ठाणे, डहाणू नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने २३ जागांपैकी १५ जागांवर विजय मिळवून बहुमत संपादन करून सत्ता संपादित करण्यात यश मिळविले आहे. |
महाड, महाडमधील रुग्णवाहिकेचे मालक सुनील चव्हाण यांनी बजावलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाड शहर पोलिसांनी चव्हाण यांच्या कार्याचा नुकताच गौरव केला. पोलीस वरिष्ठ अधिकारी सूर्यकांत जगदाळे यांनी रायगड पोलीस दलातर्फे त्यांना सन्मानपत्र प्रदान करून सुनील चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक केले. |
महाड, महाडमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते वसंत विनायक तथा अण्णा भागवत यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. |
इगतपुरी तालुक्यात अस्वच्छता व दूषित पाण्यामुळे आजार वाढले असून कवडदरा येथील आश्रमशाळेतील शिक्षकाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. |
प्रतिनिधी नाशिक नोव्हेंबर २०११ मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत येथील हर्षद बेळे याने देशाच्या क्रमवारीत सर्वसाधारण गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक मिळविला असून देशातील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये त्याचा क्रमांक १८० वा आहे उद्योग क्षेत्रातील कौटुंबिक वारसा असताना लहानपणापासून लोकसेवा करण्याची आवड असल्याने सामाजिक क्षेत्रातील कामातही हर्षदने चांगले काम केले आहे. |
प्रतिनिधी नाशिक शहरातील सिडको परिसरात घरफोडी, वाहन जाळपोळ, लूट, सोनसाखळी चोरी, अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या टिप्पर गँगच्या पाच गुन्हेगारांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. |
वार्ताहर जळगाव जिल्ह्य़ातील रावेर शहराजवळ कुसुंबा येथे हल्लेखोरांनी एका व्यक्तीचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. मंदिराच्या पुजाऱ्यासह आणखी तिघे जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत. |
चोपडा चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम बुधवारी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी होणार आहे. |
वार्ताहर, कोपरगाव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार शंकरराव देवराम काळे (९२) यांचे सोमवारी रात्री मुंबई येथील ब्रीच कँडी रूग्णालयात प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. |
नाशिक, ६ नोव्हेंबर २०१२ निफाड आणि नाशिक मधील हजारो शेतक-यांनी अपु-या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून मोर्चा काढत गंगापूर कालव्यातून गोदावरी कालव्यात पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे |
प्रतिनिधी, पुणे
सिद्धयोगाचा प्रचार आणि प्रसार यासाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ आध्यात्मिक गुरू नारायणकाका ढेकणेमहाराज (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी रात्री निधन झाले. ते नाशिक येथील सिद्ध महायोग आश्रमाचे संस्थापक-अध्यक्ष आणि गुळवणीमहाराज यांच्या पुण्यातील वासुदेव निवास ट्रस्टचे पीठाधीश्वर होते.नारायणकाकांचा जन्म ३ जुलै १९२७ रोजी धुळे येथे झाला.
|
‘लोकसत्ता’ आणि ‘झी २४ तास’ चा उपक्रम प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेची सत्ता हातात येऊन सहा महिन्याहून अधिक कालावधी लोटला असला तरी मनसेच्या स्थानिक नेत्यांसह पक्षश्रेष्ठींची असलेली निष्क्रीयता, उड्डाणपुलामागील राजकारण, मोकाट कुत्री व डासांमुळे होणारा त्रास, पाण्याची कृत्रिम टंचाई, प्रशासन व सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलेली टोलवाटोलवी, आदीं विषयांवर नाशिककरांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना धारेवर धरले. |
प्रतिनिधी, पुणे
पैठणीला केंद्र शासनाकडून पेटंट मिळूनही अजून दक्षिणेकडील राज्यांमधून येणाऱ्या सेमी पैठणीमुळे महाराष्ट्रातील पारंपरिक पैठणी व्यावसायिकांची वाट अजूनही खडतरच आहे.हस्तमागावर बनवलेली वैशिष्टय़पूर्ण पैठणी ही महाराष्ट्राची एक ओळख आहे. औरंगाबादमधील पैठण आणि नाशिक येथील येवला या ठिकाणी अनेक कुटुंबांचा हस्तमागावर पैठणी तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. |
प्रतिनिधी, पुणे
गुजराती आणि बंगालीमध्ये रंगभूमी ही चळवळ आहे, तर मराठीमध्ये रंगभूमी हा धर्म आहे. श्वास आणि जेवणाप्रमाणे नाटक ही मराठी माणसांची गरज आहे. मराठी रंगभूमीवरील नाटके आणि परिश्रम घेणारे कलाकार यामुळे ही रंगभूमी समृद्ध आहे. मराठी रंगभूमी आणि कलाकारांना माझा मानाचा मुजरा, अशी भावना प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांनी सोमवारी व्यक्त केली आणि ‘मी मराठीमध्ये असतो तर आता आहे त्यापेक्षाही अधिक चांगला अभिनेता झालो असतो,’ असेही ते म्हणाले. |
गोव्यालाही मागे टाकले विक्रम हरकरे, नागपूर बिहारमधील ऐतिहासिक पर्यटन स्थळे विदेशी पर्यटकांमध्ये लोकप्रिय झाली असून भारतात येणाऱ्या दर सहा पर्यटकांपैकी एक पर्यटक बिहारला भेट देत असल्याचे एका आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. पर्यटनात आघाडीवर असलेल्या देशातील पहिल्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगाल यांच्या तुलनेत बिहार सातव्या क्रमांकावर आहे. |
धुळे, वार्ताहर येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी या संस्थेत २००९ ते २०११ या कालावधीत अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष आणि इतर १६ जणांनी सत्तेचा व अधिकाराचा दुरूपयोग करून तब्बल १०३ कोटी ९३ लाख रूपयांचा अपहार केल्या प्रकरणी येथील न्यायालयाने संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. |
सचिन देशपांडे, अकोला प्रकाश पोहरे यांच्या गोंडखैरी येथील प्रकरणात सर्वच राजकीय पक्षांनी चुप्पी साधली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांबरोबर भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात ब्र सुध्दा उचारला नाही. भारिप-बमसंचे नेते प्रकाश आंबेडकर यांची नागपूर येथील सांत्वन भेट वगळता त्यांनी अकोल्यात चुप्पी साधली. |
वार्ताहर, हिंगोली अशुद्ध पाण्यामुळे औंढा नागनाथ व परिसरातील अनेक गावांत काविळीची साथ पसरली आहे. शहरातील रुग्णालयांत जवळपास २०० पेक्षा जास्त काविळीने त्रस्त रुग्ण सध्या दाखल आहेत. म्हाळसगाव व निशाणा या गावांतील दोघांचा काविळीने मृत्यू झाल्याची चर्चा सुरू होताच जिल्हा शल्यचिकित्सक अशोक बोल्डे यांनी औंढय़ाला भेट देऊन पथकांद्वारे रुग्णांची पाहणी केली. |
तीन नगरपालिकांवर काँग्रेसचे वर्चस्व प्रतिनिधी ,नाशिक उत्तर महाराष्ट्रातील पाच नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसने तीन ठिकाणी एकहाती वर्चस्व प्रस्थापित करत जोरदार मुसंडी मारली असताना दुसरीकडे राष्ट्रवादीची चांगलीच घसरगुंडी उडाल्याचे पहावयास मिळाले. राष्ट्रवादीच्या वाटय़ाला एकही पालिका आली नाही. |
जलंसधारण समितीची बैठक १० मिनिटांत गुंडाळली प्रतिनिधी, अलिबाग रायगड जिल्हा परिषदेचा कारभार लोकशाहीला धरून राहिलेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य श्याम भोकरे यांनी केली आहे. ते अलिबाग इथे पत्रकारांशी बोलत होते. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|