महाराष्ट्र
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय बाजारातील दुग्धजन्य पदार्थाचे दर घटले Print E-mail

तानाजी काळे, इंदापूर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरची घसरण झाल्यामुळे दूध पावडर, केसीन या दुग्धजन्य पदार्थाचे दर कमी झाले. दूध पावडरच्या दरात प्रतिकिलो १५ रुपये घट झाल्याने दुग्ध व्यावसायिक व उत्पादक शेतकऱ्यांना याची मोठी झळ बसत आहे. सध्या दूध उत्पादकास ३.५ फॅट व ८.५ डिग्रीसाठी १७ रुपये दर मिळतो. गावपातळीवर संकलन करणाऱ्या संस्थेस १.५० पैसे प्रतिलीटर, डेअरी प्लँटवर दूध आणण्यासाठी प्रतिलीटर ७५ पैसे खर्च येतो. पॉलिथीन पिशवीसाठी प्रतिलीटर ९० पैसे तर प्लँटमधील व्यवस्थापनासाठी (कर्मचारी पगार, बँक चार्जेस, लाईट बिल, डिझेल) १.५० रुपये प्रतिलीटर खर्च येतो.
 
दुधाला प्रतिलिटर दोन रु पये अनुदान देण्याची मागणी Print E-mail

राज्यातील दूध संघ १ नोव्हेंबरपासून बंद ठेवण्याचा इशारा
प्रतिनिधी, कोल्हापूर

दूध संघ व शेतकऱ्यांवर आलेल्या आर्थिक संकटाला सामोरे जाण्यासाठी कर्नाटक शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने प्रतिलिटर दोन रु पयांचे अनुदान द्यावे, या मागणीसाठी राज्यातील सर्व सहकारी व खासगी दूध संघ २७ व २८ ऑक्टोबर रोजी दूध संकलन बंद ठेवणार असल्याची माहिती राज्यातील दूध संघाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत देण्यात आली. शासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास १ नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व दूध संघ बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या दूध संघांच्या प्रतिनिधींनी घेतला.
 
रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची मारहाण Print E-mail

* नाशिक जिल्हा रुग्णालयातील प्रकार  
* पाच परिचारिकांसह दोन कर्मचारी जखमी  
प्रतिनिधी, नाशिक

विषबाधित रुग्णाचा मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातील पाच परिचारिकांसह दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद आंदोलन’ पुकारत संशयितांवर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालयात यापूर्वी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाणीचे अनेक प्रकार घडले आहेत. काही वेळा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टरांना काळे फासण्याचेही प्रकार झाले.
 
कांदा लिलाव वादावरील तोडग्यासाठी संयुक्त समिती स्थापन Print E-mail

नाशिक , प्रतिनिधी
व्यापारी व माथाडी कामगार यांच्यातील वादावर कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर व्यापारी, माथाडी कामगार, बाजार समिती, शेतकरी, सहकार विभाग यांची संयुक्त समिती स्थापन करून महिनाभरात या प्रश्नावर मार्ग काढण्याविषयी मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत सहमती दर्शविण्यात आली. तोपर्यंत कांद्याचे लिलाव सध्या ज्या पद्धतीने सुरू आहेत तसेच सुरू ठेवण्यास संबंधितांनी मान्यता दिल्यामुळे इलेक्ट्रॉनिक काटय़ावरील वजनाची नोंद बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांकडून केली जाणार आहे.

 
स्वतंत्र विदर्भ आंदोलनात प्राण फुंकण्याच्या हालचाली Print E-mail

खास प्रतिनिधी, नागपूर
स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीला मिळत असलेल्या जनतेच्या पाठिंब्यापुढे झुकून काँग्रेसने लवचिक भूमिका घेतल्याने स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीत प्राण फुंकण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी विदर्भातील जनप्रतिनिधींवर दबाव आणण्याच्या हालचालींना वेग मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाचे नेतृत्त्व विदर्भाबाहेरील नेते करणार आहेत.

 
खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत युवतींचा मेळावा - आ. सामंत Print E-mail

प्रतिनिधी, रत्नागिरी
 राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्य़ातील युवतींचा मेळावा शुक्रवारी         (१९ ऑक्टोबर) येथील वि. दा. सावरकर नाटय़गृहात आयोजित करण्यात आला असून या जंगी मेळाव्याला सुमारे पाच हजार युवती उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, मेळाव्यात सहभागी होणाऱ्या युवतींपैकी एक हजार युवतींना औरंगाबाद येथील राज्यस्तरीय मेळाव्यात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते पक्षाची सनद दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 
काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन Print E-mail

वार्ताहर, सावंतवाडी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षांनिमित्त महाराष्ट्रभर विविध विभागीय केंद्राच्या माध्यमातून काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय पातळीवर निवड झालेल्या कवींची राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा नाशिक येथील विद्यापीठाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

 
‘आजच्या जगण्याचे वास्तव कवितेतून मांडले!’ Print E-mail

वार्ताहर, सावंतवाडी
माणसाच्या जीवनमरणाच्या समस्या नव्या पिढीतील कवी दीर्घ कवितांतून मांडत आहेत. जनतेच्या कल्याणाची भावना विध्वंसक करणारी विलक्षण अपप्रवृत्ती सत्तेच्या जोरावर बळावत आहे. या भावनांना कवी अजय कांडर यांनी  ‘हत्ती इलो’ या काव्यसंग्रहातून वाट करून दिली असल्याचे मत अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले.

 
कळवण तालुक्यात वीज पडून मायलेकी ठार Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक
कळवण तालुक्यातील दळवट शिवारात मंगळवारी दुपारी वीज कोसळून झाडाखाली उभ्या असलेल्या मायलेकी ठार झाल्या. सकाळपासून असह्य़ उकाडय़ाने सर्वजण हैराण झाले असताना दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात झाली. नाशिक शहर व परिसरात केवळ दहा मिनिटे पावसाने हजेरी लावली.

 
खिचडीतून ७० विद्यार्थ्यांना विषबाधा Print E-mail

बुलढाणा / प्रतिनिधी
खामगाव तालुक्यातील कुंबेफळ येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळेतील ७० विद्यार्थ्यांना मंगळवारी दुपारी खिचडीतून विषबाधा झाली. यातील ३५ विद्यार्थ्यांना पिंपळगाव राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून काही विद्यार्थ्यांना खामगाव येथे आणण्यात येत आहे. 

 
अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक मंजूर करा Print E-mail

डॉ. दाभोळकर यांची मागणी; मुख्यमंत्र्यांची इच्छाशक्ती कमी असल्याची टीका
वार्ताहर , यवतमाळ ,८ ऑक्टोबर २०१२
alt

अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक या नावाने परिचित असलेले महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवीय अनिष्ट व अघोरी प्रथा जादुटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०११ हे विधेयक विधिमंडळात सादर करून ते मान्य करून घेण्याची जर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची राजकीय इच्छाशक्ती असेल तर हे विधेयक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर होऊ शकते, पण मुख्यमंत्र्यांची इच्छाशक्ती कमी दिसते,

 
उद्योजकांचा गुरुवारी बंद Print E-mail

वीज दरवाढीच्या निषेधार्थ काढणार मोर्चा
प्रतिनिधी , कोल्हापूर
alt

राज्य सरकारने वीज दरवाढीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने विचार करावा म्हणून वीज दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व उद्योजक, सूत गिरण्या ११ ऑक्टोबरला एक दिवसाचा बंद ठेवणार असून त्या दिवशी सर्व जण एकत्र जमून जिल्हाधिकारी व महावितरण कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील फौंड्री उद्योग, सूत गिरण्या व तत्सम उच्चदाब उद्योग व त्याचबरोबर २७ अश्वशक्तीहून अधिक जोडभार असलेले लघुउद्योग यांचे भवितव्य देशातील स्पर्धात्मक दर व शेजारील राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रातील प्रचंड वाढलेले वीजदर यामुळे अत्यंत अडचणीत आले आहे.
 
राज्याचे सिंचनाखालील क्षेत्र.. केवळ २७ लक्ष हेक्टर! Print E-mail

जलसंपदा विभागाच्या कार्यपद्धतीवर विजय पांढरे यांची टीका
प्रतिनिधी , पुणे
‘‘सिंचनाचे अंदाजपत्रक बनविताना त्यात फक्त प्रवाही सिंचन गृहित धरून खर्चाची तरतूद केली जाते. त्यामुळे राज्यात प्रत्यक्षात सांगितल्या जाणाऱ्या ४७ लक्ष हेक्टर क्षेत्राऐवजी केवळ २७ लक्ष हेक्टर क्षेत्रच सिंचनाखाली आले आहे,’’ असे प्रतिपादन मुख्य अभियंता डॉ. विजय पांढरे यांनी केले.

 
सामाजिक न्याय खात्याला न्यायालयाचा दणका ; निवासी आश्रमशाळांच्या मान्यतेचा प्रश्न Print E-mail

प्रतिनिधी , नागपूर
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने मान्यता रद्द केलेल्या निवासी आश्रमशाळांचे शिवाजीराव मोघे सामाजिक न्यायमंत्री झाल्यानंतर वेगळ्या प्रकारे पुनरुज्जीवन करण्यात आले. आश्रमशाळांचे स्थलांतरण व हस्तांतरण करताना शासन निर्णयातील नियम डावलून नातेवाईक आणि मर्जीतील लोकांना आश्रमशाळांचे वाटप केले.

 
‘जीटीएल’ने महावितरणचे सव्वाशे कोटी थकविले! Print E-mail

सुहास सरदेशमुख , औरंगाबाद
ग्राहकांकडून वसूल केलेल्या देयकांची १ अब्ज २६ कोटी ३७ लाख रुपये रक्कम ‘जीटीएल’ने थकविली आहे. महावितरण कंपनीकडे ही रक्कम तातडीने भरली जावी, तसेच रक्कम थकीत का राहते, याचा आढावा ऊर्जामंत्रिपदाचा कारभार नव्याने स्वीकारणारे राजेश टोपे येत्या दोन दिवसांत घेणार आहेत.

 
द्रुतगती मार्गावर टेम्पो-कारच्या अपघातात तीन ठार Print E-mail

प्रतिनिधी , पुणे
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सडवली गावाजवळ सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास टेम्पो व कारमध्ये झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. मृतांमध्ये कोथरूड पोलीस ठाण्यातील एका हवालदाराचा समावेश आहे.

 
मुख्यमंत्र्यांचा बोलविता धनी वेगळाच- पाटील Print E-mail

वार्ताहर , लातूर
मुख्यमंत्र्यांच्या मागून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात कोणीतरी दुसराच मोहीम राबवतो आहे. केवळ मुख्यमंत्री समोर आहेत, असा आरोप युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. डी. एन. शेळके, मुर्तूजा खान, मकरंद सावे, अविनाश रेशमे, बबन भोसले, शंकर गुट्टे या वेळी उपस्थित होते.

 
बेळगावमध्ये ११ ऑक्टोबरला एकीकरण समितीचा निषेध मोर्चा Print E-mail

विधानसौधच्या उद्घाटनाला विरोध
प्रतिनिधी , कोल्हापूर
बेळगावसह सीमाप्रश्नाचा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना कर्नाटक शासनाने विधानसौधचे उद्घाटन ११ ऑक्टोबरला करण्याचे ठरवले आहे. या अन्यायकारक भूमिकेच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने या दिवशी बेळगावमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

 
नऊ अनुदानित सिलिंडर देण्यावर काँग्रेस ठाम - ठाकरे Print E-mail

प्रतिनिधी , पुणे
वर्षांत सहा अनुदानित सिलिंडर देण्याचा निर्णय केंद्राने घेतला असला, तरी अनुदानित नऊ सििलडर देण्यावर काँग्रेस ठाम आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी केले.पुणे शहर काँग्रेसतर्फे महात्मा गांधी जयंतीपासून आयोजित करण्यात आलेल्या गांधी सप्ताहाचा समारोप सोमवारी ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

 
बालभारतीच्या कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन Print E-mail

प्रतिनिधी , पुणे
बालभारतीच्या कार्यालयीन सचिव निलिमा नाईक यांच्या विरुद्ध बालभारतीतील राष्ट्रवादी पाठय़पुस्तक मंडळ कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन केले. नाईक यांची ताबडतोब बदली करावी अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

 
<< Start < Prev 31 32 33 34 35 36 37 38 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो