महाराष्ट्र
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महाराष्ट्र
जमिनीची धूप माथेरानच्या मुळावर Print E-mail

हर्षद कशाळकर ,अलिबाग

जगभरातील पर्यटकांच्या पसंतीचे केंद्र असणाऱ्या माथेरानचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जमिनीची मोठय़ा प्रमाणात होणारी धूप माथेरानच्या मुळावर उठली आहे. या सॉईल इरोजनच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आजवर केलेले सर्व प्रयत्न निकामी ठरले आहेत. जमिनीची धूप थांबवण्यासाठी तातडीने पावले उचलली नाहीत तर माथेरानची वैभवशाली वनसंपदा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जातेय.
हिरव्यागार वनराईत वसलेले माथेरान आजवर देशविदेशातील पर्यटकांच्या पसंतीला उतरत आले आहे. डोंगरमाथ्यावर असणारे रान ही माथेरानची खरी ओळख आहे, पण माथेरानची ही ओळख आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

 
नाशिक शहरातील पाणी कपात रद्द Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील विस्कळीतपणाचे कारण देऊन जवळपास सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली महापालिकेने शहरात लागू असणारी २० टक्के पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे शहरवासीयांना आता शनिवारपासून मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी पुढील उन्हाळ्यात कोणत्या स्थितीचा सामना करावा लागेल हे सांगणे अवघड आहे.
महापालिकेत शुक्रवारी झालेल्या बैठकीत महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांनी हा निर्णय जाहीर केला. उन्हाळ्यात जलसाठा कमी झाल्यामुळे पाच महिन्यांपूर्वी शहरात २० टक्के कपात लागू करण्यात आली होती.

 
राज्यातील ७५ टक्के खरेदी-विक्री संस्था तोटय़ात, शेतकरी व्यापाऱ्यांच्या दारात Print E-mail

मोहन अटाळकर, अमरावती
शेतकऱ्यांना उत्पादित मालाच्या किफायतशीर विक्रीची संधी मिळवून देण्यासाठी राज्यात सहकारी खरेदी-विक्री संस्थांचे जाळे उभारण्यात आले खरे, पण यापैकी ७५ टक्के संस्था तोटय़ात असल्याने या संस्थांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीनेही यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.

 
रत्नागिरी जिल्ह्य़ात पावसाचा धुमाकूळ; भातपिकाचे नुकसान Print E-mail

खास प्रतिनिधी, रत्नागिरी  
यंदाच्या मान्सून पावसाचा अखेरचा टप्पा रत्नागिरी जिल्ह्य़ात चांगलाच त्रासदायक ठरत असून गेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात सरासरी सुमारे तीन इंच पावसाची नोंद झाली आहे. विशेषत: विजांच्या चमचमाटासह आज पहाटे झालेल्या वादळी पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.  गेल्या महिन्याच्या उत्तरार्धात गायब झालेला पाऊस या महिन्याच्या सुरुवातीपासून सर्वत्र पुन्हा बरसू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे.

 
लिलाव बंद ठेवणाऱ्या बाजार समित्या बरखास्तीचे निर्देश Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक
व्यापारी-माथाडी कामगार यांच्या वादामुळे शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा व धान्यमालाचे व्यवहार बंद ठेवण्याचा प्रयत्न कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यवहार बंद ठेवणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रत्यक्षात येऊ शकला नाही. शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातील ज्या बाजार समित्यांनी हे लिलाव बंद ठेवले, त्यांनीदेखील सायंकाळी कांद्याचे लिलाव सुरू करत कारवाईच्या कचाटय़ातून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

 
सप्तश्रृंग गडावर त्वरित सुविधा देण्याचे निर्देश Print E-mail

नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर आढावा बैठक
कळवण
नवरात्रोत्सवास अवघे काही दिवस राहिले असताना सप्तश्रृंग गडावर भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधा अद्यापही उभारण्यात आल्या नसल्याचे अप्पर जिल्हाधिकारी आर. के. गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली गडावर तालुक्यातील मुख्य अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या आढावा बैठकीत समोर आले. १३ ऑक्टोबपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची ताकीद या वेळी देण्यात आली. १६ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे.

 
अलिबागमध्ये आजपासून सैन्यभरती Print E-mail

अलिबाग,प्रतिनिधी
 मुंबईच्या संचालक सैन्यभरती विभागाकडून अलिबागच्या आरसीएफ मैदानावर आजपासून सैन्यभरतीला सुरुवात होणार आहे. ६ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या भरतीत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि रायगड या पाच जिल्ह्य़ांतील इच्छुक उमेदवार सहभागी होणार आहेत. भरतीसाठी आवश्यक असणारी सर्व तयारी पूर्ण झाली असून या भरतीमुळे जास्तीत जास्त स्थानिकांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार असल्याचे कर्नल हरमित सिंग यांनी सांगितले.

 
‘नासाका’चा गळीत हंगाम सुरु करण्यास जिल्हा बँकेचा अडसर Print E-mail

देविदास पिंगळेंचा आरोप
प्रतिनिधी ,नाशिक
नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी मंजूर झालेले कर्ज देण्यास नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप कारखान्याचे अध्यक्ष देविदास पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत केला. या पद्धतीने अडवणूक करत कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न राजकीय विरोधक करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 
छेडछाडविरोधात नाशिकमध्ये ‘रायुकाँ’ ची ‘हेल्पलाईन’ Print E-mail

प्रतिनिधी, नाशिक
महापालिकांच्या शाळांमधील अस्वच्छता, परिसरातील रोडरोमिओचा उच्छाद, यासंदर्भात थेट राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यात खा. सुप्रिया सुळे यांच्याकडे विद्यार्थिनींनी गाऱ्हाणे मांडल्याच्या पाश्र्वभूमीवर महापालिका शाळा क्रमांक २० येथे  शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘रास्ता रोको’आंदोलन करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष छबु नागरे यांनी दिली.

 
वैदेही चौधरी व अजिंक्य पाथरकर यांना दुहेरी मुकुट Print E-mail

स्त्री मंडळ आयोजित बॅडमिंटन स्पर्धा
प्रतिनिधी , नाशिक
वैदेही चौधरी आणि अजिंक्य पाथरकर यांनी येथे स्त्री मंडळ संस्थेच्या वतीने आयोजित व बाळासाहेब वैशंपायन ट्रस्टतर्फे पुरस्कृत बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळविला. बक्षीस वितरण सोहळा नगरसेविका सुजाता डेरे आणि डॉ. सुचेता बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.  या स्पर्धेत विविध वयोगटांमध्ये खुशी घरटे, अमेय खोंड, आर्या मोरे, विपुल शिंदे, अक्षय गायधनी यांनी एकेरीत, तर दुहेरीत श्रीपाद कुलकर्णी व रोहित उफाडे यांनी विजेतेपद मिळविले.

 
दरोडा टाकून पळणाऱ्या सहा दरोडेखोरांना अटक Print E-mail

प्रतिनिधी, अलिबाग
 माणगाव तालुक्यातील साई कोंड गावात दरोडा टाकून पळणाऱ्या सहा जणांना रायगड पोलिसांनी जेरबंद केले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुन्हा घडल्यानंतर सहा तासांच्या आत या गुन्ह्य़ातील सहा जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन तीन दरोडेखोर पसार झाले. त्यांचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली.

 
घोटीत भरदिवसा घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास Print E-mail

इगतपुरी
तालुक्यातील घोटी येथे शुक्रवारी सकाळी एका घरातून एक लाख २० हजार रुपये व जवळपास १२ तोळे दागिने, असा सुमारे साडेचार लाखांचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला. मध्यवस्तीतील नवनाथनगर येथे राहणाऱ्या पुंजाबाई भांडमुखे (४०) सकाळी सहाच्या सुमारास भाजीपाला खरेदीसाठी घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या.

 
प्रभाकर पवार यांचे निधन Print E-mail

प्रतिनिधी , नाशिक
मालेगाव येथील वीज वितरण कंपनीतील निवृत्त कर्मचारी प्रभाकर मल्हारराव पवार (६२) यांचे शुक्रवारी आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, पाच भाऊ असा परिवार आहे. दै. ‘दिव्य मराठी’च्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक जयप्रकाश पवार यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

 
पोलिसाला महिलांकडून चोप Print E-mail

प्रतिनिधी, औरंगाबाद
विवाहित महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास वैजापूर येथे महिलांनी बदडून काढले. शुक्रवारी सकाळी पोलीस कर्मचारी वसाहतीत ही घटना घडली. दीपेश चंदेल असे या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली. वैजापूर पोलीस ठाण्यासमोरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत दीपशेने एका विवाहितेची छेड काढली.

 
जलसंपदा विभागाचा जागतिक बँकेलाही ‘कात्रजचा घाट’ Print E-mail

अनिकेत साठे,नाशिक

सिंचन प्रकल्पाच्या उभारणीत निधीची भासणारी चणचण दूर करण्यासाठी जागतिक बँकेने कर्जाऊ रक्कम देताना धरणांसह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात धरण सुरक्षितता कायदा करण्याचे जे बंधन टाकले होते, तो कायदा कर्जाची रक्कम पदरात पडूनही अस्तित्वात आणण्याची तसदी जलसंपदा विभागाने घेतली नसल्याचे पुढे आले आहे. परिणामी, धरणाची मालकी असणाऱ्यांवर सुरक्षिततेची जबाबदारी, पूर्व परवानगीशिवाय बदलास प्रतिबंध आणि नियमांचे उल्लंघन केल्यास सहा महिने तुरुंगवास आणि १० हजार रूपये दंड, अशा या प्रस्तावित कायद्यातील अनेक महत्वपूर्ण तरतुदी निव्वळ कागदावर राहिल्या आहेत.

 
व्यापारी-माथाडी कामगारांच्या वादात नाशिकमध्ये कांदा लिलाव ठप्प Print E-mail

प्रतिनिधी,नाशिक

कांदा विक्री प्रक्रियेत इलेक्ट्रॉनिक काटय़ावर केलेल्या वजनाच्या पावतीचा क्रमांक टाकण्याच्या मुद्यावरून व्यापारी व माथाडी कामगार संघटना यांच्यात निर्माण झालेल्या वादंगात गुरूवारी दुपारपासून नाशिक जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा लिलाव प्रक्रिया ठप्प झाली. माथाडी कामगार संघटनांनी व्यापाऱ्यांची मागणी धुडकावत आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे अनिश्चित काळासाठी हे लिलाव पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या संदर्भात नऊ ऑक्टोबरला कामगारमंत्र्यांसमवेत व्यापारी, माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक होणार असून त्यात काही तोडगा निघू शकेल, अशी अपेक्षा आहे.
 
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या कारभारावर उच्च न्यायालयाचे ताशेरे Print E-mail

आदर्श महाविद्यालय स्थापनेचा निर्णय नव्याने घ्यावा
प्रतिनिधी, औरंगाबाद

जालना जिल्ह्य़ातील आदर्श महाविद्यालयाच्या स्थापनेचे ठिकाण कोठे असावे, या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्यासह कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे व उपकुलसचिव डॉ. मांझा यांच्या दबावाला बळी न पडता आठ आठवडय़ांत नव्याने पुनश्च निर्णय घ्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. बी. पी. धर्माधिकारी व न्या. एस. पी. देशमुख यांनी दिला. आदर्श महाविद्यालयासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेले निकष पाळले जावेत, ते निकष डावलले गेले आहेत काय, याची चौकशी विद्यापीठ अनुदान आयोगाने व राज्य शासनाने स्वतंत्रपणे करावी.
 
२४ वर्षांत ‘गोसी खुर्द’वर खर्च ४९७५ कोटींचा, पाच वर्षांपासून सिंचन मात्र २५०० हेक्टरचे ! Print E-mail

देवेंद्र गावंडे, चंद्रपूर  
गेल्या २४ वर्षांत राज्याच्या जलसंपदा खात्याने गोसी खुर्द प्रकल्पावर ४ हजार ९७५ कोटी रुपये खर्च केले. पाच वर्षांपूर्वी बांधून पूर्ण झालेल्या या धरणातून आजमितीला केवळ अडीच हजार हेक्टर शेतीचे सिंचन होत आहे. मूळ प्रकल्प मार्गी न लावता त्याचा विस्तार करून कंत्राटदाराचे भले करण्याच्या वृत्तीमुळेच ही स्थिती उद्भवल्याचे आता खात्यातले वरिष्ठ अधिकारी बोलून दाखवत आहेत.

 
पिंपरीत मंदीमुळे जकात उत्पन्नाला फटका Print E-mail

वर्षभरासाठी टार्गेट १३०० कोटींचे; सहा महिन्यांत ५८४ कोटी
प्रतिनिधी , पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ‘श्रीमंती’ अवलंबून असणाऱ्या जकात विभागाला सध्याच्या औद्योगिक मंदीचा फटका बसू लागल्याचे चित्र पुढे आले आहे. वर्षभरासाठी १३०० कोटींचे उद्दिष्ट ठरवून दिलेल्या जकात विभागाने सहा महिन्यांच्या कालावधीत ५८४ कोटी रुपये म्हणजे अपेक्षेपेक्षा ६६ कोटी रुपये कमी उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे उर्वरित सहा महिन्यांमध्ये तब्बल ७१६ कोटी रुपये मिळवण्याचे अवघड आव्हान जकातीसमोर आहे. अ‍ॅटोमोबाइल क्षेत्रातील मंदीचा उद्योगनगरी असलेल्या िपपरी-चिंचवडला फटका बसू लागला आहे.
 
खंडकऱ्यांचे जमीनवाटप मार्गी Print E-mail

औरंगाबाद खंडपीठाने  स्थगिती उठवली
प्रतिनिधी, श्रीरामपूर
शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचा ताबा देण्यास दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज उठविली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एन. एच. पाटील व न्यायमूर्ती ए. बी. चौधरी यांनी आज हा निकाल दिला. नगर जिल्हय़ात सुमारे १५ हजार एकर जमिनीचे खंडकऱ्यांना वाटप केले जाणार आहे.

 
<< Start < Prev 31 32 33 34 35 36 37 38 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो