वार्ताहर, मालेगाव
तालुक्यातील चिंचावड येथे शिवसेनेचे सचिव आ. विनायक राऊत यांच्या हस्ते पार पडलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या जलपूजनप्रसंगी बुधवारी शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुद्ध रंगल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. बंधाऱ्याचे काम अपूर्ण असल्यामुळे लाभक्षेत्रातील तीन गावांच्या ग्रामसभांनी विरोध केल्यावरही शिवसेनेतर्फे घाईघाईत जलपूजनाचा हा कार्यक्रम रेटण्यात आल्याचा आरोप मनसेने केला असून, आ. दादा भुसे यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. काही विघ्नसंतोषी मंडळींनी स्थानिक शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरविल्याचा आरोप करतानाच चांगल्या कामात खोडा घालणाऱ्यांना तशाच पद्धतीने उत्तर देण्यात येईल, असा इशाराही भुसे यांनी दिला.
|
प्रतिनिधी, अलिबाग
कोकणात ठिकठिकाणी आज साखरचौतीच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अलिबाग, पेण, पनवेल, उरणमध्ये वाजतगाजत मोठय़ा उत्साहात लाडक्या गणपतीचे आगमन करण्यात आले. या गणपतीचा पुराणात काही इतिहास आढळत नसला तरी अलीकडच्या कोकणात साखरचौतीचा गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होऊ लागला आहे. भाद्रपद महिन्यातील मुख्य गणेशोत्सव संपल्यानंतर येणाऱ्या वद्य चतुर्थीला या गणपतींची स्थापना केली जाते. कुठे दीड दिवस, तर कुठे पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो. कोकणात घराघरांत गणेशोत्सव साजरे होत असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव फारसे साजरे होत नाहीत.
|
रत्नागिरी
रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथील श्रीराम विद्यालय व तु. पुं. शेटय़े कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘यशस्वी भव’ या दहावीच्या अभ्यासाने परिपूर्ण पुस्तिकेच्या वितरणाचा समारंभ पार पडला. या प्रसंगी वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मारुती डोळस ऊर्फ दादा उपस्थित होते. या विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाला मदत व्हावी म्हणून गेली पाच-सहा वर्षे सातत्याने ‘लोकसत्ता’ या वर्तमानपत्राचे वितरण केले जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला रोजचा पेपर मिळत असल्याने त्यांच्या सामान्यज्ञानात भर पडत आहे.
|
साहित्य संमेलनपूर्व कार्यक्रमाचे उद्घाटन खास प्रतिनिधी, रत्नागिरी चिपळूण येथील आगामी ८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्जनशील कलाकार आणि उद्योजक संघटित झाल्याचे चित्र साहित्य संमेलनपूर्व कार्यक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना बघावयास मिळाले.चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या सभागृहात मंगळवारी संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध चित्रपट निर्माते-कला दिग्दर्शक नितीन देसाई, सर्जनशील संगीतकार कौशल इनामदार, उद्योजक महेश नवाथे, संजय भुस्कुटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
|
प्रतिनिधी, नाशिक साधारणत: दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, तोफखाना स्कूल व पोलीस आयुक्तालयाची रेकी करून घातपात घडविण्याच्या तयारीत असल्याच्या प्रकरणात अटकेत असणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी अबु जुंदालची २४ दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर येथील न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणातील अन्य संशयित शेख लालबाबा मोहंमद हुसेन उर्फ बिलाल आणि हिमायत बेग यांची साक्ष नोंदविण्याचे कामही सुरू झाले आहे. |
प्रतिनिधी, नाशिक काही दिवसांपासून अंतर्धान पावलेल्या पावसाने दोन ते तीन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जोरदार हजेरी लावल्याने एकिकडे पाणी टंचाईची तीव्रता कमी होणार असली तरी वादळी पावसाने दोन जणांचा बळी घेतला. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे वीज कोसळल्याने दोन जण ठार झाले. वादळामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तसेच दूरध्वनी खांबांचे नुकसान झाल्याने विद्युत व दूरध्वनी व्यवस्था कित्येक तास विस्कळीत झाली. |
वार्ताहर , सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात वन्यप्राणी शेतकरी-बागायतदारांची प्रचंड नुकसानी करत असूनही शासन किंवा लोकप्रतिनिधी त्याकडे डोळसपणे पाहात नाहीत. त्यामुळेच शेतकरीवर्गाची मेहनत मातीत मिळत असल्याचे बोलले जाते. गेल्या पाच ते सहा वर्षांत हत्ती, गवारेडे, माकड या सर्वानी मिळून दहा ते पंधरा कोटींची नुकसानी केली आहे. |
वार्ताहर , सावंतवाडी भातकापणीचा हंगाम सुरू होताच जंगली हत्तींचा वावर वाढू लागला. सावंतवाडी शेजारील कारीवडे व चराठे भागांत भातशेती तुडवत इन्सुली भागात पोहोचलेल्या चार हत्तींनी डेगवे, डिंगणे भागांत आपला मुक्काम केल्याची शक्यता वनखात्याने व्यक्त केली. गेल्या दहा वर्षांच्या काळात कोटय़वधीची नुकसानी करणाऱ्या हत्तींचा वावर पुन्हा एकदा सुरू झाला आहे. |
वार्ताहर, सावंतवाडी कवी अजय कांडर यांच्या ‘हत्ती इलो’ या काव्यसंग्रहाचे येत्या ६ ऑक्टोबर रोजी अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, कवी वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. सिंधुदुर्ग साहित्य संघ आणि श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वा. श्रीराम वाचन मंदिरमध्ये कार्यक्रम होणार आहे. |
वार्ताहर, जळगाव महापौर पदाचा कार्यकाल पाच किंवा अडीच वर्षांचा योग्य असताना केवळ राजकीय गणित सोडविण्यासाठी आणि भविष्यातील लाभासाठी आता केवळ सहा-सहा महिन्यांत महापौरपद बदलण्यात येत असल्याने शहराच्या विकासकामांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. सहा महिन्यांच्या अत्यंत कमी अवधीत कोणताच महापौर शहर विकासाच्या दृष्टीने निर्णय घेऊ शकत नसल्याने लोकशाहीस घातक अशी ही पद्धत बंद करण्याचे आवाहन मानवी अन्याय निवारण केंद्राने केले आहे. |
प्रतिनिधी, नाशिक शैक्षणिकसह इतर पातळींवरील उपक्रम, क्रीडा शिक्षण, कार्यक्षम अध्यापन, अध्यापक कल्याण व विकास, पालकांचा सहभाग, शिस्त व जीवनकौशल्यावर आधारित शिक्षणप्रणाली, समाजसेवा, या निकषांच्या आधारे येथील ‘ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल’ची पुन्हा राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. ‘सी-फोर एज्युकेशन वर्ल्ड सव्रे’च्या सर्वेक्षणानुसार देशातील पहिल्या दहा बोर्डिग स्कूलमध्ये ऑर्किडचा समावेश करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. |
वार्ताहर, सावंतवाडी सुमारे ५२५२ मोदकांचा नैवेद्य आज संकष्टी चतुर्थीदिनी वैश्यवाडा हनुमान मंदिरात स्थानापन्न असलेल्या श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आला. आज दुपारी महाआरतीनंतर हा ‘सहस्र मोदक नैवेद्य अर्पण सोहळा’ संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम झाला. |
प्रतिनिधी , नाशिक उस्मानाबाद येथे चार ते सात ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या महाराष्ट्र राज्य खो-खो अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेसाठी कुमार व मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाचा निरोप समारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार यांच्या उपस्थितीत झाला. |
|
|
<< Start < Prev 31 32 33 34 35 36 37 38 Next > End >>
|