प्रतिनिधी, अलिबाग जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांना अपात्र ठरवा, अशी मागणी काँग्रेस प्रतोद राजेंद्र पाटील यांनी केली आहे. ते अलिबाग इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. दिलीप भोईर हे गेल्या दीड महिन्यांपासून कुठल्याही कारणाशिवाय बेपत्ता आहेत. |
सावंतवाडी, ५ नोव्हेंबर मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे म्हणून सहा जिल्ह्य़ांतील वकील संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वकिलांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला आहे. आज वकिलांनी न्यायालयीन कामकाजात सहभाग दर्शविला नाही, असे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड्. दिलीप नार्वेकर यांनी बोलताना सांगितले. |
सावंतवाडी, ५ नोव्हेंबर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आज ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. जिल्ह्य़ातील अनेक भागांत या पावसाचे आगमन झाले असल्याने बागायतदार शेतकरी वर्गाची धावपळ उडाली.सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांत पावसाच्या आगमनाने भातशेती, आंबा व काजू बागायतदार त्रस्त झाले आहेत. |
जिल्हा निवड चाचणी कबड्डी प्रतिनिधी, अलिबाग रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या जिल्हा निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुरुष गटात भैरवनाथ पेझारी संघावर एकतर्फी मात करीत श्री विठ्ठल कोपरपाडा संघाने अंतिम विजेतेपद पटकावले. महिलांमध्ये दिलखुश आवास संघाने स. रा. तेंडुलकर विद्यालय, रेवदंडा संघाचा पराभव करीत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली. |
प्रतिनिधी , नाशिक इंटनेट जगतात कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या संकेतस्थळांमध्ये भारतीय कंपन्याही दिसू लागल्या असून भारतीय भाषांचा शब्दकोष म्हणून ज्याचा गौरव होतो, त्या www.khandbahale.com या भारतीय संकेतस्थळाने प्रतिमहिना एक कोटी हिट््सचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करण्यात यश मिळवले आहे. |
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलनाच्या पवित्र्यात अलिबाग, ५ नोव्हेंबर कुरुळ ग्रामपंचायत हद्दीत राबविण्यात येणारी पेयजल योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अलिबाग तालुका उपतालुकाध्यक्ष धनंजय म्हात्रे यांनी केला आहे. |
मुरुड, ५ नोव्हेंबर अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघाच्या कार्यतत्पर आमदार मीनाक्षी पाटील यांनी आज तातडीने विहूर धरणास भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व सदस्य पंडित पाटीलही उपस्थित होते. |
कर्जत, ५ नोव्हेंबर कर्जत तालुक्यातील कोंदिवडेनजीकच्या कोंढाणे येथील प्रगतिशील शेतकरी विनायक गोगटे तथा बापू गोगटे यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. |
महाड, ५ नोव्हेंबर : महाड तालुक्यातील काँग्रेसची सत्ता असलेल्या बिरवाडीमधील कुंभारवाडा मोहल्ला ग्रामस्थांनी पाणी समस्येवरून पंचायतीच्या कार्यालयामध्ये हल्लाबोल केला. गेल्या दोन दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई असताना पंचायतीने दुर्लक्ष केल्याने संतप्त ग्रामस्थांनी सरपंच लक्ष्मण पवार यांना घेराव घालून पंचायतीच्या अनागोंदी कारभाराचा निषेध व्यक्त केला. |
प्रतिनिधी ,अलिबाग स्वदेश फांऊडेशनच्या दोन कार्यकर्त्यांची कौन्सिल ऑफ इंटरनॅशनल फेलोशिपच्या वतीने परदेश दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. स्वदेश फाऊंडेशन गोरेगावमध्ये कृषी अधिकारी म्हणून काम करणारे बाबासाहेब चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते अमोल चौगुले, अशी या दोघांची नावे आहेत. |
नाशिक, ५ नोव्हेंबर २०१२ नाशिक काँलेज रोड परिसरातील एका माँलला लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीरित्या जखमी झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात घडल्याचे अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी स्पष्ट केले. |
वार्ताहर, सावंतवाडी, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२ मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी येत्या ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत सहा जिल्ह्य़ांतील वकील संघटनांनी आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे.
|
वार्ताहर सावंतवाडी सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणाच्या येथे गोडबोले गेट बसवून पाणी साठवण दुप्पट करण्याच्या योजनेची प्रत्यक्ष पाहाणी नाशिकमधील तज्ज्ञांनी केली. त्यामुळे गोडबोले गेटच्या प्रस्तावास मान्यता मिळवून प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याची आशा निर्माण झाली आहे. |
वार्ताहर वाई छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी रविवारी सुरक्षा चौक्यांवर केलेल्या सशस्त्र हल्ल्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले. यात उडतारे ता. वाई येथील राजेंद्र अर्जुन कुंभार यांचा समावेश आहे. |
प्रतिनिधी नाशिक इंटनेट जगतात कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या संकेतस्थळांमध्ये भारतीय कंपन्याही दिसू लागल्या असून भारतीय भाषांचा शब्दकोष म्हणून ज्याचा गौरव होतो, त्या www.khandbahale.com या भारतीय संकेतस्थळाने प्रतिमहिना एक कोटी हिट््सचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करण्यात यश मिळवले आहे. |
प्रतिनिधी नाशिक सिन्नर येथील औष्णिक वीज प्रकल्प आणि विशेष आर्थिक क्षेत्रासाठी प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी नाशिक, निफाड आणि सिन्नर तालुक्यांतील १० गावांतील भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सात नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात शेतकऱ्यांची वाटाघाटीसाठी अंतिम बैठक आयोजित करण्यात आली आहे. |
घराची लॉटरी लागलेल्या सदस्यांना मार्गदर्शन वार्ताहर सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील गिरणी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. ज्यांना घरांची लॉटरी लागली त्या सर्वाना कायदेशीर मार्गदर्शन करण्याची तयारी ठेवली असून घराची लॉटरी ज्यांना लागली आहे त्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असल्याचे मत गिरणी कामगारांचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दिनकर मसगे यांनी व्यक्त केले. |
प्रतिनिधी अलिबाग गेल्या वर्षभरापासून रखडलेली जिल्हा नियोजन समिती बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. तब्बल साडेसात तास चालल्या या मॅरॅथॉन बैठकीत २०१३-२०१४ साठीच्या १८३ कोटीच्या प्रारूप आराखडय़ाला मंजुरी देण्यात आली. |
वार्ताहर मालेगाव मांडूळ विक्रीचे आमिष दाखवून लोकांना ठगविणाऱ्या आठ जणांच्या टोळीचा येथील विशेष पोलीस पथकाने छडा लावला आहे. गिऱ्हाईक म्हणून गेलेल्या पोलिसांकडून पैसे घेऊन हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीतील सदस्यांपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने या तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. |
प्रादेशिक नाशिक नाशिक व पुणे येथील सहकार खात्याचे अधिकारी हे जाणीवपूर्वक बँक व पतसंस्था ठेवीदारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे शहरातील खुटवडनगर येथे झालेल्या ठेवीदारांच्या बैठकीतील चर्चेतून समोर आल्याने नाशिक व पुणे येथील सहकार कार्यालयांपुढे सात व नऊ नोव्हेंबर रोजी निदर्शने करण्याचा निर्णय नाशिक जिल्हा बँक ठेवीदार हितवर्धक तथा बचाव समितीच्या बैठकीत घेण्यात आला. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|