सिटूचा इशारा प्रतिनिधी , नाशिक शहरातील सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये कार्यरत हंगामी व प्रशिक्षणार्थी कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस द्यावा, अन्यथा कंपनी मालकांच्या घरांसमोर दिवाळीऐवजी शिमगा साजरा करण्यात येईल, असा इशारा सिटूतर्फे देण्यात आला आहे.
प्रतिनिधी , नाशिक नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत येथील एचपीटी व आरवायके विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्ण कामगिरी करीत यश मिळविले.
मनमाड पालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेंद्र पगारे यांची शुक्रवारी आयोजित विशेष सभेत अपेक्षेप्रमाणे नगराध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. पगारे यांना २२, तर शिवसेनेचे गटनेते संतोष बळीद यांना ४ मते मिळाली.
महाराष्ट्रात मद्य विक्रीचा उच्चांक देशी दारू शौकिनांचीही संख्या वाढली खास प्रतिनिधी,
नागपूरमहाराष्ट्र सरकारला मद्यविक्रीच्या माध्यमातून ३० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. महसूल वसुलीचे हे चित्र कितीही हिरवेगार वाटत असले तरी यामुळे भावी पिढी व्यसनाधीन होत आहे. व्यसनी पिढी सारासार विवेकबुद्धीने विचार करू शकत नाही. हे अभिमानाचे नव्हे तर लाजिरवाणे चित्र आहे.- डॉ. अभय बंग , सामाजिक कार्यकर्त महाराष्ट्रात मद्यावर सर्वाधिक कर लादण्यात आल्यानंतरही मद्यशौकिनांना याचा फरक पडलेला नाही, असेच चित्र उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीने स्पष्ट झाले आहे.
विशेष प्रतिनिधी, पुणे
‘‘ऊसदराच्या आंदोलनामुळे कारखाने बंद पडले तर शेतकरी ऊस कुठे घालणार? चांगला भाव घेण्याचा शेतकऱ्यांना अधिकार आहे, त्यासाठी बसून निर्णय करावा लागेल, पण आंदोलनामुळे कारखानेच बंद पडायला लागले तर ते योग्य ठरणार नाही,’’ अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आंदोलक शेतकऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला.