प्रतिनिधी, मुंबई
कानठिळ्या बसवणाऱ्या फटाक्यांसदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन केले जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे. मात्र, निर्देशांची अमलबजावणी करणारी कुठलीही प्रभावी यंत्रणा राज्यात अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. परिणामी १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या अर्थात कानठळी फटाक्यांची विक्री खुलेआम मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. |
विकासाची भकासवाट भाग - ७ संदीप आचार्य, मुंबई
उत्तर प्रदेश व बिहारमधून मुंबईवर रोजच्या रोज लोंढे कोसळत आहेत. मुंबईतील मोकळ्या जागा संपुष्टात येत चालल्या आहेत. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार निवडणुकीच्या तोंडावर अनधिकृत झोपडय़ांना संरक्षण देण्याच्या घोषणा करत असते. या झोपडय़ांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या नरकयातना आणि आरोग्याचा प्रश्न आगामी काळात गंभीर होणार आहे. |
प्रतिनिधी, मुंबई
खाण्याच्या वाईट सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे भारतात १२ ते २५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढते तर आहेच; पण या लहान रुग्णांमध्ये मधुमेहाची तीव्रताही खूप जास्त असल्याची माहिती पुढे येत आहे.या आजाराची लागण होण्याचे प्रमाण मुलांमध्ये वाढते आहे. मधुमेहाचे हे लहान रुग्ण आतापर्यंत आजाराच्या पहिल्या टप्प्यावर असत. पण, लहान मुलांमध्ये मधुमेहाच्या तीव्रतेचा दुसऱ्या टप्पा गाठण्याचे प्रमाण आता जवळपास ५०टक्क्य़ांच्या आसपास आहे. |
प्रतिनिधी, मुंबई आझाद मैदान हिंसाचारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी ५७ दंगलखोरांवर आरोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र ३३८४ पानांचे आहे. सहा खंडांमध्ये विभागलेल्या या आरोपपत्रात चारजणांविरुद्ध महिला पोलिसांचा विनयभंग केल्याचा आरोप, तर २२ आरोपींवर पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याशिवाय आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न करणे, दंगल उसळविणे असे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. |
विशेष प्रतिनिधी , मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती अतिनाजूक बनली असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला व आईसमवेत शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दसरा मेळाव्यात चित्रफितीच्या माध्यमातून बाळासाहेबांनी आपल्या प्रकृतीची कल्पना दिली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती दोलायामानच आहे. |
संदीप आचार्य, मुंबई
उत्तर प्रदेश व बिहारमधून मुंबईवर रोजच्या रोज लोंढे कोसळत आहेत. मुंबईतील मोकळ्या जागा संपुष्टात येत चालल्या आहेत. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार निवडणुकीच्या तोंडावर अनधिकृत झोपडय़ांना संरक्षण देण्याच्या घोषणा करत असते. या झोपडय़ांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या नरकयातना आणि आरोग्याचा प्रश्न आगामी काळात गंभीर होणार आहे. |
विशेष प्रतिनिधी, मुंबई
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे दोन दिवसांच्या भेटीसाठी उद्या सपत्निक मुंबईत दाखल होत आहेत. या दौऱ्यात ते एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटला भेट देणार असून तेथील एका नव्या सुविधा केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. त्याशिवाय एका खाजगी कार्यक्रमासही ते उपस्थित राहणार आहेत.शनिवारी रात्री पंतप्रधानांचा मुक्काम येथील राज भवनावर असेल, रविवारी सकाळी ते दिल्लीला रवाना होतील, असे सूत्रांनी सांगितले. |
मनोहर जोशी रुग्णालयात |
|
|
विशेष प्रतिनिधी , मुंबई
शिवसेना नेते मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडल्यामुळे शुक्रवारी दुपारी त्यांना दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.मनोहर जोशी यांना मूत्रमार्गातील बिघाडामुळे सुश्रुशा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आवश्यक त्या चाचण्या झाल्यानंतर एक-दोन दिवसात त्यांना घरी पाठविण्यात येणार आहे. |
प्रमाणपत्र नसल्याने अर्ज रद्द महापौर निवडणुकीत रंगले नाटय़ राष्ट्रवादीच्या पदरात नामुष्की विरोधकांचे अर्जही ठरले बाद प्रतिनिधी, नवी मुंबई नवी मुंबई महापालिकेत पाशवी बहुमत असूनही जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार आणि विद्यमान महापौर सागर नाईक यांचा ऊमेदवारी अर्ज शुक्रवारी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविला. |
प्रतिनिधी, ठाणे ठाणेकरांना दिवाळीची खरेदी मुक्तपणे करता यावी, या उद्देशाने ठाणे वाहतूक पोलिसांनी शहरातील मुख्य बाजार पेठेच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूक मार्गामध्ये मोठे बदल केले असून या संदर्भात अधिसुचना काढली आहे. येत्या १५ नोव्हेंबपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत. |
‘सनातन’वर बंदी घालण्याची मात्र केंद्राला शिफारस प्रतिनिधी, मुंबई दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या पुणे येथील ‘अभिनव भारत’वर बंदी घालण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही राज्य सरकारने त्याबाबत आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. |
विखंडीत ठरावाच्या वादावर पडदा प्रतिनिधी, ठाणे भांडवली मुल्यावर आधारीत कर प्रणालीच्या मुद्यावरून सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेविकांनी केलेल्या ठिय्या आंदोलनाचे पडसाद शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत उमटले. या घटनेचा राष्ट्रवादीच्या सदस्यांनी निषेध व्यक्त केल्याने शिवसेनेचे सदस्य चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. |
प्रतिनिधी, ठाणे अंबरनाथ नगरपालिकेतील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सहा हजार शंभर रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय नगरसेवकांनी शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत घेतला. या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीवर सुमारे ७० लाखांचा बोजा पडणार आहे. |
प्रतिनिधी, मुंबई मुंबईत अंदाधुंदपणे उभारण्यात आलेल्या मोबाइल टॉवरविरुद्ध महापालिकेने कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे एका इमारतीवर दोनपेक्षा अधिक टॉवर उभारण्यास परवानगी देण्यात येणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांनी सांगितले.
|
बी. जी. शिर्के’वर ‘म्हाडा’ची मेहेरनजर निशांत सरवणकर, मुंबई गेली अनेक वर्षे रखडलेल्या धारावी प्रकल्पातील एका सेक्टरमधील झोपडीवासीयांच्या पुनर्वसनाचे कंत्राट देताना ‘म्हाडा’ने ठरलेल्या दरापेक्षा ३०० टक्के अधिक दर अदा केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आतापर्यंत म्हाडाची घरे बांधणाऱ्या व कामाच्या दर्जाबद्दल तक्रारी असलेल्या मे. बी. जी. शिर्के या कंपनीनेच हे कंत्राट पटकावण्यात यश मिळविले आहे. |
रिझव्र्ह बँकेचे अन्य बँकांना निर्देश पीटीआय, मुंबई शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करणारा विद्यार्थी बँकेच्या कार्यक्षेत्रात राहात नसला तरी त्याच्या कर्जाचा अर्ज नाकारू नये, अशी सूचना रिझव्र्ह बँकेने सोमवारी अन्य बँकांना केली आहे. |
औद्योगिक सवलतींचा बोजा सर्वसामान्यांवर ? प्रतिनिधी, मुंबई मागच्या वर्षीच्या वीजदरवाढीतील थकलेल्या ८१६ कोटींसह ‘महावितरण’ने एकूण २५०० कोटी रुपयांची वीजदरवाढ मंजूर करण्याची मागणी शुक्रवारी राज्य वीज नियामक आयोगासमोर केली. मात्र, ग्राहक प्रतिनिधींनी त्यास तीव्र विरोध करत ती चुकीची असल्याची भूमिका मांडली. |
खास प्रतिनिधी ,नवी मुंबई बांगलादेशाहून मुंबईत आणलेल्या आपल्या सावत्र बहिणीला एक लाख वीस हजार रुपयांना विकताना नवी मुंबई खंडणीविरोधी पथकाने तळवली गावातून एका त्रिकूटाला अटक केली. |
निवडणुकीतील अर्ज बाद विरोधकही बाद झाल्याने पराभव मात्र टळला प्रतिनिधी, नवी मुंबई नवी मुंबई महापालिकेत पाशवी बहुमत असूनही जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार आणि विद्यमान महापौर सागर नाईक यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविला. |
पीटीआय, मुंबई शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करणारा विद्यार्थी बँकेच्या कार्यक्षेत्रात राहात नसला तरी त्याच्या कर्जाचा अर्ज नाकारू नये, अशी सूचना रिझव्र्ह बँकेने सोमवारी अन्य बँकांना केली आहे.अनेकदा बँक शैक्षणिक कर्ज मागणारा विद्यार्थी आपल्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे स्पष्ट करीत कर्ज नाकारतात. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|