वीज आयोगासमोर शुक्रवारी सुनावणी प्रतिनिधी मुंबई मागच्या वर्षी मंजूर केलेल्या ३२६५ कोटी रुपयांच्या वीजदरवाढीपैकी ८१६ कोटींची वसुली वीज नियामक आयोगाच्या चुकीच्या आदेशामुळे प्रलंबित राहिल्याकडे लक्ष वेधत ‘महावितरण’ या ८१६ कोटी रुपयांची वसुली तीन महिन्यांत करण्याची परवानगी मागणारी याचिका ‘महावितरण’ने दाखल केली आहे. |
नव्या वेतन कराराबाबत असंतोष खास प्रतिनिधी ठाणे इतर शासकीय आस्थापनांच्या तुलनेत अतिशय कमी वेतन असणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या हाती नव्या करारानेही फारसे भरीव काही पडणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी दिवाळीनंतर संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. |
प्रतिनिधी कल्याण कल्याण पश्चिमेतील आनंद दुबे या बांधकाम व्यावसायिकाकडे पाच कोटींची खंडणी मागण्याचा आरोप असलेले मोहने विभागाचे शिवसेनेचे उपविभागप्रमुख अंकुश जोगदंड यांना दोन दिवसांच्या चौकशीनंतर ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. |
प्रतिनिधी मुंबई डिसेंबर २०१२ मध्ये राज्यभर संपूर्ण भारनियमनमुक्ती साजरी करण्यासाठी वीज कमी पडत असल्याने ‘महावितरण’ने पुन्हा एकदा बाजारपेठेकडे मोर्चा वळवला असून ३०० मेगावॉट अल्पकालीन वीजखरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. |
अंबरनाथ पालिका निवडणूक प्रतिनिधी ठाणे अंबरनाथच्या नगराध्यक्षपदासाठी सोमवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीच्या वेळी गैरहजर राहणाऱ्या आघाडीच्या ‘त्या' चार नगरसेवकांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. |
प्रतिनिधी, मुंबई विद्याविहार येथे रविवारी रात्री पोलिसांनी केलेल्या मारहाणीत कल्याण साळवे (वय १७) या युवकाच्या ओढवलेल्या मृत्यूवरून सोमवारी संध्याकाळी दोन हवालदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
गोंधळात गोंधळ प्रतिनिधी, मुंबई एमबीबीएस आणि बीडीएस या आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय स्तरावर होणाऱ्या ‘नीट’ या सामाईक प्रवेश परीक्षेच्या अंमलबजावणीतील गोंधळाचे कारण देत राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या संघटनेने २०१३ या वर्षांसाठीही आपली ‘असो-सीईटी’ घेण्याचे जाहीर करून आपला सवतसुभा मांडला आहे. |
प्रतिनिधी मुंबई दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना तातडीने सानुग्रह अनुदान मंजूर करावे, यामागणीसाठी येत्या गुरुवारी वडाळा आगार येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. |
प्रतिनिधी मुंबई आझाद मैदानात ११ ऑगस्ट रोजी उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेल्या आणखी १४ जणांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. |
प्रतिनिधी मुंबई सुमारे साडेपाच लाख रुपयांचे केशर तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या इराणच्या नागरिकास सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने मंगळवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले. |
प्रतिनिधी कल्याण कल्याण-डोंबिवली पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मंगळवारी दहा हजार एक रुपया दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला. पालिकेतील ६ हजार ४०० कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. |
वसई /प्रतिनिधी- मीरा-भाईंदर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत उद्या बुधवारी महापौर कॅटलीन परेरा यांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांची बैठक होणार आहे. |
प्रतिनिधी कल्याण कल्याण रेल्वे स्थानकालगतच्या एस.टी. बस स्थानकातून रविवारी रात्री झोपेत असलेल्या श्रद्धा या अकरा महिन्यांच्या बालिकेचे अपहरण करण्यात आले आहे. |
प्रतिनिधी, मुंबई बीजगणितीय भूमितीत जागतिक स्तरावर ठसा उमटवणारी कामगिरी करणारे ज्येष्ठ गणितज्ज्ञ प्रा. श्रीराम अभ्यंकर यांची शोकसभा पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. |
प्रतिनिधी मुंबई विद्याविहार येथे रविवारी रात्री पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या कल्याण साळवे प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. |
मुंबई, ६ नोव्हेंबर २०१२ मुंबईतील हाजीअली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. हाजीअली दर्ग्याला दररोज हजारो नागरिक भेट देत असतात, परंतू दर्ग्याच्या विश्वस्तांनी दर्ग्यात महिलांच्या प्रवेशाला बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय अंतिम असल्याचेही स्पष्ट केले आहे.
|
मुंबई, ६ नोव्हेंबर २०१२ पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब गेल्या एक आठवड्यापासून तापाने आजारी होता. परंतू आता त्याची प्रकृती ठीक असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी विनोद लोखंडे यांनी सोमवारी स्पष्ट केले. |
प्रतिनिधी, मुंबई
स्त्रीरोगविज्ञान आणि प्रसुतीशास्त्र या विषयातील तज्ज्ञांच्या ‘फेडरेशन ऑफ गायनॉकॉलॉजी अँड ऑबस्ट्रेटिक्स’ (फिगो) या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. सी. एन. पुरंदरे यांची निवड झाली आहे. इटलीत सुरू असलेल्या फेडरेशनच्या २०व्या आंतरराष्ट्रीय संमेलनात त्यांची निवड झाली आहे. डॉ. पुरंदरे हे संस्थेच्या नियमाप्रमाणे २०१५ मध्ये पदभार स्वीकारणार आहेत.
|
जबाबदारी कुणाची? विकासाची भकासवाट - भाग झ्र् ३ संदीप आचार्य, मुंबई
कोणत्याही शहराचे नियोजन करताना मोकळ्या जागांचे प्रमाण लोकसंख्येच्या प्रमाणात निश्चित केले जाते. शिवाजी महाराजांनी रायगडाची बांधणी करताना बाजारपेठ, पाण्याच्या टाक्या, निवास व्यवस्था आदींचा विचार केल्याचे दिसून येते.अगदी मोहेंजोदडो-हरप्पा संस्कृती काळातही शहरे नियोजनबद्ध असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात मात्र, राजकारणी आणि सनदी अधिकारी नियोजन करतात की नियोजनबद्ध विचका करतात, असा प्रश्न तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात येत आहे. |
पालिका देणार १६०० कोटी रुपयांचे कर्ज प्रतिनिधी , मुंबई
बेस्ट उपक्रमाला पालिकेकडून १६०० कोटी रुपयांचे कर्ज दहा टक्के व्याजदराने देण्याचा प्रस्ताव सोमवारी पालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत बोनसबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कर्जाच्या प्रस्तावाबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|