खास प्रतिनिधी, मुंबई
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे जवळपास नक्की झाले आहे. खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला दुजोरा दिला. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसशीही चर्चा करण्यात येणार आहे, असे त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारताना सांगितले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीस ११ नोव्हेंबरला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. |
राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांची कोंडी खास प्रतिनिधी , मुंबई
गेल्या वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार कोटींचे पॅकेज दिले तसे या वर्षी सिलिंडरसाठी अडीच हजार कोटी खर्च करावेत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने मांडल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची चांगलीच कोंडी झाली आहे. यातून मार्ग काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न असून, या मुद्दय़ावर चव्हाण यांनी आज पुन्हा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली. सफेद शिधापत्रिकाधारक ग्राहक वगळता बाकीच्यांना ही सवलत देण्यावर विचार सुरू झाला आहे. |
खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियानाचा लहान मुले व मातांचे कुपोषण कमी करण्यास परिणामकारक उपयोग होत असून कुपोषणाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचा निष्कर्ष युनिसेफच्या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या सर्वेक्षण पुस्तिकेचे सोमवारी प्रकाश करण्यात आले. |
विशेष प्रतिनिधी, मुंबई
दिवाळीच्या तोंडावर भडकलेल्या महागाईत सिलिंडर नियंत्रणाचे चटके जनतेला सोसावे लागू नयेत यासाठी राज्यातील जनतेला सहाऐवजी १२ सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय दिवाळीपूर्वी जाहीर करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली.भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून राज्यभर काँग्रेस आघाडी सरकारला धारेवर धरण्याचे प्रदेश भाजपने याआधी जाहीर केले होते. |
विजया मेहता यांचे आत्मचरित्र ‘झिम्मा’ प्रकाशित प्रतिनिधी, मुंबई
लेखन हे आमच्यासारख्या नाटकवाल्यांचे काम नाही. लेखनासाठी एकांताची गरज असते आणि आम्ही मंडळी सदैव ‘गँग’मध्ये वावरणारी. त्यामुळे गेली दोन वर्षे चाललेल्या या लेखन प्रवासात मी मला माझी नव्याने उलगडले, असे हितगुज ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांनी त्यांचे शिष्य, चाहते यांच्या उपस्थितीत बोलताना केले. |
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती खास प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील ग्रामीण भागात जाणीवपूर्वक प्रयत्न करुन लहान मुले व मातांमधील कुपोषण कमी करण्यास यश मिळाल्यानंतर आता शहरी भागातही कुपोषणमुक्तीचे अभियान राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ७ एप्रिल २०१३ पर्यंत ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील ० ते ३ वर्षे वयोगटातील मुलांचे व मातांचे आरोग्य सुधारण्यासाठी राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान राबिण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. |
आंदोलनानंतर प्रशासनाची धावपळ प्रतिनिधी, मुंबई पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकातील रेल्वे कार्यालयाला काही दिवसांपासून होत असलेल्या दूषित पाणीपुरवठय़ाबाबत कर्मचाऱ्यांनी सोमवारी जोरदार दणका दिल्यावर जाग आलेल्या प्रशासनाने पाणीपुरवठा करणारी वाहिनी तात्काळ बदलण्याचे आदेश दिले आहेत. |
प्रतिनिधी, मुंबई वांद्रे येथे चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या एका अज्ञात व्यक्तीने घरातील एका परदेशी तरुणीवर बलात्कार केला. सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. आरोपीस शोधण्यासाठी पोलिसांनी आठ पथके तयार केली आहेत. |
आघाडीचे चार नगरसेवक गैरहजर खास प्रतिनिधी, ठाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला शब्द पाळून आपली सर्व सहा मते आघाडीच्या पारडय़ात टाकूनही चार स्वपक्षीयांनीच दगा दिल्याने अखेर आज झालेल्या अटीतटीच्या लढतीत अंबरनाथच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सुनील चौधरी यांची फेरनिवड झाली. उपनगराध्यक्षपदासाठी आघाडीचे प्रदीप पाटील यांनी अर्ज मागे घेतल्याने युतीचे रमेश गुंजाळ निवडले गेले. |
खास प्रतिनिधी, मुंबई मद्यक्रांतीचे राजकीय सत्तापीठ हे बारामतीमध्ये असल्याची ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केलेली टीका राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच झोंबली आहे. डॉ. बंग यांची उठबस एका राजकीय पक्षाबरोबर असून त्यांच्या वक्तव्यातून त्यांचा ‘मानसिक बकालपणा’ दिसून येतो, अशा शब्दांत राष्ट्रवादीने डॉ. बंग यांना आज लक्ष्य केले. |
प्रतिनिधी, मुंबई टॅक्सी-रिक्षा भाडेवाढीसंदर्भात करण्यात आलेल्या जनहित याचिकेप्रकरणी आदेश देऊनही हजर न राहिलेल्या परिवहन सचिवांना तसेच पाच तज्ज्ञांची समिती नेमण्याबाबत केलेल्या सूचनेवर गंभीरपणे विचार न करणाऱ्या राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फैलावर घेतले. |
‘ओआरएफ’च्या अहवालातील दावा प्रतिनिधी, मुंबई खासगी टँकरचालक आणि महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी यांच्या युतीमुळे गळतीत दाखविले जाणाऱ्या सुमारे ७०० दशलक्ष लीटर पाण्यापैकी तब्बल २० टक्के पाणी खासगी टँकर मालकांच्या घशात जाते आहे, असा आरोप ‘ऑब्जव्र्हर रिसर्च फाऊंडेशन’ने (ओरआरएफ) मुंबईच्या पाणी समस्येवर प्रकाशित केलेल्या अहवालात करण्यात आला आहे. |
पाक संघाला कडवा विरोध करा-शिवसेनाप्रमुख |
|
|
मुंबई / विशेष प्रतिनिधी ‘झाले गेले विसरून जाऊ’, हे विधान केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे मागे घेत नाहीत, तोवर देशातील कडव्या हिंदूंनी आणि राष्ट्रभक्त जनतेने आगामी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होऊ देऊ नये, असे आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. |
सचिन देशपांडे, अकोला प्रकाश पोहरे यांच्या गोंडखैरी येथील प्रकरणात सर्वच राजकीय पक्षांनी चुप्पी साधली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांबरोबर भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात ब्र सुध्दा उचारला नाही. भारिप-बमसंचे नेते प्रकाश आंबेडकर यांची नागपूर येथील सांत्वन भेट वगळता त्यांनी अकोल्यात चुप्पी साधली. |
प्रतिनिधी, मुंबई मुंबईतल्या वरिष्ठ नागरिकांच्या हत्येचे सत्र सुरूच असून मालाड येथे आणखी एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले. निर्मला व्होरा (७८) ही वृद्धा आपल्या घरात मृतावस्थेत आढळली. त्यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. |
प्रतिनिधी, मुंबई पश्चिम रेल्वेच्या अंधेरी आणि चर्नीरोड स्थानकाच्या उत्तरेकडील बाजूस दोन नवे पादचारी पूल सुरू करण्यात आले असून रेल्वे वाहतुकीस कोणताही अडथळा न होता या पुलांची उभारणी करण्यात आली आहे. |
मुंबई, ५ नोव्हेंबर २०१२ वांद्रे परिसरातील पेरी क्रॉस रोडवर राहणा-या २७ वर्षीय जर्मन महिलेवर बलात्काराची घटना आज (सोमवार) पहाटे घडली. ही महिला जर्मन नागरिक असून वांद्रे येथील पेरी क्रॉस रोडवर एका तीन मजली इमारतीत भाड्याने राहत आहे. |
मुंबई, ५ नोव्हेंबर २०१२ मुंबईतील मालाड पश्चिम भागात रविवारी रात्री निर्मला व्होरा या ७८ वर्षीय वृध्द महिलेची हत्या करण्यात आली. व्होरा यांची मुलगी आणि जावई रात्री घरात नसताना ही घटना घडली. व्होरा यांच्या घरातून दहा तोळे सोने आणि ३५ हजार रुपयांची रोकडही चोरीस गेली आहे. या हत्येबाबत पोलिसांकडून चौकशीस आणि तपास सुरू आहे.
|
विशेष प्रतिनिधी
मुंबई, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२ शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हृदयावर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात रविवारी दुसऱ्यांदा एन्जिओप्लास्टी करण्यात आली. ती यशस्वी झाली असून तब्येत उत्तम असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे जुलैमध्ये त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
|
काही मंत्र्यांना वगळण्यावरुन संघर्षांची चिन्हे मधु कांबळे
मुंबई राज्यातील आघाडी सरकारच्या नेतृत्वाची दोन वर्षे पूर्ण करण्याच्या तयारीत असलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर मंत्रिमंडळ विस्तार व फेरबदलाचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. मंत्रिमंडळातील काँग्रेसच्या कोटय़ातील रिक्त जागा भरतानाच काही अकार्यक्षम व भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांना वगळायचे आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|