मनसेच्या भूमिकेबाबत कमालीची उत्सुकता खास प्रतिनिधी ठाणे अडीच वर्षांपूर्वी मनसेने बाहेरून पाठिंबा दिल्यामुळे अंबरनाथ पालिकेची सत्ता हस्तगत करू शकणारी सेना आता या पक्षाने काँग्रेस आघाडीची कास धरल्याने अल्पमतात आहे. |
खास प्रतिनिधी ठाणे बदलापूरमधील अनेक भागात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी भाजपच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. |
औरंगाबाद स्फोटके-शस्त्रसाठा खटला प्रतिनिधी मुंबई मुंबई हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेला दहशतवादी झैबुद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल याच्यावर राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) २००६ सालच्या औरंगाबाद येथील स्फोटके-शस्त्रसाठा प्रकरणी शनिवारी तीन हजार ६५० पानांचे आरोपपत्र दाखल केले. |
सहा हजार गावांसाठी ४०० छावण्या; मोठय़ा प्रमाणावर खर्च खास प्रतिनिधी मुंबई सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे राज्यातील पिकांची स्थिती सुधारली असल्याने दुष्काळी गावांची संख्याही गेल्या वर्षीच्या तुलनेत घटली आहे. मात्र सरकारी निधीवर डोळा ठेवून राजकारण्यांकडून अजूनही दुष्काळाचा बोलबाला केला जात आहे. |
विशेष प्रतिनिधी मुंबई शैक्षणिक वर्षांचे पहिले सत्र संपत आले तरी मुंबईतील मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला नसल्याने दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांना निवाऱ्यासाठी वणवण करावी लागत आहे. |
विशेष प्रतिनिधी मुंबई राज्यातील बिल्डरांकडून सुमारे एक हजार कोटी रूपयांचा ‘मूल्यवर्धित कर (व्हॅट) वसूल झाला आहे. विक्रीकर विभागाला उद्दिष्टाच्या केवळ २० ते २५ टक्केच उत्पन्न मिळविण्यात यश मिळाले असून अनेक बिल्डरांनी ‘शून्य’ विवरणपत्रे (र्टिन्स) दाखल केली आहेत, तर काहींनी नोंदणी करून करभरणाच केलेला नाही. |
परिवहन आयुक्तांचे नागरिकांना आवाहन प्रतिनिधी मुंबई मीटर कॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा-टॅक्सींना २५ नोव्हेंबरनंतर नवे भाडे देऊ नये असे आवाहन परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनी केले आहे. २४ नोव्हेंबपर्यंत मीटर कॅलिब्रेशनची अंतिम मुदत आहे. |
प्रतिनिधी मुंबई दीड वर्षांच्या पोटच्या मुलाच्या खुनाच्या आरोपातून मुंबई उच्च न्यायालयाने ३३ वर्षांच्या महिलेची शुक्रवारी निर्दोष सुटका केली. तिनेच तिच्या दीड वर्षांच्या मुलाचा खून केल्याचे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आल्याचे स्पष्ट करीत कनिष्ठ न्यायालयाने तिला निर्दोष ठरविले होते. |
पुण्यातून सर्वाधिक बसेस सुटणार प्रतिनिधी मुंबई दिवाळी निमित्त महाराष्ट्रातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने २५ नोव्हेंबपर्यंत राज्यभरातील पाच विभागातून जादा बसेस सोडण्याचे जाहीर केले आहे. |
प्रतिनिधी मुंबई पत्नीच्या चारित्र्याबाबत संशयावरून झालेल्या भांडणातून तिचा गळा दाबून खून केल्याची घटना मुलुंडमध्ये घडली. खुनानंतर पती ज्ञानेश्वर सरोदे याने आपणहून पोलिसांत जाऊन अटक करवून घेतली, तर मालाड येथील दुसऱ्या एका घटनेत हुंडय़ासाठी पत्नीला जाळून मारण्यात आले. |
प्रतिनिधी मुंबई माहीमच्या मोरी रोड येथील आंध्र बँकेच्या एटीएम सेंटरची तोडफोड केल्याप्रकरणी माहीम पोलिसांनी अश्रफ सय्यद, जाफर अन्सारी, आसीफ शेख या तिघांना अटक केली आहे. |
प्रतिनिधी मुंबई ‘बेस्ट’चा वीजपुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर बिघडल्याने दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक भागात सुमारे दीड तास वीजपुरवठा खंडित झाला. |
प्रतिभावान तरुण कलाकारांचा अविष्कार प्रतिनिधी मुंबई राज्य शासनाच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीतर्फे येत्या ४ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात महाराष्ट्र युवा रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. |
अजित पवारांचा राजीनामा पथ्यावर संतोष प्रधान, मुंबई, शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
औरंगाबादमध्ये युवती काँग्रेसच्या मेळाव्याच्या माध्यमातून झालेले शक्तिप्रदर्शन, युवतींपाठोपाठ महिला व युवक काँग्रेसच्या कारभारात लक्ष घालण्याचे केलेले सुतोवाच, घरगुती वापराचे तीन गॅस सिलिंडर सर्वांना सवलतीच्या दरात मिळावेत म्हणून घेतलेला पुढाकार यातून खासदार सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्याचे पद्धतशीर प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
|
दोन महिन्यात पत न सुधारल्यास कारवाई अटळ संजय बापट मुंबई राज्य सरकारने दिलेली हमी आणि केंद्राच्या हस्तक्षेपानंतर राज्यातील आर्थिक अडचणीत असलेल्या सहा जिल्हा मध्यवर्ती बँकाना डिझर्व बँकेने काहींसा दिलासा दिला आहे. |
विशेष प्रतिनिधी मुंबई राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीने सरकारने राज्याची पुरती वाट लावली आहे. सिंचन घोटाळ्यासह असंख्य घोटाळे रोजच्या रोज उघडकीस येत आहेत. |
प्रतिनिधी मुंबई मुंबईच्या उपनगरात वन बीएचके घरासाठी ८० ते ९० लाख, तर टू बीएचके घरासाठी एक ते पाच कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईतील दर चढे असतानाही मीरा रोड, वसई, विरार ते कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आदी परिसरातील घरांसाठी मध्यमवर्गीयांनी फारशी मागणी नोंदविल्याचे आढळून येत नाही. |
न्यायालयाने फटकारूनही पाचसदस्यीय समिती नेमण्यावर सरकारचा निर्णय नाही प्रतिनिधी मुंबई टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढीसंदर्भात हकीम समितीच्या शिफारशी आणि त्या मान्य करणाऱ्या राज्य सरकारच्या कृतीबाबत उच्च न्यायालयाने मागच्या सुनावणीत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. |
प्रतिनिधी मुंबई परळ येथे शुक्रवारी सकाळी एका तरुणीवर ब्लेडने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ही मुलगी जखमी झाली असून तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला करून पळणाऱ्या प्रशांत हुले या तरुणाला जमावाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. |
प्रतिनिधी मुंबई नव्या उपनगरी गाडय़ांमध्ये मोबाईल सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोधकुमार जैन यांनी दिली. |