प्रतिनिधी, ठाणे भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीच्या मुद्दय़ावरून सत्ताधारी शिवसेना नगरसेविकांच्या ठिय्या आंदोलनाचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत उमटले. या घटनेचा राष्ट्रवादीच्या सदस्यांनी निषेध केल्याने शिवसेनेचे सदस्य चांगलेच आक्रमक झाले. |
राज्याची केंद्राकडे शिफारस; अभिनव भारतबाबत मौन प्रतिनिधी, मुंबई दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या पुणे येथील ‘अभिनव भारत’वर बंदी घालण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही राज्य सरकारने त्याबाबत आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. |
खास प्रतिनिधी, नवी मुंबई सारसोळे येथील रेल्वेरुळ ओलांडताना गुरुवारी मृत्यू पावलेल्या तीन महाविद्यालयीन युवकांपैकी दोन तरुणांचे मृतदेह ताब्यात देताना शुक्रवारी त्यांची अदलाबदल झाली. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. पालिका आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे या मृतदेहांची अदलाबदल झाल्याचे उघड झाले आहे. |
मुंबई- मुंबई आणि नवी दिल्लीच्या दरम्यान वातानुकूलित सुपरफास्ट गाडीच्या दहा विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. १२, १५, १८, २१ आणि २४ नोव्हेंबर रोजी मुंबई ते नवी दिल्ली दरम्यान ही गाडी चालविण्यात येणार असून ११ नोव्हेंबरपासून या फेऱ्यांचे संगणकीकृत आरक्षण सुरू करण्यात येणार आहे. |
पीटीआय, नवी दिल्ली मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात गोंधळ घालणाऱ्या मुंबईच्या मुरसालिन शेख या प्रवाशाची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. शेख याच्या वकिलांनी तो मानसिक रुग्ण असल्याची कागदपत्रे दाखल केली. त्याची दखल घेत न्यायालयाने त्याला जामीन दिला. |
प्रतिनिधी, मुंबई कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त ४५ कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्याचा आणि विद्यापीठात ११३ नवी पदे निर्माण करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. |
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मत खास प्रतिनिधी, नवी मुंबई
देश आणि राज्य पातळीवर सध्या भ्रष्टाचाराचे सर्रास आरोप केले जात आहेत. त्यामुळे देशात केवळ भ्रष्टाचार सुरू आहे, असे चित्र निर्माण होऊन सर्वसामान्यांनाचा लोकशाहीवरील विश्वास उडेल आणि देशात अराजकता माजेल, असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी नवी मुंबईत व्यक्त केले.प्रत्येक गोष्ट नियमांवर बोट ठेवून करता येत नाही. कधी कधी लोकांसाठी ‘आऊट ऑफ द वे’ जाऊन काम करावे लागते, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावला. |
विकासाची भकासवाट भाग - ६ संदीप आचार्य, मुंबई
मुंबईच्या उभ्या-आडव्या वाढीची क्षमता आता संपली आहे. न्यूयॉर्कप्रमाणे उंच इमारती बांधल्या तरी वाहतूक, पाणी पुरवठा, स्वच्छतेसह असंख्य प्रश्न जागेअभावी सोडविणे अशक्य आहे. अशा वेळी मनोरी, गोराई आणि उत्तनचे पर्यटनासाठीचे आरक्षण रद्द करून तेथे निवासी आरक्षण केल्यास मुंबईवरील मोठा भार कमी होऊ शकेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. |
राम पंडागळे यांची आमदारकी पणाला खास प्रतिनिधी, मुंबई पक्षाध्यक्ष शरद पवार, अजितदादा पवार व राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांवर केलेल्या आरोपांमुळे राम पंडागळे यांची आमदारकी पणाला लागणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. पक्षाकडून सर्व मानमरातब मिळाल्यानंतरही पदाच्या लालसेतून पक्षाध्यक्षांवरच आरोप करणाऱ्या आमदार पंडागळे यांच्या विरोधात पक्षातील वातावरण तापले असून पंडागळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार व त्यांची आमदारकीही धोक्यात येणार असे बोलले जात आहे. |
सिलिंडरच्या निर्णयाचे श्रेय सुप्रियाचे, राष्ट्रवादीचा दावा खास प्रतिनिधी, मुंबई * एकूण १ लाख ६० हजार कोटी खर्चापैकी ५५ हजार कोटी वेतनावर खर्च * पहिल्या सहामहीत राज्याचे उत्पन्न समाधानकारक नाही * दुष्काळापाठोपाठ सिलिंडरवरील खर्च वाढला आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये उत्पन्नाच्या आघाडीवर फारसे समाधानकारक चित्र नसतानाच दुष्काळ, सिलिंडरचे अनुदान, कर्मचाऱ्यांचा महागाईभत्ता आदींमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरील ताण वाढू लागला आहे. |
खास प्रतिनिधी, मुंबई राज्यात सध्या दोन हजार मेगावॉट विजेची कमतरता असून राज्य भारनियमनमुक्त करण्यासाठी आर्थिक भार सोसून ही वीज उपलब्ध करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र तसे झाल्यास महावितरणवर कंपनीच गाळात जाऊ शकते. त्यामुळे या धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज ऊर्जामंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. |
सरकारी कर्मचारी नाराज खास प्रतिनिधी, मुंबई राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना ७ टक्के महागाई भत्ता वाढवून देतानाच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे जुलैपासून नव्हे तर नोव्हेंबरपासून तो लागू करण्याची चलाखी केली आहे. मात्र असा प्रकार सरकारने गेल्या १३ वर्षांत अनेकदा केला असून त्यापायी सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल ४२ महिन्यांच्या महागाई भत्त्यावर पाणी सोडावे लागले आहे. |
प्रतिनिधी, मुंबई ओव्हरहेड तारांची योग्य देखभाल होत नसल्यामुळेच त्यांच्यावर ताण येऊन त्या तुटत असल्याचे बुधवारच्या मध्य रेल्वेवरील ऐन गर्दीच्यावेळी झालेल्या गोंधळातून स्पष्ट झाले आहे. |
सामान्य जनतेला सोडले वाऱ्यावर प्रतिनिधी, मुंबई सुट्टय़ांच्या मोसात खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या सर्वसामान्यांना सर्रासपणे लुटते. त्यांच्या या मनमानीला चाप लावण्याच्या उद्देशाने गेल्या एप्रिल महिन्यात उच्च न्यायालयाने कमीतकमी आणि जास्तीत जास्त भाडे आकारण्याबाबत अधिसूचना काढण्याचे आदेश सरकारला दिले होते. |
भायखळा पश्चिमेची अतिक्रमणे जमीनदोस्त |
|
|
प्रतिनिधी , मुंबई भायखळा पश्चिम येथील रेल्वेस्थानक परिसरातील ना. म. जोशी मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई बुधवारी करण्यात आली होती. गुरुवारीही गणेश पारुंडेकर मार्ग, बापूराव जगताप मार्ग परिसरातील १०९ झोपडय़ा जमीनदोस्त करण्यात आला आणि या दोन्ही मार्गावरील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात आला. |
प्रतिनिधी, मुंबई मुंबईच्या ३४ किलोमीटर लांबीच्या समुद्र किनाऱ्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने योजना तयार केली आहे. मुंबई महापालिकेने त्यास मंजुरी दिली तर रात्रीचा बाजार (नाइट लाइफ नव्हे) आणि कलाग्रामसारखे प्रकल्प या किनाऱ्यावर उभे राहतील तसेच सागरी आणि साहसी क्रीडाप्रकारांचा अनुभव पर्यटकांबरोबरच मुंबईकरांनाही घेता येईल. |
प्रतिनिधी, मुंबई आर्थिक स्थिती नाजूक असतानाही बेस्ट प्रशासनाने बोनसबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून महापौरांच्या मध्यस्थीमुळे कामगार संघटनांनी आंदोलनाच्या भूमिकेपासून माघार घेतली आहे. मात्र कर्मचाऱ्यांना बोनस नेमका किती आणि केव्हा मिळणार हे गुलदस्त्यातच आहे. |
प्रतिनिधी, मुंबई वारंवार बजावूनही दुसऱ्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. मुंबई सेंट्रल पोलिसांनी या प्रकरणी मोहम्मद हुसेन चांद शेख याला अटक केली आहे. |
प्रतिनिधी, मुंबई जगभरात दर मिनिटाला यूटय़ूबवर तब्बल ७२ तासांचे व्हिडिओ अपलोड होतात. संपूर्ण भारतभरातून तयार होणारे व्हिडिओ आकडेवारीच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर असून भारत हा यूटय़ूबच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल देणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे, गुगल इन्कॉर्पोरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष व मुख्य व्यवसाय अधिकारी निकेश अरोरा यांनी गुरुवारी येथे ही माहिती दिली. |
प्रतिनिधी , वसई भाईंदरमधील उत्तन येथे ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून एका विवाहित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी फरार झाला आहे.पीओपीचे काम करणारा आरोपी अब्दुल शेख (२८)हा उत्तनच्या शांतीनगर डोंगरी भागात राहणाऱ्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांना ओळखत होता. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|