मुंबई आणि परिसर
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुंबई आणि परिसर
अनधिकृत बांधकामप्रकरणी आमदार सरनाईक गोत्यात Print E-mail

मुख्यमंत्र्यानी दिले कारवाईचे आदेश
खास प्रतिनिधी,मुंबई

ठाण्यात पाणीचोरीवरून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्यात सुरू असलेल्या संघर्षांला गुरुवारी नवे वळण मिळाले. काँग्रेस आणि शिवसेनेतील गेल्या काही महिन्यापासूनचे मधुर संबंध तुटताच अनधिकृत बांधकाम प्रकरणी आमदार सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी दिले. त्यामुळे आयुक्तांविरोधात दाद मागणाऱ्या शिवसेना आमदारांना जोरदार धक्का बसला असून राष्ट्रवादीचेही काही नगरसेवक अडचणीत आले आहेत.
 
चिपळूण साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडणूक: डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची सरशी Print E-mail

मतदानाची टक्केवारी वाढली
प्रतिनिधी, मुंबई

चिपळूण येथे पुढील वर्षी ११ ते १३ जानेवारी या कालावधीत भरणाऱ्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. नागनाथ कोत्तापल्ले निवडून आले. कोत्तापल्ले यांना ५८४ मते मिळाली. ह. मो. मराठे १६४ मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ या मुख्य कार्यालयात दुपानंतर महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे आणि निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. यशोधन दिवेकर यांनी हा निकाल जाहीर केला.
महामंडळाकडे एकूण ८८९ मतपत्रिका प्राप्त झाल्या. त्यापैकी १४ मते अवैध ठरली.

 
धारावी पुनर्विकासाचा पायाभरणी समारंभ रहिवाशांनी उधळला Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

धारावीतील सेक्टर पाचच्या पुनर्विकासाची पूर्ण योजना आखली जात असताना मोकळय़ा भूखंडावर पथदर्शी इमारत बांधण्यासाठी कंत्राटदार ‘बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन’ने गुरुवारी आयोजित केलेला शुभारंभाचा कार्यक्रम स्थानिक रहिवाशांनी प्रचंड विरोध करत उधळून लावला. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी सेक्टर पाचच्या पुनर्विकासाचे काम राज्य सरकारने ‘म्हाडा’ला दिले. या सेक्टरमधील प्रकल्पाच्या स्वरूपाची आखणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, पण तोवर सुमारे तीन हजार चौरस मीटरच्या मोकळ्या भूखंडावर पथदर्शी इमारत म्हणून बहुमजली इमारत बांधण्यास सुरुवात करण्याचे ठरले.
 
आदिवासी विकास योजनेत घोटाळा झाल्याचे सकृद्दर्शनी स्पष्ट Print E-mail

सहा फायली ताब्यात घेण्याचे न्यायालयाचे आदेश
प्रतिनिधी, मुंबई

आदिवासी विकास मंत्रालयामार्फत राबविल्या गेलेल्या विकास योजनांमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी सरकारला दणका दिला. तसेच या घोटाळ्याची गंभीर दखल घेत त्या संबधीच्या सहा फायली जप्त करण्याचे आदेशही दिले आहेत. या फायली रजिस्ट्रार जनरलनी ताब्यात घ्याव्यात, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. या फायलींच्या छायाकिंत प्रती काढण्याची विनंती राज्य सरकारतर्फे करण्यात आली होती. मात्र ती न्यायालयाने फेटाळून लावली.
आदिवासी विकास मंत्रालयामार्फत राज्यभर विविध योजना राबवल्या जातात.
 
महानिर्मिती आर्थिक संकटात Print E-mail

‘महावितरण’ने ३५०० कोटी रुपये थकवले
प्रतिनिधी, मुंबई

राज्यात वीजवितरण करणाऱ्या ‘महावितरण’ने विजेचे पैसे थकवल्याने राज्यासाठी वीजनिर्मितीचे काम करणारी ‘महानिर्मिती’ आर्थिक संकटात सापडली आहे. गेल्या दीड वर्षांत ही थकबाकी तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांवर गेली असून त्यामुळे रोकड टंचाई निर्माण होऊन इंधनखरेदी, कर्मचाऱ्यांचे पगार यासारख्या नियमित खर्चासाठी वारंवार दोनशे-अडीचशे कोटी रुपयांचे अल्पकालीन कर्ज काढण्याची वेळ ‘महानिर्मिती’वर येत आहे. राज्याच्या एकूण वीजमागणीपैकी सुमारे ४५ ते ५० टक्के वीज ‘महानिर्मिती’ पुरवते.
 
शिधावाटप यंत्रणा कुचकामी; महागाईवर उतारा काय? Print E-mail

रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात न केल्याने अर्थमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. रिझव्‍‌र्ह बँक ही विश्वासार्ह, स्वायत्त संस्था आहे. महागाई हा समाजाच्या दृष्टीने प्राधान्याचा आणि थेट दैनंदिन जगण्याला भिडणारा विषय, असे रिझव्‍‌र्ह बँकेचेही मत आहे, पण त्यांच्या या मतावरच हल्ला झाला. पण महागाई भडकण्यास कारणीभूत असलेले अडथळे दूर करण्याचे प्रयत्नच झाले नाहीत. गोरगरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी असलेली शिधावाटप यंत्रणा सरकारनेच पुरती मोडीत काढली आहे. दारिद्रय़रेषेखालील जनतेलाही पामतेल, चणाडाळ, साखर मिळणार नाही, असा निर्णय सरकारने १५ दिवसांपूर्वी घेतला.
 
सामाजिक कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांबाबत शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी कुणाची वाट पाहताय ? Print E-mail

न्यायालयाने मागितले सरकारकडे स्पष्टीकरण
प्रतिनिधी, मुंबई

सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यावरील हल्ले रोखण्यासाठी दोन वर्षांपूर्वी केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने गुरुवारी धारेवर धरले. या समस्येच्या निवारणासाठी तातडीने योजना आखण्याची गरज असताना सरकार कुणाची वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल करीत न्यायालयाने या शिफारशींची पूर्तता करणार की नाही याबाबतची भूमिका ५ नोव्हेंबर रोजी स्पष्ट करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. तसेच ही शेवटची संधी असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
 
मंत्रालय पुनर्विकास : शापुरजी पालनजी, एल अ‍ॅण्ड टी बाहेर Print E-mail

कमी दरासाठी युनिटीशी वाटाघाटी
खास प्रतिनिधी, मुंबई

मंत्रालय पुनर्विकास योजनेच्या कामासाठी तीन कंपन्या पात्र ठरल्या असल्या, तरी शापुरजी पालनजी आणि एल अ‍ॅण्ड टी या दोन नामांकित कंपन्यांनी दर कमी करण्याबाबत फारशी उत्सुकता दाखवली नाही. परिणामी कमी दराच्या ‘युनिटी’ कंपनीबरोबर राज्य शासनाने वाटाघाटी सुरू केल्या आहेत. मंत्रालयाच्या आगीत जळालेल्या तीन मजल्यांच्या पुनर्विकासाकरिता राज्य शासनाने ११० कोटींचा खर्च अंदाजित केला आहे. मात्र निविदा १५० कोटींपेक्षा जास्त दराच्या आल्या आहेत. तिन्ही कंपन्यांना वाटाघाटींसाठी बोलाविण्यात आले होते.

 
महागाई भत्त्याबाबत अद्याप निर्णय नाहीच! Print E-mail

खास प्रतिनिधी, मुंबई

राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी आंदोलनाचा रेटा लावूनही ७ टक्के महागाई भत्ता देण्याबाबत सरकारने नकारात्मक सूर लावला आहे. या संदर्भात गुरुवारी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे झालेल्या महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही.
मात्र, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे नेते र. ग. कर्णिक व राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस ग. दि. कुलथे यांच्याशी झालेल्या चर्चेत अर्थमंत्र्यांनी महागाई भत्ता देण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याचा दावा कुलथे यांनी केला. सर्व संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
 
थेट पणनच्या विरोधात व्यापाऱ्यांचे ‘टोमॅटो फेको’ आंदोलन Print E-mail

खास प्रतिनिधी,नवी मुंबई

पणन संचालकांनी काही भाजी व्यापाऱ्यांना मुंबईत दिलेल्या थेट व्यापाराच्या परवानगी विरोधात गुरुवारी तुर्भे येथील भाजी व्यापाऱ्यांनी त्यांच्याजवळील सुमारे पाच हजार किलो टोमॅटो रस्तावर फेकून अनोखे आंदोलन केले. त्यामुळे बाजारात काही काळ वातावरण तंग झाले होते. देशात थेट परकीय गुंतवणुकीला रीतसर परवानगी मिळण्याअगोदर राज्य सरकारने यापूर्वीच काही व्यापाऱ्यांना थेट पणनची परवानगी दिली आहे. त्यामुळे काही व्यापारी नाशिक-पुण्याहून शेतमाल उचलून तो थेट मुंबई व उपनगरात नेऊन विकत आहेत. त्यामुळे तुर्भे येथील एपीएमसीच्या घाऊक बाजारावर मोठा परिणाम होऊ लागला आहे.
 
खासगी वैद्यकीय महाविद्यालयांविरोधात विद्यार्थी-पालकांचे आझाद मैदानात उपोषण Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी गैर आणि मनमानी पद्धतीने केलेल्या प्रवेशांच्या निषेधार्ह विद्यार्थी आणि पालकांनी आझाद मैदानात उपोषणाला सुरूवात केली. ‘फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन’ या संघटनेच्या नेतृत्त्वाखाली राज्यभरातून ७ विद्यार्थी आणि १८ पालक या उपोषण आंदोलनात सहभागी झाले आहेत. आश्चर्य म्हणजे राज्यातील एकाही मंत्र्याला किंवा अधिकाऱ्याला दिवसभरात आपल्यावरील अन्यायाची दाद मागण्यासाठी येथे जमलेल्या १९-२० वर्षांच्या या विद्यार्थ्यांची वा त्यांच्या पालकांची भेट घ्यावीशी वाटली नाही. त्यामुळे, हे आंदोलन सुरूच राहील, असे ‘फोरम’चे अध्यक्ष जयंत जैन यांनी सांगितले.
 
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात! Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

‘केप हॉर्न’, ‘केप ऑप गुड होप’ आदी ठिकाणे तुम्हाला केवळ पाठय़पुस्तकात वाचून माहीत असतील. पण, आता ती तुम्हाला माझ्या डोळ्यांद्वारे पाहता येतील. माझ्या १६० दिवसांच्या प्रवासात या ठिकाणांची आणि तेथील वैशिष्टय़ांची माहिती छायाचित्रे आणि फेसबुक अपडेटच्या माध्यमातून तुम्हाला करून देईन.. हे आश्वासन होते लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांचे.भारतीय नौदलाच्या कामगिरीत आणखी एक मानाचा शिरपेच रोवणाऱ्या प्रवासाला अभिलाष यांनी गुरूवारी दुपारी १२च्या सुमारास ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून सुरूवात केली. १६० दिवसांच्या या साहसी आणि खडतर ‘सागर परिक्रमे’चे सुकाणू फक्त आणि फक्त ३३ वर्षांच्या अभिलाष यांच्या हाती राहणार आहे.
 
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत अद्याप निर्णय नाही Print E-mail

खास प्रतिनिधी, मुंबई
राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी आंदोलनाचा रेटा लावूनही ७ टक्के महागाई भत्ता देण्याबाबत सरकारने नकारात्मक सूर लावला आहे. या संदर्भात गुरुवारी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे झालेल्या महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही.

 
नूरिया हवेलीवालाला पाच वर्षांचा कारावास Print E-mail

उपनिरीक्षकाच्या मृत्यूस कारणीभूत
प्रतिनिधी, मुंबई
मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एका पोलिसासह दोघांच्या मृत्यूस आणि चौघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरणारी नूरिया हवेलीवाला (३०) हिला सत्र न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवत पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावला. मात्र अपघाताच्या वेळेस तिने अंमलीपदार्थाचे सेवन केले होते हे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आल्याने न्यायालयाने त्या आरोपात तिला निर्दोष ठरविले.

 
रिपब्लिकन कार्यकर्त्यांची कलर्स वाहिनीवर दगडफेक Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
कलर्स वाहिनीच्या अंधेरी येथील कार्यालयावर शुक्रवारी दुपारी दोन अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. दगडफेक करणारे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दगडफेकीत कुणीही जखमी झाले नसले तरी कार्यालयातील काचांचे नुकसान झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 
पोलीस बळाचा वापर करून पालिकेने केले सर्वेक्षण Print E-mail

विरोध करणाऱ्या वरिष्ठ नागरिकांना अटक
प्रतिनिधी, मुंबई
न्यू प्रभादेवी येथील कामगार नगर क्र. एक परिसरात महापालिकेने पोलीस बळाचा वापर करून केलेल्या सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या रहिवाशांविरुद्ध पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या प्रकरणी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप ठेवून ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी ११ महिलांसह २० जणांना अटक केली. यामध्ये १६ वरिष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

 
निवडणूक झाली एकतर्फी, मराठेंना ‘जातिवाद’ भोवला? Print E-mail

शेखर जोशी, मुंबई
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, संमेलनाध्यक्षपदासाठी होणारी निवडणूक आणि वाद हे जणू समीकरण झाले आहे. चिपळूण येथे होणाऱ्या आगामी ८६व्या साहित्य संमेलनाध्यक्ष पदाची निवडणूकही त्याला अपवाद ठरली नाही. संमेलनाध्यक्ष निवडणुकीत चार उमेदवार असले तरी खरी लढत डॉ. नागनाथ कोतापल्ले आणि ह. मो. मराठे यांच्यातच होईल, असे चित्र होते.

 
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना न्यायालयीन कोठडी Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
कुर्ला येथील श्रमजीवीनगरमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटक केलेल्या १३ आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मंगळवारी कोजागरीनिमित्त आयोजित दांडिया उशिरापर्यंत सुरू होता. रात्री पावणेबाराच्या सुमारास तो बंद करण्यासाठी नेहरूनगर पोलीस ठाण्याचे हवालदार सुरेश माने आणि विष्णू सावंत गेले होते. त्यावेळी तेथील जमावाने या दोघांवर हल्ला केला होता.

 
लेखनासाठी संघर्ष करावा लागला - व्ही. एस. नायपॉल Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
कोणतीही गोष्ट सहज साध्य होत नाही, त्यासाठी मेहनत आणि कष्ट करावेच लागतात. लेखन करतानाही मला सतत संघर्ष करावा लागला आणि आजही तो सुरूच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘बुकर’ व ‘नोबेल’ पुरस्कार विजेते व्ही. एस. नायपॉल यांनी केले.

 
मिठाईच्या कारखान्यांवर सरकारची नजर Print E-mail

खास प्रतिनिधी, मुंबई
 दिवाळीसाठी मोठय़ा प्रमाणात मिठाई बनविताना भेसळयुक्त खवा आणि तेलाचा होणारा वापर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश राज्यमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी अन्न व औषध प्रशासनास दिले. मिठाईच्या दुकानाऐवजी कारखान्यांवरच छापे टाकून माव्याची तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 19 20 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो