सिडकोचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाकडे विकास महाडिक, नवी मुंबई उद्योगमंत्री नारायण राणे यांनी चार वर्षांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत थयथयाट केल्याने गाजलेल्या नवी मुंबईतील व्हिडीओकॉन एलसीडी प्रकल्पाचे भवितव्य पुन्हा मंत्रिमंडळाच्या हाती सोपविण्यात येणार आहे. या प्रकल्पाला मंत्रिमंडळाच्या संमतीने नवी मुंबईतील २५० एकर जमीन केवळ ३०० कोटी रुपयांना देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला होता. |
खास प्रतिनिधी, मुंबई नवी मुंबई विमानतळासाठी आवश्यक असणारी २५० हेक्टर वन जमीन हस्तांतरित करण्यास वन खात्याने मान्यता दिली आहे. तसेच मुंबई-दिल्ली कॉरिडॉरसाठीही जमीन उपलब्ध होणार आहे. |
प्रतिनिधी, मुंबई राज्य सरकारच्या तिन्ही वीज कंपन्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी प्रत्येकी आठ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय ऊर्जामंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला आहे. |
प्रतिनिधी, मुंबई भारतात बनावट नोटांचा व्यवहार करणारी टोळी बांगलादेशातील चित्रपट उद्योगात हा पैसा गुंतवत असल्याची प्रकार पोलीस तपासात उघडकीस आला आहे.युनिट १२ ने ऑक्टोबरमध्ये मुंबईत बनावट नोटा बाळगणाऱ्या तिघांना अटक केली होती. |
विकासाची भकासवाट - भाग - ५ संदीप आचार्य, मुंबई मुंबई महानगर प्रदेशात सेझ अंतर्गत तब्बत बारा हजार हेक्टर जागा राखीव ठेवण्यात आली आहे. या राखीव जागेची विकास आराखण्याशी सांगड कशी घालणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. २०३४ साली मुंबईची लोकसंख्या १.९० कोटी होईल. |
प्रतिनिधी, मुंबई सुपरस्पेशालिटी डॉक्टर कोणत्याही एका राज्याची नव्हे तर संपूर्ण देशाची संपत्ती आहेत. त्यामुळे त्यांना सरकारी-निमसरकारी रुग्णालयांमध्ये सेवा देण्याबाबत केलेल्या कराराची अंमलबजावणी बंधनकारक करू नये हा डॉक्टरांचा युक्तिवाद उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावताना राज्य सरकारच्या कराराबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. |
अतिरिक्त आयुक्तांचा दावा प्रतिनिधी, मुंबई उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास बंदी घातली आहे. मात्र याचिकादाराने डम्पिंग ग्राऊंडबाबत न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत केला. |
प्रतिनिधी, मुंबई सुट्टीकालीन किंवा उत्सवानिमित्त सोडण्यात येणाऱ्या विशेष गाडय़ांना यापुढे स्वतंत्र आरक्षण ठेवण्यात येणार नाही. नेहमीच्या गाडय़ांना असलेल्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांनाच या गाडय़ांमध्ये प्राधान्याने सामावून घेतले जाणार आहे. |
प्रतिनिधी , ठाणे ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये कोपरी येथील प्रभाग क्रमांक ५१ मधून भाजपच्या तिकिटावर विजयी झालेल्या नगरसेविका चांदनी दुलानी यांचा जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र जप्त करून रद्द करण्याचे तसेच बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कोकण विभाग जातपडताळणी समितीने दिले आहेत. त्यामुळे दुलानी यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. |
काँग्रेसचे राष्ट्रवादीला प्रत्युत्तर! खास प्रतिनिधी, मुंबई मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे लवकर निर्णय घेत नाहीत म्हणून राष्ट्रवादीने टीका सुरू केली असतानाच, विचारपूर्वक निर्णय घेत असल्यानेच विलंब लागतो, असे प्रत्युत्तर काँग्रेसच्या वतीने आज देण्यात आले. सरकारमध्ये एकत्र असताना मुख्यमंत्र्यांवर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाने पातळी सोडून बोलणे कितपत योग्य आहे का, असा सवालही काँग्रेसने केला. |
प्रतिनिधी , मुंबई एका मोटरसायकलवरून तीन मित्र भरधाव वेगाने जात होते. प्रतितास सुमारे ९० कि.मी. वेगाने जात असताना अचानक ब्रेक लागल्याने दुचाकी उलटून झालेल्या अपघातात एक तरुण मरण पावला. ही घटना देवनार परिसरात संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. पार्थ जाधव (२०) असे या तरुणाचे नाव आहे. |
विशेष प्रतिनिधी, मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी नऊ रुपये किलो दराने साखर वाटप सुरू केले आहे.आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे, राम कदम यांनी मुंबईतील आपापल्या मतदारसंघात स्वस्त दरात साखर वाटपासह विविध उपक्रम हाती घेतले आहेत. |
प्रतिनिधी, ठाणे सहाऐवजी १२ घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त दरात देऊन नागरिकांना दिवाळी भेट द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी बुधवारी ठाणे येथे सांगितले. |
विशेष प्रतिनिधी, मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी नऊ रुपये किलो दराने साखरवाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे, राम कदम यांनी मुंबईतील आपापल्या मतदारसंघात स्वस्त दरात साखर वाटपासह विविध उपक्रम हाती घेतले आहेत. |
मोबाइल फोन करणे महागले पल्स रेट ९० ऐवजी ६० सेकंदांवर प्रतिनिधी, मुंबई फोनवरील विविध सुविधांची मोठमोठय़ा जाहिरातींद्वारे माहिती देणाऱ्या ‘महानगर टेलिफोन निगम’ने आपल्या पल्स रेटमध्ये कपात करण्याबाबतचा निर्णय मात्र गुपचूप घेतला आहे. या निर्णयामुळे आता लँडलाइनवरून मोबाइल क्रमांक लावणे तसेच कंपन्यांच्या लँडलाइनशी, गरुडा सेवेशी बोलणे महाग झाले आहे. २ नोव्हेंबरपासूनच हे बदल झाले असून देयकांमध्ये ही वाढ दिसून येणार आहे. |
प्रतिनिधी, मुंबई बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसचा तिढा अद्याप कायम असला तरी महापौरांच्या मध्यस्थीमुळे कामगार संघटनांनी तूर्तास आंदोलनापासून माघार घेत ‘थांबा आणि वाट पाहा’ अशी भूमिका घेतली आहे. मात्र गुरुवारच्या बैठकीनंतर बोनस की आंदोलन हे स्पष्ट होईल. |
खास प्रतिनिधी, ठाणे अंबरनाथ नगराध्यक्षपद निवडणुकीत आघाडीच्या पराभवास जबाबदार चार नगरसेवकांपैकी एक नासिर कुंजाली हा राष्ट्रवादीचा असून त्याच्या विरोधात येत्या दोन दिवसांत कारवाई न झाल्यास शहरातील राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक राजीनामा देतील, असे आज शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांनी जाहीर केले. |
महिला संस्था संपविण्याचा घाट! विशेष प्रतिनिधी, मुंबई महिला संस्थांच्याच माध्यमातून अंगणवाडीमधील बालके, गर्भवती महिला आणि कुपोषित मुलांना ब्लेंडेड सकस आहार (टेक होम रेशन) देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने २०११मध्ये दिलेला आदेश आणि केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे सुस्पष्ट परिपत्रक राज्याचे मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांच्यापुढे सादर करण्यात आल्यामुळे महिला संस्था संपविण्यासाठीच काही ठेकेदारांकडून पोषण आहाराबाबत बदनामी सुरू असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. |
प्रतिनिधी, मुंबई मालाडच्या निर्मला व्होरा (७८) या वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने व्होरा यांच्या दुकानातील पूर्वीचा नोकर पप्पू उर्फ गिरवरसिंग देवडा (२०) याला उदयपूर येथून अटक केली आहे. कामावरून काढून टाकल्याचा राग आणि पैशांची निकड यामुळे त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. |
खास प्रतिनिधी, मुंबई विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ११ ते २१ डिसेंबर दरम्यान नागपूर येथे होणार आहे. दोन आठवडे चालणाऱ्या या अधिवेनशनात प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या नरबळी आणि इतर अमानुष व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक विधेयकासह ११ विधेयके मांडण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|