नव्या वेतन कराराबाबत असंतोष खास प्रतिनिधी, ठाणे इतर शासकीय आस्थापनांच्या तुलनेत अतिशय कमी वेतन असणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या हाती नव्या करारानेही फारसे भरीव काही पडणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी दिवाळीनंतर संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. |
प्रतिनिधी, मुंबई विद्याविहार येथे रविवारी रात्री पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या कल्याण साळवे प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. |
प्रतिनिधी , कल्याण कल्याण रेल्वे स्थानकालगतच्या एस.टी. बस स्थानकातून रविवारी रात्री झोपेत असलेल्या श्रद्धा या अकरा महिन्यांच्या बालिकेचे अपहरण करण्यात आले आहे. आशा प्रवीण भुवंडे (वय २८) ही पती, तीन मुली व एक मुलगा यांच्यासह आगारात भिवंडीला जाणाऱ्या फलाटावर झोपली होती. |
झोपडीधारक पर्यायी घरांमध्ये राहायला जात नसल्याने कारवाई प्रतिनिधी , मुंबई भायखळा पश्चिम रेल्वेस्थानक परिसरातील बकरी अड्डा येथील २८१ अनधिकृत झोपडय़ा जमीनदोस्त करून महापालिकेने ना. म. जोशी मार्गा मोकळा केला. महात्मा गांधी पथक्रांती योजनेंतर्गत पालिका प्रशासनाने ही कारवाई केली. |
खास प्रतिनिधी, मुंबई मुंबईतील मोकळ्या जागांचा व्यापक आणि एकात्मिक आराखडा तयार करून त्यांच्या वापराबाबतचे धोरण ठरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे धोरण ठरविण्यासाठी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यांना तीन महिन्यात अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. |
भाडेवाढीचे प्रकरण दिवाळीनंतरच निकाली निघणार प्रतिनिधी, मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलेला टॅक्सी-रिक्षा भाडेवाढीचा मुद्दा एवढय़ात तरी निकाली निघण्याची शक्यता नाही. उलट प्रत्येक सुनावणीच्या वेळी त्यातील गुंतागुंत उघड होत आहे. मंगळवारच्या सुनावणीतसुद्धा न्यायालयात ‘वेटिंग चार्जेस’चा मुद्दा पुढे आला आणि त्यावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. |
काँग्रेस - राष्ट्रवादी - ठेकेदारांच्या साठमारीत संदीप आचार्य/मुंबई, बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
राज्यातील अंगणवाडय़ांमधील सहा महिने ते तीन वर्षांची बालके, स्तनदा माता आणि ग्रेड तीन व चारच्या कुपोषित बालकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकस आहार मिळत असताना आता काँग्रेस-राष्ट्रवादीतील झगडा आणि ठेकेदारांच्या मारामारीत ४३ लाख मुलांचे ‘पोषण’ पणाला लागले आहे.
|
विकासाची भकासवाट भाग - ४ संदीप आचार्य
मुंबई मुंबई शहरात एकीकडे एक लाखाच्या आसपास घरे रिकामी आहेत. या घरांच्या किमती कोटय़वधी रुपयांमध्ये असल्यामुळे ही घरे विकत घेण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे प्रचंड मागणी असूनही मध्यमवर्गाला परवडणाऱ्या छोटय़ा घरांच्या मागणीकडे लक्ष देण्यास कोणालाच वेळ नाही असेही चित्र आहे.
|
खास प्रतिनिधी मुंबई राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ७ टक्के महागाई भत्ता देण्यास अखेर वित्त विभाग राजी झाला असून त्याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. |
काँग्रेसचे राष्ट्रवादीला प्रत्युत्तर! खास प्रतिनिधी मुंबई मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे लवकर निर्णय घेत नाहीत म्हणून राष्ट्रवादीने टीका सुरू केली असतानाच, विचारपूर्वक निर्णय घेत असल्यानेच विलंब लागतो, असे प्रत्युत्तर काँग्रेसच्या वतीने आज देण्यात आले. |
जलसंपदा खात्यातील मनमानी कारभार मधु कांबळे मुंबई राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांतील घोटाळ्यांनी राजकारण ढवळून निघाले असतानाच राजकारणी, कंत्राटदारांच्या दादागिरीला कंटाळून गेलेल्या या विभागातील सचिवांसह १७ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून घरचा रस्ता धरला आहे. |
साखर संघाची मध्यस्थीही वादाच्या भोवऱ्यात संजय बापट मुंबई राज्यातील काही साखर कारखान्यांनी राज्य साखर संघाच्या माध्यमातून केलेल्या साखर निर्यातीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. |
प्रतिनिधी मुंबई वांद्रे येथे स्पॅनिश तरुणीवरील बलात्कारप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार मोहम्मद अली अन्वर अन्सारी ऊर्फ बादशाह याला अटक केली आहे. पीडित तरुणीनेही या आरोपीला ओळखल्याचे पोलिसांनी सांगितले. |
भाडे वाढीचे प्रकरण दिवाळीनंतरच निकाली निघणार प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलेला टॅक्सी-रिक्षा भाडेवाढीचा मुद्दा एवढय़ात तरी निकाली निघण्याची शक्यता नाही. उलट प्रत्येक सुनावणीच्या वेळी त्यातील गुंतागुंत उघड होत आहे. |
खास प्रतिनिधी मुंबई तीन सिलिंडर अनुदानाच्या रक्कमेत देण्यावरून सध्या घोळ सुरू असतानाच केंद्र सरकारच्या पातळीवरच ही मर्यादा वाढविण्याचा विचार सुरू झाल्याने थोडे थांबावे, असा पर्याय पुढे आला होता. |
खास प्रतिनिधी मुंबई मुंबईतील मोकळ्या जागांचा व्यापक आणि एकात्मिक आराखडा तयार करून त्यांच्या वापराबाबतचे धोरण ठरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. |
प्रतिनिधी मुंबई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती शिवेसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आली. दरम्यान, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर दुसऱ्यांदा अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया रविवारी करण्यात आल्यानंतर मंगळवारी ते मातोश्री निवासस्थानी परतले. त्यांचीही प्रकृती उत्तम आहे, असे सूत्रांनी सांगितले. |
न्यायालयाने जोंधळे पॉलिटेक्निकच्या संस्थाचालकांचे उपटले कान ८१ विद्यार्थ्यांच्या मान्यतेचा प्रश्न निकाली प्रतिनिधी मुंबई संस्थाचालकांमधील व्यक्तिगत भांडणात विद्यार्थ्यांचा साधन म्हणून वापर करू नका, असे खडे बोल सुनावत डोंबिवलीतील ‘एस. एच. जोंधळे पॉलिटेक्निक’मधील ८१ विद्यार्थ्यांच्या मान्यतेचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढला आहे. |
नवी मुंबई महापौर निवडणूक उपमहापौरपदासाठी अशोक गावडे यांना उमेदवारी प्रतिनिधी नवी मुंबई लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईचे पुढील अडीच वर्षांचे महापौरपद आपल्याच घरात राहील याची काळजी घेत पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी सकाळी महापौरपदासाठी पुन्हा एकदा आपले पुतणे सागर नाईक यांचे नाव जाहीर केले. |
बनावट पावत्यांच्या आधारे महापालिकेची फसवणूक प्रतिनिधी ठाणे बनावट जकात पावत्यांद्वारे ठाणे महापलिका आणि शासनाचा ८० लाखांहून अधिक किमतीचा महसूल बुडवणाऱ्या सहा जणांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|