मुंबई आणि परिसर
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुंबई आणि परिसर
सवलतींमधील सिलिंडर सर्वाना देण्याबद्दल मतभेद Print E-mail

खास प्रतिनिधी, मुंबई

काँग्रेस पक्षाच्या दबावामुळे राज्यातही अनुदानाच्या रक्कमेत तीन सिलिंडर देण्यात येणार असली तरी नक्की कोणाला ही सवलत द्यावी यावरून सरकारमध्येच दोन मतप्रवाह आहेत. सरसकट सर्वांना ही सवलत दिल्यास सुमारे दीड ते दोन हजार कोटींचा बोजा पडणार असल्याने दारिद्रय रेषेखालील व अंत्योदय योजनेतील लोकांनाच ही सवलत देण्याबाबत विचार सुरू असला तरी सरसकट सर्वांनाच ही सवलत द्यावी, अशी काँग्रेसमधूनच मागणी होत आहे. सवलतीच्या दरात तीन सिलिंडर देण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती.
 
प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्याचे आदेश Print E-mail

खास प्रतिनिधी , मुंबई

टॅक्सी व ऑटोरिक्षांचे भाडे ठरविण्यासंदर्भात हकिम समितीच्या सर्व शिफारशी शासनाने मान्य केल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर भाडेवाढीचा काही प्रमाणात भार पडणार आहे. मात्र यापुढे प्रवाशांना चांगली सेवा न देणाऱ्या व  ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांविरुध्द कठोर कारवाई करा. प्रसंगी त्याचे परवाने रद्द करून फौजदारी कारवाई करा, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत.
 
‘म्हाडा’च्या पवईतील घरांच्या वाढीव किमतीचा घोळात घोळ Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

‘म्हाडा’च्या मागच्या वर्षीच्या सोडतीमधील पवई येथील उच्च उत्पन्न गटातील घरांच्या किमतीत १५ लाख रुपयांची वाढ करण्याच्या प्रश्नावरून गोंधळ निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठक घेऊन वाढीव किंमत अर्धी कमी करण्यास ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांना सांगितल्याचा दावा पवईतील घराचे यशस्वी लाभार्थी व शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला असताना असा काही निर्णय झालेला नसल्याचे ‘म्हाडा’ अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. ‘म्हाडा’तर्फे मे २०११ मध्ये मुंबईतील ४०३४ घरांसाठी सोडत झाली होती. या सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी सर्वाधिक ३१३३ घरे, मध्यम उत्पन्न गटासाठी २८०, उच्च उत्पन्न गटांसाठी ३६५ घरे आणि आर्थिक दुर्बल गटासाठी २५६ घरे होती.
 
भाडेवाढ नेमकी कशी झाली? Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

डॉ. हकीम यांनी सुचविलेल्या शिफारशीत सुधारणा करून राज्य शासनाने भाडेवाढ स्वीकारीत टॅक्सीचे भाडे दोन रुपये तर रिक्षाचे भाडे तीन रुपयांनी वाढविण्याचे निश्चित केले. यासाठी डॉ. हकीम यांनी मार्च २०१२ मधील ग्राहक निर्देशांक विचारात घेतला होता तर शुक्रवारी भाडेवाढ करताना प्रत्यक्षात ऑगस्ट २०१२ चा ग्राहक निर्देशांक विचारात घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. डॉ. हकीम यांनी भाडेवाढ सुचविताना मार्च २०१२ मधील ग्राहक निर्देशांक २०४  यानुसार भाडेवाढ सुचविली होती. भाडेवाढीला मंजुरी देताना   परिवहन प्राधिकरणाने ऑगस्ट २०१२ मध्ये असलेल्या २१६ रुपये हा ग्राहक निर्देशांक आधारभूत मानून भाडेवाढ केली.
 
जन आले दुरूनी.. लुटल्या आठवणी! Print E-mail

‘लोकमानस’मध्ये भेटले जुने दिग्गज
रोहन टिल्लू, मुंबई

मुंबई दूरदर्शनचा पहिला कार्यक्रम १९७२ मध्ये २ ऑक्टोबर रोजी, गांधी जयंतीच्या दिवशी होता. संध्याकाळी साडेसहा वाजता सुरू होणारा तो पहिलाच कार्यक्रम तब्बल आठ मिनिटे उशिराने सुरू झाला. सुरुवातीला वसंत देसाई यांनी बसवलेले पसायदान झाले आणि त्यानंतर होता उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या शेहेनाई वादनाचा कार्यक्रम! पण नेमका उस्तादजींना त्याच वेळी नमाज पढायचा होता. त्यांना कसेबसे मनवले.  
त्यानंतर आशा पारेख यांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. त्याआधी त्यांच्या पायात काचेचा तुकडा गेला. खूप धावपळ झाली, औषधपाणी झाले आणि अखेर तो कार्यक्रम पार पडला. दूरदर्शन मुंबई केंद्राच्या ४० वर्षांच्या वाटचालीचे साक्षीदार असलेले याकुब सैय्यद आपली आठवण सांगत होते.  
 
गुंतवणुकदारांच्या खिशावर अल्प बचत एजंटचा डल्ला Print E-mail

* ८९ लाखाचा अपहार  
* ३५० गुंतवणुकादारांमध्ये खळबळ
भगवान मंडलिक , कल्याण

कल्याणमधील मोहने येथील टपाल कार्यालयातील अल्प बचत एजंट जयश्री ठक्कर व त्यांचा मुलगा तुषार यांनी सदस्यांकडून जमा केलेले अल्प बचत योजनेतील पैसे टपाल कार्यालयात न भरता परस्पर हडप केली असल्याची खळबळजनक तक्रार महात्मा फुले पोलिस ठाण्यात कल्याणच्या सहाय्यक टपाल अधीक्षकांमार्फत नोंदविण्यात आली आहे. या तक्रारीनुसार कल्याण, मोहनेतील सुमारे ३५० ग्राहकांच्या ८९ लाख रूपयांच्या अल्प बचतीच्या रकमेवर एजंटांनी डल्ला मारल्याचे प्राथमिक तपासात उघड होत असून या प्रकारामुळे या भागातील छोटय़ा गुंतवणुकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
 
राज्य शासनाच्या बृहन्महाराष्ट्र उत्कृष्ट वाङ्मय पुरस्काराची रक्कम आता एक लाख रुपये Print E-mail

प्रतिनिधी ,मुंबई

राज्य शासनातर्फे मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी देण्यात बृहन्महाराष्ट्र पुरस्काराच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली असून ही रक्कम आता एक लाख रुपये अशी असेल. पूर्वी ही रक्कम ५० हजार इतकी होती. प्रौढ वाङ्मय गटातील २२ साहित्य प्रकारांना प्रत्येकी १ लाख रुपये, बाल वाङ्मय गटातील सहा साहित्य प्रकाराना प्रत्येकी ५० हजार रुपये, प्रथम वाङ्मय प्रकाशन गटातील सहा साहित्य प्रकारांना प्रत्येकी ५० हजार रुपये तर बृहन्महाराष्ट्र पुरस्कारासाठी १ लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे.
 
पुन्हा पाऊसधारा! Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

गेले दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळनंतर आपला रंग दाखवत पुन्हा ‘पाऊसधारा’चा प्रयोग रंगवला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या ‘पाऊसधारा’नी नागरिक आणि व्यापारी, फेरीवाले आणि दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली. सोमवार, १ ऑक्टोबर रोजी मुंबईत शहर आणि उपनगरात परतीच्या पावसाने जोरदार दणका दिला होता. या पावसाने रस्ते आणि रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली होती.
 
मराठी प्रकाशकांची ‘ई-पाटी’ कोरीच! Print E-mail

 शेखर जोशी, मुंबई

माहिती-तंत्रज्ञानाच्या झालेल्या स्फोटामुळे हल्लीची तरुण पिढी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीही संगणक, स्मार्ट मोबाईल, ई-बुक्स आणि इंटरनेटचा वापर मोठय़ा प्रमाणात करत आहेत. खासगी स्वयंसेवी संस्था तसेच टाटा समाज विज्ञान सारख्या संस्थांनी केलेल्या पाहणीतूनही हे चित्र समोर आले आहे. मराठी ग्रंथव्यवहार, विक्री आणि वाचन संस्कृती वाढविण्यासाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो. मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील असे अपवाद वगळले तर या आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत मराठी प्रकाशकांची ‘ई-पाटी’ कोरी असल्याचे वास्तव समोर आले आहे.
 
‘मोक्का’ न्यायालयांचा ताण कमी होणार Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील ‘मोक्का’ न्यायालयांतील प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी या न्यायालयांत अतिरिक्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी उच्च न्यायालय प्रशासनातर्फे न्यायालयाला देण्यात आली. त्यातही मुंबईतील ‘मोक्का’ न्यायालयांवरील भार कमी करण्यासाठी अन्य कायद्याअंतर्गत दाखल खटलेही संबंधित न्यायालयांत वर्ग करण्यात येणार असल्याचे या वेळी न्यायालयाला सांगण्यात आले. मोहम्मद आतिक मोहम्मद इक्बाल या पुणे जर्मन बेकरी स्फोटातील आरोपीने ‘मोक्का’ न्यायालयातील प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याबाबत याचिका केली आहे.
 
सत्तरावा वाढदिवसही इतर दिवसांसारखाच -अमिताभ बच्चन Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

हिंदी चित्रपटसृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन यांचा सत्तरावा वाढदिवस कसा असेल, याची उत्सूकता त्याच्या चाहत्यांसह संपूर्ण चित्रपटसृष्टीला लागली आहे. अमिताभ यांचा वाढदिवस कसा साजरा होणार, या बाबतच्या बातम्यांचे पेव फुटले आहे. अमिताभ बच्चन यांनी मात्र आपला सत्तरावा वाढदिवस हा माझ्यासाठी अन्य दिवसांसारखाच आहे, असे सांगत या उत्साहाला आवर घालायचा प्रयत्न केला आहे.
एकीकडे भारतीय सिनेमाचे शतक आणि दुसरीकडे याच सिनेमाचा महानायक म्हणून ओळख असलेल्या अमिताभ बच्चन यांचा सत्तरावा वाढदिवस हा सिनेप्रेमींसाठी दुग्धशर्करा योग आहे.
 
कमलाकर जामसंडेकर हत्या Print E-mail

अरूण गवळीचे अपील न्यायालयाने केले दाखल
प्रतिनिधी, मुंबई
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात अरूण गवळी याने केलेले अपील मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दाखल करून घेतले. लवकरच ते सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.

 
रिक्षा संघटनांना आनंद.. ग्राहकांमध्ये तीव्र संताप Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
रिक्षा-टॅक्सीच्या झालेल्या भाडेवाढीबद्दल रिक्षा-टॅक्सी संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ करताना प्रथमच चालकांच्या जीवनमानाचा खर्च लक्षात घेऊन त्यावर आधारित भाडेवाढ झाली. असे प्रथमच घडल्याने मिळालेली भाडेवाढ समाधानकारक असल्याचे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी सांगितले.

 
‘सनातन’वरील बंदीबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
‘सनातन संस्थे’वर बंदी घालण्यासंदर्भात राज्य सरकारने पाठविलेल्या प्रस्तावावर चार आठवडय़ांत भूमिका स्पष्ट करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला दिले. सुशिक्षित तरूण-तरूणींना संमोहित करून ‘सनातन संस्था’ त्यांच्यामार्फत दहशतवादी कारवाया घडवून आणत असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामाणी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.  

 
चाकरमान्यांच्या खिशाला भरुदड Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगर प्रदेशातील रिक्षा-टॅक्सीचालकांचे किमान भाडे वाढवण्यात आल्यामुळे आता शेअर रिक्षा-टॅक्सीचे भाडेही वाढण्याची चिन्हे असून त्यामुळे दैनंदिन प्रवास खर्चापायी चाकरमान्यांच्या खिशाला महिन्याला किमान दीड-दोनशे रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे.

 
विरोध पक्षांचा सरकारवर हल्लाबोल Print E-mail

विशेष प्रतिनिधी , मुंबई
पेट्रोल-डिझेल दरवाढ तसेच हकिम समितीच्या शिफारशी लक्षात घेऊन राज्य सरकारने रिक्षा व टॅक्सीच्या दरांमध्ये वाढ करण्यास दिलेली परवानगी ही सर्वसामान्य नागरिकांना आणखी त्रासात ढकलणारी असल्याचे शिवसेना-भाजप व मनसेने म्हटले आहे. प्रामुख्याने सर्व टॅक्सी- रिक्षा सीएनजीवर चालत असताना अशा भाडेवाढीला मंजुरी देणे कितपत योग्य आहे, असा सवाल या पक्षांकडून  केला जात आहे.

 
तान्हुलीची हत्या करणाऱ्या आईला पोलीस कोठडी Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
तीन महिन्यांच्या तान्हुल्या आहुती जोशी हिच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेली तिची आई धर्मिष्ठा जोशी हिला १२ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. २६ सप्टेंबर रोजी डोक्याला इजा झाल्याने आहुतीला तिच्या आई-वडिलांनी केईएम रुग्णालयात दाखल केले होते.

 
राखी सावंतच्या विरोधात तक्रार Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
विविध कारणांमुळे सतत चच्रेत असलेली अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चच्रेत आली आहे. एका फॅशन डिझायनरने राखीविरोधात शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पूजा शुक्ला या फॅशन डिझायनरने राखीला ४३ ड्रेस डिझाईन्स बनवून दिले होते.

 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ठाण्यात शिवसेनेला दिलासा Print E-mail

१६ सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब
प्रतिनिधी , ठाणे
ठाणे महापालिकेतील स्थायी समितीसाठी महापौर हरिश्ंचद्र पाटील यांनी जाहीर केलेल्या १६ नावांवर शिक्कामोर्तब करत स्थायी समिती सभापतीपदासाठी तातडीने निवडणुक घेण्याचे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने सत्ताधारी शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रवादी प्रणित लोकशाही आघाडी गटात कायम रहाणे कॉग्रेसच्या नगरसेवकांना बंधनकारक असेल का, याविषयीचा निर्णय मात्र न्यायालयाने १८ ऑक्टोबपर्यंत राखून ठेवला आहे.

 
कारच्या धडकेत बालिकेचा मृत्यू Print E-mail

प्रतिनिधी , ठाणे
ठाणे येथील तुळशीधाम भागात शुक्रवारी सकाळी भरधाव कारच्या धडकेत दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी कापुरबावडी पोलिसांनी कारचालकास अटक केली आहे. लाडली श्यामसुंदर विश्वकर्मा, असे यात मृत बालिकेचे नाव असून ती तुळशीधाम येथील गंगुबाई चाळीत राहत होती.

 
<< Start < Prev 41 42 43 44 45 46 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो