मुंबई आणि परिसर
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुंबई आणि परिसर
छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून बाळाचे अपहरण Print E-mail

प्रतिनिधी , मुंबई
छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून एका १० महिन्यांच्या मुलाचे बुधवारी पहाटे अपहरण करण्यात आले. पोलीस या मुलाचा तसेच त्याचे अपहरण करणाऱ्या अज्ञात महिलेचा शोध घेत आहेत. रंजना महत ही ५० वर्षीय महिला नेपाळ येथे सासरी जाण्यासाठी सागर उर्फ बाबू या १० महिन्यांच्या मुलासह  लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या फलाटांसमोर असलेल्या मुख्य हॉलमध्ये थांबली होती.

 
दिव्यात गिरणीचालकाची हत्या Print E-mail

प्रतिनिधी, ठाणे
दिवा भागात पिठाची गिरणी चालविणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात हातोडा मारून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला असून या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवीलाल रामलखन जैयस्वाल (३०) असे मृत पावलेल्या गिरणी चालकाचे नाव असून मूळचा तो आझमगड येथील लालगंजचा रहिवाशी होता.

 
मुलगी झाल्याने खेरवाडीत पत्नीची हत्या Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
खेरवाडी येथे पत्नीची हत्या करणा-या पतीला निर्मल नगर पोलिसांनी अटक केली आहे. अनिल कुमार कनोजिया (२८) असे या आरोपीचे नाव आहे. दुसरी मुलगी झाल्याने कनोजिया याने ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.

 
वृद्धेच्या हत्येप्रकरणी भाच्याला अटक Print E-mail

 

प्रतिनिधी , मुंबई
विठ्ठलभाई पटेल मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या सरला वासुदेवन या महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी वासुदेवन यांचा भाचा सुरेश रेडकर याला अटक केली आहे. कर्ज म्हणून दिलेल्या पशांच्या वादातून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

 
सहा जिल्हा बँकाना सहा महिने मुदतवाढ? Print E-mail

संजय बापट, मुंबई
 आर्थिक अडचणींमुळे रिझव्ह बँकेच्या कारवाईच्या गर्तेत सापडलेल्या नागपूर, वर्धा, बुलढाणा, जालना, उस्मानाबाद आणि धुळे - नंदूरबार या सहा जिल्हा सहकारी बँकाना पूर्वपदावर आणण्यासाठी मदत करण्याच्या राज्य सरकारच्या लेखी हमीनंतर या बँकाना आपला कारभार सुधारण्यासाठी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या हालचाली रिझव्‍‌र्ह बँकेने सुरू केल्या आहेत. त्यामुळे या बँकावरील प्रशासक नियुक्तीचे संकट टळण्याची आशा निर्माण झाली आहे.

 
साक्षीदारांच्या सुरक्षेची योजना न आखणाऱ्या राज्य सरकारची न्यायालयाकडून झाडाझडती Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
फौजदारी खटल्यातील साक्षीदारांच्या सुरक्षेसाठी विशेष योजना आखण्याचे वारंवार आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारच्या बेजबाबदार भूमिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. त्याचप्रमाणे महाअधिवक्त्यांनी स्वत: हजर राहून न्यायालयाच्या आदेशाचे पालन का केले जात नाही याबाबत खुलासा करण्याचे निर्देशही दिले.

 
माहिती आयोगात पूर्ववत सुनावणी सुरू होणार Print E-mail

खास प्रतिनिधी, मुंबई
राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नेमण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे गेल्या काही दिवसांपासून ठप्प झालेल्या माहिती अधिकारच्या सुनावणी लोकहितार्थ येत्या १५ ऑक्टोबरपासून पुर्ववत सुरू करण्याचा निर्णय राज्य माहिची आयोगाने घेतल्याची माहिती मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिली.

 
‘अजित पवारांची निर्ढावलेली टगेगिरी’ Print E-mail

विशेष प्रतिनिधी, मुंबई
आधी मंत्रालयाची नीट माहिती घ्या, मगच बोला, असा टोला अजित पवार यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना लगावल्याने ‘अजितदादा हे निर्ढावलेले टगे’  असल्याचा प्रतिटोला शिवसेनेने लगावला आहे. सत्तर हजार कोटी रुपये खर्चून अवघे ०.१ टक्के जमीन सिंचनाखाली आली. हजारो कोटी रुपयांचे घोटाळे झाल्याचे आरोप खात्यातीलच अधिकारी आता उघडपणे करू लागले असतानाही जनतेत जाण्याची भाषा अजित पवार करू शकतात. कारण ते अत्यंत निर्ढावलेले टगे आहेत, अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या व आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

 
आनंदवनचा सिलिंडर आता १२०० रुपयांना Print E-mail

 विशेष प्रतिनिधी, मुंबई

चंद्रपूर जिल्ह्य़ात बुधवापर्यंत १०५० रुपये असलेला गॅस सिलिंडरचा दर गुरुवारी थेट १२०० रुपयांवर गेल्याने आधीच अडचणीत आलेले वरोडा येथील बाबा आमटे यांचे आनंदवन खर्चाच्या आणखी खोल गर्तेत जाणार आहे. या अतिरिक्त भाववाढीमुळे आणखी ९० लाखांचा खर्च आनंदवनाच्या माथी बसणार आहे.
‘आनंदवना’त १७००हून अधिक कुष्ठरुग्ण तसेच एकंदरीत सुमारे अडीच हजार लोक राहतात. त्यांच्या चहा-नाश्ता व जेवणासाठी वर्षभरात सुमारे आठ हजाराहून अधिक गॅस सिलिंडर लागतात.

 
उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात आरक्षणाची सुविधा कशी? Print E-mail

*उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा
* सपा नगरसेवकाचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द
प्रतिनिधी, मुंबई
उत्तर भारतात मागासवर्गीय जातींमध्ये मोडल्या जाणाऱ्या मन्सुरी धुनिया या जातीचा फायदा एखाद्या उमेदवाराला महाराष्ट्रात निवडणूक लढण्यासाठी कसा होऊ शकतो तसेच त्याला राखीव प्रभागातून निवडणूक लढण्याची सुविधा कशी काय दिली जाऊ शकते, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली. घाटकोपर येथील नगरसेवक इसाक कासिम अली शेख यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या याचिकेदरम्यान न्यायालयाने ही विचारणा केली. या प्रकरणी शेख यांचे नगरसेवकपद रद्द होण्याची शक्यता आहे.

 
सरकारच्या विविध खात्यांत सव्वा लाखांहून अधिक पदे रिक्त Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांत सुमारे १ लाख ३० हजार पदे रिक्त असूनही राज्य सरकार ही रिक्त पदे भरण्यास उदासीन आहे. परिणामी कमी मनुष्यबळामुळे सरकारी खात्यांमध्ये भ्रष्टाचार फोफावला असल्याचा आरोप करीत राज्य सरकारला युद्धपातळीवर ही रिक्त पदे भरण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अफझल यांनी ही याचिका केली असून त्यात त्यांनी रिक्त पदे भरण्याबाबत सरकार उदासीन असल्यानेच कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याचा दावा केला आहे.

 
सोनियांच्या आदेशानंतरही राज्यात सिलिंडर मर्यादेत वाढ नाहीच! Print E-mail

खास प्रतिनिधी, मुंबई

काँग्रेसशासित राज्यांनी अनुदानित गॅस सिलिंडरची मर्यादा सहावरून नऊ करावी, असा आदेश काँग्रेस पक्षाने देऊनही राज्यात या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत तसा प्रस्तावच आला नाही. विशेष म्हणजे या मुद्दय़ावरच काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी भाजपवर टीका केली होती. दिल्ली, आसाम आणि हरियाणा या काँग्रेसशासित राज्यांनी अनुदानित गॅस सििलडरची संख्या सहावरून नऊ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातही या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, अशी प्रदेश काँग्रेसची अपेक्षा आहे.

 
मोबाईल टॉवरचा किरणोत्सार : दूरसंचार विभागाची हेल्पलाइन Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

मोबाईल टॉवरमधून होणाऱ्या किरणोत्सारामुळे आरोग्याला अपाय होत असल्याच्या वाढत्या तक्रारी सुरू झाल्याने केंद्रीय दूरसंचार विभागाने मुंबई क्षेत्रातील टॉवरबाबतच्या तक्रारी नोंदवण्यासाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. त्याचबरोबर दूरसंचार मंत्रालयाच्या संकेतस्थळावरही तक्रार नोंदवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी या तक्रांरीमध्ये लक्ष घातले. मोबाईल सेवा कंपन्या या सर्रास किरणोत्साराच्या मर्यादेचे उल्लंघन करतात, असे देवरा यांना आढळून आले.

 
‘नीट-पीजी’ प्रवेशाचे संकेतस्थळ कोलमडले Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या ‘नीट-पीजी’ या प्रवेश परीक्षेसाठी गुरुवारपासून जिथे नोंदणी करायची होती ते संकेतस्थळच तब्बल नऊ तास ‘हँग’ झाल्याने विद्यार्थ्यांना मोठय़ा मनस्तापाला सामोरे जावे लागले. सायंकाळी सातच्या सुमारास संकेतस्थळ पूर्ववत झाल्यावर विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास सुरूवात केली. परंतु, ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत राहून गेलेल्या त्रुटी, परीक्षा केंद्रांचे उपलब्ध असलेले मर्यादीत पर्याय यामुळे विद्यार्थ्यांच्या मनस्तापात आणखीच भर पडली आहे.
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या वर्षी प्रथमच राष्ट्रीय स्तरावर ‘नॅशनल एजिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट-पीजी’ (नीट) ही प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.

 
अनुपम खेर व रॉबर्ट डी निरोच्या ‘सिल्वर लाईनिंग प्लेबुक’ने ‘मामि’चा प्रारंभ Print E-mail

रेश्मा राईकवार, मुंबई

हिंदी चित्रपटातील गाजलेले कलाकार एकेक करत हॉलिवूडपटांमध्येही आपला करिश्मा दाखवत आहेत. नासिरुद्दिन शहा, ऐश्वर्या राय, अनिल कपूर, अमिताभ बच्चन अशा निवडक कलाकारांच्या पंक्तीत आता अभिनेता अनुपम खेरही जाऊन बसले आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या पहिल्याच हॉलिवूडपटात थेट रॉबर्ट डी निरोसारख्या कलाकाराशी जोडी जमवणारे अनुपम खेर स्वत: मायदेशात या चित्रपटाचा शुभारंभ करणार आहेत. १४ व्या आंतरराष्ट्रीय मुंबई चित्रपट महोत्सव (मामि)चा शुभारंभाचा चित्रपट म्हणून अनुपम खेर आणि रॉबर्ट डी निरो यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘सिल्व्हर लाईनिंग्ज प्लेबुक’ची निवड झाली आहे.

 
रिक्षाचे भाडे आणखी वाढण्याची शक्यता Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

डॉ. हकीम यांनी सुचविलेल्या शिफारशीनुसार रिक्षा आणि टॅक्सींना भाडेवाढ मिळणारच असा विश्वास मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी व्यक्त केला आहे. परिवहन प्राधिकरणाची शुक्रवारी बैठक होत असून त्या बैठकीत रिक्षा आणि टॅक्सीचे नवे भाडे निश्चित होणार आहे. या पाश्र्वभूमीवर रविावरपासून पुकारण्यात आलेल्या टॅक्सीचालकांच्या संपात फूट पडली असून संप करण्याऐवजी चर्चेने प्रश्न सोडविण्याचा आग्रह टॅक्सी संघटनांनी धरला आहे. डॉ. हकीम यांनी सुचविलेल्या भाडेवाढीत राज्य सरकारने हस्तक्षेप करत रिक्षाची भाडेवाढ दोन रुपयांची तर टॅक्सी भाडेवाढ एक रुपयांची करण्याची शिफारस परिवहन प्राधिकरणाला केली आहे.

 
आठवलेंच्या ‘आरक्षण नीती’वर सेनेचे दडपण! Print E-mail

खास प्रतिनिधी, मुंबई

रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यात पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी जोरदार शक्तीप्रदर्शन केले, परंतु पदोन्नतीतील आरक्षण, २५ टक्के सवर्णाना आरक्षण, दलित अत्याचार या प्रश्नांवर आंदोलन करण्याची आदल्या दिवशी घेतलेल्या निर्णयाची घोषणा करण्याचे त्यांनी टाळले. शिवसेनेच्या दडपणामुळे त्यांनी आरक्षण या विषयालाही बगल दिल्याची चर्चा आहे. रिपब्लिकन पक्षाच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी वांद्रे येथे एमआयजी क्लबवर रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती.

 
वैष्णोदेवीसाठी मध्य रेल्वेची विशेष गाडी Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

वैष्णोदेवीच्या उत्सवासाठी लवकरच मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून जम्मूतावीसाठी विशेष गाडी सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा देशाचा पश्चिम भाग वगळता सर्व राज्यांमध्ये मुंबईहून जात असतात. मुंबईतून जम्मूकडे पश्चिम रेल्वेच्या गाडय़ा जात असल्या तरी आतापर्यंत मध्य रेल्वेची मुंबईहून एकही गाडी थेट जम्मूपर्यंत जात नव्हती. वैष्णोदेवीच्या उत्सवापासून या प्रवासाची सुरुवात होणार आहे. आता भोपाळ, झाशी, आग्रामार्गे ही गाडी जम्मूतावीला जाईल.

 
‘आदर्श’मध्ये नातेवाईकांचे फ्लॅट असल्याचे प्रसिद्धीमाध्यमांद्वारे कळले! Print E-mail

अशोक चव्हाण यांचा दावा
प्रतिनिधी, मुंबई

सासू, चुलत सासरे आणि मेव्हण्याच्या पत्नीच्या नावे ‘आदर्श’ सोसायटीमध्ये फ्लॅट असल्याची बाब आपल्याला घोटाळ्यासंदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांद्वारे कळली, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि घोटाळ्यातील आरोपी अशोक चव्हाण यांनी गुरुवारी द्विसदस्यीय चौकशी आयोगासमोर केला. मुंबई-पुण्यातील सरकारी जमिनी सहकारी सोसायटीला देण्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेत असतात, असे सांगत त्यांनी ‘आदर्श’चे खापर पुन्हा एकदा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या माथी फोडले.

 
विजेचा ‘गुजरात पॅटर्न’ अभ्यासण्याचा ऊर्जामंत्र्यांचा आदेश Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर ऊर्जामंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार आणि भारनियमनमुक्तीची जबाबदारी अंगावर पडलेल्या राजेश टोपे यांनी मंगळवारी सुटीच्या दिवशी राज्याच्या ऊर्जाक्षेत्राचे धडे गिरवले. भारनियमनमुक्तीचा कार्यक्रम जाणून घेताना भारनियमनातून सुटका आणि माफक वीजदारासाठी गुजरातने नेमका काय पॅटर्न राबवला याचा अभ्यास करा, असा आदेश टोपे यांनी वीजकंपन्यांच्या अधिकाऱ्यांना दिला. ‘महानिर्मिती’, ‘महापारेषण’ व ‘महावितरण’ या तिन्ही कंपन्यांच्या स्वरूपाची, कामाची, योजनांची माहिती घेतली.

 
<< Start < Prev 41 42 43 44 45 46 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो