मुंबई आणि परिसर
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुंबई आणि परिसर
शेकडो विद्यार्थ्यांना आयआयटीतून ‘नारळ’ Print E-mail

असमाधानकारक शैक्षणिक कामगिरी अंगलट
प्रतिनिधी , मुंबई

‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेत एकदा का प्रवेश मिळाला की संपले सगळे या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सर्वसाधारण समजुतीला छेद देणारी आकडेवारी नुकतीच पुढे आली आहे. कारण शैक्षणिक कामगिरी समाधानकारक नसलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना गेल्या सहा वर्षांत आयआयटीने ‘नारळ’ दिला आहे. अर्थात वाईट वागणुकीबद्दल संस्थेने एकालाही घरचा रस्ता दाखविलेला नाही हे विशेष. तसेच आयआयटी-रूरकी वगळता एकाही आयआयटीने शुल्काची रक्कम परवडत नाही म्हणून विद्यार्थ्यांला काढून टाकलेले नाही.

 
महिला पोलिसांना आता मिळणार काठया Print E-mail

हल्लेखोरांवर यापुढे कडक  कारवाई
प्रतिनिधी, मुंबई

रस्त्यावर बंदोबस्तासाठी नि:शस्त्र असणाऱ्या महिला पोलिसांना आता काठय़ा मिळणार आहेत. महिला पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी हा निर्णय घेतला आहे. महिला पोलिसांवर हल्ला केल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर बंदोबस्तासाठी असणाऱ्या महिला पोलिसांना, विशेषत: वाहतूक पोलिसांना मारहाण होणाच्या घटना घडल्या आहेत. जे.जे. उड्डाण पुलावर बंदोबस्ताला असणाऱ्या वाहतूक पोलिसांना मारहाणीच्या दोन घटना घडल्या होत्या. तर नागपाडा येथेही महिला वाहतूक पोलिसाला मारहाण झाली होती.

 
जव्हारमधील नव्या खडखड धरणाला गळती Print E-mail

वार्ताहर , वाडा

जव्हार शहर तसेच परिसरातील खेडेगावांना शेती तसेच पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी डोमविरा नदीवर ७३ कोटी रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या खडखड धरणास गळती लागली आहे. विशेष म्हणजे अलिकडेच या धरणाचे काम पूर्ण झाले आहे. नित्कृष्ट दर्जामुळेच धरणातून गळती सुरू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
गेल्या पाच वर्षांत आदिवासी उपयोजनेतून सुमारे ७३ कोटी रूपये खर्च करून हे धरण बांधण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच वर्षी धरण गळू लागले आहे. या धरणाच्या कामात कमी सीमेंट तसेच वाळू मिश्रीत रेती वापरण्यात येत असल्याच्या तक्रारीही ग्रामस्थांनी केल्या होत्या.

 
नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मारकाबाबत ‘जैसे थे’चे आदेश Print E-mail

प्रतिनिधी , मुंबई

रायगड जिल्ह्यातील वढाव (खुर्द) येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मारकाच्या उभारणीबाबत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. सुमारे २० कोटी रुपये खर्चाच्या या स्मारकासाठी राज्य सरकारने बेकायदा जमीन बळकावल्याचा आरोप करीत अशोक राऊत, प्रभाकर राऊत यांच्यासह ग्रामस्थांनी ही याचिका केली आहे. रायगड जिल्ह्यात सुमारे १२ हेक्टर जमिनीवर नानासाहेब धर्माधिकारी यांचे स्मारक बांधण्यात येणार आहे. हे गाव बामणगाव समूह ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते. स्मारकासाठीची ही नियोजित जागा कित्येक वर्षांपासून गुरांच्या चराईसाठी वापरण्यात येते.

 
सिंचन घोटाळ्याचा मंत्रालय आगीशी संबंध? Print E-mail

आरपीआयच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा सवाल
खास प्रतिनिधी, मुंबई

पाटबंधारे प्रकल्पांतील घोटाळे उघड होऊ लागल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन ‘होऊन जाऊ द्या चौकशी’ असे सांगत अजित पवार महाराष्ट्रभर फिरत आहेत, त्यांच्यात हे धाडस कुठून आले, मंत्रालयातील आगीशी तर त्याचा संबंध नाही ना, असा खळबळजनक सवाल शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यात केला, तर सिंचन घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.  काँग्रेस-राष्ट्रवादीचे भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यास सज्ज रहा, असे आवाहन या मेळाव्यात रामदास आठवले, ठाकरे, मुंडे यांनी केले.

 
गुजरातवर टीका करणाऱ्या सोनिया गांधी यांचे महाराष्ट्राबाबत मौन Print E-mail

सिलिंडरची मर्यादा वाढविण्यावर सरकारची अळीमिळी!
खास प्रतिनिधी , मुंबई

दिल्ली, आसाम, हरियाणा या काँग्रेसशासित राज्यांनी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवरील अनुदानाची मर्यादा तीनने वाढविली असताना भाजपशासित राज्ये सामान्यांच्या मदतीला का धावून आली नाहीत, असा सवाल काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजकोटच्या सभेत बुधवारी केला असतानाच काँग्रेसची सत्ता असलेल्या महाराष्ट्रात मात्र ही मर्यादा वाढविण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सरकारने अद्याप निर्णय घेण्याचे टाळले आहे. सुमारे दीड हजार कोटींचा बोजा पडणार असल्याने हा निर्णय घेण्यात सरकारलाच धस्स होत आहे. यामुळेच हा निर्णय तात्काळ घ्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 
‘किंगफिशर’च्या संपात अद्याप तोडगा नाही Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

किंगफिशर एअरलाइन्सचे व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात सुरू असलेली बोलणी बुधवारी फिसकटल्याने रविवरपासून सुरू झालेला संप सुरूच राहिला आहे. यामुळे शुक्रवारपासून विमानसेवा पूर्ववत सुरू करण्याच्या व्यवस्थापनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. किंगफिशर एअरलाइन्सचे इंजिनिअर आणि वैमानिकांचे प्रतिनिधी म्हणून कॅ. विक्रांत पाटकर यांनी सांगितले की, व्यवस्थापनाने आमचे थकलेले पगार देण्याबाबत कोणतेही निश्चित आश्वासन दिलेले नाही. त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि त्यामुळे ते कोणतेही आश्वासन देण्यास तयार नाहीत.

 
जात पडताळणी समित्यांच्या बेभरवशी कारभाराने ग्रामपंचायत उमेदवार हवालदिल Print E-mail

खास प्रतिनिधी , मुंबई
नोव्हेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ४,६३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दोन दिवसांवर आली असतानाही जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे हजारो उमेदवार हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आता अखरेचा पर्याय म्हणून निवडणुकीनंतर जात प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देणारा अध्यादेश काढून इच्छुक उमेदवारांना दिलासा देण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत.

 
साकीब नाचणसह पाचजणांना मोक्का Print E-mail

प्रतिनिधी , ठाणे  

भिवंडी येथील विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड मनोज रायचा यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप असलेला साकीब नाचण आणि त्याच्या चार साथीदारांविरोधात भिवंडी गुन्हे अन्वेषण शाखेने नुकतीच मोक्कांर्तगत कारवाई केली आहे. साकीब हा स्टुडण्ट इस्लामिक मुमेन्ट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेशी संबंधित असून त्याच्यावर मुलुंड येथील बॉम्बस्फोटाचा आरोप होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
साकीब नाचण, त्याचा मुलगा शमील नाचण, त्याचे साथीदार अकीब नाचण, गुड्डू उर्फ मोहम्मद हाफीज हमजा खान आणि तन्वीर अब्दुल मजीर जब्बीदार या पाचजणांविरोधात मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या वृत्ताला गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण पवार यांनी दुजोरा दिला आहे.
 
प्रतीक्षानगरमध्ये वाहनांची मोडतोड Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
प्रतीक्षानगर येथे मंगळवारी मध्यरात्री २१ वाहनांची मोडतोड करण्यात आली. याप्रकरणी वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून दोन फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. पूर्ववैमनस्यातून आरोपींनी हे कृ त्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

 
डब्यातील घाणीचा त्रास Print E-mail

मध्य रेल्वेच्या संतप्त महिलांची मुख्यालयावर धडक
प्रतिनिधी, मुंबई
कर्जत येथून सकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या उपनगरी गाडीच्या महिलांच्या डब्यात मानवी विष्ठा टाकण्याच्या विकृतीमुळे महिला प्रवासी त्रस्त झाल्या असून आता या संतापाचा उद्रेक होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. हा प्रकार थांबविण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही रेल्वे प्रशासन थंडच असल्याने बुधवारी काही महिलांनी थेट छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील रेल्वे मुख्यालयावर धडक दिली. तथापि, हा प्रकार बंद करण्यासाठी केवळ प्रयत्न करण्याच्या आश्वासनापलीकडे प्रवासी महिलांच्या पदरी काहीही पडले नाही.

 
लेफ्टनंट जनरल ब्रार यांचे मुंबईत आगमन Print E-mail

प्रतिनिधी , मुंबई
लंडनमध्ये चार अज्ञात व्यक्तींकडून झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले निवृत्त लेफ्टनंट जनरल के. एस. ब्रार यांचे पत्नी मीना यांच्या समवेत बुधवारी दुपारी मुंबईत आगमन झाले. पंजाबमध्ये झालेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’मध्ये ब्रार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे खलिस्तानवाद्यांमध्ये त्यांना नेहमी ‘खलिस्तानविरोधी’ म्हणूनच पाहिले जाते. याच द्वेषातून ७८ वर्षांच्या ब्रार यांच्यावर लंडनमध्ये रविवारी  प्राणघातक हल्ला झाला.

 
मंत्रिमंडळाची आज बैठक Print E-mail

 

अजितदादांचे पक्षाच्या मंत्र्यांना मार्गदर्शन
खास प्रतिनिधी , मुंबई
अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर उद्या होणाऱ्या पहिल्याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी अशा दोन्ही बाजूने तयारी करण्यात आली आहे. अजितदादांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मार्गदर्शन केले. सिंचनाच्या श्वेतपत्रिकेचा विषय आल्यास काँग्रेसने तयारी केली आहे. पक्षाचे एक मंत्री नितीन राऊत यांनी नारायण राणे, डॉ. पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली. अजितदादांच्या सल्ल्याने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यास त्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे याची व्यूहरचना काँग्रेसने केली आहे.

 
लालबागच्या गणपतीच्या गर्दीत चोरी करणाऱ्या ‘मोसमी चोरां’ना अटक Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
हल्ली चोरांचे अनेक प्रकार पहायला मिळतात. दिवसा रिक्षा चालवून रात्री चोरी करणारे, अन्य राज्यांतून येऊन चोरी करणारे असे चोरांचे प्रकार रूढ आहेत. पण दरवर्षी केवळ लालबागच्या गणेशोत्सवातच चोरी करणाऱ्या चोरांची एक टोळी क्षाली आहे. नागपाडा पोलिसांनी यातील तीन चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा महागडे मोबाईल आणि सोनसाखळी जप्त केली आहे. आम्ही केवळ लालबागच्या गर्दीतच चोरी करतो, असे या आरोपींनी सांगितले आहे.

 
अशोक चव्हाण यांची आज पुन्हा साक्ष Print E-mail

‘आदर्श’तील अपात्रांना शासनानेच पात्र केल्याचा माजी जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा
प्रतिनिधी , मुंबई
‘आदर्श’ सोसायटीमध्ये सदस्य होऊ इच्छित असलेल्या अनेक सदस्यांना जिल्हाधिकारी या नात्याने आपण अपात्र ठरविले होते. मात्र त्याच सदस्यांना पुढे राज्य सरकारने पात्र ठरविले, असा खळबळजनक खुलासा माजी जिल्हाधिकारी प्रदीप व्यास यांनी बुधवारी द्विसदस्यीय चौकशी आयोगासमोर केला. व्यास यांच्या या खुलाशाची दखल घेत सोसायटीच्या सदस्यांना कोणत्या विभागाकडून पात्र ठरविण्यात आले, याबाबत आयोगाने राज्याच्या महाधिवक्त्यांना विचारणा करीत १५ ऑक्टोबपर्यंत त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.

 
‘रिलायन्स’-‘एमएमआरडीए’त दुसऱ्या मेट्रोवरून जुंपली Print E-mail

प्रतिनिधी , मुंबई
चारकोप-वांद्रे-मानखुर्द या दुसऱ्या मेट्रो रेल्वेमार्गाचे काम तीन वर्षे उलटूनही सुरू न झाल्याने त्यावरून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ यांच्यात जबाबदारीची टोलवाटोलवी सुरू झाली आहे. या दुसऱ्या मेट्रो रेल्वेचे काम तातडीने सुरू करण्याचे पत्र प्राधिकरणाने पाठवताच, या प्रकल्पासाठी कारडेपोची जागा आणि प्रकल्पाचा मार्ग निधरेक करून दिला नसल्यानेच काम सुरू करता येत नसल्याचा प्रतिहल्ला ‘रिलायन्स’ने चढवला आहे. हे पत्र आता प्राधिकरणाने कायदा विभागाकडे ‘सल्ल्या’साठी पाठवले आहे.

 
बागेत कवटी सापडली Print E-mail

प्रतिनिधी , मुंबई
घाटकोपरच्या असल्फा व्हिलेजमध्ये एक मानवी कवटी सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही कवटी नेमकी कोणाची आणि किती जुनी आहे याचा शोध घेण्यासाठी ती न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे.

 
राज्यातील दुष्काळ सरला! Print E-mail

खास प्रतिनिधी , मुंबई
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील पिकांची स्थिती सुधारली असून ५० टक्केपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत कमालीची घटली आहे. त्यामुळे राज्यात १९७२ पेक्षाही भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचा कांगावा करीत केंद्राकडून भरीव मदत मिळविण्याच्या काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनसुब्यांवर पाणी फेरले जाणार आहे.

 
कॉ. भालचंद्र भांडारकर यांचे निधन Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
रोजंदारीवरील टपाल कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे यासाठी न्यायालयीन लढाई लढणारे टपाल कर्मचाऱ्यांचे नेते कॉ. भालचंद्र भांडारकर यांचे ३० सप्टेंबर रोजी कर्करोगाने निधन झाले. ते ७३ वर्षांंचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे आणि भाऊ असा परिवार आहे.

 
ठाण्यातील ‘रेमंड’ची जमीन विकासकामांना देण्यास विरोध Print E-mail

प्रतिनिधी , मुंबई
ठाणे येथील ‘रेमंड वूल मिल’ची कमाल नागरी जमीन कायद्याअंतर्गत मोडणारी सुमारे चार लाख चौरस मीटर जागा विकासकामांसाठी देण्याबाबत राज्य सरकारकडे पाठविलेल्या प्रस्तावाला विरोध करणारी रिट याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. मात्र या याचिकेत उपस्थित करण्यात आलेले मुद्दे हे महत्त्वाचे आणि सर्वाच्या हिताचे असल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने रीट याचिकेचे जनहित याचिकेत रुपांतर करण्याचे निर्देश बुधवारी दिले.

 
<< Start < Prev 41 42 43 44 45 46 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो