प्रतिनिधी, मुंबई अभिनेता सलमान खान याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून पदपथावरील पाच जणांना चिरडल्याच्या घटनेला १० वर्षे उलटली. मात्र त्याने जखमींच्या नुकसानभरपाईसाठी सरकारदरबारी जमा केलेली १७ लाख रुपयांची रक्कम अद्याप संबंधितांना मिळाली नसल्याचे उच्च न्यायालयाला सांगण्यात आले. विशेष म्हणजे न्यायालयाने सलमानला नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याचे आदेश देताना राज्य व केंद्र सरकारलाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. |
वार्ताहर , वाडा भिवंडी-वाडा-मनोर या राज्य महामार्गावरील खड्डय़ामुळे एका विद्यार्थ्यांचा बळी गेला. खुपरी गावाजवळ बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता मोटार सायकल खड्डय़ात आदळल्याने मागे बसलेला महेंद्र रमेश माले (७) हा मुलगा बाहेर फेकला गेला. |
प्रतिनिधी , ठाणे तब्बल १० सोनसाखळी चोरीचे गुन्हे नावावर दाखल असलेल्या १६ वर्षीय मुलाला तसेच त्याच्या एका साथीदाराला ठाणे खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली . |
प्रतिनिधी , मुंबई अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांच्या हत्ये प्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी जिल्हा न्यायालयात ९२६ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात १०१ साक्षीदारांचा समावेश असून, ओळख परेडमध्ये ९ साक्षीदारांनी मुख्य आरोपी परवेज टाक याला ओळखल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे हत्याकांड पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. |
रविवार मध्यरात्रीपासून टॅक्सींचा बेमुदत बंद |
|
|
प्रतिनिधी , मुंबई डॉ. हकीम समितीने शिफारस केल्याप्रमाणे टॅक्सीच्या भाडय़ात तीन रुपयांची वाढ मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी मुंबईतील ४५ हजार टॅक्सी रविवार मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जात आहेत. या संपामध्ये ठाणे आणि पुणे येथील टॅक्सीचालकही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येते. |
प्रतिनीधी ,मुंबई हॉटेल व्यवसायिक बी आर शेट्टी यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. मुंबई उपनगरातील ओशिवरा येथे रात्री दहाच्या सुमारास आपल्या हॉटेलतून घरी जाताना ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी शेट्टी यांच्यावर तीन राऊंड फायर केल़े |
प्रतिनिधी , मुंबई कर्जत येथून सकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या उपनगरी गाडीच्या महिलांच्या डब्यात मानवी विष्ठा टाकण्याच्या विकृतीमुळे गेल्या काही दिवसांपासून महिला प्रवासी त्रस्त झाल्या असून आता या संतापाचा उद्रेक होणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. हा प्रकार थांबविण्याबाबत रेल्वे प्रशासन थंडच असल्याने बुधवारी काही महिलांनी थेट छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील रेल्वे मुख्यालयावर धडक दिली. तथापि, हा प्रकार बंद करण्यासाठी केवळ प्रयत्न करण्याच्या आश्वासनापलीकडे प्रवासी महिलांच्या पदरी काहीही पडले नाही. |
गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२
समाजोपयोगी कामाचा वसा घेऊन त्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींचे जाळे महाराष्ट्रात सर्वदूर पसरले आहे. स्वीकृत कामावरील निष्ठेने ही मंडळी समाजजीवन निरामय होण्यासाठी तुटपुंज्या साधनसामुग्रीनिशी कार्यरत असतात. अशा निवडक संस्था व व्यक्तिंची ओळख करून देऊन त्यांच्या कार्यात वाचकांनी आर्थिक मदतीच्या रुपाने सहभागी व्हावे या हेतूने मागील वर्षांपासून ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या काळात ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम हाती घेतला. वाचकांनी त्याला मन:पूर्वक प्रतिसाद दिला. |
मुंबई, ३ ऑक्टोबर २०१२ डॉ. हकीम यांच्या शिफारशींनुसार टॅक्सीच्या भाडय़ात किमान तीन रुपयांची वाढ मिळालीच पाहिजे या मागणीसाठी येत्या रविवार मध्यरात्रीपासून टॅक्सी चालक बोमुदत संपावर जाणार आहेत. जोपर्यंत किमान तीन रूपये भाडेवाड मिळत नाही तोपर्यंत बेमुदत संपाचा इशारा टॅक्सी चालक-मालकां संघटनेने दिला आहे. |
|
|
<< Start < Prev 41 42 43 44 45 46 Next > End >>
|