प्रतिनिधी, मुंबई गिरणी कामगारांच्या घरांसाठी ‘म्हाडा’ने काढलेल्या सोडतीत घरे मिळालेल्या यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी ऑक्टोबरची मुदत असताना अद्याप ७५४ अर्जदारांची कागदपत्रे जमा झालेली नाहीत. त्यामुळे कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून १६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ती जमा करता येतील.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मत खास प्रतिनिधी, नवी मुंबई
देश आणि राज्य पातळीवर सध्या भ्रष्टाचाराचे सर्रास आरोप केले जात आहेत. त्यामुळे देशात केवळ भ्रष्टाचार सुरू आहे, असे चित्र निर्माण होऊन सर्वसामान्यांनाचा लोकशाहीवरील विश्वास उडेल आणि देशात अराजकता माजेल, असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी नवी मुंबईत व्यक्त केले.प्रत्येक गोष्ट नियमांवर बोट ठेवून करता येत नाही. कधी कधी लोकांसाठी ‘आऊट ऑफ द वे’ जाऊन काम करावे लागते, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावला.
प्रतिनिधी, ठाणे भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीविषयी महापालिका प्रशासनाने आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या नगरसेविकांनी गुरुवारी जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. याप्रकरणी महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर तब्बल तीन तासांनी पोलिसांच्या मदतीने मळवी यांना कार्यालयाबाहेर काढण्यात आले.
प्रतिनिधी, कल्याण कल्याण तालुक्यातील गोवेली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रमिला काळे व उपसरपंच रवींद्र बासरे यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका हॉटेल व्यावसायिकाकडून १५ हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी रात्री रंगेहाथ अटक केली आहे.
प्रतिनिधी , वसई भाईंदरमधील उत्तन येथे ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून एका विवाहित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी फरार झाला आहे.पीओपीचे काम करणारा आरोपी अब्दुल शेख (२८)हा उत्तनच्या शांतीनगर डोंगरी भागात राहणाऱ्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांना ओळखत होता.