देश-विदेश
मुखपृष्ठ >> देश-विदेश
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

देश-विदेश
काँग्रेसला लागले निवडणुकांचे वेध Print E-mail

विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली

केंद्रात यूपीए सरकारचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेस पक्षाला दीड वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे आतापासूनच वेध लागले आहेत. निवडणुकांना सामोरे जाण्यासाठीची बौद्धिक कवायत काँग्रेसजन यंदा दिवाळीपूर्वीच उरकणार आहेत. येत्या रविवारी रामलीला मैदानावर देशभरातील तमाम काँग्रेसजनांच्या उपस्थितीत होणाऱ्या जंगी जाहीर सभेपाठोपाठ ९ नोव्हेंबर रोजी अ. भा. काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील काँग्रेसचे मंत्री यांची हरयाणातील सूरजकुंड येथे संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे.
 
निवृत्त निमलष्करी जवानांना माजी सैनिकांचा दर्जा Print E-mail

पीटीआय, नवी दिल्ली / गुरगांव

निमलष्करी दलातील निवृत्त कर्मचाऱ्यांना माजी सैनिकांचा दर्जा देण्यास केंद्र सरकारने गुरुवारी मंजुरी दिल्याने जवळपास चार लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), भारत तिबेट सीमा सुरक्षा दल (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) या दलातील माजी कर्मचाऱ्यांना संरक्षण दलाप्रमाणे माजी सैनिकांचा दर्जा देण्यात येणार असून त्यांना यापुढे माजी केंद्रीय पोलीस कर्मचारी म्हणून गणले जाणार आहे.
 
कॅमेरॉन यांची ब्रिटनच्या संसदेत नामुष्की! Print E-mail

वृत्तसंस्था, लंडन

युरोपीय महासंघाच्या अर्थसंकल्पात कपात करावी, या विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाच्या मागणीला सत्तारूढ हुजूर पक्षातील बंडखोरांनीही पाठिंबा दिल्याने पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांचा ब्रिटिश संसदेत गुरुवारी धक्कादायक पराभव झाला. कॅमेरॉन यांचा या कपातीस विरोध होता. ठरावाच्या बाजूने ३०७ मते पडली तर विरोधात २९४ मते पडली. हा ठराव कॅमेरॉन यांच्यावर बंधनकारक नसला तरी त्यांच्यावरचा दबाव वाढला आहे. युरोपीय महासंघातील राष्ट्रनेत्यांची ब्रुसेल्स येथे परिषद होत असून त्यात २०१४ ते २०२० या कालावधीतील अर्थसंकल्पाचा निर्णय होणार आहे.
 
गोव्यातील काँग्रेस खासदारांच्या पाठीवर ‘कमळ’धारी भाजपचा ‘हात’! Print E-mail

वृत्तसंस्था, पणजी

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ताज्या पुनर्रचनेत गोव्यातील काँग्रेस खासदारांची उपेक्षा केली गेल्याबद्दल गोवा भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली आहे! या घडामोडीमुळे काँग्रेस खासदारांच्या पाठिवर ‘कमळ’धारी भाजपचा ‘हात’ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजपचे गोव्यातील प्रवक्ते डॉ. विल्फ्रेड मिस्किता म्हणाले की, मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात ज्यांना स्थान मिळाले आहे त्यापेक्षा काँग्रेसचे राज्यसभा सदस्य असलेले शांताराम नाईक आणि खासदार फ्रान्सिस्को सारदिन्हा हे कितीतरी अधिक कर्तृत्ववान आहेत. मात्र आजवर केंद्रीय मंत्रिमंडळात गोव्यातील कुणाही खासदाराला स्थान द्यावेसे काँग्रेसला वाटलेले नाही.
 
मोदी विवाहित असल्याचा दिग्विजय यांचा जावईशोध Print E-mail

पीटीआय, सिमला
शशी थरूर यांच्या प्रेयसीबाबत टिप्पण्या करण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांनी आपल्या वैवाहिक जीवनाची माहिती उघड करावी, असे आव्हान काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी दिले आणि मोदी यांचा विवाह झाल्याचा जावईशोधही जाहीर केला.
यू टय़ूब या संकेतस्थळावर ‘नरेंद्र मोदी यांची पत्नी’ असा मजकूर टाकल्यास ‘यशोदा बेन’ ही त्यांची पत्नी असल्याची बाब पुढे येते असा जावईशोध सिंग यांनी लावला आहे.

 
ओबामांकडून हवाई पाहणी Print E-mail

पीटीआय, न्यूजर्सी
सॅण्डीचा सर्वाधिक फटका बसलेल्या न्यूजर्सी राज्याच्या किनारपट्टी भागाची अध्यक्ष बराक ओबामा यांनी गुरुवारी पाहणी केली. त्यांच्याबरोबर न्यूजर्सीचे रिपब्लिकन गव्हर्नर आणि त्यांचे कट्टर विरोधक ख्रिस ख्रिस्ती हे होते. संकटसमयी या दोन्ही नेत्यांनी एकत्र येत आपदग्रस्त भागाच्या पुनर्उभारणीसाठी एकदिलाने काम करण्याचा दृढनिश्चय केला.

 
कामाला लागा! Print E-mail

मनमोहन सिंग यांचे सहकाऱ्यांना आवाहन
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
यूपीए सरकारची स्पर्धा आता राजकीय ‘कॅलेंडर’शी असून, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेचा सदुपयोग करीत अपूर्ण कामे मार्गी लावा, त्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करा, असे आवाहन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुरुवारी ८० सदस्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीला संबोधताना केले.

 
चीनच्या ‘रडारचुकव्या’ विमानाची चाचणी Print E-mail

पीटीआय, बीजिंग
चीनने नुकतेच रडारच्या आवाक्यात येऊ न शकणाऱ्या जे- ३१ या अद्ययावत लढाऊ विमानाची यशस्वी चाचणी घेतली़  अमेरिकी तंत्रज्ञानाशी बरोबरी करण्याच्या शर्यतीत ही विमाने म्हणजे एक मैलाचा दगड ठरणार आहेत़  लिओनियन प्रभागातील शेन्यांग एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन येथे या विमानांची ११ मिनिटांची पहिलीवहिली चाचणी घेण्यात आली, असे वृत्त ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्राने दिली आह़े 

 
कामतांविरोधातील अहवाल स्वीकारला Print E-mail

वृत्तसंस्था, पणजी
गोव्यातील बेकायदा खाणकामावरून माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांना जबाबदार धरणारा लोकलेखा समितीचा अहवाल विधानसभाध्यक्षांनी स्वीकारला आहे. तत्कालीन विधानसभाध्यक्ष प्रतापसिंह राणे यांनी हा अहवाल रोखला होता.

 
अपूर्ण कामे मार्गी लावण्याचे पंतप्रधानांचे सहकारी मंत्र्यांना आवाहन Print E-mail

 

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
यूपीए सरकारची स्पर्धा आता राजकीय ‘कॅलेंडर’शी असून, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेचा सदुपयोग करीत अपूर्ण कामे मार्गी लावा, त्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करा, असे आवाहन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुरुवारी ८० सदस्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीला संबोधताना केले.

 
तेलवाहू जहाजातील बेपत्ता खलाशांचा शोध जारी Print E-mail

पी.टी.आय., चेन्नई
‘प्रतिभा कावेरी’ या तेलवाहू जहाजावरील सहा खलाशी बेपत्ता झाले असून, त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर तेलवाहू जहाज येथील किनाऱ्यावरून भरकटले होते. या जहाजावरील अन्य १५ खलाशांना वाचविण्यात आल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 
विनाअनुदित सिलिंडर महागला अन् स्वस्तही झाला! Print E-mail

पीटीआय, नवी दिल्ली
स्वस्तात मिळणाऱ्या गॅस सिलिंडरच्या संख्येवर वर्षांला केवळ सहा सिलिंडर अशी मर्यादा आणल्यानंतर विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात २६ रुपये ५० पैशांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने गुरुवारी घेतला आणि त्याच दिवशी रात्री तो गोठविलाही.

 
खेमकांना धमक्या Print E-mail

पी.टी.आय., चंदीगढ
रॉबर्ट वढेरा यांच्या वादग्रस्त जमिनव्यवहाराच्या चौकशीने झोतात आलेले हरयाणाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अशोक खेमका यांना पुन्हा एकदा धमकीचा दूरध्वनी आला आहे. पंचकुला पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

 
लांब पल्ल्याच्या गाडय़ांत ‘स्लीपर’ प्रवाशांना १ डिसेंबरपासून ओळखपत्रे सक्तीची Print E-mail

पी.टी.आय., नवी दिल्ली
‘स्लीपर’ वर्गातून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना येत्या १ डिसेंबरपासून आपली छायाचित्रांकित ओळखपत्रे जवळ बाळगणे आवश्यक ठरणार आहे. अनधिकृत दलालांकडून तिकिटांच्या होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी तसेच अधिकृत प्रवाशांना प्रवास करणे अधिक सुलभ व्हावे, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले. बनावट नावांनी तिकिटे खरेदी करून चढय़ा दराने प्रवाशांना त्यांची विक्री करणाऱ्या दलालांना या निर्णयामुळे अटकाव करता येईल, असा अंदाज आहे.

 
सागरी चाच्यांबाबत सावधगिरीचा इशारा Print E-mail

पीटीआय, वॉशिंग्टन
सोमाली सागरी चाच्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या कारवाया आता भारताच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत विस्तारल्याची भीती व्यक्त करीत अमेरिकेने भारताला सावधगिरीचा इशारा दिला आहे.

 
सलमान खुर्शीद यांच्या धमक्या अखेर पोकळच ! - केजरीवाल Print E-mail

alt

वृत्तसंस्था, फारुखाबाद (उत्तर प्रदेश)
मी येथे आलो असून केंद्रीय मंत्री सल्मान खुर्शीद यांचे आव्हान स्वीकारले आहे. खुर्शीद यांनी मला आणि माझ्या समर्थकांना जीवे मारण्याच्या दिलेल्या अखेर पोकळच ठरल्या आहेत, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी खुर्शीद यांना येथे गुरुवारी आव्हान दिले. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ चे कार्यकर्ते येथे येतील परंतु त्यांना माघारी जाणे शक्य होणार नाही, असे खुर्शीद यांनी केजरीवाल यांना अलीकडेच बजावले होते.
 
मोदी विवाहीत असल्याचा दिग्विजय सिंग यांचा दावा Print E-mail

alt

नवी दिल्ली, १ नोव्हेंबर २०१२
शशी थरूर यांच्या प्रेयसीबाबत टिप्पण्या करण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांनी आपल्या वैवाहिक जीवनाची माहिती उघड करावी, असे आव्हान कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी दिले. यू टय़ूब या संकेतस्थळावर ‘नरेंद्र मोदी यांची पत्नी’ असा मजकूर टाकल्यास ‘यशोदा बेन’ ही त्यांची पत्नी असल्याची बाब पुढे येते असा जावईशोध सिंग यांनी लावला आहे.
 
अरविंद केजरीवालांवर चप्पल फेकण्याचा एका अज्ञात व्यक्तीने केलेला प्रयत्न अपयशी Print E-mail

alt

नवी दिल्ली, १ नोव्हेंबर २०१२
इंडीया अगेन्स्ट करप्शन(आय.ए.सी) च्या बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने अरविंद केजरीवालांवर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. पत्रकार परिषद सुरू असताना एक व्यक्तीने अचानक उभे राहून नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर केजरीवाल उत्तर का देत नाहीत? तसेच दिल्लीत गेल्या वीस वर्षात आय.आर.एस अधिकारी असताना केजरीवालांनी आरोप का केले नाहीत? असे प्रश्न केजरीवालांना विचारले.
 
धोका आणि सन्नाटा कायम Print E-mail

पीटीआय , न्यूयॉर्क

उद्ध्वस्त झालेली घरे.. रस्तोरस्ती पडलेला डेब्रीजचा खच.. पुराच्या पाण्यात वाहून आलेली वाहने इतस्तत पडलेली.. सरकारी निवाऱ्यात संभ्रमावस्थेत अडकलेले आपद्ग्रस्त.. हे वर्णन आहे सॅण्डी वादळामुळे उडालेल्या हाहाकाराचे, अर्थात अमेरिकेचे. अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला सोमवारी सायंकाळी थडकलेल्या सॅण्डी वादळाने महासत्तेच्या निम्म्या भागाला तडाखा दिला. या तडाख्यात अब्जावधी डॉलरची वित्तहानी झाली असून अद्यापही सॅण्डीचा धोका कायम आहे! कॅरेबियन किनारा ते कॅनडा या पट्टय़ात झालेल्या या वादळाने आतापर्यंत १२२ जणांचा बळी घेतला आहे. त्यात अमेरिकेतील ५५ बळींचा समावेश आहे.

 
श्रीलंकेत पहिल्या महिला सरन्यायाधीशांवर महाभियोग Print E-mail

वृत्तसंस्था, कोलम्बो

सरकारी अधिकारी आणि न्यायालयातील वाढत्या मतभेदांच्या पाश्र्वभूमीवर श्रीलंकेच्या पहिल्या महिला न्यायाधीश शिरानी बंदरनायके यांच्याविरोधात गैरवर्तनाच्या आरोपावरून संसदेत महाभियोगाचा ठराव मांडला जाणार आहे. सत्तारूढ आघाडी गुरुवारी संसदेच्या अध्यक्षांकडे तो सुपूर्द करणार आहे. सत्तारूढ आघाडीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. श्रीलंकेच्या घटनेनुसार कलम १०७ नुसार महाभियोग भरण्यासाठीचा प्रस्ताव मांडण्यासाठी एक तृतियांश खासदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. संसदेची सदस्यसंख्या २२५ असून ७५ खासदारांच्या स्वाक्षऱ्यांची गरज असताना आतापर्यंत ११७ खासदारांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो