|
देश-विदेश
पीटीआय, वॉशिंग्टन
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघा आठवडा उरला असतानाच अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मिट रोम्नी यांच्यातील वादात चांगलेच रंग भरत चालले आहेत. ओहिओ या महत्त्वाच्या राज्यात झालेल्या खुल्या चर्चेत ओबामा यांनी रोम्नी यांच्यावर पाच टक्क्य़ांनी आघाडी घेतल्याचे नव्या चाचणीवरून स्पष्ट झाले आहे. विविध वृत्तवाहिन्या आणि न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या पाहणीत, रोम्नी यांनी फ्लोरिडा आणि व्हर्जिनिया येथे आघाडी घेतली असून आता तेथे दोन्ही उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. |
वृत्तसंस्था, लंडन
वयाची चाळिशी उलटून गेल्यानंतर अनेक आजार आपल्याला बेजार करतात, त्यात हृदयरोग व मधुमेह हे प्रामुख्याने दिसून येतात. चाळिशीतही आरोग्यदायी जीवनासाठी टोमॅटो, ओट्स, बदाम तसेच मासे यांचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. वयाच्या चाळिशीनंतर हृदयरोग व मधुमेह हे आजार जडतात व त्याचे कारण अनारोग्यकारक जीवनशैली हे आहे. त्यामुळे कोलेस्टरॉल व रक्तदाब वाढतो. काही विशिष्ट अन्नपदार्थामुळे मात्र आपण त्यांना आटोक्यात ठेवू शकतो. संशोधकांच्या मते रोज तीन ग्रॅम जरी ओट्स सेवन केले तरी त्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण पाच ते दहा टक्क्य़ांनी कमी होते. |
डॉ. हॅमरॉफ व रॉजर पेनरोझ यांच्या जिद्दीला यश वृत्तसंस्था, लंडन
जेव्हा कणरूपाने बनलेला आत्मा मानवी चेतासंस्थेच्या बाहेर पडतो, तेव्हा मृत्यूसमीप अनुभवाची जाणीव होते, अशा आशयाचा क्रांतिकारी सिद्धांत डॉ. स्टुअर्ट हॅमरॉफ व रॉजर पेनरोझ दोघा ख्यातनाम वैज्ञानिकांनी मांडला आहे. मृत्यू समीप असतानाच्या अनुभवांचे आकलन मांडताना ते म्हणाले, की मेंदू हा क्वांटम संगणक आहे व सबोधता त्याची आज्ञावली आहे. अॅरिझोना विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. स्टुअर्ट हॅमरॉफ यांनी क्वासी रिलीजियस सिद्धांत पुढे नेण्याचा प्रयत्न केला असल्याचे ‘डेली मेल’च्या वृत्तात म्हटले आहे. कणभौतिकी सिद्धांताच्या आधारे त्यांनी सबोधतेची संकल्पना अधिक समजावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. |
किनारपट्टीलगत वादळी वारे शाळा-महाविद्यालये बंद पीटीआय, चेन्नई सँडी वादळामुळे अमेरिकेतील जनजीवन कोलमडले असतानाच भारताच्या पूर्व किनारपट्टीला नीलम या समुद्री चक्रीवादळामुळे धोका निर्माण झाला आहे. हे समुद्री वादळ बुधवारी संध्याकाळनंतर अधिक तीव्र झाले असून, त्यामुळे तामिळनाडू व पुडुचेरीच्या किनारी भागात मुसळधार पाऊस झाला. झोपडय़ा, उभी पिके व वीजवाहिन्यांचे यात मोठे नुकसान होऊ शकेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. |
० राजकीय पक्षप्रमुखांच्या राज्यभर पदयात्रा ० एकच लक्ष्य, २०१४ची विधानसभा निवडणूक पीटीआय, हैदराबाद सरकार तुमच्या दारी.. माजी सरकार तुमच्या दारी.. भावी सरकार तुमच्या दारी.. असा अद्वितीय अनुभव सध्या तेलुगु मतदारांना येत आहे.. कारण एकच २०१४ साली होणारी विधानसभा निवडणूक. या निवडणुकीत आपल्यालाच सत्ता मिळावी यासाठी आतापासूनच तेलुगु देसम, वायएसआर काँग्रेस आणि सत्ताधारी काँग्रेस या तीनही प्रमुख राजकीय पक्षांनी तयारी चालवली आहे. आणि या पक्षांच्या प्रमुखांनी त्यासाठी भर दिला आहे पदयात्रेवर! |
वृत्तसंस्था, गांधीनगर पारंपरिक दिवाळी नोव्हेंबरमध्ये साजरी होईलच पण गुजरात निवडणुकीचे निकाल २० डिसेंबरला जाहीर होतील तेव्हा आमच्या विजयाने जी दिवाळी साजरी होईल ती ‘न भूतो न भविष्यति’ अशीच असेल, असे प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. |
नवी दिल्ली, ३१ आँक्टोबर २०१२ फेब्रुवारी २००९ मध्ये इंडिगो हवाईवाहतूक संस्थेच्या गोवा-दिल्ली विमानात टोकधार वस्तू(सुया) आणि बंदुकीसकट अटक झालेल्या आणि व्यवसायाने चार्टड अकाऊन्टंट असलेल्या आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. |
पी.टी.आय, ३१ आँक्टोबर २०१२
गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलींनंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिसा अमेरिकेने नाकारला होता मात्र, नरेंद्र मोदी व्हिसासाठी अर्ज करू शकतात आणि व्यवस्था त्यावर योग्य निर्णय घेईल असं अमेरिकेने काल (मंगळवार) स्पष्ट केले.अमेरिकेच्या दक्षिण-मध्य विभागातील राज्यांचे सचिव राँबर्ट ब्लेक यांनी गुजरात राज्याबरोबर अमेरिकेचे चांगले संबंध असून गुजरात राज्य अमेरीकन संस्थांच्या दृष्टीने महत्वाचे आहे, असे स्पष्ट केले. मोदींची यावर काय प्रतिक्रिया असेल याबद्दल आता कोणताही अंदाज मला व्यक्त करावयाचा नाही पण मोदी केव्हाही नव्या व्हिसासाठी अर्ज करू शकतात, असंही ते पुढे म्हणाले. |
नवी दिल्ली, ३१ ऑक्टोबर २०१२ भारचाच्या पहिल्या महिला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज (बुधवार) त्यांची समाधी 'शक्तीस्थळ' येथे जाऊन श्रद्धांजली वाहिली. |
पीटीआय, न्यूयॉर्क
* वादळी वाऱ्यांचा वेग ताशी ८० मैल * अनेक झाडे उन्मळून पडली * विद्युत उपकेंद्रात स्फोट * मॅनहटन, न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये वीज खंडित * देशाच्या अनेक भागांत आणीबाणी जाहीर * न्यूयॉर्कमध्ये १३ फूट उंचीच्या लाटा * अंदाजे २० अब्ज डॉलर्सची वित्तहानी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात प्रलयंकारी ठरलेल्या ‘सॅण्डी’ या वादळाने अमेरिकेची वाताहत केली आहे. या वादळात आतापर्यंत १७ जण ठार झाले असून लाखो लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
|
शुक्रवारी घोषणा होण्याची शक्यता विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात सहभागी व्हायचे टाळणारे काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षात अध्यक्ष सोनिया गांधी यांचे उत्तराधिकारी व दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून महासचिव (सेक्रेटरी जनरल) किंवा कार्यकारी अध्यक्ष म्हणून पदोन्नती मिळणार आहे. येत्या रविवारी रामलीला मैदानावर किरकोळ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या समर्थनार्थ काँग्रेसने भव्य मेळाव्याचे आयोजन केले असून, त्यापूर्वी राहुल गांधी यांची काँग्रेस पक्षातील क्रमांक दोनच्या पदाची औपचारिक घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. |
वृत्तसंस्था, लंडन
जगात कुठेही बसून तुमच्या घरातला विजेचा दिवा तुम्हाला तुमच्या हातातील मोबाईलने चालू किंवा बंद करता आला तर. आता यात जरतर अशी शक्यता राहिलेली नाही. तसे करण्यात यश आले आहे. मोबाईलच्या मदतीने असा बल्ब चालू-बंद करता आला तर चोरटय़ांनाही काही प्रमाणात वचक बसू शकेल असा त्याचा फायदा आहे. या बल्बचे वैशिष्टय़ म्हणजे तो रंगीत आहे. ब्रॉडबँड नेटवर्कला तो जोडलेला असतो त्यामुळे स्मार्ट फोनच्या मदतीने तुम्ही त्या बल्बच्या प्रकाशाचे रंग बदलू शकता. प्रकाशाची तीव्रता बदलू शकता अर्थातच त्यात स्मार्टफोनचे विशिष्ट अॅप म्हणजे अॅप्लिकेशन असणे गरजेचे आहे. |
भाजपच्या ‘कमल संदेश’मधून टीका विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली भाजपचे मुखपत्र ‘कमल संदेश’ने बुधवारी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी करणारे ‘ब्लॅकमेलर’ अशा तिखट शब्दात हल्ला चढविला. भारतीय लोकशाहीविरुद्ध अविश्वास निर्माण करण्याच्या षडयंत्रात गुंतलेल्या केजरीवाल यांनी त्यासाठी विदेशी पैसा वापरल्याची शक्यता व्यक्त करून केजरीवाल यांना ही सुपारी कोणी दिली याची मनमोहन सिंग सरकारने चौकशी करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. |
पीटीआय, नवी दिल्ली केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी पत्नी सुनंदा पुष्कर यांच्याबाबत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा मंगळवारी समाचार घेतला. माझी पत्नी अनमोल आहे. मात्र नरेंद्र मोदींना प्रेम-भावना समजून घेण्याची अधिक गरज असल्याचे थरूर यांनी ट्विटरवर म्हटले आहे. |
पीटीआय, शिमला स्वत:च्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना, त्यावर कोणतीही कारवाई न करण्याचा दुटप्पीपणा भाजप करीत आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी येथे केली. स्वत:च्या नेत्यांवर कोणती कारवाई केली, याचे उत्तर भाजपला जनतेला द्यावेच लागेल, असेही त्यांनी ठणकावल़े |
पीटीआय, नवी दिल्ली नको असणारे दूरध्वनी आणि संदेश ही आता केवळ सर्वसामान्य जनतेची डोकेदुखी राहिलेली नाही, तर दळणवळण मंत्री कपिल सिब्बल यांनाही आता या प्रकारांचा जाच सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता या बाबत त्यांनी दळणवळण नियामकाकडे या प्रश्नाची तड लावण्याचे ठरविले आहे. |
पीटीआय, दिफू (आसाम) एकशिंगी गेंडय़ांच्या बेकायदा शिकार प्रकरणात चंद्रा डोले आणि गणेश डोले या दोन शिकाऱ्यांना अटक करण्यात आली आह़े ते शरणागत अतिरेक्यांच्या टोळीसोबत काम करीत होत़े तसेच, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील अनेक प्राण्यांच्या बेकायदा शिकारींमागेही त्यांचा हात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आह़े |
नवी दिल्ली, ३० आँक्टोबर २०१२ मागासवर्गीय मुस्लिम समाज त्याचप्रमाणे ख्रिस्ती आणि मुस्लिम समाजातील दलित यांच्या आरक्षणाच्या मुद्यावर नविन अल्पसंख्यांक मंत्री के.रेहमान यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच त्या दृष्टीने प्रशासनात सुधारणा करण्याचा आणि आरक्षणासंबंधीचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात सादर करण्याचा के. रेहमान यांचा मानस आहे. |
वृत्तसंस्था, लंडन
इंग्रजी ग्रंथव्यवहारातील पेंग्विन आणि रँडम हाऊस या जगातील अत्यंत आघाडीच्या अशा प्रकाशनसंस्थांनी सोमवारी विलीनीकरणाची घोषणा केली. तब्बल २.४ अब्ज पौंडाच्या विलीनीकरण करारावर पेंग्विनची मालकी असलेल्या पीअरसन प्रकाशनगृह आणि रँडम हाऊसची मालकी असलेल्या बर्टल्समन कंपनीने स्वाक्षऱ्या केल्या असून त्यायोगे नव्याने स्थापन होणारी ‘पेंग्विन रँडम हाऊस’ ही जगातील सर्वात बलाढय़ प्रकाशनसंस्था ठरणार आहे. या करारावर सोमवारी स्वाक्षऱ्या झाल्या असल्या तरी हे विलीनीकरण प्रत्यक्षात येण्याची प्रक्रिया पुढील वर्षांच्या उत्तरार्धात पूर्ण होईल आणि ही नवी संस्था पूर्ण ताकदीनिशी ग्रंथव्यवहारात उतरेल, असे सांगण्यात आले. |
पीटीआय, न्यू यॉर्क
अमेरिकेच्या ईशान्य किनाऱ्यावर सोमवारी उशिरा अथवा मंगळवारी सकाळी विनाशकारी सॅण्डी वादळ धडकण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवल्याने पूर्ण अमेरिकेत घबराट पसरली आहे. अतिशय शक्तिशाली असणाऱ्या या वादळामुळे समुद्रात ११ फूट उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने अमेरिकेतील सर्वाधिक दाट लोकसंख्या असणाऱ्या न्यूयॉर्क, बोस्टन आणि न्यू जर्सीसारख्या किनारपट्टीलगतच्या शहरांना त्याचा मोठा तडाखा बसण्याची चिन्हे आहेत. न्यूयॉर्क किनारपट्टीपासून सुमारे ७०० किलोमीटर अंतरावर हे वादळ घोंघावत असून ते ताशी २३ किलोमीटर वेगाने किनाऱ्याकडे सरकत आहे.
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
|
‘लोकसत्ता’चे विविध अॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-
 
वासाचा पयला पाऊस आयला
साप्ताहिक पुरवणी
लोकरंग (दर रविवारी)
चतुरंग (दर शनिवारी)
वास्तुरंग (दर शनिवारी)
व्हिवा (दर शुक्रवारी
करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)
अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)
|