|
देश-विदेश
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
पहिलावहिला व्यावसायिक पेलोड आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकात नेऊन सोडण्यात स्पेसएक्सची ड्रॅगन ही कॅप्सूल (अंतराळ कुपी) यशस्वी ठरली असून आता ती पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आली आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे १२ वाजून ५२ मिनिटांनी ही स्पेस एक्सची ड्रॅगन कॅप्सूल पॅराशूटच्या मदतीने पॅसिफिकमध्ये उतरली. अठरा दिवसांची मोहीम फत्ते करून परतलेल्या या कुपीने हार्डवेअर, काही जीवनावश्यक वस्तू, वैज्ञानिक उपकरणे असलेला ग्लेशियर फ्रीझर असे सगळे सामान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात नेऊन पोहोचवले. |
पीटीआय, मॉस्को
एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपण जिवाचे रान करतो, मग ती असाध्य गोष्टदेखील साध्य होते. कोणत्याही परिस्थितीत अल्लाच्या दरबारी जायचेच, असा निर्धार केलेल्या एका भाविकानेही अशीच अचाट गोष्ट करून दाखवली आहे. हाडे गोठवणारी थंडी आणि सीरियातील जिवावर बेतणाऱ्या संकटांना झुगारत दुर्दम्य इच्छाशक्ती आणि भक्तीच्या जोरावर या भाविकाने तब्बल ५ हजार ६५० कि.मी. अंतर १० महिन्यांत पायी चालून येथील हज तीर्थस्थान गाठले. सेनाद हादजिक (४७) असे या बोस्नियन मुस्लीम भाविकाचे नाव आहे. |
वृत्तसंस्था, लंडन
कॅलरी जाळण्यासाठी आसुसलेल्यांसाठी नवा उपाय शोधला गेला आहे तो म्हणजे भयपट पाहण्याचा! अर्धा तास चालून जेवढी कॅलरी खर्च होते तेवढीच काहीवेळ भयपट पाहूनदेखील होते. दीड तास भयपट पाहून ११३ कॅलरी खर्च होते, असे सिद्ध झाले आहे. वेस्टमिनिस्टर विद्यापीठाने भयपट पाहाणाऱ्या लोकांच्या केलेल्या सखोल अभ्यासातून हे निष्कर्ष काढले आहेत. या लोकांच्या हृदयाचे ठोके, नाडीचे ठोके, रक्ताभिसरण आणि श्वासोच्छवासाची गती यांचाही अभ्यास केला गेला. भयपटात लोकांना धक्का देणाऱ्या प्रसंगात प्रेक्षकाच्या हृदयाचे ठोके अतिशय जलद पडतात आणि कॅलरी सर्वाधिक जाळतात, असेही दिसून आले. |
पीटीआय, नवी दिल्ली
इंटरनेट वापराचा प्रसार वेगाने होणाऱ्या पहिल्या तीन देशांत भारताचा समावेश आहे, अशी माहिती अॅसोकॅम आणि कॉमस्कोर या औद्योगिक संस्थेने केलेल्या अभ्यासातून समोर आली आहे. भारतामध्ये इंटरनेट विस्ताराचा वार्षिक वेग हा ४१ टक्के असून ब्रिक देशात (ब्राझील, रशिया, भारत आणि चीन) भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये मागील वर्षभरात १ कोटी ८० लाख नव्या इंटरनेटधारकांची भर पडली असून, त्यामुळे देशातील इंटरनेटधारकांची संख्या १२ कोटी ५० लाख इतकी झाली आहे. तर चीनमधील इंटरनेटधारकांची संख्या १ कोटी ४० लाख इतकी वाढली असून त्यामुळे ३३ कोटी ६० लाख चिनी नागरिक आता ‘नेट’कर बनले आहेत, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे. |
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय काढून घेतल्यामुळे नाराज झालेले एस. जयपाल रेड्डी यांनी सकाळऐवजी उशीरा सायंकाळी अनिच्छेनेच विज्ञान व तंत्रज्ञान खात्याची सूत्रे स्वीकारली. प्रथेनुसार नव्या पेट्रोलियम मंत्र्यांना मावळत्या मंत्र्याने सूत्रे द्यायची असतात पण सकाळी नवे पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली कार्यालयात आले तेव्हा रेड्डी फिरकले नाहीत! स्वतच्या खात्याची सूत्रे घ्यायलाही ते गेले नाहीत. त्यामुळे तर्कवितर्काना उधाण आले होते. सायंकाळी मात्र सूत्रे स्वीकारून रेड्डींनी वादाला विराम द्यायचा प्रयत्न केला. |
ऑस्ट्रेलियाच्या पार्लमेंटमध्ये मांडला जाणार प्रस्ताव पीटीआय, मेलबर्न १९८४ मध्ये भारतात झालेली शीखविरोधी दंगल म्हणजे धार्मिक हिंसाचाराचे क्रूर उदाहरण आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातील या हिंसाचाराला ‘सामूहिक हत्याकांड’ घोषित करावे,अशी मागणी करणारा प्रस्ताव ऑस्टेलियाच्या एका खासदाराने या आठवडय़ात संसदेत मांडण्याचा निर्णय घेतला आहे. |
वृत्तसंस्था, लंडन डचेस ऑफ केंब्रिज व ब्रिटनची राजस्नुषा केट मिडलटन हिची टॉपलेस छायाचित्रे काढणाऱ्या पापाराझी छायाचित्रकाराचे नाव पोलिसांना समजले असून त्याला लवकरच अटक केली जाईल, असे फ्रान्सच्या पोलिसांनी सांगितले. |
पीटीआय, बंगळुरू येथून जवळच असलेल्या हेसारगट्टामधील ‘सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ (सीपीडीओ) येथे २०६ कोंबडय़ा व १७ बदकांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या भागात दोन दिवसांपूर्वीच ३ हजार ६०० टर्कीचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ कोंबडय़ाही मोठय़ा प्रमाणात दगावल्याने बर्ड फ्लूचा विषाणू शहरात पसरल्याची शक्यता आहे. |
विशेष प्रतिनिधी , नवी दिल्ली नवे रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी सोमवारी आपल्या खात्याची सूत्रे स्वीकारताच रेल्वे सेवासुविधांमध्ये सुधारणांच्या नावाखाली प्रवासी भाडेवाढीचे संकेत दिले. रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रवासी भाडय़ात वाढ करण्यात येईल, असे बन्सल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
|
पीटीआय, नवी दिल्ली मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी भारताच्या राष्ट्रीय अन्वेषण विभागाच्या (एनआयए) अधिकाऱ्यांना आपल्या देशात तपास करू देण्याबाबत पाकिस्तानने तत्त्वत: मान्यता दिली आहे. या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानात नेमके केव्हा यावे, याबाबत मात्र त्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे सोमवारी ही माहिती देण्यात आली. |
रोहतक, २९ ऑक्टोबर २०१२ काल (रविवार) झालेल्या खाप पंचायतीच्या बैठकीत हरियानातील रात्री होणा-या लग्नांवर बंदी घालणायचा निर्णय घेण्यात आला. पंचायतीतर्फे अशी मागणी सरकारकडे करण्यात येणार आहे. खाप पंचायतीने यापूर्वी बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी मुलींच्या लग्नाचे वय कमी करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर सर्वसंमती झाली नव्हती. |
नवी दिल्ली, २९ ऑक्टोबर २०१२ दिल्लीमध्ये २२ डिसेंबर नंतर प्लास्टिक बॅग तयार करण्यावर बंदी घालण्यात आली असून त्या विकतासुध्दा येणार नाहीत. एवढंच नव्हे तर त्यांचा साठाही करता येणार नाही. प्लास्टिक बॅगच्या वापरावर पूर्णपणे आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने २२ डिसेंबर पर्यंत शेवटची मुदत दिली आहे. |
पीटीआय मेलबर्न, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२
आशियाचा उदय हा न थांबवता येण्यासारखा आहे असे जाहीर करून ऑस्ट्रेलियाने भारत व चीन या महत्त्वाच्या देशांशी संबंध आणखी बळकट करण्यासाठी त्यांच्या शाळांमध्ये हिंदी व मँडरिन या भाषा शिकवण्याचे ठरवले आहे. ऑस्ट्रेलिया बदलतो आहे तसाच आशियाही बदलतो आहे. या शतकात आशिया हा जागतिक नेतृत्वात केंद्रस्थानी येणार आहे, आशियाचा उदय होणार आहे असे पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी आज सांगितले. गिलार्ड यांनी अलीकडेच त्यांचा पहिला भारत दौरा केला होता. आशियाचा उदय आता कोणी रोखू शकत नाही, त्याला वेग आला आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
|
पीटीआय वॉशिंग्टन
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत बराक ओबामा आणि मिट रोम्नी यांच्यात चुरशीची लढत होणार असली तरी आणखी दोन उमेदवार ओबामा आणि रोम्नी यांच्या वाटय़ाची लक्षणीय मते खाण्याची शक्यता येथील माध्यमांनी वर्तवली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची ही निवडणूक ६ नोव्हेंबरला होत असून डेमॉक्रॅटिक पक्षाचे बराक ओबामा आणि रिपब्लिकन पक्षाचे मिट रोम्नी यांच्यात खरी लढत होणार आहे. ओबामा यांच्यापुढे अध्यक्षपद टिकवण्याचे आव्हान असून त्यांनी जनमत चाचणीत रोम्नी यांच्यावर काही प्रमाणात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. |
(मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलानंतरचे खातेवाटप) कॅबिनेट मंत्री वीरप्पा मोईली : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू एस. जयपाल रेड्डी : विज्ञान आणि तंत्रज्ञान व पृथ्वी विज्ञान कमलनाथ : शहरी विकास आणि संसदीय कामकाज |
नितीशकुमार यांनी बिहारचे चित्र बदलले! स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ पाटणा ‘बिहारमधील रस्ते अभिनेत्रीच्या गालासारखे गुळगुळीत करून टाकेन’ हे बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी १९९० च्या दशकात दिलेले आश्वासन देशभरात गाजले होते. |
सरकार्यवाह भैयाजी जोशी यांची स्पष्टोक्ती पीटीआय/पाटणा, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२
रा.स्व.संघ हा भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांचा गॉडफादर आहे, अशा आशयाच्या बातम्यांचा संघाने इन्कार केला असून भ्रष्टाचाराचे आरोप झाले असताना आता गडकरी यांचे भवितव्य हे भाजपच ठरवणार आहे असे स्पष्ट केले आहे. केवळ आरोपांच्या आधारे गडकरी यांनी पक्षाध्यक्षपद सोडू नये असे रा.स्व. संघाने सूचित केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी सांगितले, की तुम्ही म्हणता तसे नाही, रा.स्व.संघ हा गडकरींचा गॉडफादर नाही व त्यांचे भवितव्य भाजपच ठरवणार आहे.
|
पीटीआय
नवी दिल्ली ‘‘तरूण रक्ताला वाव देण्यासाठी योग्य वेळ आली असल्याने आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिला तरी, कर्नाटकातील राजकारणात भूमिका पार पाडण्याचा आपला पर्याय खुला आहे,’’ असे माजी परराष्ट्र मंत्री एस.एम.कृष्णा यांनी सांगितले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतल्यानंतर शनिवारी वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले की,तरूणांनी जबाबदारी स्वीकारावी अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे. |
लोकप्रियतेबाबत मात्र रोम्नींची किंचित सरशी
पीटीआय, वॉशिंग्टन अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा व त्यांचे तुल्यबळ प्रतिस्पर्धी मिट रोम्नी यांच्यातील लढत अधिकच तीव्र होत चालली आहे. रोम्नी अद्याप ओबामांपेक्षा किंचित सरस असल्याचेच एकंदर पाहण्यांवरून दिसून येत असले तरी उभयतांमध्ये ‘काँटे की टक्कर’ होणेच अपेक्षित असल्याचे एकमत आहे. |
५० हजार नोकऱ्या निर्माण झाल्याची माहिती पीटीआय वॉशिंग्टन आर्थिक स्थिती बिकट झाल्यामुळे अमेरिकेत सध्या बेरोजगारी ही मोठी समस्या आह़े अशा वेळी भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत मोठय़ाप्रमाणात गुंतवणूक करून सुमारे ५० हजार नोकऱ्यांची निर्मिती केली आहे, अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे उपमंत्री विल्यम बर्न यांनी शुक्रवारी येथे दिली़ |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
|
‘लोकसत्ता’चे विविध अॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-
 
वासाचा पयला पाऊस आयला
साप्ताहिक पुरवणी
लोकरंग (दर रविवारी)
चतुरंग (दर शनिवारी)
वास्तुरंग (दर शनिवारी)
व्हिवा (दर शुक्रवारी
करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)
अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)
|