पीटीआय इस्लामाबाद पाकिस्तानातील अमेरिकेचे राजदूत म्हणून रिचर्ड ओल्सन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या पदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी शनिवारी त्यांचे येथे आगमन झाले. |
पी.टी.आय. पणजी गेल्या १२ वर्षांत झालेल्या बेकायदा खाणकामांमुळे सरकारला अंदाजे ३५ हजार कोटी रुपयांचा झालेला तोटा प्रतिकात्मक असल्याचा निष्कर्ष शाह आयोगाने काढला असल्याचा दावा ‘गोवा मिनरल ओअर एक्स्पोर्टर्स असोसिएशन’ ने केला आहे. |
येड्डियुरप्पांच्या मनधरणीचे प्रयत्न पीटीआय बंगळुरू कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येड्डियुरप्पा यांनी पक्षत्याग करू नये, यासाठी आता भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. |
पीटीआय बगदाद बगदादजवळ आणि इराकच्या उत्तरेकडील भागात असलेल्या शहरात शिया पंथीय यात्रेकरूंवर करण्यात आलेल्या हल्ल्यात शनिवारी किमान १०जण ठार झाल्याचे वृत्त आहे. ईदचा सण साजरा करीत असतानाच हा हल्ला चढविण्यात आला आहे. |
पीटीआय मलकानगिरी (ओदिशा) आपल्या आदेशांचे पालन न केल्याने संतप्त झालेल्या माओवाद्यांनी मलकानगिरी जिल्ह्यातील एका सरपंचाची शुक्रवारी रात्री गळा चिरून हत्या केली. |
कोइम्बतूर : जवळपास १२ ते १४ तास वीज नसल्याच्या निषेधार्थ येथील २० हजारांहून अधिक छोटय़ा आणि मध्यम उद्योगसमूहांनी शनिवारी बंद पुकारला होता. तामिळनाडू सरकारने दररोज किमान आठ तास सलग विजेचा पुरवठा करावा, अशी मागणी कोइम्बतूर औद्योगिक संघटना महासंघाने राज्य सरकारकडे केली आहे. |
टोपणनावांमुळे छडा लागला पीटीआय वॉशिंग्टन खंडणीसाठी लिहिलेल्या चिठ्ठीत वापरलेल्या टोपणनावांमुळे १० महिन्यांच्या चिमुरडीची आणि तिच्या आजीची हत्या करणाऱ्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. रघुनंदन यंदमुरी असे या आरोपीचे नांव असून तो मूळचा आंध्र प्रदेशातील रहिवासी आहे. |
केंद्रात खांदेपालटाची चिन्हे; राहुल गांधींबाबत साशंकता विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी सकाळी होण्याची चिन्हे असून या संभाव्य फेरबदलात काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा समावेश होण्याची शक्यता मावळली आहे. वृद्धत्वाचे कारण सांगून एस. एम. कृष्णा यांनी शुक्रवारी परराष्ट्रमंत्रिपदाचा राजीनामा दिला. कृष्णा यांच्यासह काँग्रेसच्या काही वरिष्ठ मंत्र्यांना पक्ष संघटनेत पाठविले जाण्याची शक्यता आहे, तर अन्य वरिष्ठ मंत्र्यांकडे असलेली अतिरिक्त मंत्रालये या फेरबदलात काढून घेतली जातील, असे संकेत देण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात राहुल गांधी यांचा समावेश व्हावा यासाठी स्वत: मनमोहन सिंग उत्सुक असले आणि त्याविषयी अनेकांची उत्सुकता ताणली गेली असली तरी राहुल गांधी यांच्या गोटातून सकारात्मक संकेत मिळालेले नाहीत.
|
ओबामांचे ऐतिहासिक मतदान वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
जगातील एकमेव महासत्तेच्या सत्तेची दोरी आपल्याच हातात रहावी यासाठी लढत असलेले विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा आणि रिपब्लिकनांचे अध्यक्षपदाचे उमेदवार मिट रोम्नी यांच्यातीव वाग्युद्ध आता शिगेला पोहोचले आहे. टीका, आरोप-प्रत्यारोप, उणीदुणी काढण्याची एकही संधी हे दोघेही सोडत नाहीत. मतदानाची तारीख अगदी समीप येऊन ठेपली असतानाच प्रचाराची रणधुमाळी दोन्ही बाजूंनी सुरू आहे. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीला अद्याप १२ दिवस शिल्लक असतानाच विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी आधीच मतदानाचा हक्क बजावून नवीन इतिहास रचला आहे. |
केंद्रीय गृहमंत्र्यांचे प्रतिपादन पीटीआय, नवी दिल्ली
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या कंपनीमध्ये अनेक कंपन्यांनी गैरमार्गाने पैसा गुंतविल्याच्या करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे वाटते, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत ज्या गोष्टी उघड होत आहेत, विविध वाहिन्यांवरून जे वृत्त प्रक्षेपित केले जात आहे, ते पाहता गडकरी यांच्यावर करण्यात येत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे वाटते, असेही शिंदे यांनी एका समारंभादरम्यान मीडियाला सांगितले. तथापि, याबाबत विस्तृतपणे भाष्य करण्यास शिंदे यांनी नकार दिला. |
केजरीवाल यांची मागणी पीटीआय, नवी दिल्ली
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी त्यांचे सर्व उद्योगधंदे आणि देशात त्यांच्या मालकीची जमीन कोठे आहे ते जाहीर करावे, अशी मागणी ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे (आयएसी) नेते अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. नितीन गडकरी यांच्याविरुद्ध प्राप्तिकर विभागाने सुरू केलेली चौकशी ही धूळफेक करण्याचा प्रकार आहे, कारण काँग्रेस आणि भाजप यांची हातमिळवणी झाली असून ते एकमेकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. |
सर्वोच्च न्यायालयाचे मत पीटीआय, नवी दिल्ली
हुंडाप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्य़ात सासरच्या मंडळींची नावे प्राथमिक माहिती अहवालात नोंदली गेली असली तरी ठोस पुराव्याशिवाय त्यांना त्या गुन्ह्य़ात अडकवणे योग्य होणार नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. याबाबत आपले मत मांडताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, कौटुंबिक वादात तक्रारदार महिलेच्या केवळ तक्रारीवरून सासरच्या मंडळींना त्या गुन्ह्य़ात अडकवणे योग्य नसून न्यायालयांनीदेखील सर्व बाबी तपासूनच कारवाई करावी. |
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
ग्रेटर नोईडाच्या बुद्ध इंटरनॅशनल सर्किटमध्ये फॉम्र्युला वनच्या इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीच्या सरावादरम्यान आज फेरारीच्या संघाने आपल्या कारवर इटालियन नौदलाचे झेंडे फडकाविण्याची आगळीक करीत आंतरराष्ट्रीय वादाला निमंत्रण दिले. भारत सरकारने या घटनेवर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. आठ महिन्यांपूर्वी भारतीय महासागरात इटालियन नौदलाने केलेल्या गोळीबारात दोन भारतीय मच्छीमार मृत्युमुखी पडले होते. हा गोळीबार करणारे इटालियन नौदलाच्या सुरक्षारक्षकांना चार महिन्यांचा तुरुंगवास घडल्यानंतर जामीन देण्यात आला आहे. |
सुधींद्र कुलकर्णी यांचे आवाहन पीटीआय, बंगळुरू
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याप्रमाणे यूपीए सरकारने धारिष्टय़ दाखवावे आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीला सामोरे जावे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे माजी निकटवर्तीय सुधींद्र कुलकर्णी यांनी म्हटले आहे. गडकरी यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आता काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारने त्यांच्या नेत्यांवर असलेल्या अधिक गंभीर स्वरूपाच्या आरोपांच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दाखवावी, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. |
पीटीआय, वॉशिंग्टन फिलाडेल्फिया शहरातून अपहरण करण्यात आलेल्या १० महिन्यांच्या सान्वी वेन्ना या बालिकेची माहिती सांगणाऱ्यास ५० हजार डॉलरचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सोमवारी राहत्या घरातून सान्वीचे अपहरण करताना हल्लेखोरांनी तिच्या आजीचीही निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर अमेरिकेत एकच खळबळ उडाली आहे. |
म्यानमार सरकारचे आवाहन पीटीआय, सिट्टवे (म्यानमार) म्यानमार सरकारने जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. म्यानमारमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या जातीय हिंसाचाराच्या उद्रेकात किमान ५६ जण ठार झाले आहेत. या कृतीमुळे देशाच्या लौकिकाला बट्टा लागण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे सरकारने म्हटले आहे. देशात लोकशाहीचे राज्य स्थापन व्हावे, हीच इच्छा असल्याचेही सरकारने म्हटले आहे. |
पीटीआय, रामेश्वरम (तामिळनाडू) सासरच्या जाचाला कंटाळून पुणे येथील एका महिलेने घर सोडले आणि ती थेट रामेश्वरमला जाऊन पोहोचली. मात्र पोलिसांनी तिचे मन वळवून तिला पुन्हा पुण्याला धाडले. याबाबत पुण्यातील तिच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले आहे.दोन मुलांची आई असलेली ही महिला काल रेल्वेतून रामेश्वरमला उतरली आणि स्थानकावरच भेदरलेल्या अवस्थेत फिरताना पोलिसांच्या नजरेस पडली. |
पक्षाची घोषणा पीटीआय, अहमदाबाद उत्तर प्रदेशातील सत्ता गमावलेल्या मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने आता गुजरात विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. गुजरातमधील सर्वच्या सर्व म्हणजे १८२ जागा स्वबळावर लढण्याची घोषणा या पक्षातर्फे शुक्रवारी करण्यात आली. |
वॉशिंग्टन, २६ ऑक्टोबर २०१२ अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ६ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. मात्र, निवडणुकीला १२ दिवस शिल्लक असताना विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी आज (शुक्रवार) शिकागो येथील मार्टिन ल्यूथर किंग कम्युनिटी सेंटर येथे जाऊन लवकर मतदान करणा-या अध्यक्षांचा मान मिळविला आहे. |
नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर २०१२ गुजरामध्ये डिसेंबर महिन्यात होणा-या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार असल्याचा निष्कर्ष ओपिनियन पोलमध्ये काढण्यात आला आहे. गेल्या दशकभरात झालेला विकास आणि दुबळा विरोधी पक्ष याचा फायदा मोदी सरकारला होणार असून, २००७च्या तुलनेत भाजप पुन्हा जास्त जागा जिंकताना दिसेल, असे एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|