देश-विदेश
मुखपृष्ठ >> देश-विदेश
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

देश-विदेश
अफगाणिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ल्यात ३२ ठार Print E-mail

काबूल, २६ ऑक्टोबर २०१२
उत्तर अफगाणिस्तानातील मशिदीत झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ३२ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

 
जसपाल भट्टी यांचे अपघाती निधन Print E-mail

विनोदाच्या बादशहावर काळाची क्रूर झडप
वृत्तसंस्था, चंदीगढ

बोचऱ्या पण विखारी नसलेल्या, सहजसाध्या पण सामान्य पातळीवर न घसरलेल्या प्रसन्न विनोदाच्या माध्यमातून सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि आधुनिक काळात दूरचित्रवाणीद्वारे विनोदाला देशव्यापी लोकमान्यता मिळवून देणारे जसपाल भट्टी (५७) यांचे गुरुवारी पहाटे पंजाबात चंदीगढ येथे रस्ताअपघातात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी सविता, कन्या राबिया आणि पुत्र जसराज आहेत. सायंकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातात जसराज, अभिनेत्री सुरिली गौतम आणि चित्रपटाचे प्रवर्तक नवनीत जोशी हे तिघे जखमी झाले आहेत.

 
‘झी न्यूज’ने मागितली १०० कोटींची खंडणी Print E-mail

उद्योगपती नवीनजिंदल यांचा आरोप स्टिंग ऑपरेशन सादर
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीने आपल्या कंपनीविरुद्ध नकारात्मक बातम्या रोखण्याच्या मोबदल्यात शंभर कोटी रुपयांच्या जाहिरातींची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप कोळसा खाणवाटप घोटाळ्यात अडकलेले काँग्रेसचे खासदार व उद्योगपती नवीन जिंदल यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केला. आपल्या आरोपापुष्टय़र्थजिंदल यांनी झी न्यूजच्या संपादकांचे केलेले स्टिंग ऑपरेशनही दाखविले. खंडणी मागितल्याचे जिंदल यांचे आरोप झी न्यूजने फेटाळून लावले आहे. नवीनजिंदल यांच्या जिंदल स्टील अँड पॉवर कंपनीवर गैरमार्गाने कोळसा खाणी मिळविल्याचा आरोप आहे. आपल्या कंपनीविरुद्ध झी न्यूजकडून चुकीच्या बातम्या दाखविल्या जात होत्या.
 
डेंग्यूचे ‘स्वागत’ करणारे पेशींचे प्रवेशद्वार सापडले! Print E-mail

पीटीआय, लंडन

डेंग्यू या प्राणघातक रोगाचा विषाणू माणसाच्या पेशीत शिरण्यास कारणीभूत ठरणाऱ्या संग्राहकांचे दोन प्रकार वैज्ञानिकांनी शोधले आहेत, त्यामुळे या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करता येणार आहे. डेंग्यूच्या प्रादुर्भावातील पहिल्या टप्प्याच्या प्रक्रियेचे आकलन होण्यास यामुळे मदत होणार आहे. पेशींच्या सुनियंत्रित मृत्यूच्या प्रक्रियेतील जैविक कार्यपद्धतीची नक्कल करून या विषाणूच्या पेशीतील प्रवेशाच्या पद्धतीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. इनसर्म व सीएनआरएस-पॅरिस विद्यापीठाचे अली आमरा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनात जनुकीय छाननी करण्यात आली असून त्यात या विषाणूकडून पेशीत प्रवेश करताना वापरले जाणारे पेशीवरील संग्राहक नेमके कोणते आहेत याची निश्चिती करण्यात यश आले आहे.
 
रजत गुप्ता यांना दोन वर्षे तुरुंगवास Print E-mail

पीटीआय, न्यूयॉर्क

भांडवली बाजारासंबंधी गोपनीय माहिती प्रतिस्पर्धी कंपनीला पुरवण्याच्या आरोपाखाली अमेरिकेतील भारतीय उद्योजक रजत गुप्ता यांना मॅनहॅटन येथील न्यायालयाने गुरुवारी दोन वर्षे तुरंगवास व ५० लाख अमेरिकी डॉलरचा दंड अशी शिक्षा ठोठावली. आपला अशील निर्दोष असून या शिक्षेविरोधात वरच्या न्यायालयात दाद मागण्यात येईल, अशी माहिती गुप्ता यांच्या वकिलांनी दिली. शर्मा मात्र या शिक्षेच्या निर्णयामुळे पूर्णपणे खचले असून त्यांनी कुटुंबीय व सहकाऱ्यांची माफी मागितली आहे. वॉल स्ट्रीट भांडवल बाजारातील महत्त्वाच्या कंपन्यांची माहिती प्रतिस्पर्धी कंपनीतील राजरत्नम या अधिकाऱ्याला दिल्याचा आरोप ६३ वर्षीय गुप्ता यांच्यावर यापूर्वीच निश्चित झाला होता.
 
रेल्वेत २.१ लाख जागा रिक्त Print E-mail

सुरक्षा सेवांशी निगडित ९० हजार जागा भरणे गरजेचे
पीटीआय, नवी दिल्ली

सुरक्षेसंबंधी सेवांशी निगडित अशा ९० हजार जागांसह रेल्वेमध्ये एकूण २.१ लाख जागा रिक्त आहेत, त्या तातडीने भरण्याची गरज आहे असे दिसून आले आहे. लोको रनिंग स्टाफ, स्टेशन मास्तर, गार्ड, टेक्नॉलॉजी सुपरवायझर, नियंत्रण व यार्ड कर्मचारी, सिग्नल इन्स्पेक्टर, पॅरा-मेडिकल , कार्यालयीन कर्मचारी अशा प्रकारच्या या जागा असून त्या लगेच भरण्याची गरज आहे. सुरक्षेशिवाय कार्यशाळा व व्यापारी विभागात तसेच वैद्यकीय विभागात अनेक जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी मोहीम सुरू असल्याचा दावा रेल्वेने केला आहे.
 
सौंदर्योपचारासाठी ३५० डॉलर मोजा आणि खा सणसणीत थपडा Print E-mail

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

‘सुंदर मी होणार’ अशी प्रतिज्ञा आजकाल तरुणींनीच नव्हे तर तरुणांनीही मनोमन केलेली असते, पण कितीही क्रीम चेहऱ्यावर रगडली तरी ही प्रतिज्ञा कितपत फलद्रूप होते हे सर्वानाच माहीत आहे. पण अमेरिकेत सध्या एका वेगळ्याच सौंदर्योपचारांची चर्चा आहे. त्याला म्हणतात ‘फेस स्लॅपिंग’. यात चक्क तुम्हाला चांगल्या ताकदीने थोबाडीत मारल्या जातात आणि तुमच्या चेहऱ्याचे अंगभूत सौंदर्य अधिक उजळून येते. यासाठी तुम्ही थोबाडीत खायच्या आहेत पण त्यासाठी त्या मारणाऱ्यांना द्यायचे आहेत ३५० डॉलर म्हणजे खरंतर तोंड लाल व खिसा साफ.
 
ओबामांना निसटती आघाडी Print E-mail

पीटीआय, वॉशिंग्टन

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार व विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रोम्नी यांच्याशी झालेल्या तीनपैकी शेवटच्या दोन वादसभांत चांगली कामगिरी बजावल्याने अंतिम बाजी मारण्यासाठी उत्तम पायाभरणी केल्याचे अलीकडेच झालेल्या जनमत चाचण्यांतून ध्वनित होत आहे, मात्र तरीही त्यांच्या विजयाबद्दल संदिग्धता कायम आहे.
आतापर्यंतच्या जनमत चाचण्यांच्या आधारे ओबामा २.१ मतांनी आघाडीवर आहेत, असे रिअलक्लिअर पोलिटिक्सने म्हटले आहे.
 
केट मिडल्टन इंग्लंडची सौंदर्यसम्राज्ञी! Print E-mail

पीटीआय, लंडन

आपल्या नैसर्गिक सौंदर्याने साऱ्या जगाला भुरळ घालणारी, प्रिन्स विल्यम्स याची पत्नी केट मिडल्टन हिने इग्लंडमधील सर्वात अभिजात सौंदर्यवती होण्याचा बहुमान पटकावला आहे. हॉलीवूडच्या किआरा नाइटली आणि एमा व्ॉटनसन या रूपगर्वितांना मागे टाकत इंग्लंडच्या राजघराण्याची सून असलेल्या केटने हा किताब पटकावला आहे. तर टायटॅनिक चित्रपटामुळे जगभरात प्रसिद्ध झालेली केट विन्स्लेट ही या जनमत चाचणीत तब्बल ८ व्या क्रमांकावर राहिली. कोणत्याही कृत्रिम सौंदर्य साधनांचा वापर न करता केवळ नैसर्गिक सौंदर्याच्या कसोटीवर सर्वात देखण्या महिलेची निवड करण्यासाठी नुकतीच इंग्लंडमध्ये एक जनमत चाचणी घेण्यात आली.
 
ओबामांना मुस्लिमांचा पाठिंबा? Print E-mail

पीटीआय, वॉशिंग्टन
महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांना अमेरिकेतील मुस्लीम बांधवांनी मोठय़ा प्रमाणात पाठिंबा दिला असल्याचे ताज्या जनमत चाचणीत स्पष्ट झाले आहे.

 
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ वाढ Print E-mail

पीटीआय, नवी दिल्ली
ऐन दिवाळसणाच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा किरकोळ वाढ झाली आहे. पेट्रोल ३० तर डिझेल १८ पैशांनी महागले आहे. पेट्रोल पंपधारकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे ही दरवाढ झाली आहे. ही दरवाढ आज, शुक्रवारपासून अंमलात येण्याची शक्यता आहे.

 
इराकमध्ये हिंसक हल्ल्यात १५ ठार Print E-mail

पीटीआय, बगदाद
इराकच्या मध्यवर्ती आणि उत्तरेकडील भागांत मुख्यत्वे सरकारी अधिकारी आणि सुरक्षा दलाच्या जवानांवर गुरुवारी करण्यात आलेल्या हल्ल्यात १५ जण ठार झाले. ईदच्या सणानिमित्त सुटी असतानाच करण्यात आलेला या महिन्यातील हा सर्वात भीषण हल्ला होता.

 
भट्टींच्या कार्यक्रमांनी समाजासमोर आरसा धरला - पंतप्रधान Print E-mail

वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जसपाल सिंग भट्टी यांच्या निधनाने राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात तीव्र हळहळ व्यक्त होत असून पंतप्रधानांसह अनेक नेते आणि आघाडीच्या कलावंतांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले की, चित्रपट आणि दूरचित्रवाणीद्वारे समाजासमोर जणू आरसा धरण्याचे त्यांचे कार्य न विसरता येण्यासारखे आहे. समाज परिवर्तनाचे काम त्यांनी स्वतच्या पद्धतीने केले आणि त्याला विनोदाचा स्पर्श होता म्हणून सर्व वयोगटातल्यांना ते आपलेच वाटले. त्यांचे निधन अकाली आणि दुर्दैवी आहे.

 
सरकारच्या लेखी गांधीजी राष्ट्रपिता नाहीत! Print E-mail

alt

घटनेतील तरतुदीचा हवाला
पीटीआय, नवी दिल्ली
घटनेतील विशिष्ट तरतुदींमुळे महात्मा गांधी अथवा कोणालाही राष्ट्रपिता ही उपाधी देणे सरकारला शक्य नाही, असे स्पष्टीकरण गुरुवारी केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे देण्यात आले. लखनौ येथील ऐश्वर्या पराशर या सहाव्या इयत्तेतील मुलीने माहितीच्या अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नावर हा खुलासा करण्यात आला.
 
टॅबलेट किंगचा अल्पावतार आला! Print E-mail

अ‍ॅपलचा आयपॅड मिनी दिमाखदार, पण किंमत तुलनेने जास्तच
सॅन होजे , एएफपी ,२४ ऑक्टोबर २०१२
alt

अ‍ॅपलचा सर्वात छोटा आयपॅड अर्थात आयपॅड मिनी बुधवारी सादर करण्यात आला. अ‍ॅमेझॉन, गुगल व सॅमसंग यांच्या छोटय़ा टॅबलेटमधील मक्तेदारीला अ‍ॅपलने आयपॅड मिनीच्या माध्यमातून कडवे आव्हान दिले आहे. अ‍ॅपल कंपनीने कॅलिफोर्नियातील सॅन होजे  येथे झालेल्या कार्यक्रमात आयपॅड मिनीबरोबरच १३ इंचाचे मॅकबुक, स्लिम आयमॅक व मॅकमिनी ही उत्पादनेही सादर करण्यात आली. भारतात मात्र आयपॅड मिनी लगेच सादर केला जाणार नाही. त्यामुळे ज्यांना उत्सुकता असेल त्यांना तो परदेशातून आणावा लागणार आहे.

 
बान की मूनही आता ‘अबलख’ घोडय़ावर Print E-mail

‘गंग्नम स्टाइल’ गाण्यावर केले नृत्य
पी.टी.आय. संयुक्त राष्ट्रे
alt

‘अबलख’ घोडय़ावर बसल्याचा आनंद व्यक्त करणाऱ्या दक्षिण कोरियाई ‘गंग्नम स्टाइल’ गाण्याने आधी कोरिया मग यू-टय़ूबवरून जग पादाक्रांत केले. त्यानंतर क्रीडाविश्व, हॉलीवूडपासूून बॉलिवूडच्या सेलिब्रेटी विश्वाला नादावले. आता आंतरराष्ट्रीय कायदा, सुव्यवस्था आणि मानवी हक्कांच्या रक्षणकर्त्यां समजल्या जाणाऱ्या संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे प्रमुख बान की मूून हेही आपल्या जन्मदेशातील या निर्मितीने उघडपणे भारावल्याचे समोर आले आहे.
 
रुग्णालयातील जुन्या मासिकांतून होऊ शकतो सूक्ष्म जंतूंचा फैलाव! Print E-mail

आजारपणातील वेळकाढू वाचन  करू शकते आणखी आजारांचे धनी
पीटीआय ,लंडन
alt

उपचार अथवा सल्ला घेण्यासाठी रुग्णालयात गर्दीमुळे आपला नंबर येईस्तोवर टिपॉयवर ठेवलेली चकचकीत जुनी मासिके हाताळण्यासाठी वेडे वाचक असण्याची गरज असावी लागत नाही. मात्र रुग्णकाळातील अल्पकाळाचे वाचनवेड किंवा वेळकाढू कुतूहल आणखी आजारांचे धनी करू शकते. कारण इतस्तत: पसरलेली हीच जुनी मासिके ही सूक्ष्म जंतूंमुळे निर्माण करणाऱ्या रोगांपेक्षा अधिक घातक ठरू शकतील, असे अभ्यासकांनी म्हटले असून त्यापासून दूर राहण्याचाच इशारा दिला आहे.
 
मंत्रालयांनाही वाढीव निधी नाही Print E-mail

‘आहे त्यातच भागवण्याची’ सूचना
पीटीआय , नवी दिल्ली
alt

आर्थिक विकासदर उंचावण्याच्या आव्हानाशी तोंड देणाऱ्या केंद्र सरकारने आता दौरे, कार्यक्रम अशा सरकारी खर्चात कपात करण्यासोबतच विविध मंत्रालयांना देण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पापेक्षा वाढीव तरतुदीलाही छाट मारण्याचा निर्णय घेतला आहे. २०१२-१३च्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीपेक्षा जास्त निधी देता येणार नाही, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सर्व मंत्रालयांना स्पष्टपणे कळवले आहे.
 
‘भारत आमचा शत्रू नाही तर भागीदार’ Print E-mail

चीनने पुढे केला मैत्रीचा हात
पीटीआय, बीजिंग
भारत-चीन युद्धाच्या पन्नास वर्षांनंतर परिस्थिती खूपच बदलली आहे, भारत हा आमचा शत्रू नाही तर भागीदार आहे, भारताबरोबर धोरणात्मक सहकार्यावर आधारित भागीदारी करण्याचा आमचा निर्धार आहे, अशा शब्दांत आज चीनने  भारताला ‘मुझसे दोस्ती करोगे’ असाच संदेश दिला आहे. भारत-चीन युद्धाला ५० वर्षे झाल्यानंतर भारतात घेण्यात आलेला स्मृती कार्यक्रमाच्या निमित्ताने चीनने प्रथमच प्रतिसाद दिला आहे.

 
गोव्यातील बेकायदा खाणकामात दिगंबर कामत, प्रतापसिंह राणे सहभागी-पर्रिकर Print E-mail

पी.टी.आय. पणजी
गोव्यातील बेकायदा खाणकामांमध्ये काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि प्रतापसिंह राणे यांच्यासह काँग्रेसचेच प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर हे सहभागी असल्याची तोफ मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी येथे डागली. या ज्येष्ठ नेत्यांखेरीज राज्यातील काँग्रेसच्या अन्य नेत्यांचाही यामध्ये समावेश असल्याची टीका पर्रिकर यांनी केल्यामुळे गोव्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.शहरातील पार्किंग टर्मिनसच्या पायाभरणी समारंभानंतर पर्रिकर पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील बेकायदा खाणींच्या उत्खननामध्ये कामत व राणे यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते सामील असल्याची टीका त्यांनी केली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो