लखनौ : महिला आरक्षण विधेयकाचे कडवे विरोधक असलेले समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी शुक्रवारी आपली भूमिका मवाळ करीत या विधेयकास सशर्त पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. |
* पुढील आठवडय़ात चीनमध्ये सत्तांतर * कम्युनिस्ट पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक सुरू पीटीआय, बीजिंग
जागतिक बाजारपेठेत अमेरिकेला तुल्यबळ असलेल्या चीनमध्ये सध्या बदलाचे वारे वाहत आहेत. मात्र, हे बदलाचे वारे आर्थिक किंवा लोकशाहीचे नसून सत्तांतराचे आहेत. पुढील आठवडय़ात चीनच्या सत्ताधाऱ्यांची नवी टीम जाहीर होणार असून दशकभरातून एकदाच होणाऱ्या या कम्युनिस्ट सत्तांतर सोहळ्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. लोकशाही असलेल्या अमेरिकेत बराक ओबामांकडेच पुन्हा अध्यक्षपद आलेले असतानाच चीनमध्ये प्रस्तावित असलेले सत्तांतर हा अनोखा योगायोग आहे. |
असांज यांची खरमरीत टीका वृत्तसंस्था, लंडन
अमेरिकेच्या अध्यक्षपदी फेरनिवड झालेले बराक ओबामा म्हणजे मेंढय़ाचे कातडे घालून कळपात घुसलेला लांडगा असल्याची खरमरीत टीका विकिलीक्सचे संस्थापक जुलिअन असांज यांनी गुरुवारी केली.ओबामा सरकार यापुढेही गोपनीयताविरोधी संकेतस्थळांवर हल्ले करणे चालू ठेवेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. लैंगिक गुन्ह्याच्या आरोपावरून स्वीडनला होणारे स्थलांतर टाळण्यासाठी त्यांनी इक्वाडोरच्या लंडन येथील दूतावासात जून महिन्यापासून आश्रय घेतला आहे. |
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पहिली ‘टर्म’ संपते न संपते तोच हिलरी क्लिंटन आपल्या पदावरून पायउतार होणार असल्याचे अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ओबामा यांची अध्यक्षपदाची दुसरी ‘टर्म’ सुरू होणार आहे. |
पीटीआय, नवी दिल्ली
भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर किटाळ आलेले असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना क्लीन चिट देण्याच्या प्रकारावर काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी टीका केली आहे. संघाचे नेते गुरुमूर्ती म्हणजे भाजपचे महालेखापाल (कॅग) आहेत काय असा तिरकस सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
|
मावळते अध्यक्ष हू जिंताओ यांचा इशारा बीजिंग, पीटीआय
‘भ्रष्टाचाराच्या भस्मासुराला वेळीच आवर घाला अन्यथा हा भस्मासुर संपूर्ण देशाला गिळंकृत करेल’, असा इशारा दिला आहे मावळते अध्यक्ष हू जिंताओ यांनी. पक्षाच्या बैठकीसाठी संपूर्ण देशभरातून आलेल्या २२७० कॉम्रेड्समोर निरोपाचे भाषण करताना जिंताओ यांनी चीनसमोरील अनेक आव्हानांचे चित्र मांडले. |
पीटीआय, सेन मार्कोस
ग्वाटेमालामधील दोन प्रांतांमध्ये जाणवलेल्या ७.४ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे किमान ४८ जण मृत्युमुखी पडले आहेत. या भूकंपामुळे मेक्सिकोच्या सीमेवरील अनेक भागांतील भूस्खलन झाले असून त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरातील १०० पेक्षा अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. |
केंद्राला ३१ हजार कोटींच्या उत्पनाची अपेक्षा विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असलेल्या नव्या व जुन्या कंपन्यांना समान संधी मिळावी म्हणून विद्यमान दूरसंचार कंपन्यांपाशी असलेल्या स्पेक्ट्रमवर एकरकमी शुल्क आकारण्याच्या प्रस्तावाला आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. |
वाढदिवशी अभिष्टचिंतन करून गडकरींनी घेतले आशीर्वाद विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली पंतप्रधानपद पक्षापेक्षा मोठे नाही, असे उद्गार आज भाजपचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ८५वा वाढदिवस साजरा करताना काढले. भाजपच्या वाटचालीत सिंहाचा वाटा असलेल्या अडवाणींच्या वाढदिवसाचे निमित्त साधून भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले आणि गेल्या काही दिवसांपासून उभय नेत्यांमधील दुरावा संपल्याचे संकेत दिले. |
पीटीआय, पाटणा
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार गुरुवारी पाकिस्तानच्या आठवडाभराच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. पाकिस्तानातील पंजाब आणि सिंध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणावरून त्यांनी हा दौरा आखला आहे.नितीशकुमार आपल्या १२ सदस्यीय शिष्टमंडळासह सकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर ते विमानाने दुबईमार्गे पाकिस्तानला रवाना झाले. |
पीटीआय, जॅक्सन (अमेरिका) बराक ओबामा यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाल्याने नाराज झालेल्या मिसिसिपी विद्यापीठातील सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी येथे निदर्शने केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून या निषेधाचे वृत्त वेगाने पसरत गेल्याने मध्यरात्रीर्प्यत विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत होती. |
डाव्यांची मागणी पीटीआय, थिरुवनंतपूरम प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिर आणि त्यातील संपत्तीचा ताबा येथील त्रावणकोर राजघराण्याकडे सोपवण्याच्या ‘न्याय मित्रा’च्या अहवालास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जोरदार विरोध केला आहे. या मंदिराच्या काही कक्षांत अगणित संपत्ती व दागिने सापडल्यानंतर त्याच्या मालकीहक्कावरून वाद निर्माण झाला होता. |
राम जेठमलानींवर कारवाईची शक्यता
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये गुरफटलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची जाहीर मागणी करून भाजपमधील वाद चव्हाटय़ावर मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ व राज्यसभा सदस्य राम जेठमलानी यांनी पक्षशिस्त मोडीत काढल्याबद्दल पुढच्या काही दिवसांत कारवाई होण्याची शक्यता आहे.
|
अमेरिकी निवडणूक : एक दृष्टिक्षेप गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
अमेरिकेतील अध्यक्षीयपदाची निवडणूक दर चार वर्षांनी एकदा होते. ही निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या मंगळवारीच होते.अमेरिकेचा नागरिक हा कटिबद्ध इलेक्टर्सना आपले मत देतो आणि मग असे ‘कटिबद्ध इलेक्टर्स’ औपचारिकपणे आपली मते अध्यक्षीय उमेदवारास देतात.
|
धन्यवाद.. मी आपला खूप खूप आभारी आहे. एक वसाहत असलेल्या या देशाने स्वत:चे विधिलिखित ठरवण्याचा अधिकार मिळवला होता. आज दोनशे वर्षांनंतर पुन्हा एकदा या रात्री आपण आपले संघराज्य अधिक परिपूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. |
पीटीआय, वॉशिंग्टन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बराक ओबामा यांच्याकडून पराभूत झालेल्या रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार मिट रोम्नी यांनी खुल्या मनाने ओबामा यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले. या निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर आपल्या हजारो समर्थकांना संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली. |
चुरशीच्या लढतीत प्रतिनिधी गृहावर निवड पीटीआय, वॉशिंग्टन डॉ. अमी बेरा (४५) यांनी अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या सदस्यत्वासाठीची निवडणूक जिंकून बुधवारी इतिहास घडविला. ते या सभागृहात जाणारे तिसरे अमेरिकी भारतीय ठरले आहेत. त्यांचा विजय येथील भारतीयांना सुखावणारा ठरला. या लढतीत असणारे इतर पाच अमेरिकी भारतीय पराभूत झाले आहेत. |
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी बराक ओबामा यांची फेरनिवड झाल्यानंतर सर्वाची उत्सुकता लागून राहिलेल्या अमेरिकेचे प्रतिनिधीगृह आणि सिनेटच्या निवडणुकांचे निकाल पुढे आले आहेत, ज्यामध्ये प्रतिनिधीगृहात रिपब्लिकनांना आणि सिनेटमध्ये डेमोक्रॅटस्ना वर्चस्व मिळाले आहे. |
नवी दिल्ली, ७ नोव्हेंबर २०१२ छत्तीसगड जिल्ह्यातील बीजापूर येथील दोन अल्पवयीन मुंलींवर माओवाद्यांनी केलेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील संबंधीत पीडीत मुलींना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
|
इंटरपोलच्या अधिवेशनात गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची स्पष्टोक्ती १९९३ स्फोटातील सूत्रधारांना पाकिस्तानमध्ये आश्रयस्थान
पी.टी.आय., रोम, बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२ मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्यासह अनेक जबाबदार हस्तकांविरोधात ठोस पुरावे देऊनही त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानने आजवर यासंबंधात कोणतीही कारवाई केली नाही, याकडे बोट दाखवत गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भारतासमोर दहशतवादाची भीती कायम असल्याचे रोममध्ये सुरू असलेल्या इंटरपोलच्या वार्षिक अधिवेशनात स्पष्ट केले.
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|