देश-विदेश
मुखपृष्ठ >> देश-विदेश
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

देश-विदेश
भारतीय युवतीच्या हत्येप्रकरणी ऑस्ट्रेलियन युवक दोषी Print E-mail

मेलबोर्न :  रोशो ठक्कर या २४ वर्षी भारतीय युवतीच्या हत्येप्रकरणी ऑस्ट्रेलियन युवक दोषी आढळला आहे. रोशाचे प्रेत मार्च २०११ मध्ये मॅडबॅक येथील पॅरामट्टा नदीच्या पात्रात एका सुटकेसमध्ये आढळले होते.

 
डेंग्यूचे ‘स्वागत’ करणारे पेशींचे प्रवेशद्वार सापडले! Print E-mail

alt

पीटीआय, लंडन
डेंग्यू या प्राणघातक रोगाचा विषाणू माणसाच्या पेशीत शिरण्यास कारणीभूत ठरणाऱ्या संग्राहकांचे दोन प्रकार वैज्ञानिकांनी शोधले आहेत, त्यामुळे या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करता येणार आहे.
 
रोम्नींच्या मुलाने मागितली ओबामांची माफी Print E-mail

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांतील दुसऱ्या वादसभेदरम्यान आपल्या वडिलांना आक्रमकपणे आव्हान देणाऱ्या बराक ओबामा यांना ठोसा लगावण्याची आपली इच्छा होती,

 
अमेरिकेमध्ये भारतीय आजीची हत्या करून नातीचे अपहरण Print E-mail

पी.टी.आय., वॉशिंग्टन
अमेरिकेमध्ये नातीला सांभाळण्यासाठी गेलेल्या आंध्र प्रदेशमधील आजीबाईंना आपल्या लहानग्या नातीचे अपहरण टाळताना प्राण गमवावा लागला. अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया स्टेटमध्ये ही भीषण घटना घडली असून अपहरणकर्त्यांनी १० महिन्यांच्या बाळाला पळवून नेले आहे. 

 
ओबामांची रोम्नी यांच्यावर बाजी Print E-mail

पाकिस्तानकडे किमान १०० अण्वस्त्रे : अंतिम वाग्युद्धात रोम्नी यांचा गौप्यस्फोट
पीटीआय , बोका रॅटन (फ्लोरिडा) ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार व विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रोम्नी यांच्यातील चर्चेचा तिसरा व अखेरचा फड चांगलाच रंगला. एकूण ९० मिनिटे चाललेल्या या चर्चेत आपले प्रतिस्पर्धी उमेदवार मिट रोम्नी यांच्यावर सातत्याने टीकाहल्ले करतानाच ओबामा यांनी त्यांच्या परराष्ट्र धोरणांतील विसंगतींचा चांगलाच समाचार घेतला. या चर्चेदरम्यानची ओबामांची आक्रमक देहबोली आणि तथ्यांचा आधार घेऊन त्यांनी चढविलेले हल्ले यामुळे ही फेरी तेच जिंकणार हे स्पष्ट झाले होते.

 
अंतराळात तरंगण्याचा अनुभव अनमोल - सुनीता विल्यम्स Print E-mail

पीटीआय , ह्य़ूस्टन
alt

आजूबाजूला तरंगत राहणे हा अनुभव अतिशय अनमोल आहे पण असे असले तरी गुरुत्वाकर्षणाचा आपल्याला कधीही विसर पडत नाही, अशा भावना भारतीय वंशाची अमेरिकी अंतराळवीरांगना सुनीता विल्यम्स हिने अंतराळातील शंभर दिवसांच्या वास्तव्यानिमित्ताने व्यक्त केल्या. सध्या ती आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील ३३ व्या मोहिमेतील अंतराळवीरांचे नेतृत्व करीत आहे.
सुनीता म्हणाली की, मला येथे यायला आवडते व आजूबाजूला तरंगत राहणे हा एक वेगळा अनुभव आहे.
 
अमेरिकेत वॉलमार्टवर बडगा Print E-mail

कामगारांच्या प्रश्नावर  कायदेशीर याचिका
वृत्तसंस्था , न्यूयॉर्क
alt

रिटेल क्षेत्रात जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या वॉलमार्टविरोधात कामगारांच्या पिळवणुकीबाबत कायदेशीर याचिका दाखल करण्यात आली आहे. वॉलमार्ट आणि तिच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे काम करणाऱ्या एजन्सीने किमान वेतन आणि कामाच्या वेळेबाबतचे नियम धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांची पिळवणूक केल्याप्रकरणी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात अमेरिकेतील विविध शहरांमध्ये वॉलमार्टच्या कामगारांनी रस्त्यावर उतरून मोर्चा काढला होता.
 
मानवतावादी तत्त्वज्ञ पॉल कुर्टझ् यांचे निधन Print E-mail

वृत्तसंस्था , अ‍ॅमहर्स्ट
alt

माणसाच्या जीवनाला धर्मापेक्षा विज्ञान आणि तर्काचे अधिष्ठान असले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन करणारे आणि ‘निधर्मी मानवतावादाचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे तत्त्वज्ञ पॉल कुर्टझ् यांचे शनिवारी न्यूयॉर्क येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
कुर्टझ् यांनी तर्कवादाच्या प्रसारासाठी स्थापन केलेल्या ‘सेन्टर फॉर इन्क्वायरी’ या संस्थेने मंगळवारी त्यांच्या निधनाची घोषणा केली. त्यांच्या मृत्यूचे कारण मात्र जाहीर करण्यात आलेले नाही.
 
दिल्लीत अचानक मुसळधार.. Print E-mail

पीटीआय , नवी दिल्ली
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला उत्सवाच्या वातावरणात लगबगीने कार्यालयांतून घरी परतणाऱ्या दिल्लीकरांना सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढल़े  भर दुपारी अंधारून आल्याने चकित झालेल्या दिल्लीकरांची पाठोपाठ आलेल्या पावसाने चांगलीच धांदल उडवली़

 
येडियुरप्पांची लवकरच वेगळी चूल! Print E-mail

alt

आता निधर्मीवादाचे राजकारण
पीटीआय, बंगळुरू
कर्नाटक विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने पदच्युत मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा स्वाभिमान जागा झाला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी जुळवून घेणे आता अशक्य असून आपण लवकरच स्वतंत्र पक्षाची स्थापना करणार आहोत, अशी घोषणा त्यांनी मंगळवारी येथे केली. विशेष म्हणजे, हा नवा पक्ष निधर्मीवादाचे राजकारण करेल, असे त्यांनी सांगितले.
 
मिट रॉम्नी यांच्यासोबतच्या वादविवादात परराष्ट्र धोरणावर बराक ओबामा आक्रमक Print E-mail

alt

फ्लोरिडा, २३ ऑक्टोबर २०१२
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबाम यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रॉम्नी यांच्यावर सोमवारी फ्लोरिडातील लिन विद्यापीठात पार पडलेल्या तिस-या व शेवटच्या खुला वादविवादात परराष्ट्र धोरणाच्या मुद्यावरून जोरदार हल्ला चढवला. तर मिट रॉम्नी यांनी तेहरानला आण्विक अस्त्र मिळवण्यासाठी निर्बंध्द घालणार असल्याची कडक भूमिका घेणार असल्याचा संकल्प केला.
 
मी फेसबुकमध्ये नसतो तर मायक्रोसॉफ्टमध्ये असलो असतो- मार्क झुकरबर्ग Print E-mail

alt

लंडन, २३ ऑक्टोबर २०१२
जर फेसबुक हे संकेतस्थळ योग्यरित्या कार्यन्वित झाले नसते तर मी कदाचित मायक्रोसॉफ्टमध्ये प्रवेश केला असता असं फेसबुक या जगप्रसिध्द संकेतस्थळाचा निर्माता मार्क झुकरबर्ग म्हणाला.

 
गडकरींच्या कथित भ्रष्टाचाराविषयी काँग्रेसचे मौन Print E-mail

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या कंपन्यांमधील कथित भ्रष्टाचाराविषयी सोमवारी काँग्रेसने मौन धारण केले. एखाद्या व्यक्तीवरील वैयक्तिक आरोपांविषयी काँग्रेसला काहीही बोलायचे नाही. अशा भ्रष्टाचाराची दखल संबंधित शासकीय संस्था घेतील आणि  कायदा आपले काम करेल, असे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संदीप दीक्षित म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी अल्पावधीत बेहिशेबी संपत्ती जमविल्याचे अरिवद केजरीवाल यांनी आरोप केल्यापासून काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता आहे. या मुद्दय़ावरून भाजपनेही काँग्रेसवर हल्ला चढविला आहे.

 
व्यक्तिगतता हक्कात सूट देण्याची शिफारस! Print E-mail

सार्वजनिक हिताच्या व पत्रकारितेतून उघड बाबी गुन्हा नाही
पीटीआय, नवी दिल्ली

सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबी तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून उघड झालेल्या गोष्टी यांना प्रस्तावित व्यक्तिगतता हक्क विधेयकातून सूट मिळाली पाहिजे. व्यक्तिगतता हक्क विधेयकानुसार या दोन्ही बाबी गुन्हा ठरू नयेत, अशी शिफारस शासनाने नियुक्त केलेल्या समितीने केली आहे. व्यक्तिगतता हक्क विधेयक निर्मितीच्या दृष्टीने निवृत्त न्यायमूर्ती ए. पी. शाह यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना नियोजन आयोगाने सप्टेंबर, २०११ मध्ये केली होती. या समितीने उपरोक्त विधेयकाच्या संदर्भाने व्यक्तीच्या खासगी जीवनाशी संबंधित बाबी निर्धारित कराव्यात आणि या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात हातभार लावावा, असे या समितीस सुचविले गेले होते.
 
एफएम रेडिओंवर यापुढे सरकारची ‘नजर’ Print E-mail

पीटीआय, नवी दिल्ली

खासगी (एफएम) रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातील तपशिलावर यापुढे सरकारची ‘नजर’ राहणार आहे. नजीकच्या भविष्यात तब्बल ८०० खासगी रेडिओ येऊ घातल्याने हा निर्णय सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव उदयकुमार वर्मा यांनी सोमवारी येथे दिली. ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’च्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. खासगी रेडिओंवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांच्या तपशिलावर देखरेख ठेवण्याची यंत्रणा सध्या अस्तित्वात आहे, मात्र भविष्यात तब्बल ८०० खासगी रेडिओ येऊ घातल्याने ही यंत्रणा अधिक सक्षम करावी लागेल.
 
ओबामा- रॉम्नी यांच्यातील तिसरा सामनाही रंगणार Print E-mail

वृत्तसंस्था , वॉशिंग्टन

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील बराक ओबामा व मिट रॉम्नी या दोन उमेदवारांचा तिसरा व शेवटचा खुला वादविवाद फ्लोरिडातील लिन विद्यापीठात मंगळवारी होत असून, त्यात परराष्ट्र धोरणावर जास्त भर दिला जाण्याची शक्यता आहे. लिबिया व इराण या दोन देशांबरोबर अमेरिकेचे असलेले संबंध, दहशतवाद, चीनचा वाढता प्रभाव तसेच सीरिया व अफगाणिस्तानातील युद्ध या विषयांवरही युक्तिवाद केले जाऊ शकतील असा अंदाज आहे.
 
भाजपचा भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा हा दिखाऊपणा - सोनिया Print E-mail

पीटीआय, मांडी (हिमाचल प्रदेश)

भ्रष्टाचारामध्ये स्वत: आकंठ बुडालेले असताना भ्रष्टाचाराविरुद्ध भाजपकडून करण्यात येत असलेली आंदोलने हा केवळ दिखाऊपणा असल्याची कडवट टीका करीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपविरुद्ध हल्लाबोल केला आह़े  भाजप तळागाळातील लोकांसाठी काम करण्याकडे दुर्लक्ष करून केवळ भ्रष्टाचार आणि महागाई यांच्याविरोधात लढण्याचा आभास निर्माण करत आहे, अशीही झोड उठवीत गांधी यांनी हिमाचल प्रदेशातील निवडणुकांसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडला़.
भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून दुसऱ्याकडे बोट दाखविण्याआधी भाजपने आत्मपरीक्षण कराव़े 
 
ऑस्ट्रेलियातील निवडणूक रिंगणात तब्बल ४० भारतीय Print E-mail

पीटीआय, मेलबोर्न

ऑस्ट्रेलियामध्ये भारतीयांचा दबदबा वाढत असून व्हिक्टोरिया राज्यात होणाऱ्या स्थानिक निवडणुकीत तब्बल ४० भारतीय आपले नशीब आजमावत आहेत. व्हिक्टोरिया राज्याच्या निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार ७७ जागांसाठी ४० भारतीय उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्याशिवाय भारतीय वंशाचे १० उमेदवारही निवडणूक लढवीत आहेत. २६ ऑक्टोबरला होणाऱ्या या निवडणुकीत ऑस्ट्रेलियात अनेक सकारात्मक बदल होतील, अशी आशा व्यक्त होत आहे.
 
अमेरिकेत मॉलमध्ये माथेफिरूचा गोळीबार Print E-mail

३ जण मृत्युमुखी, हल्लेखोराचीही आत्महत्या
पीटीआय, वॉशिंगटन

अमेरिकेतील विस्कॉन्सिस राज्यातील मॉलमध्ये एका माथेफिरूने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. रेडक्लिफ हॉटन (वय ४५) असे या माथेफिरूचे नाव असून त्याने गोळीबारानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. घरगुती वादामुळे त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अंदाधुंद गोळीबाराची अमेरिकेतील ही तीन महिन्यांतील दुसरी घटना आहे.
हॉटनने गोळीबार केला त्या स्पामध्ये त्याची पत्नी काम करत होती. त्याचे पत्नीबरोबर वाद सुरू होते.
 
.. म्हणून मुलींना मोबाइल देऊ नका Print E-mail

बसपाच्या खासदाराचे तर्कट
पीटीआय , मुझफ्फरनगर

अल्पवयीन मुलींच्या प्रेमप्रकरणांस व पळून जाऊन लग्न करण्यास मोबाइल फोन जबाबदार असल्याने त्यांच्या हातात मोबाइल देऊ नका, असे अजब तर्कट बहुजन समाज पार्टीचे राज्यसभेतील खासदार राजपाल सिंह सैनी यांनी मांडले आहे.
मुलांच्या, विशेषत: मुलींच्या, हाती मोबाइल फोन देऊ नका, असे आवाहन मी प्रत्येक सभेत करत असतो. मुला-मुलींच्या हाती मोबाइल आढळल्यास ते काढून घ्या, त्यावाचून त्यांचे फार काही अडणार नाही. या फोनच्या सुविधेमुळेच आजकाल अल्पवयीन मुलांच्या प्रेमप्रकरणात व मुलींनी घर सोडून परस्पर लग्न करण्याच्या संख्येत वाढ झाली आहे, असे ते म्हणाले.
 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 19 20 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो