पीटीआय
नवी दिल्ली ‘सन ऑफ सरदार’चा निर्माता अजय देवगणने यशराज फिल्म्सच्या विरोधात दाखल केलेली याचिका ‘कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया’ (सीसीआय)ने मंगळवारी फेटाळली. सीसीआयच्या या निर्णयामुळे आपल्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच अजय देवगणला मोठा धक्का बसला आहे. |
पीटीआय
संयुक्त राष्ट्रे दहशतवादी हल्ले चढवणे, अफगाणिस्तानातील नाटो सैन्यावर आत्मघातकी हल्ले करणे, महत्त्वाच्या व्यक्तींचे अपहरण करून खंडणी वसूल करणे अशा प्रकारच्या घातपाती कारवाया करणाऱ्या तसेच जागतिक दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या हक्कानी नेटवर्कवर संयुक्त राष्ट्रांनी आर्थिक र्निबध लादले आहेत. तसेच त्यांचा आत्मघातकी हल्ल्यांचा प्रमुख कारी झकीर याच्यावरही र्निबध लादले आहेत. |
दिवाळीनंतर भाजपला सोडचिठ्ठी
पीटीआय बंगळुरू खाण भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा भाजपवरील कर्नाटकी राग अद्याप कायम असून १० डिसेंबरला स्वतच्या मालकीचा नवा पक्ष स्थापन करण्याची जय्यत तयारी त्यांनी चालवली आहे. त्यासाठी त्यांनी मंगळवारी शक्तिप्रदर्शनार्थ समर्थकांची बैठक बोलावली होती. |
हत्या करण्यात आलेला हेवूड ब्रिटिश गुप्तहेर पी.टी.आय.
बीजिंग चीनमधील कम्युनिस्ट पक्षातून पायउतार झालेले बो झिलाई यांच्या कुटुंबाचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटवणारे हत्या प्रकरण वेगळ्या वळणापाशी येऊन थांबले आहे. झिलाई यांच्या पत्नी ग्यु कैलाई यांनी हत्या केलेला ब्रिटिश नागरिक निल हेवूड हा ब्रिटिश गुप्तचर संघटना एम- १६ चा हेर असल्याचे नवे सत्य समोर आले आहे. |
पाकिस्तानच्या मुख्य न्यायमूर्तीची स्पष्टोक्ती पीटीआय इस्लामाबाद लष्करशाहीच्या कल्पनेत रमलेल्या पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या. क्षेपणास्त्रे आणि रणगाडय़ांमुळे आपल्या देशात स्थैर्य आणि सुरक्षा नांदेल, असे कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे, अशी स्पष्टोक्ती पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती इफ्तिकार चौधरी यांनी सोमवारी दिली. नॅशनल मॅनेजमेंट कॉलेजच्या एका शिष्टमंडळाशी ते बोलत होते. |
नारायण मूर्ती यांचा खुलासा पीटीआय नवी दिल्ली अरविंद केजरीवाल यांच्या नव्या राजकीय पक्षासाठी आपण कोणत्याही प्रकारे देणगी दिलेली नाही, असा खुलासा इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी मंगळवारी केला. |
रा. स्व. संघाकडूनही कानउघाडणी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली पूर्ती समुहात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करीत असतानाच स्वामी विवेकानंदांची कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी तुलना करून अनावश्यक वादाला निमंत्रण देणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना मंगळवारी त्यांच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सळो की पळो करून सोडले. |
दुबई : डॉक्टरांच्या उपचाराने समाधान न झालेल्या एका पाकिस्तानी रुग्णाने अबू धाबीतील रुग्णालयामध्ये एका भारतीय डॉक्टरची भोसकून हत्या केल्याची घटना गेल्या आठवडय़ात घडली. |
पूंछ : दोन दिवसांवर लग्न आले असतानाही आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवतीस भारत-पाकिस्तान सीमेवर मंगळवारी ताब्यात घेण्यात आले. |
नवी दिल्ली : हरयाणाचे माजी मंत्री गोपाळ कांडांच्या जामीन अर्जावर पोलिसांनी उत्तर द्यावे, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. |
इस्लामाबाद : मलाला युसुफझाईवर गोळी झाडणाऱ्या हल्लेखोराच्या बहिणीने या प्रकाराबद्दल मलालाची माफी मागितली आहे. आपल्या भावाच्या या कृत्यामुळे आम्हा सर्वाची मान शरमेने झुकली आहे, असे तिने म्हटले आहे. |
पीटीआय, इस्लामाबाद मलाला युसुफझाईवर गोळी झाडणाऱ्या हल्लेखोराच्या बहिणीने या प्रकाराबद्दल मलालाची माफी मागितली आहे. आपल्या भावाच्या या कृत्यामुळे आम्हा सर्वानी मान शरमेने झुकली आहे, असे तिने म्हटले आहे. |
इस्लामाबाद, ६ नोव्हेंबर २०१२ इस्लामाबाद येथील एका दाम्पत्याने आपल्या १५ वर्षाच्या मुलीने एका मुलाकडे नुसते बघितल्यामुळे कुटुंबाचा अनादर झाल्याचे कारण दाखवत अँसीड फेकून तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा 'अनादरावरून हत्या' (ऑनर किलिंग) करण्यात येणा-या समस्येने लक्ष वेधून घेतले आहे. |
वापरकर्त्यांसाठी दिवाळी भेट पीटीआय, वॉशिंग्टन
फेसबुक वापरकर्त्यांसाठी दिवाळी भेट. आता तुम्हाला कॉफी शॉपमध्ये बसल्या बसल्या वाय-फाय पासवर्ड कुणाला विचारायची गरज नाही कारण फेसबुक सध्या नवीन वाय-फाय सेवेची चाचणी घेत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर जर कुणाला फेसबुक चेक इन करायचे असेल तर त्याला इंटरनेट अॅक्सेस फुकट असणार आहे. छोटे उद्योजक त्यांच्या ग्राहकांना फेसबुक रूटरच्या माध्यमातून थेट इंटरनेट अॅक्सेस देऊ शकतील, त्यामुळे चेक इन करताच त्यांना फेसबुक पेजवर जाता येईल असे ‘डिस्कव्हरी न्यूज’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
|
प्रतिनिधीगृहाच्या लढतीत यशाची अपेक्षा पीटीआय, वॉशिंग्टन
अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या ४३५ जागांसाठी आज, मंगळवारी, ६ नोव्हेंबर रोजी ५० राज्यांमध्ये निवडणूक होत असून, त्यात सहा भारतीय अमेरिकी उमेदवार चुरशीची लढत देत आहेत. या सहाही जणांना विजयी होण्याबद्दल आत्मविश्वास वाटतो, तर येथील माध्यमांनी यापैकी तिघांच्या विजयाचे भाकीत वर्तवले आहे. आतापर्यंत दलिपसिंग सौंड आणि बॉबी जिंदाल असे दोनच भारतीय प्रतिनिधीगृहावर निवडून गेले आहेत. |
जपानी संशोधकांनी विकसित केले तंत्रज्ञान पीटीआय, लंडन
जेम्स बाँडचा ‘डाय अनदर डे’ हा चित्तथरारक चित्रपट ज्यांनी पाहिला असेल त्यांना त्यात वापरलेली पारदर्शक मोटार कदाचित आठवत असेल तशी मोटार बनवण्यास उपयुक्त तंत्रज्ञान आता जपानी संशोधकांनी विकसित केले आहे.या मोटारीत तुम्हाला बाहेरचे सगळे जगच आत सामावल्यासारखे वाटते. ही मोटार पार्किंग करताना त्यामुळे सोपे जाते. |
* ताज कॉरिडॉरप्रकरणी आरोप नको * अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय पीटीआय, लखनऊ काय आहे ताज कॉरिडॉर प्रकरण? मायावतींनी त्यांच्या कार्यकाळात ताजमहाल परिसराच्या सुशोभीकरणासाठी ‘ताज कॉरिडॉर’ योजना आखली. त्यात १७५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सीबीआयला दिले. सीबीआयने मायावतींना क्लीन चिट दिली. |
आठवडाअखेरीस ईशान्येला थडकणार पीटीआय, न्यूयॉर्क सॅण्डी वादळाच्या तडाख्यातून अमेरिकेची पूर्व किनारपट्टी सावरत असतानाच आणखी एक वादळ या किनारपट्टीवर येऊन थडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आठवडय़ाच्या अखेपर्यंत हे वादळ किनारपट्टीला थडकेल. त्यामुळे समुद्रात उंच लाटा निर्माण होतील व वाऱ्याचा वेग वाढणार असून जोरदार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. |
खेमका यांची मागणी पीटीआय, चंदिगड ‘माझ्यासाठी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची आवश्यकता नाही. मला धमक्या देणाऱ्याची लवकरात लवकर चौकशी व्हावी, अशी माझी मागणी आहे,’ असे हरयाणातील ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी अशोक खेमका यांनी सोमवारी स्पष्ट केले. |
सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा पीटीआय, नवी दिल्ली हिंदी चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्याविरोधातील बलात्काराचा खटला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भांडारकर यांना दिलासा मिळाला आहे. अभिनेत्री प्रीती जैन हिने चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने मधुरने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|