देश-विदेश
मुखपृष्ठ >> देश-विदेश
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

देश-विदेश
ब्रिटनच्या प्रयोगशाळेत साकारणार कृत्रिम कृष्णविवर! Print E-mail

वृत्तसंस्था, लंडन

द्रव्य व ऊर्जा यांची आंतरक्रिया कशी असते हे समजून घेण्यासाठी ब्रिटनचे वैज्ञानिक प्रयोगशाळेत कृष्णविवरे तयार करणार आहेत. ती खऱ्या कृष्णविवराची हुबेहूब नक्कल असणार आहे. एडिंबर्गच्या आजूबाजूच्या परिसरात हेरियट-वॉट विद्यापीठाचे वैज्ञानिक काही लेसर शलाका तयार करणार असून त्यात निर्माण होणारी ऊर्जा ही काही ट्रिलियन व्ॉट इतकी असेल, अशी माहिती ‘द इंडिपेंडंट’ या वृत्तपत्राने दिली आहे. लेसर शलाका या कृष्णविवरांच्या निर्मितीसाठी आवश्यक स्थिती निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणार असून हा प्रकल्प साडेतेवीस लाख पाउंडांचा आहे.
 
देवाचे अस्तित्व नाकारणारे आइनस्टाइनचे पत्र लिलावात Print E-mail

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन याचे स्वहस्ताक्षरातील पत्र अर्थातच ‘गॉडलेटर’ ऑनलाइन लिलावात ठेवण्यात आले असून त्याला ३० लाख अमेरिकी डॉलरपासून बोली सुरू झाली आहे. ‘गॉड लेटर’ हे पत्र आइनस्टाइनने त्याच्या मृत्यूपूर्वी म्हणजे १९५५ मध्ये लिहिले होते. ते जर्मन भाषेत लिहिले असून त्यात धर्म, देव व टोळीवाद या मुद्दय़ांवर विचार मांडले आहेत.
आइनस्टाइनने हे पत्र प्रिन्स्टन विद्यापीठाच्या लेटरहेडवर लिहिले होते व ते तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक एरिक गटकिंड यांना पाठवले होते. आइनस्टाइनने गटकिंडचे चूझ लाइफ- द बिब्लिकल कॉल टू रिव्होल्ट हे पुस्तक वाचल्यानंतर त्यावर प्रतिसाद म्हणून हे पत्र लिहिले होते.
 
वाग्युद्ध करणारे रोम्नी नव्हतेच! Print E-mail

पीटीआय, वॉशिंग्टन

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वाग्युद्धातील पहिल्या फेरीत रिपब्लिकन उमेदवार मिट रोम्नी यांनी बाजी मारल्यानंतर डिवचल्या गेलेल्या  राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.  प्रेशिडेंशियल डिबेटदरम्यान माझ्याशी वाग्युद्ध करणारे रोम्नी खऱ्या व्यक्तिमत्त्वात नव्हते. ते कुणीतरी वेगळेच होते, असे सांगत आपणच अमेरिकेचे तारणहार असल्याचे पुन्हा एकदा जाहीर केले. बुधवारी रात्री प्रेशिडेंशियल डिबेटच्या पहिल्या फेरीत मी ज्यांना ओळखतो ते रोम्नी वाग्युद्धाच्या वेळी उपस्थितच नसल्याचे जाणवले. कारण वाग्युद्धादरम्यान त्यांना स्वत:च्याच सिद्धांत आणि आस्थांचा विसर पडला होता.
 
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी जगनमोहन रेड्डींना जामीन नाहीच! Print E-mail

पीटीआय, नवी दिल्ली

बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या काँग्रेस नेते आणि खा. वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांचा जामीन अर्ज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाच्या निर्णयामुळे रेड्डी यांच्या तुरुंगातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. न्या. अफताब आलम आणि रंजना प्रकाश देसाई यांच्या खंडपीठाने रेड्डी यांचा जामीन अर्ज फेटाळताना स्पष्ट केले की, सदर प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे सीबीआयने रेड्डींविरोधातील सर्व सात प्रकरणांचा तपास पूर्ण केल्यानंतर ते जामिनासाठी अर्ज करू शकतात.
 
इम्रान खानच्या रॅलीवर हल्ल्याची शक्यता Print E-mail

पीटीआय, इस्लामाबाद

पाकिस्तानातील दक्षिण वजिरीस्तान प्रांतात इम्रान खान याने ६ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या ड्रोन हल्लेविरोधी मोर्चास स्थानिक तालिबानी संघटनांकडून धोका असल्याचा इशारा वायव्य पाकिस्तानातील संरक्षण अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यादृष्टीने कोटकई गावात ९ आत्मघातकी हल्लेखोर पाठविण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. तर, इम्रान खान, ज्यू आणि ख्रिश्चन धर्मीयांचा ड्रोन हल्ल्यांचे राजकारण करण्याचा मुद्दा, या मोर्चाच्या माध्यमातून पुढे करीत असल्याचा आरोप करणारी पत्रके वजिरीस्तानात एका अतिरेकी संघटनेतर्फे वाटण्यात आली.
 
आपोआप पार्क होणारी निस्सानची नवी स्मार्ट इलेक्ट्रिक मोटार Print E-mail

वृत्तसंस्था, लंडन

संशोधकांनी एक नवीन स्मार्ट इलेक्ट्रिक कार (विजेवर चालणारी मोटार) सादर केली असून ती आपोआप पार्क होते व चालकाने बोलावले की, त्याच्याजवळ येते. निस्सानच्या एनएससी-२०१५ या मोटारीचे हे प्राथमिक रूप असून २०१५ पर्यंत ही गाडी बाजारात येणार आहे, असे बीबीसी न्यूजने म्हटले आहे.
असे असले तरी या गाडय़ांचा मोठय़ा प्रमाणावरील वापर होण्यास आणखी काही वर्षे जावी लागतील, असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. एनएससी-२०१५ ही गाडी म्हणजे निस्सानच्या ‘लिफ’ या मॉडेलचे आधुनिक रूप असून ते टोकियोतील सियाटेक २०१२ या प्रदर्शनात सादर करण्यात आले.
 
नरोडा हत्याकांडातील आरोपीस ३१ वर्षांची शिक्षा Print E-mail

पीटीआय, अहमदाबाद
गुजरातमधील नरोडा पाटिया येथे २००२ मध्ये झालेल्या हत्याकांडातील आरोपीला येथील विशेष न्यायालयाने शुक्रवारी ३१ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सुरेश ऊर्फ शेहजाद नेताळकर असे या आरोपीचे नाव असून तो कटाचा एक मुख्य सूत्रधार असल्याचे विशेष न्यायमूर्ती ज्योत्स्ना याज्ञिक यांनी म्हटले आहे.

 
गोव्यातील खाणकामांना स्थगिती Print E-mail

* सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
* केंद्र व राज्य सरकारांना नोटीस
पीटीआय, नवी दिल्ली

गोवा राज्याला ग्रासलेल्या अवैध खाणकामांचे ग्रहण अखेरीस शुक्रवारी संपले. राज्यातील ९० खाणींचे काम तातडीने स्थगित करून त्यांच्या कच्च्या लोखंडाच्या निर्यातीलाही लगाम घालण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. केंद्र व राज्य सरकारला यासंदर्भात नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. गोव्यातील अवैध खाणकामासंदर्भात राज्यातील गोवा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने आवाज उठवला होता. सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयानेही यासंदर्भात तपास करण्यासाठी न्यायमूर्ती एम. बी. शहा यांच्या अध्यक्षतेखालील आयोग नेमला होता.
 
सर्वोच्च न्यायालयाला हवे ‘कायदेशीर’ सहकार्य Print E-mail

किराणा क्षेत्रात ‘एफडीआय’बाबत मागवले अ‍ॅटर्नी जनरल, सॉलिसिटर जनरलचे मत
पीटीआय, नवी दिल्ली
किराणा क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्याच्या निर्णयाविरोधात करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅटर्नी जनरल अथवा सॉलिसिटर जनरल यांच्यासारख्या उच्चपदस्थ विधी अधिकाऱ्यांकडून सहकार्याची मागणी केली आहे.

 
ब्रार हल्लाप्रकरणी Print E-mail

१२ जणांना अटक
पीटीआय, लंडन
ऑपरेशन ब्लू स्टारचे हीरो मानल्या जाणाऱ्या निवृत्त लेफ्टनंट जनरल के. एस. ब्रार यांच्यावरील हल्लाप्रकरणी लंडन पोलिसांनी दोन महिलांसह १२ जणांना अटक केली आहे. ब्रार यांच्यावर ३० सप्टेंबर रोजी हल्ला झाला होता.

 
सोनियांच्या दौऱ्यांवर सरकारी खर्च नाही Print E-mail

पंतप्रधान कार्यालयाचे स्पष्टीकरण
पीटीआय, नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे परदेश दौरे वा वैद्यकीय उपचारावर सरकारने कोणताही खर्च केला नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. सोनिया गांधी यांच्या दौऱ्यांवर १८८० कोटी रुपये खर्च झाल्याचा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दाव्याबद्दल त्यांनी माफी मागावी, असेही पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले.

 
कल्याणसिंग भाजपमध्ये परतणार? Print E-mail

पीटीआय, लखनऊ
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा असून ते स्वगृही परतत असल्यास त्यांचे पक्षात स्वागतच आहे, असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी म्हटले आहे. कल्याणसिंग भाजपमध्ये परतले तर आपल्याला आनंदच होईल, असे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय कटियार आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

 
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३,५०० रुपयांचा बोनस Print E-mail

पीटीआय,वृत्तसंस्था
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात गेल्याच महिन्यात वाढ केल्यानंतर केंद्र सरकारने अराजपत्रित कर्मचाऱ्यांना २०११-१२ या वर्षांकरिता साडेतीन हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. ब, क आणि ड श्रेणीतील केंद्रीय कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

 
‘धनुष’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी Print E-mail

alt

बालासोर, ओडिशा, ५ ऑक्टोबर/पीटीआय
अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या ‘धनुष’ या क्षेपणास्त्राची भारताने आज यशस्वी चाचणी घेतली आहे. ‘पृथ्वी’ या कमी पल्ल्याच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची ही नौदल आवृत्ती आहे. ओडिशाच्या सागर किनाऱ्यावरून एका युद्धनौकेवरून ते सोडण्यात आले.
 
देवाचे अस्तित्व नाकारणारे आइनस्टाइनचे पत्र लिलावात Print E-mail

alt

वॉशिंग्टन, ५ ऑक्टोबर/पीटीआय
देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन याचे स्वहस्ताक्षरातील पत्र अर्थातच ‘गॉडलेटर’ ऑनलाइन लिलावात ठेवण्यात आले असून त्याला ३० लाख अमेरिकी डॉलरपासून बोली सुरू झाली आहे. ‘गॉड लेटर’ हे पत्र आइनस्टाइनने त्याच्या मृत्यूपूर्वी म्हणजे १९५५ मध्ये लिहिले होते. ते जर्मन भाषेत लिहिले असून त्यात धर्म, देव व टोळीवाद या मुद्दय़ांवर विचार मांडले आहेत.
 
पहिल्या वाग्युद्धात रोम्नींची सरशी! Print E-mail

तारणहार असल्याचा रोम्नींनी दिला विश्वास, ओबामांना धरले मंदीस जबाबदार
पी.टी.आय.वृत्तसंस्था , वॉशिंग्टन

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या वाग्युद्धातील (प्रेसिडेन्शिअल डीबेट) डेन्व्हर येथे झालेली पहिली शब्दलढाई रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रोम्नी यांनी जिंकली.  १९२९ सालच्या जागतिक महामंदीइतक्या तीव्र स्वरूपाची मंदी अमेरिकेत आज निर्माण होण्यास ओबामा आणि त्यांची धोरणे कारणीभूत असल्याचा ठपका ठेवून अमेरिकेचे तारणहार आपणच असल्याचे बिंबविण्यामध्ये रोम्नींनी या वादात बाजी मारली. ओबामा ज्या प्रश्नांना सोडवू शकले नाहीत, त्यांना आपण सहज सोडवू शकू, असा दिलासा देण्याचा डावही त्यांनी यशस्वीरीत्या साधला.
 
काश्मीरप्रश्नी मध्यस्थीस रशियाचा नकार Print E-mail

पीटीआय, इस्लामाबाद

भारत, पाकिस्तान यांच्यात कळीचा मुद्दा असलेल्या काश्मीर प्रश्नावर दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यास रशियाने स्पष्ट नकार दिला आहे. काश्मीर प्रश्न सोडविण्यास भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश सक्षम असल्याचे मत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी गुरुवारी इस्लामाबाद येथे व्यक्त केले. सर्गेई लावरोव पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले आहेत. पाकच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत दुभाषीच्या माध्यमातून बोलताना लावरोव म्हणाले की, काश्मीर प्रश्नाबाबत आमच्यात सविस्तर चर्चा झाली.
 
जुंदालला ८ ऑक्टोबर रोजी न्यायालयापुढे हजर करणार Print E-mail

पीटीआय, नवी दिल्ली

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा हस्तक आणि लष्कर-ए-तय्यबाचा अतिरेकी अबू जुंदाल याची गुरुवारी दिल्लीतील न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. महाराष्ट्रात जुंदालच्या विरोधात असलेल्या खटल्यांबाबतची चौकशी करण्यासाठी सध्या त्याची गरज नसल्याचे मुंबई दहशतवादविरोधी पथकाच्या वतीने दिल्ली न्यायालयात सांगण्यात आले. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मुंबई दहशतवादविरोधी पथकाने जुंदालला मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे हजर केले असता त्याची तिहार कारागृहात रवानगी करण्यात आली.
 
पृथ्वी-२ ची यशस्वी चाचणी Print E-mail

बालासोर (ओदिशा):  भारताने पृथ्वी-२ या आण्विक क्षमतेच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेऊन आपल्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. पृथ्वी-२ हे क्षेपणास्त्र ३५० कि.मी. लांबीपर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. चांदीपूर येथील देशी चाचणी क्षेत्रातील संकुल-३ मध्ये मोबाइल लॉन्चरच्या साहाय्याने भूपृष्ठावरून भूपृष्ठावर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली, असे संरक्षण दलाच्या सूत्रांनी सांगितले. देशी बनावटीच्या या क्षेपणास्त्राची चाचणी संपूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा ‘आयटीआर’चे संचालक एमव्हीकेव्ही प्रसाद यांनी केला असून सदर मोहिमेचा उद्देशही सफल झाल्याचे सांगितले.
 
टोयोटाने सादर केली नवी स्मार्ट कार Print E-mail

पीटीआय , मेलबर्न

जपानच्या टोयोटा कंपनीतील अभियंत्यांनी नवीन स्मार्ट कार (मोटार) तयार केली असून, ती तुमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तुम्हाला पुढे नेमकी काय कृती करायची आहे हे आधीच जाणून घेऊ शकते. ‘इनसेक्ट’ कार अशी ही संकल्पना असून जपानच्या टोयोटा या स्वयंचलित वाहन कंपनीने ती प्रत्यक्षात आणली आहे. या मोटारीत गतिसंवेदक, आवाज ओळखणारे संवेदक, वर्तनाचे भाकीत करणारे तंत्रज्ञान यांचा वापर केला आहे. चालकाच्या चेहऱ्यावरून त्याची पुढची कृती काय असेल याचा अंदाज या तंत्रामुळे बांधता येतो.
 
<< Start < Prev 21 22 23 24 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो