पाटणा : बिहारची भरभराट होण्यासाठी आपल्या आशीर्वादांची गरज आहे, असे भावनिक आवाहन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना केले. बिहारच्या पंचवार्षिक कृषी आराखडय़ाचे अनावरण मुखर्जी यांच्या हस्ते येथे झाले, त्या वेळी नितीशकुमार बोलत होते. |
जमशेदपूर, ३ ऑक्टोबर/पीटीआय अनुदानित गॅस सिलिंडरच्या संख्येवर सरकारने मर्यादा आणल्याने आता ब्रँडेड कंपन्यांच्या इंडक्शन कुकरला मागणी वाढली आहे. हे कुकर विजेवर चालणारे असले तरी त्यांना तुलनेने वीज कमी लागते. जिथे भारनियमनाचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी त्यांचा वापर करता येणार आहे. |
पीटीआय, पाटणा बिहारची भरभराट होण्यासाठी आपल्या आशीर्वादांची गरज आहे, असे भावनिक आवाहन बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी बुधवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना केले. बिहारच्या पंचवार्षिक कृषी आराखडय़ाचे अनावरण मुखर्जी यांच्या हस्ते येथे झाले, त्यावेळी नीतिशकुमार बोलत होते. |
पी.टी.आय., लंडन गडगडाटी पावसासोबत झुंजणाऱ्या वाऱ्याशी लढाईत पराभूत झालेल्या छत्रीच्या नाजुकतेला लाखोली वाहण्याची गरज आता उरलेली नाही. ताशी ११३ कि.मी वेगाने वाहणाऱ्या वादळातही ‘स्थितप्रज्ञ’ राहू शकणारी आणि आपल्या मालकाला विजयी मुद्रेने वाऱ्याला चिडविण्याची संधी देणारी ‘वादळरोधक’ छत्री तयार करण्यात आली आहे. |
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली, ३ आँक्टोबर २०१२ सहा महिन्यांच्या आत सर्व शाळांमध्ये पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे निर्देश आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला दिले. |
अहमदाबाद, ३ आँक्टोबर २०१२ गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या परदेश दौ-यावर करण्यात आलेल्या खर्चाची माहिती उघडकीस आणण्याची मागणी करत असताना, माहिती अधिकाराअंतर्गत मागवण्यात आलेल्या मोदींच्या परदेश दौ-यावर झालेल्या खर्चाची माहिती देण्यात गुजरात सरकार असमर्थ ठरत असल्याचे समोर आले आहे. |