पीटीआय, राजमुंद्री नीलम वादळाच्या वेळी पूर्व गोदावरी जिल्ह्यातील जलाशयातील पाण्याची योग्य पातळी राखण्याच्या कामात हलगर्जी केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सिंचन विभागातील दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. वादळाच्या वेळी जलाशयाचे दरवाजे योग्य पद्धतीने न हाताळल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या नाल्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. |
पीटीआय, नवी दिल्ली भारतीय कंपन्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे ‘सुशिक्षित’ पदवीधर सध्या विद्यापीठ यंत्रणा तयार करत नाही़ त्यामुळे कंपन्या प्रशिक्षणाचा वेश पांघरून उच्च शिक्षण क्षेत्रात प्रवेश करीत आहेत, अशी खंत उच्च शिक्षण राज्यमंत्री शशी थरूर यांनी सोमवारी येथे व्यक्त केली़ |
पीटीआय, नवी दिल्ली राजधानीत डेंग्यूचे थमान सुरूच आह़े डासांच्या प्रादुर्भावामुळे फैलावणाऱ्या डेंग्यूने दिल्लीत सोमवारी आणखीन ३९ जणांना आपल्या कह्यात घेतले आह़े त्यामुळे आता डेंग्यूग्रस्तांचा येथील एकूण आकडा १ हजार २०० वर पोहोचला आह़े त्यामुळे दिल्लीत घबराट निर्माण झाली आहे. |
इन्फाळ, ५ नोव्हेंबर २०१२ 'आयर्न लेडी आँफ मणिपूर' म्हणून संबोधली जाणारी इराँम चानू शर्मिला हिच्या २००० सालापासून सैन्यबल विशेष अधिकार कायदा(ए.एफ.एस.पी.ए)साठीच्या सुरु असलेल्या उपोषणाला तब्बल बारा वर्ष पुर्ण झाली आहेत. |
वॉशिंग्टन, ५ नोव्हेंबर/पीटीआय फेसबुक वापरकर्त्यांसाठी दिवाळी भेट. आता तुम्हाला कॉफी शॉपमध्ये बसल्या बसल्या वाय-फाय पासवर्ड कुणाला विचारायची गरज नाही कारण फेसबुक सध्या नवीन वाय-फाय सेवेची चाचणी घेत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर जर कुणाला फेसबुक चेक इन करायचे असेल तर त्याला इंटरनेट अॅक्सेस फुकट असणार आहे. |
नवी दिल्ली, ५ नोव्हेंबर २०१२ दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यावर करण्यात आलेले बलात्काराचे आरोप सर्वोच्च न्यायालयाने आज(सोमवार) खोडून काढले आहेत. सदर आरोपांची चौकशी योग्यरितीने होत नसून, फक्त आरोपकर्तीच्या मताच्या आधारावर या प्रकरणाचा तपास सुरू असल्याबाबत मधुर भांडारकरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. |
लंडन, ५ नोव्हेंबर २०१२ २०१५ पासून भारताला प्रतिवर्षी केल्या जाणा-या मदतीत २८० लाख पाऊंडची घट करण्याचा निर्णय ब्रिटीश सरकारने केला आहे. हा निधी देशातील सार्वजनिक सेवांवर खर्च करण्यापेक्षा विदेशी मदतकार्यांसाठी खर्च करण्याचा ब्रिटीश सरकारचा मनसुबा आहे. |
लखनऊ, ५ नोव्हेंबर २०१२ अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज (सोमवार) ताज कॉरिडोर गैरव्यवहार प्रकरणी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांना दिलासा दिला आहे. |
वृत्तसंस्था पाटणा, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
बिहारला विशेष दर्जा द्यावा, ही मागणी दुर्लक्षित करीत केंद्र सरकार बिहारशी सापत्न भावाने वागत आहे, असा आरोप मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी पाटण्यातील विराट ‘अधिकार रॅली’त केला. संयुक्त जनता दलाच्यावतीने महिनाभर राज्यव्यापी अधिकार यात्रा काढल्या गेल्या. त्यांचा समारोप पाटण्यातील गांधी मैदानात पक्षाध्यक्ष शरद यादव यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी कुमार बोलत होते.
|
यस.. हू कॅन?
वृत्तसंस्था वॉशिंग्टन अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारवर येऊन ठेपली असतानाच ५१ वर्षांचे डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार व विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांचे ६५ वर्षांचे प्रतिस्पर्धी रिपब्लिकन उमेदवार मिट रोम्नी यांना अखेरच्या जनमत चाचणीत प्रत्येकी ४८ टक्के मते मिळाली आहेत! |
महारॅलीत मनमोहन सिंग, सोनिया व राहुल गांधींकडून आक्रमक समर्थन विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली किरकोळ क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक आणल्याने शेतकऱ्यांचे भले होईल, तरुणांना मोठय़ा प्रमाणावर रोजगार मिळण्यात हातभार लागेल आणि सर्वसामान्यांनाही त्याचा लाभ होईल, असा दावा करताना रविवारी दुपारी येथील रामलीला मैदानावर काँग्रेसच्या महारॅलीला संबोधताना पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसचे भावी ‘आशास्थान’ राहुल गांधी यांनी केंद्रातील यूपीए सरकारच्या आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमांचा आक्रमकपणे पुरस्कार करीत विरोधी पक्षांवर, विशेषत भाजपवर कडाडून टीका केली. |
वृत्तसंस्था सिमला हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी ७४.६२ टक्के इतके दणदणीत मतदान झाले. सत्तारूढ भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना असून दोन्ही पक्षांचे केंद्रीय नेते भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या विळख्यात असल्याने लोक कोणाच्या बाजूने मते देतात, याबाबत राजकीय पक्षांतही कुतूहल आहे. |
पीटीआय चेन्नई आपल्या कंपनीतील आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा पक्षाध्यक्षपदाची सूत्रे देण्याबाबतचा निर्णय पक्षानेच घ्यावा, असे रविवारी स्पष्ट करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या निर्णयाबाबतची जबाबदारी भाजपवरच ढकलली. |
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली किराणा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीच्या समर्थनासाठी काँग्रेसने रविवारी आयोजिलेल्या महारॅलीमुळे दिल्लीतील बहुतांश रस्ते जॅम झाले होते. ७० ते ८० हजार समर्थकांच्या गर्दीमुळे पावणे दोन तास चाललेल्या या महारॅलीमुळे रामलीला मैदानाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील वाहतूक साडेतीन तास ठप्प होती. |
पीटीआय संयुक्त राष्ट्रे, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२
‘आकाश’ या जगातील सर्वात स्वस्त टॅबलेटला संयुक्त राष्ट्रांत प्रदर्शित करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात येत्या २८ नोव्हेंबरला ‘आकाश’ प्रदर्शित करण्यात येणार असून संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनाही या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
|
एफडीआयच्या समर्थनार्थ ‘रामलीला’वर सोनियांची भव्य सभा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली किरकोळ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकारचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसने रविवारी येथील रामलीला मैदानावर महारॅलीचे आयोजन करीत शक्तिप्रदर्शनाची सज्जता केली आहे. |
रोम्नी यांचा इशारा पीटीआय वॉशिंग्टन अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी सहा नोव्हेंबर या दिवशी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून बराक ओबामा यांचे प्रतिस्पर्धी मिट रोम्नी यांनी आक्रमक प्रचारावर भर दिला आहे. |
पंतप्रधानांची माहिती : आरोग्य क्षेत्रासाठी १२व्या योजनेत तिप्पट वाढ नवी दिल्ली पीटीआय आरोग्य क्षेत्रातील जटिल समस्यांची गंभीरपणे दखल घेण्याची गरज प्रतिपादित करताना पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी शनिवारी बाराव्या योजनेत या क्षेत्रासाठी तीन पटीने वाढ करण्यात येत असल्याचे सांगितले. |
रेखा गणेश दिघे दिल्लीत महाराष्ट्र महोत्सव २०१२ साजरा (सुरेंद्र कुलकर्णी) नवी दिल्ली येथील सार्वजनिक उत्सव समितीतर्फे दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान आयोजित केला जाणारा, महाराष्ट्र महोत्सव यंदाही मोठय़ा थाटामाटात व भरपूर प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. दिल्लीतील चार विविध ठिकाणी आयोजित या महोत्सवास मराठी तसेच अमराठी प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. |
पीटीआय, नवी दिल्ली, शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्यावर बूट फेकणारी व्यक्ती गांधी परिवाराशी संबंधित आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केला. या आरोपाच्या पुष्टय़र्थ जगदीश शर्मा नामक या हल्लेखोराचे सोनिया गांधी व रॉबर्ट वढेरा यांच्यासोबतचे छायाचित्रही केजरीवाल यांनी प्रसृत केले.
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|