युरोपा लीग फुटबॉल स्पर्धा ए.पी., लंडन
इंटर मिलान आणि लिऑन यांची विजयी घोडदौड कायम राखत युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत मजल मारली आहे. मात्र गतविजेत्या अॅटलेटिको माद्रिद संघाला मात्र बादफेरीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. लिव्हरपूलला रशियाच्या आंझी माखाचकाला संघाकडून ०-१ असे पराभूत व्हावे लागल्याने त्यांच्या बादफेरीच्या आशा धूसर झाल्या आहेत. |
इंग्लंड सर्व बाद ५२१; हरयाणा ४ बाद १७२ दुसऱ्या दिवशी ११ फलंदाज तंबूत इंग्लंड-हरयाणा क्रिकेट सराव सामना वृत्तसंस्था, अहमदाबाद
इंग्लंड आणि हरयाणा यांच्यातील सराव सामन्याचा दुसरा दिवस गोलंदाजांनी ११ फलंदाजाना बाद करत गाजवला. हरयाणाच्या गोलंदाजांनी उपाहारापूर्वीच इंग्लंडच्या संघाला तंबूचा रस्ता दाखवला. इंग्लंडच्या धावांचा पाठलाग करताना हरयाणाला दिवसअखेर चार फलंदाज गमावत १७२ धावा करता आल्या. दुसऱ्या दिवशी समित पटेल आणि हरयाणाच्या सन्नी सिंग व राहुल दिवान यांना अर्धशतके पूर्ण करता आली असली तरी एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नाही. |
पी.टी.आय., भुवनेश्वर
खेळात मिळणाऱ्या यशाने हुरळून न जाता खेळ आणि तंदुरुस्ती याबाबतीत आता क्रीडा संस्कृती रुजवण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केले.‘‘छोटय़ा यशानेही आपण समाधानी असतो. अव्वल खेळाडूंनी त्यांच्या वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर हे यश मिळवलेले असते. मात्र त्यांच्या यशात अनेकांची मेहनत दडलेली असते. |
दक्षिण आफ्रिका २ बाद २५५ ब्रिस्बेन, पी.टी.आय.
अव्वल क्रमांकाच्या लढाईसाठी एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या उत्कंठावर्धक पहिल्या सामन्याचा पहिला दिवस गाजवला तो दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी. पहिला धक्का लवकर बसल्यावर अलव्हिरो पीटरसनचे अर्धशतक आणि हशिम अमला व जॅक कॅलिस या भरवशाच्या फलंदाजांनी शतकाकडे कूच केली. या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसअखेर २ बाद २५५ अशी मजल मारली आहे. |
क्रीडा प्रतिनिधी,मुंबई
राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी आपला मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून मुंबई उच्च न्यायालयाने प्राजक्ता सावंतच्या बाजूने निकाल दिल्याच्या दोन दिवसांनंतर दुहेरीतील अव्वल बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टा हिनेही प्राजक्ताच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे ठरवले आहे. हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय निवड शिबिरासाठी उपस्थित राहण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने प्राजक्ताला परवानगी दिली आहे. |
भारतीय ऑलिम्पिक महासंघ निवडणूक पी.टी.आय., नवी दिल्ली
भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षपदासाठी अभयसिंग चौताला व रणधीरसिंग यांच्यातील चुरस वाढली आहे. दोन्ही संघटकांना विविध संघटनांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे. ही निवडणूक २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. चौताला यांना भारतीय वुशु महासंघाचे सरचिटणीस मनीष कक्कर, टेबल टेनिस महासंघाचे सरचिटणीस धनराज चौधरी, मॉडर्न पेन्टॅथलॉन महासंघाचे सरचिटणीस नामदेव शिरगांवकर, नेटबॉल महासंघाचे अध्यक्ष वागेश पाठक, जिम्नॅस्टिक्स महासंघाचे अध्यक्ष जसपालसिंग कंधारी यांनी पाठिंबा दिला आहे. |
कानिटकर, सक्सेनाची शतके राजस्थान २ बाद २६९ वृत्तसंस्था, जयपूर फारशा अनुभव नसलेल्या मुंबईसंघाविरुद्ध खेळताना राजस्थानने पहिल्या दिवशी दमदार फलंदाजी केली. सलामीवीर विनीत सक्सेना आणि ऋषीकेश कानिटकर यांनी शतके झळकावत आपल्या घरच्या मैदानात पहिल्या दिवसअखेर २ बाद २६९ अशी मजल मारली. |
आरसीएफ कबड्डी स्पर्धा क्रीडा प्रतिनिधी, मुंबई मुंबईच्या पश्चिम आणि मध्य रेल्वे संघांनी आरसीएफ अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. पश्चिम रेल्वेने यजमान राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्सचा २२-१० असा सहज पाडाव केला, तर मध्य रेल्वेने आपल्या भक्कम बचावाच्या आधारे देना बँकेला ६-५ असे हरवले. |
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा क्रीडा प्रतिनिधी, पुणे केदार जाधव याने केलेले नाबाद शतक तसेच हर्षद खडीवाले, संग्राम अतितकर व अंकित बावणे यांची दमदार अर्धशतके यामुळेच महाराष्ट्राने उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात भक्कम सुरुवात केली. पहिल्या दिवसअखेर महाराष्ट्राने पहिल्या डावात ३ बाद ३३९ धावा केल्या. |
एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स पी.टी.आय., लंडन भारताच्या महेश भूपती आणि रोहन बोपण्णा यांनी गतविजेत्या मॅक्स मिर्नी व डॅनियल नेस्टोर जोडीचा पराभव करून उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. पाचव्या मानांकित भूपती-बोपण्णा जोडीने ‘ब’ गटातील अटीतटीच्या लढतीमध्ये मिर्नी-नेस्टोर जोडीला ७-६(५), ६-७(५) आणि १०-५ असे पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. |
भारतीय तिरंदाजी महासंघ निवडणूक नवी दिल्ली, पी.टी.आय. भारतीय तिरंदाजी महासंघाच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांची फेरनिवड झाली. भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे प्रभारी अध्यक्ष असलेल्या मल्होत्रा यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी बी.व्ही.पी.राव यांचा ७२-२० असा दणदणीत पराभव केला. |
पी.टी.आय., नवी दिल्ली
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेची उत्सुकता तमाम क्रिकेटविश्वाला लागली आहे. फिरकीच्या जाळ्यात भारत इंग्लंडला पकडणार की इंग्लंड भारतातल्या मालिका पराभवाचा उपवास सोडणार, याची उत्कंठा साऱ्यांनाच असेल. इंग्लंडविरुद्ध पहिलेवहिले शतक झळकावणारा आणि भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘ही मालिका निकराची होणार असली तरी हा एक नवीन अध्याय असेल’, असे मत व्यक्त केले आहे. |
एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धा पी.टी.आय., लंडन
तिसऱ्या मानांकित लिएण्डर पेस आणि रॅडीक स्टेपानेक जोडीने बारक्लेस एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पेस-स्टेपानेक यांनी ‘अ’ गटातील आपला दुसरा सामना जिंकताना मार्सेल ग्रॅनोल्लर्स आणि मार्क लोपेझ या स्पेनच्या जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव केला. भारत-चेक प्रजासत्ताक जोडगोळीने फक्त ३२ मिनिटांत ७-५, ६-४ असा सहज पराभव केला. |
चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा ए.एफ.पी., पॅरिस
मँचेस्टर युनायटेडने पिछाडीवरून मुसंडी मारत ब्रागा संघाचा ३-१ असा पराभव करून चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली आहे. गटात अव्वल स्थान राखण्याबरोबरच स्पर्धेच्या बाद फेरीत मजल मारणारा युनायटेड हा तिसरा संघ ठरला आहे. चार वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या बार्सिलोना संघाला मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला. सेल्टिक फुटबॉल क्लबने बार्सिलोनाचे आव्हान २-१ असे परतवून लावत सर्वाची वाहवा मिळवली. |
सराव सामन्यात पीटरसनचे झंझावाती शतक इंग्लंडची ३ बाद ४०८ अशी दमदार मजल पी.टी.आय., अहमदाबाद
अखेरच्या सराव सामन्याचा पुरेपूर फायदा इंग्लंडच्या फलंदाजांनी उठवत पहिल्याच दिवशी तीन फलंदाज गमावत ४०८ धावांचा डोंगर उभारला. केव्हिन पीटरसनने झंझावाती फलंदाजी करीत तडफदार नाबाद शतक ठोकले.पीटरसनने हरयाणाच्या गोलंदाजांची त्रेधा उडवली, तर कर्णधार अॅलिस्टर कुक, सलामीवीर निक कॉम्प्टन आणि इयान बेल यांनीही गोलंदाजीवर हात साफ करीत अर्धशतके फटकावली. |
येती आरसीएफ स्पर्धा उपनगरातर्फे! वि. वि. करमरकर
कबड्डी क्षेत्रातील आमदार भाई जगताप यांच्या वाढत्या घुसखोरीला अखेर चाप बसलाय! तोही आरसीफएच्या निमंत्रितांच्या अखिल भारतीय कबड्डीच्या उद्घाटनात अन् सुमारे सातशे-आठशे प्रेक्षकांच्या साक्षीने!आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील, आपल्या हद्दीबाहेरील राकेफ ऊर्फ राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर्स ऊर्फ आरसीएफच्या मैदानात या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भाई जगताप यांनी मुंबई उपनगरच्या हद्दीत घुसखोरी केली. |
नवी दिल्ली : ‘‘हा खटला प्रदिर्घकाळ चालला आणि तो वेदनादायी होता. आम्ही ११ वष्रे न्यायालयाशी लढलो. या खटल्यामध्ये अनेकदा स्थगिती आणि बदल झाले. पण अखेर निकाल सकारात्मक लागला. न्यायालयाने माझ्यावरील आजीवन बंदी उठवल्याचा अत्यंत आनंद होतो आहे,’’ असे मोहम्मद अझरुद्दीनने सांगितले. |
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनवरील बंदी उठवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोणतेही भाष्य व्यक्त करण्याचे टाळले आहे.कोणतीही भूमिका घेण्यापूर्वी आम्ही न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करू, असे धोरण बीसीसीआयने स्वीकारले आहे. |
पी.टी.आय., नवी दिल्ली हॉकी इंडियाच्या बहुचर्चित हॉकी इंडिया लीगसाठी खेळाडूंचा लिलाव १ डिसेंबरला नवी दिल्लीत होणार आहे. ‘‘आजपर्यंत हॉकीतील कोणत्याही लीग स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव करण्यात आलेला नाही. सर्वोत्तम खेळाडू निवडण्यासाठी सहा फ्रॅन्चायझींना संधी मिळणार आहे,’’ असे हॉकी इंडियाचे महासचिव नरिंदर बात्रा यांनी सांगितले. |
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई युवा बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतने केलेल्या कथित आरोपांप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी नकार दिला. यासंदर्भात भारतीय बॅडमिंटन संघटना आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण निर्णय घेईल, असे त्यांनी पुढे सांगितले. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|