|
क्रीडा
सचिन, झहीर, रोहित, रहाणे यांच्या समावेशामुळे मुंबईचे पारडे जड क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
नवा हंगाम, नवी आव्हाने आणि नवे स्वरूप आदी वैशिष्टय़ांसह शुक्रवारपासून देशभरात रणजी क्रिकेट स्पध्रेला प्रारंभ होत आहे. इंग्लंडविरुद्धची चार कसोटी सामन्यांची मालिका येत्या दोन आठवडय़ांत सुरू होत असल्यामुळे कप्तान महेंद्रसिंग धोनी वगळता भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गज मंडळी यंदा रणजीमध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहेत. वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग यांच्यासह क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणारा व्ही. व्ही. एस. लक्ष्मणही पॅड बांधून तयार आहे. |
तज्ज्ञांचे मत ए.एफ.पी., लुसान
प्रतिष्ठेच्या टूर डी फ्रान्स सायकल शर्यतीत पटकावलेली सात जेतेपदे काढून घेतानाच महान सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँग याच्यावर उत्तेजके घेतल्यामुळे टाकण्यात आलेल्या आजीवन बंदीमुळे उत्तेजकविरोधी कायद्याचे उल्लंघन करण्यात आले, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अनेक क्रीडा कायदातज्ज्ञांच्या मते, ‘‘अमेरिका उत्तेजकविरोधी संस्थेने सादर केलेल्या अहवालानंतर आर्मस्ट्राँगच्या उत्तेजकांचे भीषण वास्तव सर्वासमोर आले असले तरी जागतिक सायकलिंग महासंघाने त्याला केलेली शिक्षा ही उत्तेजकविरोधी कायद्याला धरून नाही.’’ |
मी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार- रहाणे |
|
|
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
क्रमवारीत कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करायला तयार असल्याचे मुंबईकर अजिंक्य रहाणेने स्पष्ट केले. विशिष्ट क्रमांकावरच फलंदाजी करायची आहे असा माझा हट्ट नाही, त्यामुळे संघाच्या योजनेनुसार फलंदाजी करायला आवडेल असे त्याने सांगितले. धावा करणे हे माझे काम आहे. इंग्लंडविरुद्ध सराव सामन्यात पहिल्या डावात फारशी चमक न दाखवणाऱ्या रहाणेने दुसऱ्या डावात मात्र अर्धशतक झळकावले होते. |
क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांचे सूतोवाच क्रीडा प्रतिनिधी, मुंबई राज्य सरकार मुंबई हॉकी असोसिएशनच्या हॉकी स्टेडियमबाबत कोणता निर्णय घेते, याकडे माजी हॉकीपटू, मुंबई हॉकी असोसिएशनचे (एमएचए) विद्यमान पदाधिकारी आणि हॉकी महाराष्ट्राचे महासचिव कमांडर केहार सिंग यांचे लक्ष लागले असतानाच आता राज्य सरकार एमएचए चालवणार असल्याचे सूतोवाच राज्याचे क्रीडा आणि युवा संचालनालय मंत्री पद्माकर वळवी यांनी दिले. |
पी.टी.आय., नवी दिल्ली
ट्वेन्टी-२० प्रकारातून निवृत्ती स्वीकारण्याचा कोणताही विचार नसल्याचे सेहवागने स्पष्ट केले. हे वृत्त चुकीचे आहे, ट्वेन्टी-२० प्रकारातून निवृत्ती स्वीकारायची आहे असे कोणतेही पत्र मी बोर्डाला सादर केलेले नसल्याचेही त्याने सांगितले. ‘कोणताही ठोस आधार नसलेली बातमी.. कोणत्याही प्रकारच्या सामन्यातून मला निवृत्ती हवी आहे अशी विनंती मी कधीही केलेली नाही.. तयारी झाली आहे आणि मैदानावर उतरण्यासाठी मी आतुर झालो आहे’ असे सेहवागने आपल्या ट्विटर प्रोफाइलवर म्हटले आहे. |
लखनौ : लंडन ऑलिम्पिकमधील पदकविजेत्या खेळाडूंचा सहारातर्फे सत्कार करण्यात आला. रौप्यपदक विजेत्यांना प्रत्येकी ३ किलोच्या सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. कांस्यपदकप्राप्त खेळाडूंना प्रत्येकी २ किलोच्या सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. |
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
कसोटी पदार्पणासाठी मी प्रचंड मेहनत घेत आहे. काही गोष्टी माझ्या हातात नसतात, त्याबाबत मी काही करू शकत नाही. माझ्यापरीने जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे मी घेत आहे. माझे कौशल्य सिद्ध करण्यासाठी रेल्वेविरुद्धचा सामना ही उत्तम संधी आहे. या सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शन करत निवड समिती आणि चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल. हंगामाची सुरुवात चांगल्या खेळीने करायची आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव महत्त्वाचा असतो. सकारात्मक मनोवृत्तीने मैदानात उतरण्याचा निश्चय केला आहे. |
नवी दिल्ली : रामोन आणि डेव्हिड या स्पेनच्या प्रसिद्ध फुटबॉलपटू बंधू जोडीला हॉकी इंडिया लीगच्या लिलावात सामील करण्यात आले आहे. ३१ वर्षीय रामोनने लंडन ऑलिम्पिकमध्ये स्पेनचे नेतृत्व केले होते. त्याच्या नावावर २३७ सामने आहेत. तीन ऑलिम्पिकमध्ये रामोन स्पेन संघाचा भाग होता.
|
नवी दिल्ली, पी.टी.आय.
कर्करोगाची लढाई जिंकून मैदानात परतलेल्या आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याचे स्वप्न भारताचा लाडका डावखुरा फलंदाज युवराज सिंग पाहात आहे, पण त्याचे हे स्वप्न बेचिराख होऊ शकते, असा सूचक इशारा भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने चाणाक्षपणे दिला आहे. युवराज चांगली फलंदाजी करत असला तरी तो दोन दिवस क्षेत्ररक्षण करू शकतो का, हा मुद्दा मांडत धोनीने युवराजच्या कसोटी पुनरागमनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून धोनी आणि त्याचे चाणाक्ष राजकारण पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आले आहे.
|
पी.टी.आय., नवी दिल्ली
हरभजन सिंगला यापुढेही आपल्या ताफ्यात ठेवण्याचा निर्णय मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने घेतला आहे. या निर्णयामुळे हरभजन सिंगला मुंबई इंडियन्स व्यवस्थापन डच्चू देणार या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्स पुढच्या आयपीएल हंगामासाठी काही खेळाडूंना डच्चू देणार आहे. मात्र या खेळाडूंच्या यादीत हरभजनचे नाव नाही.हरभजनचा ढासळता फॉर्म आणि वाढते वय यामुळे मुंबई इंडियन्स येत्या हंगामासाठी त्याचा विचार करणार नाही अशा अफवांना ऊत आला होता. |
आशिया क्रिकेट चषकाला भारतीय महिलांची गवसणी पी.टी.आय., गुआंगझाऊ
ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताच्या पुरुषांच्या संघाला आपली छाप पाडता आली नसली तरी महिलांनी मात्र आशिया चषक ट्वेन्टी-२० चषकाला गवसणी घालत देशवासीयांना छनशी भेट दिली आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला १८ धावांनी पराभूत करत भारतीय महिलांनी विजयाचा सुवर्णाध्याय लिहिला. भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांना ८१ धावाच करता आल्यावर त्यांनी आपल्या पायावर धोंडा मारून घेतल्याचे काही जणांना वाटले. पण अचूक आणि भेदक मारा करत त्यांनी पाकिस्तानच्या संघाला ६३ धावांत गुंडाळत आशिया चषकावर भारताचे नाव कोरले. |
पुढच्या मोसमात सौबरसाठी खेळणार पी.टी.आय., नवी दिल्ली
शर्यतपटू निको हल्केनबर्ग फोर्स इंडियाची साथ सोडणार, पुढच्या हंगामात सौबरसाठी खेळणार, अशा उलटसुलट चर्चाना उधाण आले होते. अखेर बुधवारी निकोच्या फोर्स इंडियाला अलविदा करण्यावर शिक्कामोर्तब झाले. अपेक्षेप्रमाणेच पुढच्या हंगामात तो सौबर संघाचा सदस्य असणार आहे. यासंदर्भात सौबरने अधिकृत घोषणा केली. २५ वर्षीय जर्मन निकोने २०१० मध्ये फॉम्र्युला वनमध्ये पदार्पण केले. सुरुवातीला विल्यम्स संघाचा सदस्य असणाऱ्या निकोने पहिल्याच वर्षी पोल पोझिशन पटकावली होती. २०११ मध्ये निकोने फोर्स इंडिया संघात राखीव शर्यतपटू म्हणून दाखल झाला होता. या वर्षी निकोची आड्रियन सुटिलच्या जागी मुख्य शर्यतपटू म्हणून नियुक्ती झाली होती. |
मुंबई : मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे इंग्लंडचा सहा फूट, सात इंच उंचीचा वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिन सध्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या सराव सामन्यात खेळू शकणार नाही, हे बुधवारी सकाळीच स्पष्ट करण्यात आले. १५ नोव्हेंबरपासून अहमदाबादला प्रारंभ होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पाश्र्वभूमीवर फिनच्या दुखापतीमुळे इंग्लंडच्या कॅम्पमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी भारत ‘अ’ संघाविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना पहिल्याच सत्रात फिनला दुखापत झाली आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. मिडलसेक्सच्या २३ वर्षीय फिनने चारच षटके गोलंदाजी केली होती. |
पी.टी.आय., लंडन
आर्सेनेलने लीग चषकात चार गोलने पिछाडीवर पडल्यानंतरही जबरदस्त पुनरागमन करत रीडिंगवर ७-५ने मात केली. थिओ वॉलकॉट या विजयाचा शिल्पकार ठरला. ९५व्या मिनिटाला वॉलकॉटने गोल केला आणि बरोबरी झाली. अतिरिक्त वेळेत वॉलकॉटने निर्णायक गोल करत आर्सेनेलला शानदार विजय मिळवून दिला. आर्सेनेलचे व्यवस्थापक वेंजर यांनी क्वीन्स पार्क रेंजर्सविरुद्ध आर्सेनेलचा संघ पूर्णत: बदलला. रीडिंगने मध्यंतरापर्यंत वर्चस्व गाजवले. जेसन रॉबर्ट्स, लॉरेन्ट कोसेन्ली, मिकेली लेइगर्टवूड, नोएल हंट यांनी प्रत्येकी एक गोल केल्याने मध्यंतराला रीडिंगकडे ४-० अशी आघाडी होती. |
* भारतीय ‘अ’ संघाच्या ३६९ धावसंख्येला इंग्लंडचे ४ बाद २८६ असे प्रत्युत्तर * कर्णधार अॅलिस्टर कुकने साकारले नाबाद शतक * जोनाथन ट्रॉट, समित पटेलची अर्धशतके प्रशांत केणी, मुंबई
अॅन्ड्रय़ू स्ट्रॉसच्या साथीनेच अॅलिस्टर कुकने सुमारे सहा वष्रे इंग्लंडच्या सलामीची धुरा वाहिली. स्ट्रॉसकडून त्याने नेतृत्वाचे धडेही गिरवले. त्यामुळेच स्ट्रॉसच्या निवृत्तीनंतर कर्णधारपदाची धुरा आपसूकच कुककडे सोपविण्यात आली. आता भारताविरुद्धची चार कसोटी सामन्यांची मालिका हा कुकसाठीचा पहिला कठीण पेपर, पण हा पेपर सोडविण्यासाठी आपली चांगलीच पूर्वतयारी झाली आहे, असा इशारा कुकने आपल्या शानदार नाबाद शतकानिशी दिला. कुकने समित पटेलच्या साथीने पाचव्या विकेटसाठी नाबाद १५३ धावांची भागीदारी रचून इंग्लंडला सुस्थितीत नेले. पहिल्या सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने भारताच्या पहिल्या डावातील ३६९ धावसंख्येला प्रत्युत्तर देताना ४ बाद २८६ अशी मजल मारली होती.
|
राष्ट्रीय कनिष्ठ अॅथलेटीक्स स्पर्धा प्रतिनिधी, नाशिक
‘गोल्डन गर्ल’ अंजना ठमके, संजीवनी जाधव आणि किसन तडवी या नाशिकच्या युवा धावपटूंनी लखनौ येथे सुरू असलेल्या २८ व्या अखिल भारतीय कनिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचा शेवटचा दिवस गाजविला. अंजनाने पुन्हा एकदा आपल्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तिची आणि याआधी ६०० मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या नाशिकच्याच दुर्गा देवरेची ‘सर्वोत्कृष्ठ खेळाडू’ म्हणून निवड झाली आहे. |
प्रसाद लाड, मुंबई लुधियानामध्ये शुक्रवारपासून (२ नोव्हेंबर) रंगणाऱ्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत पाकिस्तानच्या शरीरसौष्ठपटूंना आणण्यासाठी भारतीय शरीरसौष्ठव महासंघ प्रयत्नशील आहे. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना गृह मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर शरीरसौष्ठवपटूंनाही भारतातील स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात यावी, अशी भावना दर्दी शरीरसौष्ठव चाहत्यांच्या मनात आहे. |
पी.टी.आय., कोलकाता अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आलेल्या बलदीपसिंगला युनायटेड स्पोर्ट्स क्लबने डच्चू दिला आहे. मात्र या आरोपाखाली संशयित असलेला जगप्रीतसिंग याची मात्र ईस्ट बंगाल संघाने पाठराखण केली आहे. बलदीपसिंग व जगदीपसिंग यांच्याबरोबरच ईस्ट बंगालचा माजी खेळाडू जसपाल परमार व त्याचा आचारी रवीसिंग यांच्याविरुद्ध येथील उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. |
लंडन : न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ख्रिस केर्न्स याने दाखल केलेल्या अब्रूनुकसान भरपाईच्या खटल्यात ललित मोदी यांनी केलेले अपील येथील न्यायालयाने फेटाळले असून, मोदी यांनी केर्न्सला ९० हजार युरो त्वरित द्यावेत असा निकाल दिला आहे. केर्न्स हा मॅचफिक्सिंगमध्ये गुंतला असल्याचा आरोप ललित मोदी यांनी केला होता. या आरोपांना आव्हान देत केर्न्सने येथे न्यायालयात याचिका दाखल केली होती. |
पी.टी.आय., नवी दिल्ली
मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेली भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका येत्या डिसेंबरमध्ये खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला असून पाकिस्तान क्रिकेट संघाला भारत दौऱ्यावर कडेकोट सुरक्षाव्यवस्था पुरवली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे केवळ आशिया खंडातच नव्हे तर अवघ्या क्रिकेटविश्वाची उत्कंठा वाढवणाऱ्या भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पध्र्यामधील सामन्यांचा थरार अनुभवण्यास मिळणार आहे. इंग्लंड क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यादरम्यान येणाऱ्या विश्रांतीकाळात पाकिस्तान संघ भारताच्या दौऱ्यावर येईल.
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
|
‘लोकसत्ता’चे विविध अॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-
 
वासाचा पयला पाऊस आयला
साप्ताहिक पुरवणी
लोकरंग (दर रविवारी)
चतुरंग (दर शनिवारी)
वास्तुरंग (दर शनिवारी)
व्हिवा (दर शुक्रवारी
करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)
अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)
|