क्रीडा
मुखपृष्ठ >> क्रीडा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

क्रीडा
तिवारी की सवारी! Print E-mail

भारत  ‘अ’ संघाची ९ बाद ३६९ अशी दमदार मजल
मनोज तिवारीचे शतक सात धावांनी हुकलेअभिनव मुकुंद आणि युवराज सिंग यांची अर्धशतके
प्रशांत केणी, मुंबई

गतवर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध चेन्नईमधील एकदिवसीय सामन्यात मनोज तिवारीने नाबाद शतक झळकावले होते. या शतकानंतरही तब्बल १४ सामने त्याला ‘राखीव’ म्हणून भूमिका पार पाडावी लागली होती. ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठीही तिवारीचा भारतीय संघात समावेश होता. परंतु श्रीलंकेत भारतीय फलंदाजी अपयशी होत असतानाही बंगालचा तिवारी अंतिम संघात एकदाही स्थान मिळवू शकला नाही. आता पाहुण्या इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ निवड करण्याकरिता भारतीय निवड समिती पुढील सोमवारी बैठक घेणार आहे. परंतु तिवारीने आपल्या शानदार सवारीमय खेळीने निवड समितीचे दरवाजे ठोठावले आहेत.
 
मायदेशात खेळपट्टय़ांचा फायदा घेण्यात गैर काहीच नाही - अमरे Print E-mail

प्रसाद लाड, मुंबई

आपण जेव्हा इंग्लंडला जातो तेव्हा आपल्याला योग्य अशा खेळपटय़ा दिल्या जात नाहीत. ही उपक्रम प्रत्येक देश राबवत असतो आणि आपल्या देशातील खेळपटय़ांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी तर इंग्लंडचा एक बलाढय़ संघ समोर आहे आणि त्यांना पराभूत करायचे आहे, त्यामुळे आपल्या देशातील खेळपटय़ांचा फायदा घेण्यात काहीही गैर नाही. मी १९९२-९३ संघाचा सदस्य होतो, तेव्हा आपण त्यांना त्यांच्या देशात ३-० असं पराभूत केलं होतं. त्यामुळे इंग्लंडवर जेवढा दबाव आणि खेळपटय़ांचा फायदा घेता येईल, ते महत्वाचं आहे.
 
पीटरसन आपल्या खेळानेच उत्तर देईल -व्हिव्ह रिचर्ड्स Print E-mail

पी.टी.आय., लंडन

काही वर्षांपूर्वी जगविख्यात बॉक्सिंगपटू मोहम्मद अलीवर जोरदार टीका होत होती, पण त्याने त्याकडे लक्ष न देता आपल्या खेळानेच त्यांना उत्तर दिले होते. अलीसारखीच अतुलनीय गुणवत्ता इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज केविन पीटरसनकडे आहे आणि तो टीकाकारांना आपल्या खेळानेच चोख उत्तर देईल, असे मत वेस्ट इंडिजचे महान फलंदाज सर व्हिव्ह रिचर्ड्स यांनी व्यक्त केले आहे.
रिचर्ड्स यांनी भारतामध्ये १९७०-८० या कालावधीत सात कसोटी सामने जिंकले होते. एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ते प्रसिद्ध होते, तर आता क्रिकेटतज्ज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांना मोहम्मद अली आणि पीटरसन यांच्यातील काही गुण सारखेच असल्याचे जाणवले आहे.
 
मी गोलांसाठी भुकेलेला नाही - मेस्सी Print E-mail

पी.टी.आय., माद्रिद

कोणत्याही सामन्यात मी किती गोल करतो यापेक्षाही संघास कसे गोल करता येतील हेच माझे मुख्य ध्येय असते. वैयक्तिक गोल करण्यासाठी मी भुकेलेला नाही असे बार्सिलोना फुटबॉल क्लबचा अव्वल दर्जाचा खेळाडू लिओनेल मेस्सी याने सांगितले. नुकताच त्याला गोल्डन बूट पुरस्कार मिळाला आहे. मेस्सी याने गेल्या मोसमात गोलांचे अर्धशतक नोंदविले होते. गोल्डन बूट पुरस्काराबद्दल तो म्हणाला, हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायक आहे. सतत मी गोल करण्यासाठी भुकेलेला नसतो. ज्या संघाकडून मी खेळत असतो, त्या संघास कसे गोल करता येतील यावरच माझा भर असतो. माझ्या सहकाऱ्यांना गोल करण्याच्या संधी निर्माण करून देण्यास मी प्राधान्य देतो.
 
एकदिवसीय क्रमवारीचे अव्वल स्थान हेच साऱ्यांचेच लक्ष्य Print E-mail

पी.टी.आय., दुबई
क्रिकेटच्या मोसमाला सुरुवात झाली असून आठही अव्वल संघांचे लक्ष्य एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्याचेच असेल. गेल्या काही दिवसांपूर्वी तिन्ही क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांक पटकावत दक्षिण आफ्रिकेने एक नवा विक्रम केला होता, पण सध्याच्या घडीला मात्र इंग्लंडने त्यांच्याशी बरोबरी केल्याचे दिसते आहे.

 
पुणे वॉरियर्स जेसी रायडरला डच्चू देणार? Print E-mail

पी.टी.आय., नवी दिल्ली
न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज जेसी रायडर याला पुणे वॉरियर्स करारमुक्त करणार असून, यंदाच्या आयपीएलकरिता तो नव्याने लिलावासाठी उपलब्ध होणार असल्याचे समजते. दिल्ली डेअरडेव्हिल्सही रॉबिन बिश्त या खेळाडूला करारातून मुक्त करणार असल्याचे समजते.

 
महाराष्ट्राच्या कर्णधारपदी विशांत मोरे Print E-mail

सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी, पुणे
ओडिशाविरुद्ध होणाऱ्या सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या २५ वर्षांखालील संघाचे नेतृत्व यष्टिरक्षक विशांत मोरे याच्याकडे सोपविण्यात आले आहे. हा सामना मालवण येथे २ ते ५ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी हा संघ जाहीर केला.

 
संक्षिप्त : ला लिगा फुटबॉल : रिअल माद्रिदचा दिमाखदार विजय Print E-mail

माद्रिद : गोन्झालो हिग्वेन आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या प्रत्येकी दोन गोलांच्या जोरावर रिअल माद्रिदने मार्लोकावर ५-० असा शानदार विजय मिळवला. रोनाल्डोनो सलग आठव्या सामन्यामध्ये गोल झळकावण्याची किमया केली.  हिग्वेनने आठव्या मिनिटाला गोल करत दणक्यात सुरुवात केली. रोनाल्डोने २२व्या मिनिटाला गोल करत रिअलची आघाडी वाढवली.

 
भारतीय दौरा आव्हानात्मक - कुक Print E-mail

 

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई

जवळपास तीस वर्षांपासून आम्हाला एकही मालिका भारतात जिंकता आलेली नाही, त्यामुळे भारतीय दौरा हे आमच्यासाठी फार मोठे आव्हान असेल, असे भारतात दाखल झालेला इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक याने सांगितले. इतिहास पाहिला तर भारतीय दौरा आमच्यासाठी फार मोठे आव्हान असणार आहे. आशियाई देशांमध्ये मालिका जिंकणे हे आम्हाला नेहमीच कठीण गेलेले आहे. त्यामुळे पहिल्या तीन सराव सामन्यांमध्ये वातावरणाशी जुवळून घेण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे कुकने पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

 
फॉम्र्युला-फन! Print E-mail

तुषार वैती - मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

फॉभारतासारख्या क्रिकेटवेडय़ा देशात अन्य खेळांना म्हणावी तितकी लोकप्रियता मिळत नाही, हे तितकेच सत्य आहे. टीव्हीवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या आणि जगभरात अन्य खेळांच्या तुलनेने सर्वाधिक चाहतावर्ग असलेल्या फॉम्र्युला-वनच्या बाबतीतही भारतात तेच घडत आहे. गेल्या वर्षी इंडियन ग्रां. प्रि.च्या यशस्वी पदार्पणानंतर भारतात फॉम्र्युला-वन हा खेळ मोठी भरारी घेईल, असे वाटले होते. पण प्रत्यक्षात तसे घडलेच नाही. तिकिटांचे दर कमी करूनही फॉम्र्युला-वनला गेल्या वर्षीच्या तुलनेत मिळालेला कमी प्रतिसाद, यावरून फॉम्र्युला-वनची लोकप्रियता वाढली की घटली, याची कारणे आता शोधावी लागणार आहेत.
 
सिडनी सिक्सर्सला जेतेपद Print E-mail

चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धा
पी.टी.आय., जाहोन्सबर्ग

मायकेल लम्बने आठ चौकार आणि पाच चौकारांसह ४२ चेंडूंत साकारलेल्या नाबाद ८२ धावांच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर सिडनी सिक्सर्सने लायन्स संघावर १० विकेट आणि ४५ चेंडू राखून आरामात विजय मिळवित चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेचे जेतेपद पटकावले. लम्बने ब्रॅड हॅडिन(नाबाद ३७) सोबत महत्त्वपूर्ण भागीदारी रचत हा विजय साकारला.

 
आयपीएलसह क्रिकेटला गांगुलीचा रामराम Print E-mail

पी.टी.आय., कोलकाता

शाहरुख खानची कोलकाता नाइट रायडर्स आणि त्यानंतर सहाराच्या पुणे वॉरिअर्ससाठी मुशाफिरी केल्यानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आयपीएलला (इंडियन प्रीमिअर लीग) रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा मार्ग पत्करला आहे. चार वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला दादा बंगालसाठी आणि आयपीएलमध्ये खेळत होता.
आयपीएलचा सहावा हंगाम संपेल तेव्हा मी ४१ वर्षांचा होईन. ट्वेन्टी-२० हे अतिशय आव्हानात्मक प्रकार आहे.
 
पंकज अडवाणी सातव्यांदा विश्वविजेता Print E-mail

पी.टी.आय., लीड्स

भारताच्या पंकज अडवाणी याने सातव्यांदा बिलियर्ड्सच्या विश्वचषकावर आपले नाव कोरले. त्याने जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत इंग्लंडच्या माईक रसेल याच्यावर १८९५-१२१६ असा मोठय़ा फरकाने विजय मिळविला. पंकजने रसेलविरुद्धच्या लढतीत सुरुवातीला १४७ गुणांचा ब्रेक नोंदवित शानदार प्रारंभ केला. पाच तासांच्या या लढतीत त्याने २९८ गुणांचा ब्रेक केला. पंकजपेक्षा अनुभवाने वरचढ असलेल्या रसेलने ३९७ गुणांचा विक्रमी ब्रेक करीत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. तथापि पंकजने पहिल्या टप्प्यातच १३१ व ९२ असे आणखी उल्लेखनीय ब्रेक करीत आघाडी बळकट केली. दुसऱ्या टप्प्यात पंकजने सुरुवातीला १२८, ९४ व १०८ असे तीन उल्लेखनीय ब्रेक नोंदवित आपली आघाडी कायम राखली.
 
इंग्लंडपुढे आव्हान भारतीय युवा सेनेचे Print E-mail

पहिला सराव सामना आजपासून
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
२७ वर्षे भारतीय मातीत विजय मिळवता आला नसला, तरी ‘छोडो कल की बातें’ म्हणत अ‍ॅलिस्टर कुकचा इंग्लंडचा संघ भारतात दाखल झाला असून मंगळवारपासून सुरू होणाऱ्या सराव सामन्याने त्यांची या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली भारतीय ‘अ’ संघ सज्ज झाला असून इंग्लंडपुढे आव्हान असेल ते या युवा सेनेचे.

 
इंग्लडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी सोमवारी निवड Print E-mail

पी.टी.आय., नवी दिल्ली
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड ५ नोव्हेंबरला मुंबईमध्ये करण्यात येईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) सोमवारी कळविण्यात आले. ५ नोव्हेंबरला संपूर्ण निवड समिती मुंबईच्या क्रिकेट कार्यालयात भेटणार आहेत.

 
संक्षिप्त : ला लिगा फुटबॉल : रिअल माद्रिदचा दिमाखदार विजय Print E-mail

माद्रिद : गोन्झालो हिग्वेन आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या प्रत्येकी दोन गोलांच्या जोरावर रिअल माद्रिदने मार्लोकावर ५-० असा शानदार विजय मिळवला. रोनाल्डोनो सलग आठव्या सामन्यामध्ये गोल झळकावण्याची किमया केली.  हिग्वेनने आठव्या मिनिटाला गोल करत दणक्यात सुरुवात केली.

 
वेटेलराज! Print E-mail

*  वेटेलचा जेतेपदाचा चौकार
*  अलोन्सोला मागे टाकून विश्वविजेतेपदाकडे कूच
तुषार वैती, नोएडा, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२

सॅबेस्टियन वेटेलने सुरुवातीपासूनच शर्यतीवर राखलेली हुकूमत.. फर्नाडो अलोन्सो, मार्क वेबर यांच्यात रंगलेली ‘काँटे की टक्कर’.. अपघातांचा सिलसिला.. फोर्स इंडियाने अव्वल दहा जणांत मिळविलेले स्थान.. नरेन कार्तिकेयनने केलेली निराशा.. यामुळे इंडियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीचा दुसरा मोसम गाजला. वेटेलने अपेक्षेप्रमाणे जेतेपद पटकावून विजेतेपदाचा चौकार लगावला आणि फेरारीचा प्रतिस्पर्धी फर्नाडो अलोन्सो याला मागे टाकून विश्वविजेतेपदाच्या दिशेने कूच केली.

 
आठवडय़ाची मुलाखत : मुंबईला हवं फक्त जेतेपदच! Print E-mail

सुलक्षण कुलकर्णी
मुंबई क्रिकेट संघाचे प्रशिक्षक

प्रशांत केणी, मुंबई
विक्रमी ४०वे अजिंक्यपद जिंकण्याच्या निर्धाराने मुंबईचा संघ २ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेसाठी सज्ज होत आहे. गतवर्षीपर्यंत चालत आलेल्या एलिट आणि प्लेट गटाला रजा देऊन यंदाच्या वर्षीपासून रणजी करंडक स्पर्धा नव्या स्वरूपात अस्तित्वात येत आहे. माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी प्रशिक्षकपद सोडल्यानंतर माजी फलंदाज आणि यष्टीरक्षक सुलक्षण कुलकर्णी यांच्याकडे गेल्या वर्षी मुंबईच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपविण्यात आली.
 
सायनाने विजेतेपदाची संधी गमावली Print E-mail

अंतिम फेरीत मिनात्सूकडून पराभूत
फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा

पी.टी.आय.
पॅरिस
डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पध्रेपाठोपाठ फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याची संधी भारताच्या सायना नेहवालने गमावली. स्पर्धेत सनसनाटी विजयी मालिका करणाऱ्या जपानच्या मिनात्सू मितानी हिने तिच्यावर २१-१९, २१-११ अशी मात केली.
 
घरच्या वातावरणाचा फायदा घेण्यात गैर काय? Print E-mail

हरभजन सिंगचा सवाल
पी.टी.आय.

ग्रेटर नोइडा
इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टय़ा बनविण्याचे डावपेच योग्य असल्याचे विराट कोहलीने शनिवारी म्हटले होते. रविवारी भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगनेही हेच मत व्यक्त केले आहे. घरच्या वातावरणाचा फायदा घेण्यात गैर काय, असा सवाल यावेळी हरभजनने विचारला आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो