क्रीडा
मुखपृष्ठ >> क्रीडा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

क्रीडा
अजूनही आनंदला विजयाची हुलकावणीच! Print E-mail

पी.टी.आय. , बिलबाओ (स्पेन)
भारताचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद व बरोबरी याचे सध्या अतूट नाते झाले असावे. मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेतील सलग सातव्या लढतीत त्याला बरोबरी स्वीकारावी लागली आहे. सातव्या फेरीत अर्मेनियाच्या लिवॉन आरोनियन याने त्याला बरोबरीत रोखले.

 
संक्षिप्त : आय-लीग फुटबॉल : पुण्यापुढे आज मुंबईचे आव्हान Print E-mail

पुणे : ओएनजीसी संघावर मात करीत शानदार सलामी देणाऱ्या पुणे फुटबॉल क्लबला आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील दुसऱ्या लढतीत येथे मुंबई संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या सामन्यात पुणे संघाला अनुकूल मैदान व स्थानिक प्रेक्षकांचा पाठिंबा मिळणार आहे.

 
राज्यातील फुटबॉलच्या विकासासाठी ‘विफा’चा पुढाकार! Print E-mail

स्पोर्टिग एस कंपनीशी १०० कोटींचा करार
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने (विफा) राज्यातील फुटबॉल विकासाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी स्पोर्टिग एस कंपनीशी १० वर्षांकरिता १०० कोटी रुपयांचा करार केला आहे. या करारानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फुटबॉलच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येणार आहेत.

 
जीते है शान से! Print E-mail

प्रसाद लाड - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

ते आले, खेळले आणि निर्विवादपणे जिंकले असे त्यांच्या बाबतीत घडले नाही. पण विश्वविजयाचा मानाचा मुकुट त्यांच्या शिरावर हातात विराजमान झाला आणि वेस्ट इंडिजने पुन्हा एकदा विश्वविजयाची चव चाखली. सोनेरी दिवस बऱ्याच वर्षांनी त्यांनी पाहिला, अनुभवला. विश्वचषकापूर्वीच (वुई आर चॅम्पियन्स या नादात यजमान श्रीलंका हरवून गेली होती. हा त्यांचा फाजील आत्मविश्वास नव्हता. कारण विश्वविजयाला गवसणी घालू शकेल असा दर्जेदार संघ त्यांच्याकडे होता. काय नव्हते त्यांच्याकडे? जगविख्यात फलंदाज, फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजही. या साऱ्यांच्या जोरावर त्यांनी आपल्याच मातीत विश्वविजयाचा शंखनाद पुकारला होता.
 
उत्तर विभाग उपांत्य फेरीत Print E-mail

दुलीप करंडक क्रिकेट
पी.टी.आय. चेन्नई

उत्तर विभागाने पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर दुलीप कंरडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. दुसऱ्या डावात पश्चिम विभागाने दोन बळी गमावल्यामुळे चौथ्या आणि अखेरच्या दिवशी खेळ थांबवण्यात आला. वेगवाग गोलंदाज इशांत शर्मा आणि फिरकीपटू अमित मिश्रा यांनी मिळून सात विकेट्स मिळवत तिसऱ्या दिवशीच पश्चिम विभागाला १६४ धावांवर रोखले होते. तेव्हाच उत्तर विभागाचा उपांत्य फेरीतील मार्ग सुकर झाला होता. पहिल्या डावात उत्तर विभागाने ४८४ धावांचा डोंगर उभा केला होता. कर्णधार शिखर धवनने साकारलेल्या अर्धशतकी खेळीमुळे उत्तर विभागाने चौथ्या दिवशी दुपारी आपला दुसरा डाव ७ बाद २०८ धावांवर घोषित केला. पश्चिम विभागाने २९ षटकांत २ बाद ६९ धावा केल्यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला.
 
प्रादेशिक सेनेच्या संचलनदिनाला धोनीची दांडी Print E-mail

पी.टी.आय. ,नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने प्रादेशिक सेनेच्या वार्षिक संचलन दिनास अनुपस्थित राहून नव्या वादास फोडणी दिली आहे. सेलिब्रिटी व्यक्तींना सैन्यदलात मानद पद खरोखरीच देण्याची आवश्यकता आहे का, हा वाद त्यामुळे निर्माण झाला आहे. धोनी याला गतवर्षी प्रादेशिक सेनेत ‘मानद लेफ्टनंट कर्नल’ हा सन्मान देण्यात आला आहे. भारताचा विक्रमवीर सचिन तेंडुलकर याला दोन वर्षांपूर्वी ‘सन्माननीय ग्रुप कॅप्टन’ करण्यात आले आहे. तेंडुलकर व धोनी यांना हवाईदलाने सु-३०एमकेआय हे विमान चालविण्यासाठी निमंत्रण यापूर्वीच पाठविले आहे. मात्र या दोन्ही खेळाडूंनी अद्याप त्याबाबत उत्सुकता दाखविलेली नाही.
 
ब्राव्हो, थरंगाची माघार Print E-mail

चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धा
वृत्तसंस्था ,जोहान्सबर्ग

मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही. त्याच्या जागी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज न्यूवान कुलसेकरा याची निवड करण्यात आली आहे. बोटाला दुखापत झाल्यामुळे श्रीलंकेचा सलामीवीर उपुल थरंगा याला उवा नेक्स्ट संघातर्फे खेळता येणार नाही. कोलंबोत श्रीलंकेविरुद्ध झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ब्राव्होने वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले होते. या सामन्यात वेस्ट इंडिजने ३६ धावांनी विजय मिळवून ३३ वर्षांनंतर पहिल्यांदा प्रतिष्ठेच्या चषकावर नाव कोरले.
 
फिक्सिंगच्या आरोपांचे नवल नाही- डॅरेल हेअर Print E-mail

पी.टी.आय., मेलबर्न

आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच फिक्सिंगच्या जाळ्यात अडकल्याच्या वृत्ताने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली. मात्र ऑस्ट्रेलियाचे माजी पंच डॅरेल हेअर हे या आरोपांनी चकित झालेले नाहीत. अशा स्वरूपाच्या बातम्या पैशाची खाण ठरलेल्या आयपीएलच्या (इंडियन प्रीमिअर लीग) निर्मितीपासून फिरत असल्याचे खळबळजनक उद्गार हेअर यांनी काढले. भारतातील एका खासगी वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सहा आंतरराष्ट्रीय पंच ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि श्रीलंका प्रीमिअर लीगदरम्यान सामना निश्चितीसाठी तयार असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी आयसीसीने तातडीने चौकशी सुरू केली आहे.
 
दोन वेळा राष्ट्रीय विजेती होऊनही बॅडमिंटनपटू सायली गोखले उपेक्षितच! Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी, पुणे

वरिष्ठ गटात राष्ट्रीय स्तरावर दोन वेळा विजेतेपद मिळवूनही आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू सायली गोखले हिला अद्याप कायमस्वरुपी नोकरी मिळालेली नाही. गेली सहा वर्षे ती एअर इंडियात तात्पुरत्या करारावरच काम करीत आहे. सायली हिने श्रीनगर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळविले. वरिष्ठ गटात तिचे हे दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी तिने २००८ च्या राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले होते. येथे मंगळवारी पुणे जिल्हा महानगर बॅडमिंटन संघटना, हवेली तालुका बॅडमिंटन संघटना व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्यातर्फे तिचा सत्कार करण्यात आला.तिला एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
 
बीसीसीआयला प्रतीक्षा आयसीसीच्या तपासाची Print E-mail

पंच स्टिंग ऑपरेशन
पी.टी.आय., नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय पंच सामनानिश्चितीच्या जाळ्यात अडकल्याने उघड करणाऱ्या स्टिंग ऑपरेशनप्रकरणी आयसीसीचा तपास पूर्ण होईपर्यंत थांबणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. या प्रकरणात कोणत्याही भारतीय पंचांवर आरोप झाले नसल्याने आयसीसीचा तपास पूर्ण होण्याची आम्ही प्रतीक्षा करू अशी भूमिका बीसीसीआयने स्वीकारली आहे.

 
पंचांच्या सामनानिश्चिती प्रकरणीआता चौकशीला सुरुवात! Print E-mail

श्रीलंका, पाकिस्तान क्रिकेट मंडळ चौकशी करणार
बीसीसीआयला प्रतीक्षा आयसीसीच्या तपासाची!
पी.टी.आय., नवी दिल्ली/कोलंबो
भारतीय खाजगी वृत्तवाहिनीने केलेल्या पंचांच्या स्टिंग ऑपरेशनच्या आरोपांची पाकिस्तान आणि श्रीलंका क्रिकेट मंडळांनी दखल घेतली असून, याप्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. काही आंतरराष्ट्रीय पंच पैशांसाठी सामना निश्चिती करण्याकरिता तयार असल्याचा आरोप या वाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये करण्यात आला आहे.  

 
विश्वविजेत्या विंडीजचे क्रिकेट मंडळाकडून कौतुक Print E-mail

पी.टी.आय., कोलंबो
कौशल्य, क्षमता, संघर्ष आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाने कमावलेला विश्वचषक विशेष प्रशंसनीय असल्याचे उद्गार वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष ज्युलियन हंट यांनी काढले. विश्वचषकाच्या अंतिम मुकाबल्यात श्रीलंकेच्या संघाला त्यांच्या मायभूमीत नमवणे ही निश्चितच अभिमानास्पद गोष्ट असल्याचे हंट यांनी सांगितले. विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजचा संघ रवाना झाला तेव्हा वेस्ट इंडिजमधील सर्व लोकांचा त्यांना पाठिंबा होता आणि या शुभेच्छांमुळेच ३३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जागतिक विश्वविजेतेपद वेस्ट इंडिजने कमावले.

 
पुणे फुटबॉल क्लबची विजयी सलामी Print E-mail

 

आय-लीग फुटबॉल
क्रीडा प्रतिनिधी, पुणे
चुरशीच्या लढतीत पुणे फुटबॉल क्लबने ओएनजीसीवर ३-२ अशी मात करीत आय-लीग फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. मध्यंतराला पुणे संघाने १-० अशी आघाडी घेतली होती. त्यांचा हा गोल जेजे लालपेखुला याने २२ व्या मिनिटाला पेनल्टी-किकद्वारा केला. सामन्याच्या ४८ व्या मिनिटाला सुभाष सिंग याने पुण्याचा दुसरा गोल केला.

 
संधू, कुलकर्णीच्या राजीनाम्याने फरक पडणार नाही -एमसीए Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
भारताचे माजी क्रिकेटपटू बलविंदर सिंग संधू आणि नीलेश कुलकर्णी यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) क्रिकेट सुधार समितीचा राजीनामा दिला असला तरी त्याने कोणतेही संकट ओढवणार नाही, असे एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

 
संक्षिप्त : बुद्धिबळ : आनंदची बरोबरीची कोंडी सुटेना Print E-mail

बिलबाओ (स्पेन) : विश्वविजेत्या विश्वनाथन आनंद याला मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत बरोबरीची कोंडी फोडण्यात अपयश आले. त्याला सहाव्या फेरीत फ्रान्सिस्को व्हॅलेजो पोन्सने बरोबरीत रोखले. या स्पर्धेत आनंदला सलग सहावी लढत बरोबरीत ठेवावी लागली. आनंदचे आता सहा गुण झाले आहेत. इटलीच्या फॅबिआनो कारुआना याने अकरा गुणांसह आघाडी घेतली आहे. स्पर्धेतील चारच फेऱ्या बाकी असून मॅग्नस कार्लसन याने नऊ गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे.

 
महिला क्रिकेटला प्रेक्षक मिळणार कधी? Print E-mail

तुषार वैती ,८ ऑक्टोबर २०१२
tushar.vaity @expressindia.com
alt

वेस्ट इंडिजच्या संघानं श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत हरवून ३३ वर्षांनंतर प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे जेतेपद पटकावत आपल्या क्रिकेटला झळाळी देण्याचा प्रयत्न केला. पण पुरुषांबरोबरच महिलांचीही ट्वेन्टी-२० स्पर्धा श्रीलंकेत सुरू होती आणि महिलांमध्ये विजेता कोण ठरला, हे किती जणांना माहीत असेल? साखळी फेरीतील सामन्यांचा अपवाद वगळता पुरुषांचे सर्वच सामने हाऊसफुल्ल होते, पण महिलांच्या सामन्यांना कोणतेही तिकीटशुल्क नसतानाही प्रेक्षकांनी मात्र महिलांच्या सामन्यांकडे पाठ फिरवली. हे चित्र वर्षांनुवर्षे असेच आहे. पुरुषांच्या आधी (१९७३मध्ये) महिलांची पहिली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा झाली.
 
पश्चिम विभागाचा १६४ धावांत खुर्दा Print E-mail

उत्तर विभागाची उपांत्य फेरीकडे वाटचाल
पी.टी.आय.चेन्नई
इशांत शर्मा

इशांत शर्मा (४/२९) व अमित मिश्रा (३/४१) यांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर उत्तर विभागाने पश्चिम विभागाचा पहिला डाव १६४ धावांत गुंडाळला आणि दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपान्त्य फेरीतील प्रवेश जवळजवळ निश्चित केला. उत्तर विभागाने पहिल्या डावात ४८४ धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवसअखेर त्यांनी दुसऱ्या डावात बिनबाद ३० धावा केल्या आहेत. मंगळवारी सामन्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्यांचा पहिल्या डावातील ३२० धावांच्या आघाडीवर विजय निश्चित केला आहे.

 
सहा आंतरराष्ट्रीय पंच फिक्सिंगच्या जाळ्यात? Print E-mail

वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमुळे खळबळ
पी.टी.आय.नवी दिल्ली
पैशाच्या लालसेपोटी सहा आंतरराष्ट्रीय पंच ट्वेन्टी-२० विश्वचषक तसेच श्रीलंका प्रीमिअर लीग स्पर्धेतील सामने निश्चिती करण्यासाठी तयार असल्याचे एका खाजगी वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गंभीर दखल घेतली आहे. आयसीसी या प्रकरणाची चौकशी करणार असून या संदर्भातील माहिती पुरवण्याचे आदेश या वाहिनीला देण्यात आले आहेत.

 
हे जेतेपद संस्मरणीय -सॅमी Print E-mail

पी.टी.आय.कोलंबो
alt

क्रिकेटमध्ये एकेकाळी आमचे निर्विवाद वर्चस्व होते. हे वैभव पुन्हा मिळविण्यासाठी येथील विजेतेपद आम्हास प्रेरणादायक ठरणार आहे असे ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्टइंडिज संघाचा कर्णधार डॅरेन सामी याने येथे सांगितले. क्रिकेटमध्ये गेल्या ३३ वर्षांमध्ये आम्ही विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळेच आमच्यासाठी हे विजेतेपद संस्मरणीय आहे. श्रीलंकेस १३८ धावांचे आव्हान फारसे अवघड नव्हते. मात्र आम्ही शेवटपर्यंत आमच्या क्षमतेवर विश्वास ठेवला. सुदैवाने लंकेच्या फलंदाजांनी केलेल्या चुका आमच्या पथ्यावर पडल्या.
 
दडपणाखाली सामन्यावरील नियंत्रण गमावले -जयवर्धने Print E-mail

पी.टी.आय.कोलंबो
alt

दडपणाखाली खेळताना आम्ही सामन्यावर मिळविलेले नियंत्रण गमावले आणि त्यामुळेच विजेतेपदाची संधी घालविली, असे श्रीलंकेचा कर्णधार माहेला जयवर्धने याने सांगितले. श्रीलंकेस येथे रविवारी झालेल्या ट्वेन्टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजकडून ३६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
घरच्या मैदानावर खेळताना स्थानिक प्रेक्षकांच्या पाठिंब्याचे दडपण होते. आम्ही विजय मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केला, मात्र सामन्यातील महत्त्वाच्या टप्प्यात तीन-चार षटकांमध्येच सामन्यास वेस्ट इंडिजच्या बाजूने कलाटणी मिळाली असे सांगून जयवर्धने म्हणाला, विंडीजच्या मर्लान सॅम्युअल्सने खूपच सुरेख फलंदाजी केली.
 
<< Start < Prev 21 22 23 24 25 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो