क्रीडा
मुखपृष्ठ >> क्रीडा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

क्रीडा
विच्छा माझी पुरी करा! Print E-mail

alt

रविवार, ७ ऑक्टोबर २०१२
तीन आठवडय़ांच्या उत्कंठावर्धक प्रवासाचा रविवारी रात्री एखाद्या परीकथेप्रमाणे सुखद शेवट होणार आहे. अथांग समुद्रकिनारा आणि पारतंत्र्यात असताना ब्रिटिशांकडून क्रिकेटचा वसा घेतलेल्या वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या दोन निसर्गसंपन्न बेटांमध्ये ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील जगज्जेतेपदासाठी महायुद्ध
रंगणार आहे. सुमारे दोनशे देशांमधील अब्जावधी क्रिकेटरसिकांना त्या सोनेरी क्षणाची उत्सुकता लागून राहिली आहे. आशियाई महासत्तेचे प्रतीक मानला जाणारा महेला जयवर्धनेचा श्रीलंकेचा संघ विश्वविजेतेपद जिंकून बीअर आणि नृत्याच्या जल्लोषात कार्निव्हल पार्टी करण्यासाठी उत्सुक आहे, तर डॅरेन सॅमीचा वेस्ट इंडिज संघ कॅरेबियन बेटांवर ‘कॅलिप्सो’ नृत्याच्या ठेक्यावर क्रिकेटचे सोनेरी दिवस पुन्हा आणण्यासाठी आसुसला आहे. रविवारी होणाऱ्या या युद्धाचे पडघम शनिवारपासून वाजू लागले होते. अर्थातच वाक्युद्धानेच त्याला प्रारंभ झाला.

 
क्रिकेटपटूंची फॅक्टरी! Print E-mail

पी. केणिंगा
alt

१७ मार्च १९९६ हा दिवस श्रीलंकेच्या क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. कारण लाहोरच्या गदाफी स्टेडियमवर अर्जुन रणतुंगाच्या क्रिकेट संघाने ‘न भूतो, न भविष्यति’ असा चमत्कार घडवीत विश्वविजेतेपद जिंकण्याची कर्तबगारी दाखवली. १९९६च्या विश्वचषक स्पध्रेत श्रीलंकेकडून अतिशय माफक अपेक्षा करण्यात येत होत्या.
 
शिखर धवनचे शानदार शतक Print E-mail

पी.टी.आय.

चेन्नई
सलामीवीर शिखर धवन याचे शैलीदार शतक व त्याने राहुल दिवाण याच्या साथीत केलेल्या शतकी भागीदारीमुळेच दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत उत्तर विभागाने पश्चिम विभागाविरुद्ध आश्वासक सुरुवात केली. पहिल्या दिवसअखेर उत्तर विभागाने ८९.२ षटकांत ३ बाद २५१ धावा केल्या.धवन याने दमदार फलंदाजी करीत १०१ धावा केल्या.
 
वेटेलला पोल पोझिशन Print E-mail

जपान ग्रां.प्रि. शर्यत

पी.टी.आय.
सुझूका, जपान
 विश्वविजेता सेबेस्टियन वेटेलने रविवारी होणाऱ्या जपान ग्रां. प्रि फॉम्र्युला-वन शर्यतीसाठी अव्वल स्थान (पोल पोझिशन) पटकावले आहे. रेड बुलचा ड्रायव्हर वेटेलचा सहकारी मार्क वेबरने दुसरे तर मॅकलरेनच्या जेन्सन बटनने तिसरे स्थान पटकावले. मात्र गिअरबॉक्समध्ये बदल केल्याप्रकरणी शिक्षा झाल्याने बटन आठव्या स्थानापासून शर्यतीला सुरुवात करेल.
 
शारापोव्हा अंतिम फेरीत Print E-mail

चीन खुली टेनिस स्पर्धा

वृत्तसंस्था
बीजिंग
जबरदस्त फॉर्म कायम राखत मारिया शारापोव्हाने चीन खुल्या टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या चीनच्या लि नाचे आव्हान शारापोव्हाने ६-४, ६-० असे मोडमून काढले. पहिल्या सेटमध्ये शारापोव्हाच्या खराब सव्‍‌र्हिसमुळे लि नाने ३-१ अशी आघाडी घेतली होती.
 
पेस-स्टेपनेक अंतिम फेरीत Print E-mail

जपान खुली टेनिस स्पर्धा

पी.टी.आय.
टोक्यो
लिएण्डर पेस आणि राडेक स्टेपनक जोडीने जपान खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. डॅनिइले ब्रासिआली आणि फ्रँटिसेक सरमाक जोडीचा ६-३, ६-१ असा धुव्वा उडवत पेस-स्टेपनेक जोडीने अंतिम फेरीतले स्थान पक्के केले. यावर्षी लिएण्डरने तीन जेतेपदांची कमाई केली आहे.
 
ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात महिलांचा महामुकाबला Print E-mail

पी.टी.आय.
कोलंबो
अ‍ॅशेस म्हटले की, डोळ्यासमोर उभा राहतो ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर रंगणारा संघर्ष. महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या निमित्ताने हाच थरार अनुभवता येणार आहे.

 
‘रेड दी हिमालय’चा थरार आजपासून रंगणार Print E-mail

शिमला ते लेह १८०० कि.मी. चालणार स्पर्धा
प्रसाद लाड
शिमला
दूरवर पसरलेल्या हिमालयाच्या पर्वत रांगा.. एका बाजूला डोंगरावरून दरड कोसळण्याची भीती, तर दुसऱ्या बाजूला खोल दरी.. खडकाळ रस्ते.. वळणावळणाचे घाट..

 
मुकुंदचे शतक, कसोटी अनिर्णीत Print E-mail

पी.टी.आय.
लिंकन, न्यूझीलंड
भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील दुसरी अनधिकृत कसोटी अनिर्णीत झाली. भारताचा कर्णधार अभिनव मुकुंदने नाबाद १३२ धावांची खेळी केली. दोन सामन्यांची कसोटी मालिका अनिर्णितावस्थेत संपली.

 
पुण्याची ओएनजीसीबरोबर सलामी Print E-mail

आयलीग फुटबॉल स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी
पुणे
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने आयोजित केलेल्या चौथ्या आयलीग फुटबॉल स्पर्धेत पुणे फुटबॉल क्लबची (पीएफसी) ८ ऑक्टोबर रोजी ओएनजीसी संघाबरोबर सलामीची लढत होणार आहे. हा सामना शिवछत्रपती क्रीडानगरीत होणार आहे.

 
२०११ विश्वचषकातील भारत-पाकिस्तान लढत कारकीर्दीतील सर्वात उत्कंठावर्धक -टॉफेल Print E-mail

पी.टी.आय.
कोलंबो
भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान २०११ विश्वचषकात झालेला उपांत्य फेरीचा सामना कारकीर्दीतील सगळ्यात उत्कंठावर्धक असल्याचे उद्गार ऑस्ट्रेलियन पंच सायमन टॉफेल यांनी काढले. ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम लढतीनंतर टॉफेल निवृत्त होणार आहेत. त्या पाश्र्वभूमीवर ते बोलत होते.

 
सानिया-नुरिया यांना उपविजेतेपद Print E-mail

चीन :
भारताची सानिया मिर्झा हिला चीन ओपन टेनिस स्पर्धेतील महिलांच्या दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

 
संक्षिप्त क्रिडावृत्त Print E-mail

दुलीप करंडक : शिखर धवनचे शानदार शतक
चेन्नई : सलामीवीर शिखर धवनचे शैलीदार शतक व त्याने राहुल दिवाणच्या साथीत केलेल्या शतकी भागीदारीमुळेच दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत उत्तर विभागाने पश्चिम विभागाविरुद्ध आश्वासक सुरुवात केली.

 
बरसात की एक रात! Print E-mail

 

* ख्रिस गेल ठरला ऑसी गोलंदाजांचा कर्दनकाळ
* वेस्ट इंडिजच्या आक्रमणापुढे ऑस्ट्रेलिया नतमस्तक
* रविवारी वेस्ट इंडिज-श्रीलंका यांच्यातील विजेता ठरणार जगज्जेता
* ख्रिस गेल  * नाबाद ७५   * चेंडू-४१   * चौकार-५  * षटकार-६

शुक्रवारची रात्र साक्षात ‘बरसात की एक रात’च होती. त्याचे दोन भले-बुरे रंग क्रिकेटरसिकांना पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी १४ षटकार आणि १३ चौकारांची ‘बरसात’ करीत धावफलकावर दोनशेचा टप्पा ओलांडला, तेव्हाच डॅरेन सॅमीच्या सेनेने अर्धी लढाई जिंकली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी कॅरेबियन गोलंदाजांपुढे अक्षरश: शरणागती पत्करली. सोसाटय़ाच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसात ऑस्ट्रेलियाने जपलेले जगज्जेतेपदाचे स्वप्न वाहून गेले. तब्बल ७४ धावांनी ऑस्ट्रेलियाला हरविल्यामुळे वेस्ट इंडिजच्या संघाने आपल्या खास ‘कॅलिप्सो’ नृत्याच्या शैलीत विजयाचा जल्लोष साजरा केला.

 
दोलायमान! Print E-mail

सचिन घेणार पुनर्आढावा
पी.टी.आय. , नवी दिल्ली

मी निवृत्तीचा विचार करण्यापेक्षा सध्या खेळाचा आनंद लुटतोय, असे आजवर छातीठोकपणे सांगत टीकाकारांची तोंडे बंद करणाऱ्या ‘मास्टरब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने २३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर पहिल्यांदाच निवृत्तीचे विचार डोकावत असल्याचे संकेत दिले आहेत. अर्थात, ज्या क्षणी माझ्याकडून त्या तोडीची खेळी होत नाही, असे मला जाणवेल त्याक्षणी मी निवृत्त होईन, असे सांगत निवृत्तीची निश्चित कालमर्यादा ठरली नसल्याचेच त्याने स्पष्ट केले आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी क्रिकेटला देण्यासारखे माझ्यात अधिक काही नसल्याने नोव्हेंबरमध्ये मी माझ्या भविष्यातील खेळीचा फेरविचार करणार आहे, असे तो म्हणाला.
 
कर्नाटकला सर्वसाधारण विजेतेपद Print E-mail

वीरधवल खाडे आणि रिचा मिश्रा सर्वोत्तम खेळाडू
वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी, पुणे

कर्नाटकने पुरुष विभागातील सांघिक विजेतेपदासह (१५० गुण) वरिष्ठ गटाच्या ६६ व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाची (२७२ गुण) कमाई केली. यजमान महाराष्ट्रास महिलांच्या सांघिक विजेतेपदावर (१५७ गुण) समाधान मानावे लागले. वीरधवल खाडे (महाराष्ट्र) व रिचा मिश्रा (पोलिसदल) यांनी अनुक्रमे पुरुष व महिला विभागात सर्वोत्तम जलतरणपटूचा मान मिळविला. शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या या स्पर्धेत वीरधवल या बीजिंग ऑलिम्पिकपटूने शेवटच्या दिवशी १०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत ५०.५३ सेकंदात पार करीत राष्ट्रीय विक्रम नोंदविला. त्याने एरॉन डिसूझाचा गतवर्षीचा ५१.१५ सेकंद हा विक्रम मोडताना जागतिक स्पर्धेची पात्रताही (५०.६४ सेकंद) पूर्ण केली.
 
आता भारतात फॉम्र्युला ‘ई’ चा थरार Print E-mail

पी.टी.आय., नवी दिल्ली

फॉम्र्युला वनच्या थरारानंतर भारतीय चाहत्यांना फॉम्र्युला ‘ई’ सीरिजचा थरार अनुभवण्याची संधी मिळणार आहे. या मालिकेतील पहिली स्पर्धा २०१४ मध्ये होणार आहे. भारताने गतवर्षी फॉम्र्युला वन ग्रां.प्रि. शर्यतीचे यशस्वीरीत्या आयोजन केले होते. आगामी सहा महिन्यांत वर्ल्ड सुपरबाईक्स चॅम्पियनशिपचे भारतात पर्दापण होणार आहे. तसेच जीटीवन सीरिजच्या शर्यतींचे येथे आयोजन करण्याचाही विचार केला जात आहे. आंतरराष्ट्रीय फॉम्र्युला असोसिएशनने फॉम्र्युला ई होल्डिंग्ज कंपनी व फॉम्र्युला ई सीरिज यांच्याशी करार केला आहे. या सीरिजमध्ये दहा संघांचा सहभाग राहील.
 
आता श्रीलंकेला रोखणे कठीण आहे! Print E-mail

श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज मुरलीचे ठाम मत

‘‘१९९६च्या विश्वविजेतेपदाने आम्हा खेळाडूंना आणि श्रीलंकेच्या क्रिकेटला संजीवनी मिळाली. आम्ही विश्वचषक जिंकल्यामुळे सर्व देश आम्हाला घाबरू लागले. त्याआधीपर्यंत कोणत्याही सामन्यात वा स्पध्रेत श्रीलंकेला सहज हरविता येईल, अशीच त्यांची विचारसरणी असायची. विश्वचषकजिंकल्यानंतर बाकीचे देश आमच्याकडे आदराने पाहू लागले!’’ ..कसोटी क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी आठशे बळींचा एव्हरेस्ट उभारणारा श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन जेव्हा हे सांगत होता तेव्हा अनेक संस्मरणीय क्षण त्याला आठवले. आता श्रीलंकेचा संघ ट्वेन्टी-२० जगज्जेतेपदाच्या उंबरठय़ावर असताना मुरली कमालीचा भावुक झाला आहे.
 
क्रिकेटचं मंदिर! Print E-mail

पी. केणिंगा

क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणारं कोलंबोच्या ‘क्रिकेट क्लब कॅफे’ अर्थात ‘सीसीसी’इतकं दुसरं कोणतंही स्थान नसावं. क्वीन्स रोडवरील हा जुना बंगला आता क्रिकेटप्रेमींचं आवडतं ठिकाण बनलं आहे. देशविदेशातील अनेक मंडळी या रेस्टॉरंटमध्ये टीव्हीवरील क्रिकेट सामन्यांचा आस्वाद घेत क्रिकेटच्याच वातावरणात आपल्या आवडीच्या पदार्थाचा आणि पेयांचा आनंद लुटतात. सचिन सॉसेजेस अ‍ॅन्ड मॅश, गांगुलीज ग्रिल, मुरली मुलीगश, महेला मोईशिवा, डि’सिल्व्हा कोलंबो बर्गर अशा गाजलेल्या क्रिकेटपटूंच्या नावाशी नातं जोडलेल्या अनेक डिशेस तुम्हाला उपलब्ध असतात.
 
पाकिस्तानच्या पराभवाला शाहीद आफ्रिदी जबाबदार! Print E-mail

माजी क्रिकेटपटूंची टीका
पी.टी.आय., कोलंबो

श्रीलंकेत सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानच्या पराभवाला शाहीद आफ्रिदी जबाबदार असल्याचा आरोप माजी क्रिकेटपटूंनी केला आहे.  मात्र पाकिस्तानचे माजी कर्णधार वासिम अक्रम यांनी खेळपट्टीला दोष दिला आहे.
आफ्रिदीने याआधीच निवृत्ती घ्यायली हवी होती. त्याची संघात निवड करायची आणि त्याने काही वर्षांपूर्वी करत होता तसाच सुमार खेळ करायचा असे आता चालणार नाही. आफ्रिदीसह अन्य काही खेळाडूंनी भवितव्याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे माजी खेळाडू आकिब जावेद याने सांगितले.
 
<< Start < Prev 21 22 23 24 25 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो