क्रीडा
मुखपृष्ठ >> क्रीडा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

क्रीडा
महिलांमध्ये ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत Print E-mail

कोलंबो : ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी वेस्ट इंडिजचा २८ धावांनी पराभव करून महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेची अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाची गाठ परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडशी पडणार आहे.

 
उत्तर विभागापेक्षा पश्चिम विभागाचे पारडे जड Print E-mail

दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा
पी.टी.आय., चेन्नई
अनेक नामवंत खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या उत्तर विभागाविरुद्ध पश्चिम विभागाचे पारडे जड मानले जात आहे. या दोन संघांमधील दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या लढतीस शनिवारपासून येथे प्रारंभ होत आहे. उत्तर विभागाचे वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली, युवराजसिंग व हरभजनसिंग या अनुभवी खेळाडूंनी विविध कारणास्तव या सामन्यातून माघार घेतली आहे.

 
महिला हॉकी : स्कॉटलंडची भारतावर मात Print E-mail

डब्लिन : चॅम्पियन्स चॅलेंज हॉकी स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठण्याच्या भारताच्या आशा शुक्रवारी संपुष्टात आल्या. स्कॉटलंडने भारताला टायब्रेकरद्वारा ३-१ असे पराभूत केले. हा सामना पूर्ण वेळेत १-१ असा बरोबरीत राहिला होता.

 
ब्राऊलिनच्या शतकासह न्यूझीलंडचे प्रत्युत्तर Print E-mail

पी.टी.आय., लिनकोन
भारत अ संघाच्या ५५४ धावांसमोर खेळताना न्यूझीलंडने डीन ब्राऊलिनच्या शतकाच्या जोरावर ४२४ धावांची मजल मारली. दुसऱ्या अनधिकृत कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने दुसऱ्या डावात २ बाद ११९ अशी मजल मारली आहे. अभिनव मुकुंद ५६, तर अनुस्तुप मजुमदार ८ धावांवर खेळत आहेत.

 
सानिया-नुरिया अंतिम फेरीत Print E-mail

पी.टी.आय., बीजिंग
भारताच्या सानिया मिर्झा हिने स्पेनच्या नुरिया लॅगोस्टेरा हिच्या साथीत चीन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत अंतिम फेरी गाठली. सानिया व नुरिया यांनी कॅतरिना श्रेबोत्निक (स्लोव्हाकिया) व जेई झेंग (चीन) यांच्यावर ७-५, ६-१ अशी मात केली. त्यांची अंतिम फेरीत रशियाच्या एकतेरिना मकारोव्हा व एलिना व्हेसनिना यांच्याशी गाठ पडणार आहे. सानियाने यंदाच्या मोसमात दोन विजेतेपदे मिळविली आहेत.

 
आशियाई रग्बी स्पर्धा आजपासून पुण्यात Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी, पुणे
महिलांच्या आशियाई अजिंक्यपद व विश्वचषक पात्रता फेरी रग्बी स्पर्धेस येथे शनिवारी प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याची भारतीय संघास खात्री वाटत आहे. शिवछत्रपती क्रीडानगरीत दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत सोळा संघ सहभागी झाले आहेत. गतविजेता चीन, उपविजेता कझाकिस्तान, तृतीय क्रमांक मिळविणारा जपान यांच्यासह अव्वल दर्जाचे संघ सहभागी झाले आहेत.

 
जय हो! Print E-mail

 

पाकिस्तानला हरवून श्रीलंका अंतिम फेरीत
क्रीडा प्रतिनिधी, कोलंबो

भारतापाठोपाठ पाकिस्तानचाही ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील प्रवास संपला. श्रीलंकेने क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणाऱ्या देशवासियांच्या साक्षीने अंतिम फेरीत भरारी घेतली. त्यामुळे आर. प्रेमदासा स्टेडियमवरील वातावरणात उत्साही आणि उत्सवी वातावरण होते. चाहते श्रीलंकेचे झेंडे डौलाने फडकवत होते. स्टेडियमच्या आकाशात आणि देशातील रस्त्यांवर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मात्र याचवेळी पाकिस्तानच्या पाठीराख्यांमध्ये शोककळा पसरली होती. आशियाई महासत्तेमधील अव्वलतेची लढाई महेला जयवर्धनेच्या श्रीलंकेने जिंकली, ती लाजवा गोलंदाजीच्याच बळावर.

 
कहीं हार ना हो जाये! Print E-mail

आजच्या ऑस्ट्रेलिया-विंडीज सामन्यात वॉटसन-गेल मुकाबल्याला महत्त्व

ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाज म्हणजे ख्रिस गेल, तर सामन्याचा निकाल एकहाती फिरविण्याची क्षमता असलेला अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणजे शेन वॉटसन. शुक्रवारी वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य लढत म्हणजे प्रामुख्याने गेल विरुद्ध वॉटसन यांच्यातील सर्वोत्तमतेची झुंज असेल, असे म्हटल्यासही वावगे ठरणार नाही. २०१०मध्ये अंतिम फेरीत इंग्लिश संघाकडून हरल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न पूर्ण झाले नव्हते. त्या अधुऱ्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी जॉर्ज बेलीचा ऑसी संघ उत्सुक आहे. वेस्ट इंडिजचा संघनायक डॅरेन सॅमीचे इरादेही बुलंद आहेत.
 
हॅमिल्टन कॅनल! Print E-mail

पी. केणिंगा

कोलंबोत प्रवास करताना जसा समुद्रकिनारा काही अंशी आपली सोबत करतो, तसाच एक नालाही आपल्याला बऱ्याच मार्गावर सोबतीला असतो. हॅमिल्टन कॅनल असं त्याचं नाव, तो पुढे केलानी नदीला जाऊन मिळतो. आकाराच्या दृष्टीनं चौथ्या क्रमांकावरील ही नदी कोलंबो शहराला पाणीपुरवठा करते. या नाल्यात अनेक बोटी आणि मच्छिमार दिसतात. नाल्याच्या आसपास राहणारे बरेच नागरिक या मासेवारीवर आपला उदरनिर्वाह करतात. याचप्रमाणे नाल्याच्या काठांवर अनेक हॉटेल्सही आपलं लक्ष वेधतात. रस्त्याच्या शेजारूनच वाहणारा हा नाला तसा चांगलाच खोलवर असल्यामुळे वाहनचालकांना सावधपणे गाडी चालवणं जिकिरीचं होऊन जातं.
 
..तर महिलांचे क्रिकेटही लोकप्रिय होईल! -मिताली राज Print E-mail

प्रशांत केणी,कोलंबो

भारतीय महिला संघातील सर्व खेळाडू आणि व्यवस्थापक विद्या यादव या साऱ्यांच्या चेहऱ्यावर औदासीन्य पसरले होते. कारण भारतीय महिला संघाला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत एकही सामना जिंकता आला नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या बलाढय़ प्रतिस्पध्र्यानी भारतावर आरामात मात केली, पाकिस्तानविरुद्धची रोमहर्षक लढत भारताने फक्त एका धावेने गमावली. या आधीच्या दोन्ही विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत भारताने उपान्त्य फेरीत मजल मारली होती. यंदा मात्र साखळीमध्येच भारताची पाटी कोरी राहिल्याने आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे भारतीय महिला संघावर दु:खाचे सावट असणे स्वाभाविक होते.
 
शूमाकर करणार अलविदा Print E-mail

ब्राझिलियन फॉम्र्युला वन शर्यतीनंतर होणार निवृत्त
पी.टी.आय.,सुझुका

सात वेळा फॉम्र्युला-वनचे जगज्जेतेपद पटकावणाऱ्या मायकेल शूमाकरने अखेर दुसऱ्यांदा फॉम्र्युला-वनमधील आपली कारकीर्द संपविण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर करत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. या मोसमातील अखेरच्या होणाऱ्या ब्राझिलियन ग्रां. प्रि. शर्यतीनंतर शूमाकर फॉम्र्युला-वनला अलविदा करणार आहे. मर्सिडिझ संघाने शूमाकरच्या जागी लुइस हॅमिल्टनची नियुक्ती केल्यानंतर शूमाकर कोणता निर्णय घेतोय, याकडे फॉम्र्युला-वन चाहत्यांचे लक्ष लागले होते. पुढील मोसमासाठी जर्मनीचा ड्रायव्हर शूमाकर सौबेर संघातर्फे खेळेल, अशी चर्चा होती.
 
रिअल माद्रिदचा विजयी चौकार Print E-mail

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा
पी.टी.आय.,पॅरिस

रिअल माद्रिद संघाने चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील खराब सुरुवात बाजूला ठेवत चार सामन्यांत चार विजय मिळवत विजयी चौकार लगावला. मलागा संघाने देखील अशाच स्वरुपाची कामगिरी करत अन्य संघांना इशारा दिला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर रिअल माद्रिद संघाने अजॅक्सचा ४-१ने धुव्वा उडवला तर मलागाने अँडरलेचटला३-० असे सहज नमवले. बार्सिलोना आणि व्ॉलेन्सिआ यांनी मंगळवारी झालेले सामने जिंकत आगेकूच कायम केली आहे. इटलीच्या स्टीफन एल शारवीने एसी मिलानसाठी चॅम्पियन्स लीग स्पर्धेत सर्वात कमी वयात गोल झळकावण्याचा मान पटकावला.
 
शारापोव्हा, जोकोव्हिच उपांत्यपूर्व फेरीत Print E-mail

चीन खुली टेनिस स्पर्धा
वृत्तसंस्था , बीजिंग

जागतिक क्रमवारीत अव्वल तिघांत असणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिच आणि मारिया शारापोव्हा यांनी चीन खुल्या टेनिस स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची नोंद करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. शारापोव्हाने स्लोव्हेनियाच्या पोलोना हरकॉगचा ६-०, ६-२ असा सरळ सेट्समध्ये पराभव केला. शारापोव्हाने या स्पर्धेत अद्याप एकही सेट गमावलेला नाही. रोमानियाच्या सिमोना हालेपला पहिल्या फेरीत तर सोराना सिस्र्टी यांना नमवत शारापोव्हाने तिसरी फेरी गाठली होती. पुरुष गटात नोव्हाक जोकोव्हिचने बिगरमानांकित कालरेस बलरेक्यूला ६-१, ६-३ असे सहज नमवत उपांत्यपूर्व फेरीत स्थान पटकावले.
 
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती मेरी कोम शासकीय भूखंडापासून अद्यापही वंचित Print E-mail

पी.टी.आय.,नवी दिल्ली

लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविल्यानंतर बॉक्सर मेरी कोम हिच्यावर रोख पारितोषिके व अन्य बक्षिसांचा वर्षांव झाला असला तरी तिच्या मणिपूर राज्य शासनाने जाहीर केलेला तीन एकराचा भूखंड अद्याप तिला मिळालेला नाही. मेरी कोम हिने पाचव्यांदा विश्वविजेतेपद मिळविल्यानंतर मणिपूर शासनाने तिला बॉक्सिंग अकादमीकरिता भूखंड देण्याचे जाहीर केले होते. तसेच, ती नोकरी करीत असलेल्या पोलीस दलाकडूनही तिला बढती देण्यात आलेली नाही. भारतास ऑलिम्पिकमध्ये बॉक्िंसगचे पदक मिळवून देणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे.
 
पाकिस्तान क्रिकेट लीगशी काहीही संबंध नाही- गावसकर Print E-mail

पी.टी.आय., नवी दिल्ली

पाकिस्तान प्रीमियर लीगच्या संयोजनात आपला सहभाग असल्याचे वृत्त खोडसाळपणाचे आहे असे ज्येष्ठ कसोटीपटू सुनील गावसकर यांनी येथे सांगितले.
कोलंबो येथे गावसकर व पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे मुख्य झाका अश्रफ यांची भेट झाली होती. त्या वेळी त्यांनी बराच वेळ क्रिकेटविषयक चर्चा केली होती.
पाकिस्तान लीगच्या संयोजनाबाबत गावसकर यांच्याशी चर्चा झाल्याचे वृत्त काही वृत्त वाहिन्यांनी दिले होते. या वृत्ताचे खंडन करीत गावसकर म्हणाले, मी या स्पर्धेला पाठिंबा दिला आहे तसेच या स्पर्धेचे निमंत्रण मी स्वीकारले आहे.
 
सानिया-नुरिया उपांत्य फेरीत Print E-mail

भूपती-बोपण्णा उपांत्यपूर्व फेरीत
पी.टी.आय. ,बीजिंग
सानिया मिर्झा आणि तिची स्पेनची साथीदार नुरिया यांनी चीन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पुरुष गटात महेश भूपती आणि रोहन बोपण्णा जोडीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पिछाडीवर पडून देखील मिर्झा-नुरिया जोडीने ज्युलिया जॉजेस आणि बाबरेरा झाहलोव्हा स्ट्रायकोव्हा या जोडीवर एक तास ३४ मिनिटांच्या लढतीत ४-६, ६-४, १६-१४ अशी मात केली. सानिया-नुरिया जोडीने पहिल्या सेटमध्ये आठ ब्रेकपॉइंट्स वाया घालवले.

 
जोस्त्ना पानसरेची सोनेरी हॅट्ट्रिक Print E-mail

राष्ट्रीय जलतरण स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी , पुणे
वाशी (नवी मुंबई) येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू जोस्त्ना पानसरे हिने १०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यत जिंकून वरिष्ठ गटाच्या ६६ व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. रिचा मिश्रा (पोलीस दल) हिने पाचवे सुवर्णपदक जिंकून वर्चस्व राखले.

 
संक्षिप्त : महिला २०-२० विश्वचषक : इंग्लंड अंतिम फेरीत Print E-mail

कोलंबो : न्यूझीलंडला अवघ्या ९३ धावांत गुंडाळून हे लक्ष्य सहजतेने पूर्ण करत इंग्लंडने महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. डॅनियल व्ॉट आणि होली कॉल्विन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले. अ‍ॅमी सॅटर्थवेटने सर्वाधिक ३० धावा केल्या.

 
आशियाई महासत्तांमधील जुगलबंदी Print E-mail

श्रीलंका-पाकिस्तान आज उपांत्य फेरीत आमने-सामने

पाकिस्तान आणि श्रीलंका या आशियाई क्रिकेटमधील दोन महासत्ता.. फिरकीच्या बळावर जग जिंकू शकतो, यावर दोन्ही संघांचा विश्वास आहे.. एकीकडे आहे, सईद अजमल तर दुसरीकडे अजंठा मेंडिस.. त्यांचा वेगवान माराही जगातील सर्वोत्तम संघांच्या फलंदाजीवर अंकुश ठेवणारा आहे.. उमर गुल आणि लसिथ मलिंगा हे त्यांचे आधारस्तंभ आहेत.. त्यामुळेच आर. प्रेमदासा स्टेडियमवरील पहिला उपांत्य फेरीचा सामना जिंकून कोणता संघ अंतिम फेरीतील आपले स्थान नक्की करणार, याची मोठी उत्सुकता आहे.
 
एका सामन्याची दुसरी गोष्ट.. Print E-mail

पी. केणिंगा

श्रीलंकेत ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात झुंज झाली तिला धड शंभर प्रेक्षकही हजर नव्हते, ना या सामन्याला भरमसाठ प्रसिद्धी लाभत होती ना काही झळाळी होती.. वाचून थोडा धक्का बसला ना? पण ही वस्तुस्थिती आहे.. श्रीलंका क्रिकेट मंडळाचे मुख्यालय असलेल्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लबच्या शेजारीच नाँडेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लबचे (एनसीसी) मैदान आहे. बुधवारी या मैदानावरही ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील आंतरराष्ट्रीय पातळीचाच सामना होता. पण एनसीसीच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावरही आपण क्रिकेट सामना पाहायला जात आहोत, याची जाणीव व्हावी असे कोणतेही वातावरण नव्हते.
 
<< Start < Prev 21 22 23 24 25 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो