राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पी.टी.आय., श्रीनगर
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना पुण्याच्या सायली गोखले हिने वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील महिलांच्या एकेरीत विजेतेपद पटकाविले. पुरुषांमध्ये ऑलिम्पिकपटू परुपल्ली कश्यप विजेता ठरला. चुरशीने झालेल्या अंतिम लढतीत सायली हिने पी.व्ही.सिंधू हिच्यावर २१-१५, १५-२१, २१-१५ अशी मात केली. सायली हिला द्वितीय मानांकन होते. तिने ड्रॉपशॉट्सचा बहारदार खेळ केला. पहिल्या गेममध्ये तिने सिंधू हिला नमविले. मात्र दुसऱ्या गेममध्ये सिंधूने खेळावर नियंत्रण ठेवले. तिने सायली हिच्या चुकांचा फायदा घेतला व ही गेम घेतली. १-१ अशा बरोबरीमुळे तिसऱ्या गेमविषयी उत्कंठा निर्माण झाली. तथापि या गेममध्ये पुन्हा सायलीने प्रभावी खेळ केला. |
चॅम्पियन्स लीग स्पर्धेला मुकण्याची शक्यता क्रीडा प्रतिनिधी, कोलंबो
ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याच्या पायाचा घोटा दुखावल्यामुळे डॉक्टरांनी त्याला दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेला तो मुकण्याची शक्यता आहे. सुपर-एट फेरीमधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सेहवागला घोटय़ाचा त्रास जाणवत होता. भारतीय संघाचे प्रसिद्धी व्यवस्थापक डॉ. आर. एन. बाबा यांच्या मते, सेहवागला डॉक्टरांनी किमान १४ दिवस विश्रांती घेण्यास सांगितले आहे. |
चॅम्पियन्स लीग फुटबॉल ए.पी., जिनिव्हा
बार्सिलोनाचा लिओनेल मेस्सी आणि मँचेस्टर युनायटेडचा रॉबिन व्हॅन पर्सी यांनी शानदार कामगिरी करीत आपापल्या संघाला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत विजय मिळवून दिले. मेस्सीने सहाव्या मिनिटाला आणि ५५व्या मिनिटाला गोल करण्याच्या संधी निर्माण केल्यामुळे अनुक्रमे अॅलेक्सी सान्चेझ आणि सेस्क फॅब्रेगस यांनी गोल केले. त्यांच्या या गोलमुळे बार्सिलोनाने बेनफिका संघावर २-० अशी मात केली. बार्सिलोनाने सहज विजय मिळवला तरी कर्णधार कार्लोस प्युयोलच्या डाव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली. सर्जी बस्केट्सने त्याला धडक दिल्यामुळे बस्केट्सला लाल कार्ड दाखवण्यात आले. |
चीन खुली टेनिस स्पर्धा पी.टी.आय., बीजिंग
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मारिया शारापोवा हिने चीन ओपन टेनिस स्पर्धेत धडाकेबाज विजयासह आगेकूच राखली. तिने सोराना सिरस्टी हिचा ६-२, ६-२ असा धुव्वा उडविला. शारापोवा हिने आपल्या नावलौकिकास साजेसा खेळ करीत सोराना या रुमानियाच्या खेळाडूला फारशी संधी दिली नाही. तिने दोन्ही सेट्समध्ये परतीच्या खणखणीत फटक्यांचा उपयोग केला तसेच नेटजवळून तिने कल्पकतेने प्लेसिंग केले. तिने सव्र्हिसवरही चांगले नियंत्रण राखले होते. शारापोवाबरोबरच मारियाना बातरेली हिनेदेखील अपराजित्व राखले. तिने जर्मनीची खेळाडू ज्युलिया जॉर्जेस हिच्यावर ६-३, ७-६ असा विजय मिळविला. |
भारताचा श्रीलंकेवर विजय महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा पी.टी.आय., कोलंबो डावखुरी फिरकी गोलंदाज एकता बिश्त हिने घेतलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने महिलांच्या आयसीसी ट्वेन्टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील प्लेऑफ सामन्यात श्रीलंकेला नऊ गडी राखून हरविले. या विजयामुळे भारताने २०१४ मध्ये होणाऱ्या ट्वेन्टी२० विश्वचषक स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला आहे. |
पी.टी.आय., कोलंबो श्रीलंकेतील ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात भारतीय संघ अपयशी ठरला तरी पाचपैकी चार सामने जिंकल्यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ट्वेन्टी-२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. श्रीलंकेने १२९ गुणांसह अव्वल स्थान पटकावले असून भारत १२० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान (११८ गुण) आणि इंग्लंड (११८ गुण) यांनी अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान प्राप्त केले आहे. |
क्रीडा प्रतिनिधी , मुंबई आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धासाठी नवीन नियमावली करण्यात आली असून, पुढील वर्षीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. आंतरराष्टीय नेमबाजी महासंघाने पुढील तीन वर्षांसाठी नवीन नियमावली तयार केली असून, त्याबाबतची माहितीपुस्तिका त्यांनी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. पूर्वी अंतिम फेरीतील गुण मोजताना प्राथमिक फेरीतील गुणही मोजले जात असत. आता नवीन नियमांनुसार अंतिम फेरीतील गुणांचाच विचार केला जाईल. |
पी.टी.आय., लिनकोन मनदीप सिंग व अशोक मणेरिया यांनी केलेली नाबाद शतके तसेच त्यांनी केलेली २९४ धावांची अखंडित भागीदारी यामुळेच भारत ‘अ’ संघाने न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत क्रिकेट कसोटीत ४ बाद ४३३ असा धावांचा डोंगर रचला. |
कोलंबो : भारताविरुद्धच्या मालिकेत आम्ही अपयशी ठरलो. दुखापतींच्या पाश्र्वभूमीवर आम्ही भारताशी चांगली टक्कर देऊ शकलो नव्हतो. परंतु कोणताही विश्वचषक संघासाठी प्रतिष्ठेचा असतो. त्यामुळे आता समोर भारत असो किंवा पाकिस्तान आम्ही एकेक आव्हाने पार करीत आहोत. गटसाखळी, सुपर-एट झाल्यानंतर आता उपांत्य फेरी आणि मग विश्वचषक काबीज करणे, हे लक्ष्य आम्ही निश्चित केले आहे, असे श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धनेने सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले. |
कोलंबो : तीन वर्षांपूर्वी लाहोरमधील गदाफी स्टेडियमच्या प्रवेशद्वारापाशी श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यानंतर जागतिक क्रिकेटमधील कोणताही संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाऊ धजावलेला नाही. पाकिस्तानी क्रिकेटरसिकांचे आंतरराष्ट्रीय सामने पाहण्याचे भाग्य तेव्हापासून नशिबाने हिरावून घेतले आहे. परंतु तरीही पाकिस्तानी क्रिकेट संघ परदेशात किंवा दुबईच्या त्रयस्थ ठिकाणी पराक्रम दाखवत आहे. |
कोलंबो : क्रिकेटमध्ये ‘स्विच हिट’ हा फटका आता चांगलाच लोकप्रिय झाला आहे. पण सोमवारी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेतील वेस्ट इंडिविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने ‘स्विच कॅप्टन्सी’चा अजब नमुना पेश केला. नियमित संघनायक महेला जयवर्धने, उपकर्णधार अँजेलो मॅथ्यूज संघात असताना कुमार संगकाराकडे या सामन्याचे नेतृत्व देण्यात आले. याबाबत विविध स्तरावर चर्चा झाली.
|
कर्णधार धोनीने केले भारताच्या कामगिरीचे आत्मपरीक्षण क्रीडा प्रतिनिधी , कोलंबो सुपर-एटमध्ये पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या दोन दिग्गज संघांना हरवूनही सरासरीचे समीकरण न सांभाळता आल्यामुळे मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाचे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले. ‘‘खेळाच्या सर्व विभागांमध्ये एक संघ म्हणून सिद्ध करण्यात आम्ही अपयशी ठरलो,’’ अशा शब्दांत भारताचा संघनायक महेंद्रसिंग धोनीने संघाच्या कामगिरीचे आत्मपरीक्षण केले. |
पी.टी.आय., नवी दिल्ली श्रीलंकेत सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारताच्या पराभवास कर्णधार महेंद्रसिंग धोनीची चुकीची संघनिवड कारणीभूत असल्याचे भारताचे माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांनी म्हटले आहे. ‘‘माझ्या मते संपूर्ण संघालाच या पराभवाचा दोष देता कामा नये. भारताच्या सुमार कामगिरीस धोनीच जबाबदार आहे. धोनीने आपली चूक मान्य करून भारताच्या पराभवासाठी पावसाला जबाबदार धरू नये,’’ असे चेतन शर्मा यांनी सांगितले. |
|
|
<< Start < Prev 21 22 23 24 25 Next > End >>
|