क्रीडा प्रतिनिधी, मुंबई अहमदाबादला १५ नोव्हेंबरपासून इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पाश्र्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचे तीन दिवसांचे सराव सत्र शुक्रवारपासून ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू होणार आहे. भारतीय संघ शुक्रवारी दुपारी सराव करणार आहे.
आरसीएफ अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा क्रीडा प्रतिनिधी, मुंबई आक्रमक एअर इंडियाने यजमान राष्ट्रीय केमिकल्स अॅन्ड फर्टिलायझर्स(आरसीएफ)चा ४०-१९ असा सहज पराभव करून सुफला चषक अखिल भारतीय कबड्डी स्पध्रेत चमकदार प्रारंभ केला. भारतीय नौदलाने रायगडचा ३७-१० असा पराभव केला. देना बँकेने बँक ऑफ इंडियावर ८-७ अशी मात केली.
पी.टी.आय., नवी दिल्ली हॉकी इंडियाच्या बहुचर्चित हॉकी इंडिया लीगसाठी खेळाडूंचा लिलाव १ डिसेंबरला नवी दिल्लीत होणार आहे. ‘‘आजपर्यंत हॉकीतील कोणत्याही लीग स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव करण्यात आलेला नाही. सर्वोत्तम खेळाडू निवडण्यासाठी सहा फ्रॅन्चायझींना संधी मिळणार आहे,’’ असे हॉकी इंडियाचे महासचिव नरिंदर बात्रा यांनी सांगितले.
येती आरसीएफ स्पर्धा उपनगरातर्फे! वि. वि. करमरकर
कबड्डी क्षेत्रातील आमदार भाई जगताप यांच्या वाढत्या घुसखोरीला अखेर चाप बसलाय! तोही आरसीफएच्या निमंत्रितांच्या अखिल भारतीय कबड्डीच्या उद्घाटनात अन् सुमारे सातशे-आठशे प्रेक्षकांच्या साक्षीने!आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील, आपल्या हद्दीबाहेरील राकेफ ऊर्फ राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर्स ऊर्फ आरसीएफच्या मैदानात या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भाई जगताप यांनी मुंबई उपनगरच्या हद्दीत घुसखोरी केली.
नवी दिल्ली : ‘‘हा खटला प्रदिर्घकाळ चालला आणि तो वेदनादायी होता. आम्ही ११ वष्रे न्यायालयाशी लढलो. या खटल्यामध्ये अनेकदा स्थगिती आणि बदल झाले. पण अखेर निकाल सकारात्मक लागला. न्यायालयाने माझ्यावरील आजीवन बंदी उठवल्याचा अत्यंत आनंद होतो आहे,’’ असे मोहम्मद अझरुद्दीनने सांगितले.