शनिवार, १० नोव्हेंबर २०१२ चहूबाजूंना दाटलेल्या काळ्याकुट्ट ढगांचा पडदा वाऱ्याच्या एखाद्या दमदार झोतामुळे नाखुशीनेच बाजूला व्हावा आणि पलीकडे चमकणाऱ्या सूर्याचा एखादा किरण अंधार भेदत त्यातून बाहेर पडावा, त्या किरणांनी काळ्याकभिन्न ढगांनाही सोनेरी किनारीचा साज चढवावा आणि काजळल्याने उदासउदास झालेली अवघी सृष्टी पुन्हा आनंदाने उजळून निघावी, तसे काही मोजके, |
शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२ चुरशीच्या निवडणुकीत प्रतिस्पध्र्यास नामोहरम करणे वेगळे आणि मिळालेल्या विजयाचे संवर्धन करणे वेगळे. जगातील एकमेव महासत्तेच्या प्रमुखपदी सलग दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर बराक ओबामा यांना ही जाणीव झाली नसेल असे म्हणता येणार नाही. |
अभय टिळक - शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
परंपरेचा निर्बुद्ध स्वीकार न करता अगदी वेदांनाही विवेकाची कसोटी लावूनच जगा, हे सांगणारा संतविचार आजही महत्त्वाचा आहे आणि उपयुक्तसुद्धा. तो अंगी बाणवल्यास आजच्या जगाकडेही आपण डोळसपणे पाहू.‘परंपरा’ नावाचे एक जे भले थोरले संचित आपल्याबरोबर सतत चालत असते त्याची व्यवस्था नेमकी कशी लावायची याचा उलगडा आपल्याला अनेकदा होत नसतो. |
गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२ समीक्षक आणि सर्वसामान्य रसिक यांच्यात एखाद्या कलाकृतीसंदर्भात सहसा एकमत नसते. निवडणुकांचेही तसेच आहे. राजकीय विश्लेषकांना जे वाटते ते मतदारांसाठी ग्राह्य असतेच असे नाही, किंबहुना ते तसे नसतेच. मतदार हा बऱ्याचदा भावनेच्या वा तात्कालिकतेच्या आहारी जाऊन मतदान करीत असतो. |
बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२ जिभेचा सर्वार्थाने सैल वापर हे नितीनभौ गडकरी यांचे जुने दुखणे आहे. यापूर्वीही महाराष्ट्रात मंत्रिपदी असताना अनेक सरकारी बैठकांचा इतिवृत्तांत त्यांच्या ज्वालाग्राही भाषेत जळून खाक झाल्याचा इतिहास आहे. ज्या शब्दांचा उच्चार मनातल्या मनात करायचा झाला तरी एखादी व्यक्ती दहा वेळा विचार करेल ते शब्द नितीनभौंच्या तोंडून सटासट कसे सुटतात याचा अनुभव अनेकांना आहे.
|
मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२ साहित्यक्षेत्रात वाद होतात आणि शमतात, ते दरवेळी साहित्यिक वादच असतात असेही नाही. याबाबत मराठी वा इंग्रजीची स्थिती सारखीच आहे. मराठीतील साहित्य संमेलने कुणा उदार नेत्याला उद्घाटक बनवून पार पडणार, अनेक वक्ते नेहमीचे प्रयोग करण्यासाठीच व्यासपीठावर येणार आणि ग्रंथविक्रीच अधिक लक्षात राहणार.
|
सोमवार, ५ नाव्हेंबर २०१२ काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला असे म्हणायला हवे. गेल्या रविवारी काँग्रेसने मंत्रिमंडळ फेरबदल करून राष्ट्रपती भवनातून संदेश द्यायचा प्रयत्न केला. आजच्या रविवारी रामलीला मैदानातून. पुढच्या आठवडय़ात अशीच एक संवाद बैठक सूरजकुंड येथे आयोजित करण्यात आली आहे आणि नंतर चिंतन बैठक. अशा बैठकांची गरज निवडणुकीच्या दबावाखेरीज काँग्रेसला वाटत नाही.
|
शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२ बातमी एक आणि चर्चा वेगळीच असे अनेकदा होते आणि अशी चर्चा कोणत्या विषयांतरांची वळणे घेत गेली, हे पाहिल्यास बातमीमागची बातमी कळत जाते.. इंटरनेटमुळे माहितीच्या पायघडय़ाच डोळ्यांसमोर उलगडू लागलेल्या असताना या चर्चा, ही विषयांतरे आणि वळणे ही सर्वासाठी खुली असलेली ठेव झाली आहे.
|
शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२ भारतास सध्या नवनैतिकवादाने ग्रासलेले असून त्याचा विळखा अधिकच प्रखर होईल अशी लक्षणे आहेत. नवनैतिकवादाचे प्राथमिक लक्षण म्हणजे याने ग्रासलेली व्यक्ती तिचे विहित कार्य करीत नाही आणि निवृत्ती घेऊन वा अन्य कारणाने त्या कार्यातून मुक्त होऊन समाजातील इतर घटकांना कर्तव्याचे धडे देऊ लागते. या व्याधिग्रस्तांच्या यादीतील विद्यमान भर म्हणजे अरविंद केजरीवाल. आपल्या आरोप मालिकेत त्यांनी काल दुनिया मुठ्ठी में घेऊ पाहणाऱ्या रिलायन्स उद्योगसमूहाने काँग्रेस पक्षास खिशात घातल्याचा आरोप केला.
|
गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२ मुंबई उच्च न्यायालयाने २००६ ते १० या काळातील घरखरेदीच्या व्यवहारांवर पाच टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) लागू करण्याचा निर्णय दिल्याने गेली काही वर्षे याबाबत असलेली संदिग्धता संपली असली, तरीही हा कर वसूल करण्याच्या पद्धतीचा वाद पुन्हा न्यायालयाच्याच दारात जाण्याची शक्यता आहे. घरखरेदीवरील व्हॅट बिल्डरांनी भरावा, असे आदेश न्यायालयाने दिले असल्याने त्यांना तो भरण्यावाचून पर्याय राहिलेला नाही.
|
बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२ वर्षभर उनाडक्या करणाऱ्याने परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यासाचे नाटक करावे आणि त्या बदल्यात परीक्षकाकडून सहानुभूतीची अपेक्षा धरावी तसे केंद्र सरकारचे झाले आहे. रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर आज आपले तिमाही पतधोरण जाहीर करणार असताना अर्थमंत्री चिदम्बरम यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आपले सरकार आर्थिक सुधारणांच्या मार्गावर कसे भरधाव निघाले आहे हे सांगायचा प्रयत्न केला.
|
मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२ पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारात माजी कायदामंत्री सलमान खुर्शीद यांना बढती मिळून परराष्ट्रमंत्री करण्यात आल्याने स्वघोषित भ्रष्टाचारविरोधी नेत्यांच्या अंगाचा तिळपापड उडाला असेल. या लढय़ाचे नवे नेते अरविंद केजरीवाल यांना तर सिंग यांच्या निर्णयाच्या मिरच्या जास्तच झोंबल्या असतील. भ्रष्टाचाराचा बीमोड व्हायला हवा याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याचीही काही पद्धत असते.
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>
|