सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२ मंत्रिमंडळात, मग ते राज्याचे असो वा केंद्राचे, राजकीय गटातटांप्रमाणे उद्योग क्षेत्रातील घडामोडींचेही प्रतिबिंब पडत असते. त्या अर्थाने बऱ्याच दिवसांपासून ज्याचे गुऱ्हाळ सुरू होते त्या मनमोहन सिंग यांच्या आजच्या मंत्रिमंडळ खांदेपालट आणि विस्तारातील लक्षणीय बाब म्हणजे पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांची बदली. रेड्डी आता पेट्रोल खात्यातून शिक्षण खात्यात जातील.
|
शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२ अमेरिकेत ज्या काळात ‘सुपरमॅन’ या पात्राच्या चित्रकथा अगदी पहिल्यांदा प्रसृत झाल्या, तो १९४५ ते ५० हा काळ छापील माध्यमाच्या ताकदीवर विश्वास असणाऱ्या लोकांचा होता. चित्रकथांचे छापील पुस्तक, तेही मासिकाच्या आकारात आणि दर महिन्यापंधरवडय़ाला आपल्या भेटीला येणारी चित्रकथांमधील पात्रे, ही कल्पना अमेरिकेतील आणि अन्यही देशांतील वाचकांना आवडू लागली होती. चित्रकथा हेच तेव्हाचे नवमाध्यम होते.
|
शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२ कारणपरत्वे तर्कबुद्धीने दगा देण्यास सुरुवात केल्यास व्यक्ती भावनेचा आधार शोधू लागते. हा नियम पक्ष, संघटना वा संस्था आदींना तितक्याच प्रमाणात लागू होतो. शिवसेना व त्या संघटनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हे झाले आहे. पक्षाच्या पारंपरिक दसरा मेळाव्यास संबोधन करताना त्यांनी जी भाषा वापरली त्यावरून हे समजून येईल. अन्य कोणत्याही व्यक्तीसारखेच आणि व्यक्तीइतकेच o्री. ठाकरे हे वयपरत्वे थकले आहेत.
|
गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२ राजकारण्यांनी उद्योग करूच नयेत का, असा प्रश्न केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केला आहे आणि त्याचे नाही असे उत्तर त्यांना अपेक्षित नाही. हा प्रश्न शरद पवार यांना अजित पवार, छगन भुजबळ वा सुनील तटकरे यांनी काही केलेल्या वा करून ठेवलेल्या उद्योगांमुळे पडला असे नाही; तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावरील आरोपांमुळे पडला आहे.
|
बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२ अष्टमी गेली, नवमी गेली आणि विजयादशमीचा सण उजाडला. परंपरेप्रमाणे मोरूचा बाप मोरूस म्हणाला, मोरू ऊठ. आज विजयादशमी. आजच्या दिवशी तरी किमान सूर्योदय पाहावा, असे शास्त्र सांगते. मोरूचा बाप लहान होता, तेव्हा त्यास वडील असेच उठवायचे. परंतु त्या वेळी गोष्ट वेगळी होती. आवाजाचे प्रदूषण अशी काही भानगड नसल्याने रात्री उशिरापर्यंत टिपऱ्या खेळता यायच्या.
|
मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२ हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास घडवणारा शोले हा सिनेमा ज्या वर्षी आला त्याच वर्षी दीवारदेखील प्रसृत झाला. शोलेची भव्यता त्यात नव्हती. शोलेने पुढे इतिहास घडवला. तरीही शोलेस एकही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही आणि इतिहासाला आकार देण्यात दीवारही मागे पडला नाही. मेरे पास माँ है.. हे त्यातील एक वाक्य अजरामर झाले आणि अँग्री यंग मॅनला विकल करणाऱ्या त्या वाक्याचे लेखक सलीम-जावेद हेही त्यामुळे यशोशिखरावर स्थानापन्न झाले.
|
सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२ आपल्या दिवटय़ाला, चि. सिद्धार्थ याला अठराव्या वाढदिवसाची भेट तीर्थरूप दिवटे विजय मल्या यांनी किंगफिशर एअरलाइन्स स्थापून दिली. ही घटना २००३ सालची. त्यानंतर हेच चिरंजीव सत्ताविसाव्या वर्षांत पदार्पण करीत असताना किंगफिशरचे विमान जमिनीवर उतरवण्याची वेळ सरकारवर आली. ज्या दिवशी सरकारकडून या कंपनीचा उड्डाण परवाना स्थगित केला गेला त्या दिवशी हे दिवटेद्वय लंडनमध्ये मौजमजा करीत होते.
|
शनिवार, २० ऑक्टोबर २०१२ जहांगीर आर्ट गॅलरी हे महाराष्ट्राच्या राजधानीतले सुपरिचित कलादालन आहे आणि या संस्थेला साठ वर्षे पूर्ण होत असल्याचा आनंद अनेकांना होणे साहजिकच आहे. मात्र कोणताही आनंद साजरा करायचा म्हटले की, त्याचा उत्सव किंवा इव्हेंट बनतो आणि मग इव्हेंटबद्दल औचित्याचे प्रश्न येतात. जहांगीर कलादालनाच्या साठीचा जो काही उरूस सध्या साजरा होतो आहे, त्याच्या औचित्याबद्दल प्रश्न आहेतच.
|
शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२ अरविंद केजरीवाल हे बुधवारी दिल्लीत नितीन गडकरी यांच्या विरोधात बार उडवण्यात मग्न होते त्याच दिवशी इकडे मुंबईत भ्रष्टाचारविरोधी लढय़ाचे आद्यपुरुष अण्णा हजारे हेही पत्रकार परिषद घेऊन आपल्या विझलेल्या फटाक्याची वात बदलण्याचा प्रयत्न करीत होते. अण्णा हजारे यांच्या बुधवारच्या पत्रकार परिषदेची दखलही घेतली गेली नाही आणि त्यांचे अनुयायी अरविंद केजरीवाल यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा गराडा पडला होता.
|
गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२ शीर्षस्थपदावरील व्यक्तीचा अचानक पदत्याग एका गोष्टीचा निश्चित निदर्शक असतो. ती म्हणजे परिस्थिती हाताळण्यात त्या व्यक्तीस अपयश आल्याने स्वत:हून राजीनामा देण्याचा निर्णय त्या व्यक्तीस घ्यावा लागला अथवा त्या व्यक्तीस नारळ देण्यात आला. विक्रम शंकर पंडित हे मंगळवारी रात्री अकस्मात सिटी बँकेच्या मुख्य कार्यकारी पदावरून पायउतार झाले त्या मागे ही दोन्हीही कारणे आहेत.
|
बुधवार, १७ ऑक्टोबर २०१२ भारतवर्षांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ज्यांनी आतला आवाज ऐकून सत्तेपासून दूर राहायचा निर्णय घेतला त्या त्यागमूर्ती सोनियाजी गांधी यांच्यासाठी जो प्रसंगी नश्वर नरदेहाचा त्यागही करावयास तयार आहे, त्या सलमान खुर्शीद यांच्यासाठी ७१ लाख रुपडे ते काय? याची आम्हा जनताजनार्दनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, दरमहा वेतनातूनच कापला जातो म्हणून प्रामाणिकपणे आयकर भरणाऱ्या सामान्य जनास कशी कल्पना असणार? आणि मुदलात ७१ लक्ष रुपयांचा संबंध आमच्यासारख्या अनेकांच्या अनेक पिढय़ांत कधी आलेला नाही. |
मंगळवार, १६ ऑक्टोबर २०१२ इंडियन प्रीमिअर लीग हे क्रिकेटमध्ये सगळ्यांच्या कानामागून येऊन तिखट झालेले बाळ आता सर्वच संबंधितांच्या गळ्याला नख लावेल की काय अशी परिस्थिती आहे. क्रिकेटपेक्षा क्रिकेट संघटना चालवण्यात रस असणाऱ्यांनी आयपीएल आवृत्तीमुळे क्रिकेट खेळाच्या लोकप्रियतेत किती आमूलाग्र बदल होईल याची स्वप्ने रंगविली होती आणि ही स्पर्धा जणू खेळासाठी क्रांतीच आहे, असे दावे केले होते. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>
|