अग्रलेख
मुखपृष्ठ >> अग्रलेख
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अग्रलेख
अग्रलेख : गप्प गड(बड)करी ! Print E-mail

 

सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२
भ्रष्टाचारास विरोध ही जणू आमचीच मक्तेदारी आहे आणि देशाची राजकीय व्यवस्था स्वच्छ करण्यासाठीच आमच्या पक्षाचा अवतार आहे, असा भाजपचा आव असायचा. परंतु सध्या देशात गाजणाऱ्या दोन महत्त्वाच्या भ्रष्टाचार प्रकरणांत या पक्षनेतृत्वावर मूग गिळून बसायची वेळ आली आहे, त्यावरून भाजपचे काँग्रेसीकरण फार वेगात होत असल्याचा निष्कर्ष कोणी काढल्यास त्यास दोष देता येणार नाही.

 
अग्रलेख : विषयांतरातून सत्याकडे Print E-mail

शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
साहित्याच्या नोबेल पारितोषिकाची चर्चा जितकी होते, तितकी ती तीन शास्त्रांच्या नोबेल-मानकऱ्यांबद्दल होत नाही. याचे उघड कारण हेच की, साहित्य वाचणाऱ्यांना त्याबद्दल बोलण्यात रस वाटत असतो. आपल्याला आवडणाऱ्या साहित्यिकाला हे पारितोषिक मिळाले, तर आनंदच होणार असतो.

 
अग्रलेख : नकारघंटांचा नाद Print E-mail

 

शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२
हल्ली आयोजकांच्या प्रतवारीनुसार भाषणे बेतण्याची नवी प्रथा चांगलीच रूढ झाली आहे. म्हणजे आयोजक गांधीवादी असतील तर आपल्या भाषणात गांधीवादच देशास कसे तारू शकतो असे म्हणायचे आणि आयोजक सावरकरवादी असले तर सावरकरांचे विचार नव्याने समजून घेण्याची गरज व्यक्त करायची. आयोजक आर्थिक सुधारणावादी असल्यास सुधारणांमुळे देश कसा प्रगतिपथावर घोडदौड करेल याचे चित्र रंगवायचे तर राजकीय पक्ष आयोजक असेल तर सुधारणांना मानवी चेहरा असण्याची गरज व्यक्त करायची.

 
अग्रलेख :मुलींचे भवितव्य.. Print E-mail

गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२
हरयाणामधील मुलींवर होणाऱ्या बलात्कारावर तेथील खाप पंचायतीने जो जालीम उपाय करण्याचा ठरवला आहे, तो देशाचे भविष्य सामाजिक क्षेत्रातही अधिक काळे करणारा आहे. देशातील मुलींचे घटते प्रमाण आणि बलात्कारांचे वाढते प्रमाण या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे लक्षात घेतले म्हणजे गेल्या वर्षांत या राज्यातील बलात्काराच्या घटनांचे प्रमाण दुपटीने का वाढले याचा उलगडा होऊ शकतो. सामाजिक दबावामुळे वा कौटुंबिक प्रतिष्ठेपायी नोंद न झालेल्या घटना याहून किती तरी अधिक असणे शक्य आहे!

 
अग्रलेख : अपारदर्शकतेचे तंत्र Print E-mail

 

बुधवार, १० ऑक्टोबर २०१२
पाटबंधारे खात्यात मुख्य अभियंता या पदावर काम करीत असलेल्या डॉ. विजय पांढरे यांनी राज्याच्या सिंचन क्षेत्राबाबत दिलेली माहिती खरी धरली, तर त्याचा अर्थ एवढाच होतो, की शासनाकडे कोणत्याच प्रकारची विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध नाही. संगणक क्रांतीनंतरच्या गेल्या दोन दशकांमध्ये भारतात तंत्रज्ञानाचा वापर इतका वाढला, की जगातील ही एक मोठी बाजारपेठ ठरली. बँकिंगपासून खासगी उद्योगांपर्यंत सर्वत्र  संगणकीकरण झाले. पाटबंधारे खात्याला मात्र संगणकीय क्रांतीचे वावडे असले पाहिजे, कारण त्यांची आकडेवारी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांकडे असलेली आकडेवारी यात फारच मोठी तफावत असल्याचे दिसत आहे.

 
अग्रलेख : खेळा आणि नाचा Print E-mail

मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
क्रिकेटमधील पराभव भारतीयांना त्रासदायक वाटतो. त्या एकाच खेळात भारताची काही शान आहे. ती धुळीला मिळाली की भारतीय अस्वस्थ होतो, मग तो क्रिकेटप्रेमी असो वा नसो. त्यातही पाकिस्तानबरोबर पराभव झाला तर तो जिव्हारी लागतो. ऑस्ट्रेलियाकडून झालेला पराभव कडवटपणा आणतो. इंग्लंडने पराभूत केले तर मानहानी झाल्यासारखे वाटते. पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्याबद्दल भारतीयांच्या मनात ठसन आहे. या संघांना विजय मिळाले तर भारतीयांना आनंद होत नाही.

 
अग्रलेख : दशमग्रह शांती Print E-mail

सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडू लागला की निवडणुका जवळ आल्याची खूणगाठ बांधता येते. त्याचमुळे गुजरात निवडणुकांची घोषणा होणे, नैतिकतेचे स्वयंघोषित मेरुमणी अरविंद केजरीवाल यांनी या क्षेत्रातील आपले गुरू अण्णा हजारे यांना घटस्फोट देऊन राजकीय पक्ष स्थापन करणे, आतापर्यंत झोपा काढणाऱ्या मनमोहन सिंग सरकारने नेमका आताच आर्थिक सुधारणांचा बिगूल फुंकणे आणि त्यापाठोपाठ सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होणे या सगळय़ांचा अन्योन्य संबंध आहे आणि त्या सगळय़ाचे धागेदोरे एकमेकांशी निगडित आहेत.

 
अग्रलेख :अंडे का फंडा Print E-mail

 

शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
संघटना फुटतात. काही व्यक्तिगत महत्त्वाकांक्षांपायी, तर काही वैचारिक आग्रहांमुळे. यापैकी दुसऱ्या प्रकारची फूट निभावणे अधिक कठीण असते. वैचारिक मतभेदांतून झालेली दोन शकले पुन्हा सांधणार कशी? राजकीय पक्षांना हेही साधते, कारण तत्त्वे तात्पुरती बाजूला ठेवून व्यावहारिक सहकार्य करणे त्यांना लाभदायक असते. पण समाज जिथे आपणहून संघटित होतो आणि आपापल्या धारणांची अभिव्यक्ती संघटनेतून करतो, तेव्हा अशा संघटनांमध्ये वैचारिक आग्रहांवरून पडलेली फूट पुन्हा कधीही सांधता येत नाही.. शिशुगीत म्हणून सर्वपरिचित असलेल्या एका इंग्रजी कवितेत अंडे फुटल्यावर राजाचे सारे उमराव आणि सारे घोडदळ यांची सत्ता-शक्तीदेखील फुटके अंडे सांधायला कमी पडेल, असा उल्लेख आहे.

 
अग्रलेख : सुधारणेला दृढ चालवावे Print E-mail

 

शुक्रवार, ५ ऑक्टोबर २०१२
मेले कोंबडे आगीला भीत नाही म्हणतात. मनमोहन सिंग सरकारची अवस्था तशी झाली असावी. जवळपास साडेतीन वर्षांच्या धोरणलकव्यानंतर, जगाच्या पातळीवर छी-थू करून घेतल्यानंतर आपली सरकारी प्रकृती कशी उत्तम आहे हे दाखवण्याची ऊर्मी सिंग यांना आणि पडद्याआडून सरकारच्या दोऱ्या हाती असणाऱ्या सोनिया गांधी यांनाही मनात आली असावी. कदाचित असेही असेल की राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने ममता बॅनर्जी यांची ब्याद डोक्यावरून उतरल्यामुळे सरकारला आपल्या निर्णय घेण्याच्या अवयवाची जाणीव झाली असावी.

 
अग्रलेख : ही काळाची गरज! Print E-mail

 

गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२
खासगी क्षेत्रातील वाईटावर उतारा म्हणून सार्वजनिक क्षेत्राचा पर्याय सुचवणाऱ्यांना आणि सार्वजनिक क्षेत्रातील अकार्यक्षमतेवर खासगी क्षेत्र हाच उतारा मानणाऱ्यांना दोन उदाहरणांनी सारखेच गप्प केले आहे. एअर इंडिया आणि किंगफिशर या दोन्ही कंपन्या म्हणजे त्या त्या क्षेत्रात काय वाईट होऊ शकते याचा उत्तम नमुना आहेत.

 
अग्रलेख : मरणांमागील मतलब Print E-mail

 

बुधवार, ३ ऑक्टोबर २०१२
आंतरराष्ट्रीय संबंधात काळे आणि पांढरे असे काही नसते आणि त्यातील बराचसा भाग हा करडय़ा रंगानेच व्यापलेला असतो. परंतु आपल्याकडे इतिहासाची मांडणी नायक आणि खलनायक अशा गटांत केली जाते आणि सामाजिकदृष्टय़ा नायक कोण आणि खलनायक कोण हे एकदा ठरवले गेले की, मग पुढील वाटचाल त्याच मार्गाने सुरू राहते.

 
अग्रलेख : ‘विजय’पथ Print E-mail

मंगळवार, २ ऑक्टोबर २०१२  :
गेल्या दहा दिवसांत दोन अर्थतज्ज्ञांनी विद्यमान वित्तस्थितीबाबत आपापली मते जाहीर केली. दोघांच्या तपशिलातील किरकोळ मतभेद वगळता त्यातून ध्वनित होणारा अर्थ एकच. मनमोहन सिंग सरकारला आपल्या धोरणलकवा विकाराचा त्याग लवकरात लवकर करावा लागेल, अन्यथा आर्थिक संकट अधिकच गहिरे होण्याची भीती आहे. गेल्या आठवडय़ात केंद्र सरकारचे वित्तीय सल्लागार रघुराम राजन यांनी आर्थिक सुधारणांचा मार्ग सरकार सोडणार नाही,

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो