सोमवार, १ ऑक्टोबर २०१२ आपल्याकडील संपत्तीच्या रकान्यात फक्त ‘सचोटी’ हे उत्तर लिहून बाकीची जागा कोरी ठेवण्यास धैर्य लागते. सरोश होमी कपाडिया यांच्याकडे ते धैर्य होते आणि त्या धैर्याने त्यांना आयुष्यभर साथ दिली. त्यामुळे सरन्यायाधीशपदाचा झगा उतरवताना न्या. कपाडिया यांचे हृदय केवळ अतीव समाधानाने ओतप्रोत भरले असेल.
|
शनिवार, २९ सप्टेंबर २०१२ राजकारण करताना डोके किती थंड ठेवायचे असते आणि भावनेच्या भरात निर्णय घेण्याचा अविचार कसा टाळायचा असतो याचा धडा अजित पवार यांना राजीनाम्याच्या तीनदिवसीय नाटकातून एव्हाना मिळाला असेल. कोणताही निर्णय घेताना पर्यायासाठीचा एक दरवाजा खुला ठेवायचा असतो आणि राजकारण हे बेरजेचे करायचे असते ही थोरल्या पवारसाहेबांची समस्त महाराष्ट्राला शिकवण.
|
शुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२ पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांची, डिझेल दरवाढीची भलामण करताना गेल्या आठवडय़ात देशवासीयांना १९९१ च्या आर्थिक संकटाची आठवण करून दिली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार रघुराम राजन यांनी विविध अर्थविषयक नियतकालिकांना मुलाखत देताना ही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली.
|
गुरुवार, २७ सप्टेंबर २०१२ एका दगडात अनेक पक्षी मारण्याची कला अजितदादा पवार यांना थेट सख्खे काका शरद पवार यांच्याकडून घरच्या घरीच शिकायला मिळाली असणार. मंगळवारी आकस्मिकपणे राजीनामा सादर करून त्यांनी आपण या कलेत किती नैपुण्य मिळवले आहे, हे जेव्हा सिद्ध केले तेव्हा अनेकांना थोरल्या पवार यांनी १९७८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खुपसलेल्या खंजिराची आठवण आली.
|
बुधवार, २६ सप्टेंबर २०१२ फाळणीच्या जखमा आणि पत्नीविना दहा मुलांचे लमाण घेऊन जगणाऱ्या गुरुमुख सिंग या गरीब शेतकऱ्याचा एकच मुलगा पुस्तकातला किडा होता आणि त्याला पाहून ते म्हणायचे, तू पंतप्रधान होशील. पुढे ७२ वर्षांनी ही गुरुबानी खरी ठरली आणि नियतीचा मनमोहन योगायोग असा की शेतमजुराचा हा पोरगा खरोखरच पंतप्रधान झाला. |
मंगळवार, २५ सप्टेंबर २०१२ महाराष्ट्र सरकारचे पाटबंधारे खाते हे बूड नसलेल्या भांडय़ासारखे आहे हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झालेले आहे. या भांडय़ात सरकारचा पैसा फक्त ओतला जातो. परंतु बूड नसल्यामुळे भांडे भरत नाही आणि ज्या कामासाठी तो ओतला जातो ते कामही पूर्ण होत नाही. बूड असते तर हा पैसा ओतू जाताना तरी दिसला असता.
|
सोमवार, २४ सप्टेंबर २०१२ पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले आणि किराणा क्षेत्रात परकीय गुंतवणूक, डिझेल दरवाढ आदी निर्णयांबाबत माहिती दिली. पंतप्रधान सिंग यांचे गेल्या काही महिन्यांतील मौन व्रत लक्षात घेता ते काय म्हणाले यापेक्षा त्यांना काही तरी म्हणावेसे वाटले हेच महत्त्वाचे आहे.
|
शनिवार २२ सप्टेंबर २०१२ अण्णा हजारे यांचे काही चुकले नाही, अरविंद केजरीवालदेखील चूकच आहेत असे म्हणण्यात अर्थ नाही.. मग बिघडले कोठे? कारणांविषयी अनेक तर्क लढविले जातील. दोघांचा अनुयायी वर्ग आधीपासून निरनिराळाच होता, दोघांच्या महत्त्वाकांक्षा भिन्न होत्या वा आहेत, अण्णांना राजकीय पक्ष स्थापनेचे पाऊल का उचलायचे नाही हे केजरीवाल प्रभृतींना नीट समजूनच घेता आले नाही.
|
शुक्रवार, २१ सप्टेंबर २०१२ आपण झाडाच्या ज्या फांदीवर बसलो आहोत तीवरच घाव घालणाऱ्या शेखचिल्लीप्रमाणे तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे आतापर्यंतचे राजकारण राहिलेले आहे. १९९३ साली माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात क्रीडामंत्री असताना ममताबाईंनी कोलकात्यात राव सरकारविरोधातच मोर्चा काढला होता.
|
बुधवार, १९ सप्टेंबर २०१२ आटपाट नगरात बघता बघता आषाढ सरला, श्रावणही संपला, अधिक भाद्रपदानेही निरोप घेतला आणि नेहमीचा भाद्रपद लागून तीन दिवस संपलेही आणि आता आली की गणेश चतुर्थी. खरे म्हणजे हे सगळे बघता बघता झाले असे म्हणणे योग्य नाही. कारण आता काही बघावे असे काही आटपाट नगरात वेगळे नसते. आटपाट नगरापासून दूर गावाकडे राहिलेल्या झाडाझुडपांतून श्रावण दिसतो थोडासा.
|
मंगळवार, १८ सप्टेंबर २०१२ देशातील सर्व संस्थांचे खच्चीकरण झालेले असताना एका संस्थेच्या बाबत मात्र आपण भारतीय म्हणून अभिमान बाळगायलाच हवा. ती म्हणजे रिझव्र्ह बँक. सोमवारच्या पतधोरणामुळे या मुद्दय़ावर शिक्कामोर्तबच झाले आहे. रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. दुव्वरी सुब्बाराव यांनी गेल्या दोन वर्षांत जवळपास डझनभरापेक्षाही अधिक वेळा व्याजदरात वाढ केली आणि सोमवारी जाहीर केलेल्या पतधोरणातही व्याजदरात सवलत नाकारली.
|
सोमवार, १७ सप्टेंबर २०१२ वर्षभर झोपा काढणाऱ्या विद्यार्थ्यांस परीक्षेच्या हंगामाची जाणीव होताच खडबडून जाग यावी आणि त्याने अभ्यासास सुरुवात करावी, तसे काहीसे मनमोहन सिंग सरकारचे झालेले दिसते. गेल्या तीन वर्षांच्या धोरणलकव्यानंतर गेल्या आठवडय़ात सिंग सरकारने महत्त्वाच्या निर्णयांचा धडाका लावला आणि आपल्या सरकारचा निर्णयक्षमतेचा अवयव शाबूत असल्याचे दाखवून दिले. या सर्व निर्णयांवर विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे कावकाव सुरू केली आहे.
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>
|