अग्रलेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अग्रलेख


अग्रलेख : दशमग्रह शांती Print E-mail

सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडू लागला की निवडणुका जवळ आल्याची खूणगाठ बांधता येते. त्याचमुळे गुजरात निवडणुकांची घोषणा होणे, नैतिकतेचे स्वयंघोषित मेरुमणी अरविंद केजरीवाल यांनी या क्षेत्रातील आपले गुरू अण्णा हजारे यांना घटस्फोट देऊन राजकीय पक्ष स्थापन करणे, आतापर्यंत झोपा काढणाऱ्या मनमोहन सिंग सरकारने नेमका आताच आर्थिक सुधारणांचा बिगूल फुंकणे आणि त्यापाठोपाठ सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होणे या सगळय़ांचा अन्योन्य संबंध आहे आणि त्या सगळय़ाचे धागेदोरे एकमेकांशी निगडित आहेत.

 
अग्रलेख :अंडे का फंडा Print E-mail

 

शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
संघटना फुटतात. काही व्यक्तिगत महत्त्वाकांक्षांपायी, तर काही वैचारिक आग्रहांमुळे. यापैकी दुसऱ्या प्रकारची फूट निभावणे अधिक कठीण असते. वैचारिक मतभेदांतून झालेली दोन शकले पुन्हा सांधणार कशी? राजकीय पक्षांना हेही साधते, कारण तत्त्वे तात्पुरती बाजूला ठेवून व्यावहारिक सहकार्य करणे त्यांना लाभदायक असते. पण समाज जिथे आपणहून संघटित होतो आणि आपापल्या धारणांची अभिव्यक्ती संघटनेतून करतो, तेव्हा अशा संघटनांमध्ये वैचारिक आग्रहांवरून पडलेली फूट पुन्हा कधीही सांधता येत नाही.. शिशुगीत म्हणून सर्वपरिचित असलेल्या एका इंग्रजी कवितेत अंडे फुटल्यावर राजाचे सारे उमराव आणि सारे घोडदळ यांची सत्ता-शक्तीदेखील फुटके अंडे सांधायला कमी पडेल, असा उल्लेख आहे.

 
अग्रलेख : सुधारणेला दृढ चालवावे Print E-mail

 

शुक्रवार, ५ ऑक्टोबर २०१२
मेले कोंबडे आगीला भीत नाही म्हणतात. मनमोहन सिंग सरकारची अवस्था तशी झाली असावी. जवळपास साडेतीन वर्षांच्या धोरणलकव्यानंतर, जगाच्या पातळीवर छी-थू करून घेतल्यानंतर आपली सरकारी प्रकृती कशी उत्तम आहे हे दाखवण्याची ऊर्मी सिंग यांना आणि पडद्याआडून सरकारच्या दोऱ्या हाती असणाऱ्या सोनिया गांधी यांनाही मनात आली असावी. कदाचित असेही असेल की राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने ममता बॅनर्जी यांची ब्याद डोक्यावरून उतरल्यामुळे सरकारला आपल्या निर्णय घेण्याच्या अवयवाची जाणीव झाली असावी.

 
अग्रलेख : ही काळाची गरज! Print E-mail

 

गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२
खासगी क्षेत्रातील वाईटावर उतारा म्हणून सार्वजनिक क्षेत्राचा पर्याय सुचवणाऱ्यांना आणि सार्वजनिक क्षेत्रातील अकार्यक्षमतेवर खासगी क्षेत्र हाच उतारा मानणाऱ्यांना दोन उदाहरणांनी सारखेच गप्प केले आहे. एअर इंडिया आणि किंगफिशर या दोन्ही कंपन्या म्हणजे त्या त्या क्षेत्रात काय वाईट होऊ शकते याचा उत्तम नमुना आहेत.

 
अग्रलेख : मरणांमागील मतलब Print E-mail

 

बुधवार, ३ ऑक्टोबर २०१२
आंतरराष्ट्रीय संबंधात काळे आणि पांढरे असे काही नसते आणि त्यातील बराचसा भाग हा करडय़ा रंगानेच व्यापलेला असतो. परंतु आपल्याकडे इतिहासाची मांडणी नायक आणि खलनायक अशा गटांत केली जाते आणि सामाजिकदृष्टय़ा नायक कोण आणि खलनायक कोण हे एकदा ठरवले गेले की, मग पुढील वाटचाल त्याच मार्गाने सुरू राहते.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 11