|
व्यक्तिवेध : डॉ. अमी बेरा |
|
|
शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीसह प्रतिनिधिगृहासाठी (काँग्रेस) झालेल्या निवडणुकीत भारतीय-अमेरिकी असलेल्या पाच दिग्गजांना पराभवाचा फटका बसल्याच्या पाश्र्वभूमीवर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार डॉ. अमी बेरा यांनी अतिशय अटीतटीच्या लढतीत मिळवलेले यश अधिक दिमाखदार आहे. त्यांची प्रतिनिधिगृहावर निवड झाली आहे. काँग्रेसवर निवडून आलेले ते तिसरे भारतीय वंशाचे अमेरिकी .
|
|
व्यक्तिवेध : विजयालक्ष्मी अय्यर |
|
|
गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
अलाहाबाद बँकेच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) पदावर एक महिन्यापूर्वी शुभलक्ष्मी पानसे यांची निवड झाली, तेव्हा मराठीच नव्हे तर अनेक महिलांना त्यांचे उमदे व्यक्तिमत्त्व प्रेरक वाटले होते.पानसे यांच्यापेक्षा खूप निराळय़ा व्यक्तिमत्त्वाच्या, पण तितक्याच कर्तबगार असलेल्या विजयालक्ष्मी अय्यर यांना आता दुसऱ्या राष्ट्रीयीकृत बँकेचे- ‘बँक ऑफ इंडिया’चे सीएमडी पद मिळाले आहे.
|
व्यक्तिवेध : शंकरराव काळे |
|
|
बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
चतुरस्त्र आणि नेमस्त म्हणून ज्येष्ठ नेते शंकरराव काळे यांचे नगर जिल्ह्य़ात स्वतंत्र स्थान होते. उच्चशिक्षणाने त्यांच्यातील सजग नेता घडला. सार्वजनिक जीवनात उणीपुरी पासष्ट वर्षे अग्रभागी राहून ते काळाच्या पडद्याआड गेले. कोपरगाव तालुक्यातील छोटय़ाशा गावात प्रतिकूल परिस्थितीत शंकरराव काळे यांनी जिद्दीने उच्च शिक्षण पूर्ण केले. १९४८ मध्ये अभियांत्रिकीतील पदवी घेतल्यानंतर त्या काळात त्यांना कुठल्याही सरकारी खात्यात मोठय़ा पगाराची व हुद्दय़ाची नोकरी मिळाली असती.
|
|
व्यक्तिवेध : राजेंद्र धवन |
|
|
मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२
पॅरिसवासी भारतीय चित्रकार म्हटले की, हा चित्रकार उगाच तोऱ्यात राहात असेल आणि सुट्टीत मायदेशी आला की भारतीय संस्कृतीबद्दल फार आस्था बाळगत असेल, अशी एक प्रतिमा चित्रकलाप्रेमींना माहीत आहे. या प्रतिमेच्या अगदी उलट राजेंद्र धवन होते. साधे. भारतात आले की, ‘मीच राजेंद्र धवन’ असे काही आर्ट गॅलऱ्यांत त्यांना सांगावे लागे आणि मग कुठे त्यांचे स्वागत वगैरे होई.
|
व्यक्तिवेध : सारा जोसेफ |
|
|
शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२
सारा जोसेफ या केवळ एक उत्कृष्ट कादंबरीकारच नव्हेत, तर केरळमधील स्त्रीवादी चळवळ पुढे नेण्याचे कामही त्यांनी नेटाने चालवले आहे. स्त्री म्हणून जन्माला आल्याचा आपल्याला अभिमान आहे. लैंगिक असमानतेला तोंड देणाऱ्या, वंचित समजल्या जाणाऱ्या, केवळ शरीरातच अडकवून ठेवलेल्या स्त्रीच्या समस्या निर्भीडपणे मांडणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे असे त्या म्हणतात. अलिकडेच केरळमधील ‘पद्मप्रभा साहित्य पुरस्कार’ मिळाल्याने त्या पुन्हा प्रकाशझोतात आल्या. त्यांच्या साहित्यामुळे केरळातील स्त्रियांच्या साहित्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणे समीक्षकांना भाग पडले.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>
|
Page 1 of 8 |