व्यक्तिवेध
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

व्यक्तिवेध


व्यक्तिवेध : सुनील गंगोपाध्याय Print E-mail

बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
alt

स्वातंत्र्योत्तर काळात देशातील सर्वच प्रांतांत व सर्वच क्षेत्रांत परिवर्तनाची एक लाट आली होती. बंगालच्या साहित्यातील साचलेपण, कवितेची चौकट मोडण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांत सुनील गंगोपाध्याय यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. नवकवितांची केवळ निर्मितीच करून ते थांबले नाहीत तर आपल्यासारख्या कवींना मुक्त व्यासपीठ मिळावे यासाठी ‘क्रितीबास’ नावाचे मासिक त्यांनी सुरू केले. नवोदित कवींनी नवनवीन काव्यप्रकार हाताळावेत, बंगाली कवितेला नवा आयाम द्यावा, या हेतूने सुरू केलेल्या या मासिकाचे संपादकही तेच होते आणि त्या वेळी त्यांचे वय होते अवघे १९!  सात सप्टेंबर १९३४ या दिवशी जन्मलेल्या गंगोपाध्याय यांना प्रतिभेचे जन्मजात देणे लाभलेले.

 
व्यक्तिवेध : ओव्हशिन्स्की Print E-mail

मंगळवार, २३ ऑक्टोबर  २०१२

जगात असे अनेक लोक असतात जे कुठल्याही मानसन्मानाच्या अपेक्षेने काम करीत नाहीत, पण समाजाला उपयोगी असे काही तरी करण्याची त्यांची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अशाच संशोधकांमध्ये स्टॅनफर्ड ओव्हशिन्स्की हे एक होते. हायब्रीड मोटारींसाठी लागणारी विजेरी म्हणजे निकेल मेटल हायड्राइड बॅटरी त्यांनी तयार केली होती. त्या बॅटरीचा वापर नंतर लॅपटॉप, कॅमेरे यातही केला जात असे. इलेक्ट्रॉनिक्स ज्या अर्धवाहक (सेमीकंडक्टर) या घटकावर अवलंबून आहे त्याचे स्वरूपच त्यांनी पालटून टाकले. त्यांनी शोधलेल्या तंत्राने अतिशय कमी पैशात अर्धवाहक तयार करता आले.

 
व्यक्तिवेध : कॅरोलिन ख्रिस्टोफ- बकार्गीव्ह Print E-mail

शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२

दृश्यकलेतील तात्त्विक, सामाजिक  वा राजकीय आशयाला गेल्या २५ वर्षांत कारागिरीपेक्षा अधिक  महत्त्व आल्यामुळे कलेच्या प्रदर्शनात वैचारिक सुसूत्रता वा आशयसंगती आणणारे सूत्रधार म्हणजे ‘विचारनियोजक’ (क्युरेटर) महत्त्वाचे ठरले. कॅरोलिन ख्रिस्टोफ-बकार्गीव्ह यांची कारकीर्द जरी कलेतिहासाच्या प्राध्यापक म्हणून सुरू झाली असली, तरी गेल्या १५ वर्षांत त्यांनी प्रदर्शनांचे विचारनियोजन सुरू केले आणि  आज त्या ‘जागतिक कलाक्षेत्रातील १००  प्रभावी व्यक्तीं’च्या यादीत पहिल्या क्रमांकावर गेल्या आहेत. ‘आर्टरिव्ह्यू’ या प्रतिष्ठित नियतकालिकातर्फे गेली ११ वर्षे ही यादी प्रसिद्ध होते आणि तीत यापूर्वी पहिला क्रमांक मिळवलेल्यांत बडे गॅलरीमालक व प्रचंड किंमत मिळवणारे दृश्यकलावंत यांचाच भरणा असे.

 
व्यक्तिवेध : कँडी क्रॉली Print E-mail

गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी खुल्या चर्चेची (‘लाइव्ह डिबेट’) सभ्य रस्सीखेच सध्या सुरू आहे, त्यापैकी दुसरी लढत मंगळवारी हॅम्पस्टेड येथे झाली. या ताज्या डिबेटचे वैशिष्टय़ म्हणजे तब्बल २० वर्षांनी कँडी क्रॉली या महिलेने चर्चेच्या नियामकाची भूमिका पार पाडली. १९९२मध्ये कॅरोल सिम्पसन या महिलेने अशा चर्चेचे नियमन केले होते. फुटबॉल सामन्यात जशा रेफ्रीविरुद्ध नेहमीच तक्रारी होत राहतात, तसेच या वेळी क्रॉली यांना टीकेचे धनी व्हावे लागले..

 
व्यक्तिवेध : फेलिक्स बॉमगार्टनर Print E-mail

मंगळवार, १६ ऑक्टोबर २०१२
alt

‘धाडसी’ ही त्यची ओळख कधीपासूनचीच! वयाच्या १९ व्या वर्षीपासून काही ना काही अचाट करून दाखवण्याचा ध्यास फेलिक्स बॉमगार्टनर याने घेतला होता, त्यामुळे ही ओळख रुळायला वेळ लागला नाही. त्याने एक लाख २८ हजार ९७ फुटांवरून मारलेली उडी, हा विक्रम मानावा की नाही याबद्दल दुमत आहे; परंतु एक गोष्ट नक्की आहे : तीन-तीन कॅमेरे अंगावर घेऊन फेलिक्सने ही उडी मारली, त्यामुळे त्याचा प्रत्येक मिलिसेकंद नोंदवला गेला आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 3 of 8