व्यक्तिवेध
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

व्यक्तिवेध


व्यक्तिवेध : फॅबिओला मान Print E-mail

लंडनमध्ये बुद्धय़ांक मोजणारी मेन्सा सोसायटी ही एक प्रतिष्ठित संस्था आहे. ज्यांना आपल्या बुद्धिमत्तेचा गर्व असेल त्यांनी खुशाल तिथे जाऊन आपले गर्वहरण करून घ्यावे, परंतु मूळ गोव्याच्या असलेल्या एका १५ वर्षांच्या मुलीने मेन्सा आयक्यू चाचणीत १६२ गुण मिळवून बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली आहे.

 
व्यक्तिवेध : अनलजित सिंग Print E-mail

 

सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२

भारतातील उद्योगधुरिणांच्या यादीत मॅक्स इंडियाचे संस्थापक व व्होडाफोन इंडियाचे अध्यक्ष अनलजित सिंग यांचे नाव अग्रस्थानी आहे यात शंका नाही. त्यांना व्यक्तिगत नेतृत्व व समाजातील योगदानासाठी यंदाचा सुवर्ण मयूर पुरस्कार नुकताच लंडनमध्ये प्रदान करण्यात आला. युरोपातील काही नामवंत संस्थांकडून हा पुरस्कार दिला जातो. अनलजित सिंग यांची उद्योगव्यवसायातील कारकीर्द एका घरगुती अन्यायाच्या कहाणीतून नावारूपास आलेली आहे.

 
व्यक्तिवेध : मलाला युसुफज्माई Print E-mail

 

शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२

तिच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस वा अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसह अनेक उच्चपदस्थ करत आहेत. ‘तथाकथित मवाळ, धर्मनिरपेक्ष कल्पनांचा प्रसार करत राहिल्याबद्दल’ मलाला युसुफज्माई  हिने तालिबान्यांचा जो हल्ला ओढवून घेतला असे तालिबानचे म्हणणे आहे; परंतु तालिबानची सद्दी असलेल्या स्वात  प्रांतातही हल्ल्याचा निषेधच होतो आहे आणि कराची, लाहोरसारख्या शहरांत तर, तरक्कीपसंद पाकिस्तानींना मलालावरील हल्ल्याने जणू पुन्हा एकत्र आणले आहे. कुठेही राहणारे वा कुठल्याही धर्माचे असलो तरी आम्हालाही शिकायचे आहे, इतरांसारखीच आर्थिक प्रगतीची स्वप्ने पाहायची आहेत, हा या पाकिस्तानींचा अस्फुट उद्गार स्पष्टपणे जगापुढे पोहोचवण्याचे काम १४ वर्षांची मलाला २००९ पासून करीत होती.

 
व्यक्तिवेध : डॉ. मंदा बॅनर्जी Print E-mail

गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२

खगोलशास्त्रासारख्या वेगळ्या क्षेत्रात मुशाफिरी केलेल्या इंग्लंडस्थित भारतीय महिला खगोलवैज्ञानिक डॉ. मंदा बॅनर्जी यांनी अलीकडेच कृष्णविवर म्हणजे ब्लॅकहोलच्या मालिकेचा शोध घेतला आणि हे कृष्णविवर, आजवरचे सर्वाधिक वस्तुमानाचे ठरले आहे.  विश्वाच्या जन्मकाळी जशी कृष्णविवरे होती तशीच ती आहेत.  ही कृष्णविवरे आतापर्यंत सापडली नाहीत याचे कारण ती धुळीच्या जाड थरात कोशस्थ होऊन जात होती. त्यांचे हे संशोधन रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी शोधलेले कृष्णविवर पृथ्वीपासून ११ अब्ज प्रकाशवर्षे दूर आहे.

 
व्यक्तिवेध : अच्युत मरार Print E-mail

 

बुधवार, १० ऑक्टोबर २०१२

चाकाच्या खुर्चीतून मंगळवारी ते राष्ट्रपती भवनात आले होते, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना देण्यासाठी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी खाली उतरले, त्यांच्या खुर्चीपर्यंत गेले.. ‘थ्रिप्पेकुलम अच्युता मरार’ असे त्यांचे पूर्ण नाव काहीसे बिगरमल्याळी वळणाने उच्चारले गेले, तेव्हा याच पुरस्काराच्या यंदाच्या ३५ मानकऱ्यांपैकी अनेकांच्या माना त्यांच्या दिशेने वळल्या! या नावातले ‘त्रिपेकुलम्’ हे केरळच्या त्रिचूर (थिस्सूर) जिल्ह्यातील लहानसे खेडे. तिथे १९२१ साली सीतारामन् एम्बान्तिरी यांच्या घरी अच्युत मरार यांचा जन्म झाला आणि वयाची पहिली पाच वर्षे सोडली तर, जन्मभर अच्युत मरार यांनी केरळचे ‘चेंडम्’ हे मृदुंगाइतके बोलके, पण उभे वाद्य वाजवले.. पुढे इतरांनाही वाजवायला लावले आणि शिकवले. 

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 4 of 8