व्यक्तिवेध
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

व्यक्तिवेध


व्यक्तिवेध : डॉ. रवींद्रकुमार सिन्हा Print E-mail

मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
alt

बिहारचे डॉ. रवींद्रकुमार सिन्हा अशांपैकी एक आहेत. ‘डॉॅल्फिन मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ते देशाला परिचित आहेत. पाटणा विद्यापीठात पर्यावरणशास्त्राचे विभागप्रमुख असलेल्या सिन्हा यांनी नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या डॉल्फिन माशांना वाचवण्यासाठी एक मोहीमच राबवली आहे. गेली ३० वर्षे ते डॉल्फिन बचावची हाक देत जनजागरण करीत आहेत. त्यांच्या नावापुढील पदव्यांची रांग बघितली तर एवढा विद्वान माणूस अशा एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन एका मुक्या जिवासाठी लढतो आहे ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे.

 
व्यक्तिवेध : पं. यशवंतबुवा जोशी Print E-mail

सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२

महाराष्ट्रात अभिजात संगीताची गंगोत्री आणणाऱ्या बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांची गायकी त्याच दिमाखात आणि त्याच लयीत परंपरेने टिकवून ठेवणाऱ्या यशवंतबुवा जोशी यांच्या निधनाने भारतीय संगीतातील एका संपन्न परंपरेतला एक तेजस्वी तारा निखळला आहे. गायकी शिकायची तर ती अंगात मुरवावी लागते. ती नुसती स्वरांच्या अंगाने म्हणजे बंदिशीची स्वररचना मुरवून चालत नाही, तर लयीत घोळलेल्या स्वरशब्दांसह मुरवावी लागते.

 
व्यक्तिवेध : डॉ. अबान मेस्त्री Print E-mail

 

शुक्रवार, ५ ऑक्टोबर २०१२

‘पहिल्या पूर्णवेळ (प्रोफेशनल) महिला तबलावादक’ म्हणून डॉ. अबान मेस्त्री यांची नोंद लिम्का बुकाने घेतली होती खरी; पण हे कौतुक सामान्यजनांना.. ‘भाजे येथील २३०० वर्षांपूर्वीच्या (इसवी सन पूर्व २००) लेण्यात तबलासदृश वाद्य वाजविणाऱ्या एका महिलेचे उत्थितशिल्प दिसते’ हे अबान मेस्त्री यांनीच प्रबंधात नमूद केले होते! अबान यांची गेल्या ५० वर्षांची सांगीतिक कारकीर्द केवळ तबल्याच्या तालाने नव्हे, तर सतार आणि कंठसंगीत, तसेच हिंदी व संस्कृतच्या विद्यापिठीय अभ्यासाने बहरली होती, हे संगीताच्या जाणकारांना अधिक महत्त्वाचे वाटते.

 
व्यक्तिवेध : निवेदिता भसीन Print E-mail

 

गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२

ड्रीमलायनर विमानाच्या निमित्ताने एका महिला वैमानिकाचे महत्त्व विशेष अधोरेखित झाले आहे, त्यांचे नाव आहे निवेदिता भसीन. या विमानाच्या कॅप्टन म्हणून त्यांनी काम पाहिले. देशात बोइंग विमानाची चाचणी घेणाऱ्या त्या एकमेव महिला वैमानिक (टेस्ट पायलट) आहेत. निवेदिता यांचा जन्म १९६३ मध्ये झाला. ‘लहान असताना इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करायचे असे मनापासून वाटत होते, विमान चालवणे हे आव्हानात्मक होते पण सकारात्मक ऊर्जेने मला एक उत्तम वैमानिक बनवले’ असे त्या सांगतात. भारतीय हवाई वाहतुकीच्या इतिहासात त्यांनी अनेक विक्रम केले आहेत.

 
व्यक्तिवेध : एरिक हॉब्सबॉम Print E-mail

 

बुधवार, ३ ऑक्टोबर  २०१२

हिटलरचा उदय संहारकच ठरणार याची खात्री झाल्याने एरिक हॉब्सबॉम वयाच्या सोळाव्या वर्षी, १९३३ सालीच लंडनला आले. तोवर कार्ल मार्क्‍सचे वाचन एरिक यांनी सुरू केले होते. १९३६ पासून ते शिष्यवृत्तीवर शिकले. १९४७ मध्ये पीएच.डी. मिळाली. ४८ साली पहिले पुस्तक प्रकाशित झाले व  बर्कबेक कॉलेजात नोकरीही मिळाली, जी अखेपर्यंत टिकली. या साध्या घटनाक्रमामागचे व्यक्तिमत्त्व किती अभ्यासू व चतुरस्र व्यासंगी आहे, हे कळण्यासाठी मात्र १९६२, ७५ आणि ८७ साले उजाडावी लागली- १७८९ ते १९१४ या काळाचा धांडोळा आर्थिक आणि सामाजिक अंगाने घेणारी त्यांची तीन पुस्तके (एज ऑफ रिव्होल्युशन, एज ऑफ कॅपिटल व एज ऑफ एम्पायर) नावाजली गेली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 5 of 8