व्यक्तिवेध
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

व्यक्तिवेध


व्यक्तिवेध : ए. सेतुमाधवन Print E-mail

 

गुरुवार, १३ सप्टेंबर २०१२

नॅशनल बुक ट्रस्ट म्हणजे ‘एनबीटी’ ही गेल्या दोन पिढय़ांना स्वस्त आणि दर्जेदार किंवा माहितीपर पुस्तके उपलब्ध करून देणारी सरकारी संस्था, सर्व भारतीय भाषांत वर्षांला दीड ते दोन हजार पुस्तके प्रकाशित करते आणि लेह (लडाख)सारख्या ठिकाणीही पुस्तकमेळे भरवते! भारतीय ग्रंथव्यवहाराच्या या शिखर संस्थेची वाटचाल दक्षिणेपेक्षा उत्तर भारताला झुकते माप देणारी असल्याचा आक्षेप असलाच, तर तोही आता एनबीटीच्या अध्यक्षपदाची सूत्रे ए. सेतुमाधवन यांच्या हाती गेल्याने धुऊन निघणार आहे. मराठीजनांना ते परिचित नसतील.

 
व्यक्तिवेध : बिल मॉगरिज Print E-mail

 

बुधवार, १२ सप्टेंबर २०१२

अर्धशतकापूर्वी खोलीभर आकाराचा असलेला संगणक खऱ्या अर्थाने हातांत आला  तो  लॅपटॉपमुळे.. हे लोभस रूपडे देण्यात ज्यांनी हातभार लावला त्यात ब्रिटनचे औद्यौगिक आरेखक (इंडस्ट्रिअल डिझायनर) बिल मॉगरिज यांचा मोठा वाटा आहे. त्यांनीच जगातील पहिल्या लॅपटॉपची रचना तयार केली होती. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये १९४३ मध्ये झाला. सेंट्रल सेंट मार्टिन्स कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइन या संस्थेत त्यांनी आरेखनाची बाराखडी गिरवली होती. अलिकडेच अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे त्यांचे निधन झाले. २०१० पर्यंत ते स्मिथसॉनियनच्या कूपर हेविट नॅशनल डिझाइन म्युझियमचे संचालक होते.

 
व्यक्तिवेध : स.पां.देशपांडे Print E-mail

मंगळवार, ११ सप्टेंबर २०१२

शिक्षक चांगला असेल तर गणितही रंजक करता येते. प्राध्यापक स. पां. देशपांडे हे अशी किमया साधलेले हाडाचे गणित शिक्षक होते. त्यांच्या निधनाने आंतरराष्ट्रीय गणित वर्षांत गणितावर प्रेम करणारे एक उमदे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांचा जन्म शिरवळ (जि. सातारा) इथला, शालेय शिक्षणानंतर ते पुण्यात आले. गणित विषयात एमएस्सी केल्यावर त्यांनी दोन वर्षे स. प. महाविद्यालयात फिजिक्स डेमोनस्ट्रेटर म्हणून काम केले.

 
व्यक्तिवेध : पं. मनोहर चिमोटे Print E-mail

सोमवार, १० सप्टेंबर २०१२

भारतीय संगीतात वाद्यसंगीताचे एक स्वतंत्र आणि समृद्ध असे दालन आहे. वाद्यांमधून अभिजात संगीताचा संपन्न अनुभव देऊ शकणाऱ्या प्रतिभासंपन्न कलावंतांची खाणच भारतात गेल्या काही शतकांमध्ये निर्माण होत आलेली आहे. भारतीय संगीताच्या अभिव्यक्तीसाठीच्या वाद्यांबरोबरच परदेशातून आलेल्या रीड ऑर्गन (पायपेटी) किंवा हार्मोनिअम या वाद्यांनी भारतीय संगीतात गेल्या दोन शतकांच्या काळात भरीव कामगिरी केली आहे.

 
व्यक्तिवेध : तुलसी गॅबार्ड Print E-mail

शुक्रवार, ७ सप्टेंबर २०१२

ती भारतीय नाही, भारतीय वंशाचीही नाही, फक्त हिंदू-अमेरिकी आहे.. तरीही तिचे नाव सर्वतोमुखी आहे. अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकांचे पडघम वाजत असताना उत्तर कॅरोलिनात डेमोक्रॅटिक पक्षाचे जे राष्ट्रीय अधिवेशन झाले त्यात तिने अध्यक्ष बराक ओबामा यांच्या बाजूने जे बिनतोड युक्तिवाद केले त्यामुळे श्रोते अवाक झाले नसतील तरच नवल. तुलसी गॅबार्डच्या नावातच दोन संस्कृतींचा मिलाफ दिसतो. तिला भक्कम राजकीय वारसा लाभलेला आहे यात शंका नाही.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 7 of 8