अन्वयार्थ
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अन्वयार्थ


अन्वयार्थ : विरोधाची ‘उत्स्फूर्त’ चक्रे.. Print E-mail

 

गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२

समाजात काही चांगले घडावे अशी अपेक्षा सगळेजण व्यक्त करत असतात. मुंबईकरांनी स्वत:च एक पाऊल पुढे टाकून काही चांगले घडविण्याची उत्स्फूर्त सुरुवातदेखील केली आणि त्यामध्ये सहभागी होण्याची संधीही मुंबईकराला मिळाली. त्यासाठी सरकारी फतवा काढला गेला नाही किंवा सरकारी यंत्रणांच्या संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली गेली नाही. ‘आपल्या हितासाठी आपलाच पुढाकार’ हा बाणा पुन्हा एकदा मुंबईकरांनी जागविला.

 
अन्वयार्थ : मोदींचा दिग्विजय Print E-mail

 

गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे कधीही आमच्याकडे व्हिसासाठी अर्ज करू शकतात, असे सांगून जणू अमेरिकेने आता मोदींनी व्हिसा घ्यावाच, असे आर्जव केले आहे. मोदी हेच पंतप्रधानपदाचे लायक उमेदवार आहेत, या त्यांच्या काही लाख चाहत्यांच्या विश्वासाला बळकटी देणाऱ्या घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर घडू लागल्या आहेत. २००२ मधील गुजरातमधील नरोडा पतियासारख्या हत्याकांडांमुळे ब्रिटनप्रमाणे अमेरिकेनेही मोदींपासून चार हात लांब राहण्याचे धोरण स्वीकारले होते. मोदींशी व्यापारी संबंध ठेवण्यात आपलेच हित आहे हे कळत असूनही हत्याकांडांचे माप ज्या-त्या आमदाराच्या पदरात सर्वोच्च न्यायालयाने घालण्याची वाट या देशांना पाहावी लागली.

 
अन्वयार्थ : टोलवाटोलवी Print E-mail

बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२

राज्यातील रस्तेबांधणीचे काम करण्यासाठी शासनाकडे पुरेसा निधी नसल्याने ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर राज्यातील महत्त्वाचे मार्ग खासगी संस्थांकडून बांधून घेण्यात आले आणि तो खर्च वसूल करण्यासाठी टोल आकारणीला सुरुवात झाली. नवे रस्ते जुने झाले. काही तर उखडून पूर्ववतही झाले. तरीही टोल वसुली मात्र सुरूच असल्याने राज्यातील नागरिकांमध्ये तो नेहमीच टीकेचा विषय बनला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याबाबत जुलै महिन्यात आंदोलन करून टोल न भरण्याचे आवाहनही केले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक टोल नाक्यावर उभे राहून प्रत्यक्ष माहिती गोळा केली.

 
अन्वयार्थ : वादळ आणि ‘जागतिक’ घबराट Print E-mail

बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२

अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर थडकून न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी या शहरांना वेठीस धरणाऱ्या ‘सँडी’ नावाच्या हरिकेनने (चक्रीवादळाने) कॅरिबियन बेटांपासूनच तडाखे देत तब्बल ८० जणांचे बळी घेतले. या वादळाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फटका पाच कोटी अमेरिकनांना होणार असल्याचे सांगण्यात येते. दहा लाख रहिवाशांचे स्थलांतर, न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज अपवादात्मक सलग दोन दिवसांसाठी बंद ठेवावे लागणे, याच शहरातील १०८ वर्षांपूर्वीचा सब-वे बंद ठेवणे, १५ हजारांहून अधिक विमानांची उड्डाणे रद्दच करावी लागणे, मॅनहॅटनसारख्या प्रतिष्ठित भागात  पाच लाख घरांची वीज जाणे, राष्ट्राध्यक्षांना न्यूयॉर्क, न्यूजर्सी या शहरांसाठी आणीबाणी जाहीर करावी लागणे.. अशा वेगवेगळ्या परिणामांनी या वादळाची तीव्रता किती जास्त आहे हे दाखवून दिले.

 
अन्वयार्थ : शिक्षकांना शिक्षा Print E-mail

मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२

शाळेतल्या विद्यार्थ्यांना आता कोणत्या प्रकारची शिक्षा द्यायची, याचा विचार शिक्षकांना करावा लागणार आहे. कारण त्यांची कोणतीही कृती तीन वर्षांच्या तुरुंगवासास कारणीभूत ठरू शकेल. शाळेतल्या विद्यार्थ्यांना यापुढे छडीचा मार देता येणार नाही, की दिवसभर बाकावर उभे करता येणार नाही.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 12