अन्वयार्थ
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अन्वयार्थ


अन्वयार्थ : लोकप्रियतेचा ‘फॉम्र्युला’! Print E-mail

मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२

फॉम्र्युला-वन हा मनोरंजनपर आणि टीव्हीसमोर बसून आनंद घेण्यासारखा खेळ. ‘याचि देही, याचि डोळा’ हा खेळ पाहणाऱ्यांना वेगाचा थरार प्रत्यक्ष अनुभवता येतो; पण सर्किटच्या एका कोपऱ्यात बसलेल्या प्रेक्षकांना समोरून येणारी कार कोणाची हे समजण्याआधीच ती कार डोळ्यांसमोरून बऱ्याच पुढे गेलेली असते. म्हणूनच फॉम्र्युला-वन हा खेळ टीव्हीवर पाहणाऱ्यांची संख्याच अधिक आहे.
 
अन्वयार्थ : संघाची चाल Print E-mail

 

शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२

राममंदिराचा मुद्दा पुन्हा निर्माण करून देशात दोन वर्षांनंतर किंवा त्यापूर्वीही होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवा दारूगोळा पुरवल्याचे दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणावरून स्पष्ट झाले आहे. गेले दीड वर्ष देशातील राजकारण भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर ढवळून निघत असल्याने येत्या निवडणुकीत हाच मुद्दा अग्रभागी राहणार, याबद्दल कुणाला शंका नव्हती. राष्ट्रकुल स्पर्धा, टू जी स्पेक्ट्रम यांसारख्या घोटाळय़ांच्या पाठोपाठ राजकीय व्यक्तींनी सत्तास्थानावरून केलेल्या घोटाळय़ात शशी थरूर यांच्यापासून ते सलमान खुर्शीद यांच्यापर्यंत आणि रॉबर्ट वढेरा यांच्यापासून ते रा. स्व. संघाचा आशीर्वाद असलेल्या भारतीय जनता पक्षाचे दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ घातलेले नितीन गडकरी यांच्यापर्यंतच्या प्रत्येकाने येत्या निवडणुकीसाठी भरपूर मुद्दे निर्माण केले असताना, रा. स्व. संघाने पुन्हा एकदा राममंदिराचा मुद्दा पुढे आणला.

 
अन्वयार्थ : उद्योग तगवायचे, की..? Print E-mail

 

शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२

कधी काळी महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक प्रगत राज्य होते, असे आता फक्त म्हणायचे! कारण उद्योगदृष्टय़ा पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या या राज्यात येण्यास आता नवीन उद्योगधंदे कचरत आहेत; तर नामांकित म्हणावेत असे बडे उद्योग काढता पाय घेण्याच्या बेतात आहेत. संपूर्ण देशात पराकोटीची महागडी वीज, शिवाय विजेचे प्रचंड दुर्भिक्ष असलेल्या राज्यात उद्योगांनी टिकाव धरण्याची अपेक्षा तरी कशी करता येईल? महाराष्ट्रात उद्योग, उद्यमशीलतेसाठी अनुकूल वातावरणच राहिलेले नाही, ही तक्रार गेल्या दशकभरापासून सुरू आहे; पण धोरण बदलेल; वाट दिसेल असा उजेड मात्र दृष्टिपथात नाही.

 
अन्वयार्थ : संकट की संधी? Print E-mail

गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
alt

अगदी वीस-पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत घराघरात गरजेपेक्षा अधिक दूध घेतले जात नसे. एखाद्या पक्वान्नाएवढे त्याचे मोल होते. सरकारी दूध योजनेत मिळणाऱ्या स्वस्त दुधाचे कार्ड मिळण्यासाठी तेव्हा वशिलेबाजी चालायची आणि असे कार्ड मिळणाऱ्याची समाजातील पतही जास्त असे. गल्लोगल्ली असणाऱ्या दूध वितरण केंद्रावर पहाटे रांग लागत असे. त्याचे एक कारण खासगी दूध उत्पादकांची संख्या कमी होती आणि त्यांचा दरही जास्त होता.

 
अन्वयार्थ : शहाणा सल्ला, पण.. Print E-mail

गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
alt

सरकारी नोकऱ्यांसंबंधात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी डोंबिवलीच्या कार्यक्रमात वस्तुस्थिती स्पष्ट शब्दांत मांडली हे चांगले झाले. सरकारी नोकऱ्या हे यापुढे रोजगार मिळविण्याचे मुख्य साधन असणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारी नोकऱ्यांवर विसंबून राहू नका, खासगी क्षेत्रात संधी शोधा, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला. आर्थिक सुधारणा देशात येऊन वीस वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी अजूनही बहुसंख्य लोकांच्या मनात सरकारी नोकरी हाच रोजगाराचा मुख्य मार्ग असतो.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 4 of 12